Sunday, 25 August 2024

शास्त्रों में स्वच्छता के सूत्र–

 ।।श्रीगणेशाय नमः।।


शास्त्रों में स्वच्छता के सूत्र–


हमारे पूर्वज अत्यंत दूरदर्शी थे। उन्होंने  हजारों वर्षों पूर्व वेदों व पुराणों में महामारी की रोकथाम के लिए परिपूर्ण स्वच्छता रखने के लिए स्पष्ट निर्देश दे रखें हैं–


1. लवणं व्यञ्जनं चैव घृतं

    तैलं तथैव च। 

    लेह्यं पेयं च विविधं 

    हस्तदत्तं न भक्षयेत्।। 

    -धर्मसिन्धू 3 पू. आह्निक


नामक, घी, तेल, चावल, एवं अन्य खाद्य पदार्थ चम्मच से परोसना चाहिए, हाथों से नहीं।


2. अनातुरः स्वानि खानि न 

    स्पृशेदनिमित्ततः।।

    -मनुस्मृति 4/144


अपने शरीर के अंगों जैसे आँख, नाक, कान आदि को बिना किसी कारण के छूना नहीं चाहिए।


3. अपमृज्यान्न च स्न्नातो

    गात्राण्यम्बरपाणिभिः।। 

    -मार्कण्डेयपुराण 34/52


एक बार पहने हुए  वस्त्र धोने के बाद ही पहनना चाहिए। स्नान के बाद अपने शरीर को शीघ्र सुखाना चाहिए।


4. हस्तपादे मुखे चैव पञ्चाद्रे

    भोजनं चरेत्।।

    पद्म०सृष्टि.51/88

    नाप्रक्षालितपाणिपादो

    भुञ्जीत।।

    -सुश्रुतसंहिता चिकित्सा

    24/98

 अपने हाथ, मुंह व पैर स्वच्छ करने के बाद ही भोजन करना चाहिए।


5. स्न्नानाचारविहीनस्य सर्वाः 

    स्युः निष्फलाः क्रियाः।।


   -वाघलस्मृति 69


बिना स्नान व शुद्धि के यदि कोई कर्म किये जाते हैं तो वो निष्फल रहते हैं।


6. न धारयेत् परस्यैवं

    स्न्नानवस्त्रं कदाचन।I

    -पद्म० सृष्टि.51/86


स्नान के बाद अपना शरीर पोंछने के लिए किसी अन्य द्वारा उपयोग किया गया वस्त्र (टॉवेल) उपयोग में नहीं लाना चाहिये।


7. अन्यदेव भवद्वासः

    शयनीये नरोत्तम।

    अन्यद् रथ्यासु देवानाम

    अर्चायाम् अन्यदेव हि ।।

    - महाभारत अनु 104/86


पूजन, शयन एवं घर के बाहर  जाते समय अलग-अलग वस्त्रों का उपयोग करना चाहिए।


8. तथा न अन्यधृतं (वस्त्रं 

    धार्यम्।।

   -महाभारत अनु 104/86


दूसरे के द्वारा पहने गए वस्त्रों को नहीं पहनना चाहिए।


9.  न अप्रक्षालितं पूर्वधृतं

     वसनं बिभृयाद्।।

    -विष्णुस्मृति 64


एक बार पहने हुए वस्त्रों को स्वच्छ करने के बाद ही दूसरी बार पहनना चाहिए।


10. न आद्रं परिदधीत।।

-गोभिसगृह्यसूत्र 3/5/24


गीले वस्त्र न पहनें।


सनातन धर्म ग्रंथो के माध्यम से ये सभी सावधानियां समस्त भारतवासियों को हजारों वर्षों पूर्व से सिखाई जाती रही हैं।

इस पद्धति से हमें अपनी व्यक्तिगत स्वच्छता को बनाये रखने के लिए सावधानियां बरतने के निर्देश तब दिए गए थे जब आज के जमाने के माइक्रोस्कोप नही थे। लेकिन हमारे पूर्वजों ने वैदिक ज्ञान का उपयोग कर धार्मिकता व सदाचरण का अभ्यास दैनिक जीवन में स्थापित किया था।आज भी ये सावधानियाँ अत्यन्त प्रासंगिक हैं। यदि हमें ये उपयोगी लगती हो तो इनका पालन कर सकते हैं।

*आदिपंढरी

 *आदिपंढरी* 



वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते.


लखपती दीदी' मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात दाखल

 'लखपती दीदी' मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात दाखल

 

जळगाव,दि. २५ (जिमाका) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'लखपती दीदी' मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदतपुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिक,  जिल्हाधिकारी आयुष प्रसादपोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दीदींशी  संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दीदी संमेलन स्थळी आगमन झाले. 

प्रधानमंत्र्यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले‌. 

राज्यस्तरीय कृषी महोत्सवास एक दिवस मुदतवाढ. कृषी

 राज्यस्तरीय कृषी महोत्सवास एक दिवस मुदतवाढ.

                                                          कृषी मंत्री धनंजय मुंडे 

 

मुंबई, दि.24 : परळी वैजनाथजिल्हा- बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे दि. २१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. कृषी महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवस वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या कृषी महोत्सवाचा समारोप दि. २५ ऑगस्ट ऐवजी २६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येईल.  सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठाकृषी अवजारेसिंचन साधनेसंरक्षित शेती साधनेमहिला गटबचत गटशेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादींच्या उत्पादित वस्तूखाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री साठी ४०० हून अधिक स्टॉल प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठकृषी विज्ञान केंद्रकृषी विभागमहाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रमझालेले संशोधन यांची देखील माहिती या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. तसेच रानभाजी महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील' सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील'

सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार

३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

                                              - महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि.२४.   'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने   सुरू आहे. ज्या महिलांनी ३१  जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या  पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे.   त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना  लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाराज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावेआणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना

                                       - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

           

यवतमाळदि. 24 : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी विविध निर्णय घेतले. महिलांची समाजातकुटुंबात भागिदारीसह त्यांचा सन्मान’ वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहीलअसे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवराज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतआ.भावना गवळीआ.किरण सरनाईकआ.मदन येरावारआ.प्रा.डॅा.अशोक उईकेआ.डॅा.संदीप धुर्वेआ.संजीवरेड्डी बोदकुरवारआ.नामदेव ससाणेआ.इंद्रनिल नाईकजिल्हाधिकारी डॅा.पंकज आशियामुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीयांची विराट शक्ती दिसून येत आहे. या शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिन्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावेयासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत असल्याचे श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात विविध योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिन्याला 6 ते 10 हजारांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे. राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. 7.5 एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलअसे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून महिला शक्तीचा जागर - देवेंद्र फडणवीस

            राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने महिला शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या 18 व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. 8 हजार 500 कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपूस केली जात आहे.

            शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला 12 तास वीज मिळेलयामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुससोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाहीयासाठी प्रयत्न करीत आहोत. वैनगंगानळगंगापैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईलअसे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही - अजित पवार

            मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खूश आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. ही रक्कम महिलांच्या हक्काचीअधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल. राज्यातील 52 हजार कुटुंबाना वर्षाला 3 सिलिंडर आपण मोफत देतोय. शेतकऱ्यांना मोफत वीजमुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आल्या. मुलींशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण केला. राष्ट्रपतींची मंजुरी झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. असे गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेअशी आमची देखील भावना असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु - संजय राठोड

            शेतकरीमहिलागरीबकामगारयुवक यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी त्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतून 1 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 60 हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना आणल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. यवतमाळ येथे आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी पाऊस असतानाही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 50 हजारांपेक्षा अधिक महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली.

लाडकी बहीण व भावाला लाभाचे वितरण

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री.पवार लाडक्या यांच्या हस्ते बहीण व भावाला लाभाचे वितरण केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रुती विलास भगतनंदा सुतारकरबेबी माणिक चव्हाणनलिनी राम राठोडचंदा सचिन शेंडेशुभांगी शिंदेप्रतिभा कोरडेसुमन रमेश गेजीकजया हरीदास विरदंडेइंदिरा लक्ष्मण मांगरेशुभांगी रविंद्र ढोरेटिंकल आकाश उरगुंडेसंगिता शेषराव राठोडरेश्मा शेख जावेदनाझीया अमजतखा पठाण यांना लाभाचे धनादेश दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शितल घाडगे व वैष्णवी पैदपवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

0000


Saturday, 24 August 2024

राग बायकोचा.... फायदा जगाचा ! (एक सत्यकथा

 💠🍁💠🍁💠🌻🏵️💠🍁💠🍁💠



राग बायकोचा.... 

फायदा जगाचा  !

(एक सत्यकथा) :

हसू नका.... खरेच हे सत्य आहे. गोष्ट आहे 2004 सालची ! 

आताचे गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई त्याकाळात अमेरिकेत करियर करण्यासाठी संघर्ष करत होते. धडपड सुरु होती. 

तर एकदा त्यांच्या तिथल्या परिचित फॅमिलीने याना जेवायला बोलावलं. 


सुंदरने हि गोष्ट आपल्या पत्नीला फोन करून सांगितली अन म्हणाले की, "असं करूया... मी ऑफिसातून कामे आटोपून परस्पर त्या मित्राच्या घरी येतो. तू आपल्या घरून आवरून वगैरे थेट तिकडेच ये. परत येताना मग आपण एकत्र येऊ"


जेवणाची वेळ रात्री आठची ठरली होती. त्याप्रमाणे मिसेस पिचाई वेळेत सर्व आवरून त्या फॅमिलीच्या घरी बरोबर आठ वाजता पोचल्या. तिकडून श्री सुंदर जी सुद्धा सगळं आवरून ऑफिसातून निघाले मात्र वाटेत गडबड झाली आणि ते रस्ता चुकले. त्यामुळे मग इतर लोकांना पत्ता विचारत विचारत त्यांना मित्राच्या घरी पोचायला दहा वाजले. तब्बल दोन तास उशीर. 


आणि तिथं गेल्यावर कळलं की, यांची वाट पाहून शेवटी कंटाळून त्यांच्या पत्नीने जेवण करून तिथून निघून घर गाठलं होत. हे कळल्यावर सुंदर अजूनच कचाट्यात अडकले की आता घरी बायकोसमोर कसे जायचे ? यजमान पण खरेतर मनातून नाराज झालेले. मात्र प्रोटोकॉल म्हणून त्यांनी कसेबसे याना जेवायला आग्रह केला मात्र सुंदरचा मूड नव्हता. मित्राला "सॉरी" असं म्हणत त्यांनी तिथून तसेच न जेवता काढता पाय घेतला. 

अमेरिकेत वेळ न पाळणे यासारखा दुसरा अपराध नाही, असं मानलं जाते.


घरी पोचल्यावर पत्नीने त्यांना जाम फैलावर घेतलं. पार उलटी सुलटी हजामत तीही जणू बिनपाण्याने ! "तुमच्या अशा लेट येण्याने चार लोकात माझी किती फजिती झालीय याची कल्पना नाहीय तुम्हाला" असा तोंडाचा दांडपट्टा सुरु होता. 

वातावरण खूपच तापलेलं पाहून सुंदर पिचाई यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सरळ आपलं ऑफिस गाठलं.

रात्रभर ते जागेच होते.... एकच विचार करत की, मी रस्ता चुकलो अन लेट झाला. आणि पुढे इतकं रामायण घडलं. माझ्यासारखेच अनेक लोक असतील ज्यांना हा त्रास सोसावा लागत असेल. 

अशी काहीतरी सोय असायला हवी की कुणीच कधीच रस्ता चुकणार नाही. आणि हा विचार करत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात एकदम विचार आला की, जर खिशात रस्त्याचा नकाशा असेल तर योग्य मार्गदर्शन मिळालं असत अन मी रस्ता चुकलो नसतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर पिचाई यांनी आपल्या संपूर्ण टीमची मिटिंग बोलावली आणि नकाशा बनवण्याची आपली आयडिया सांगितली. मात्र या आयडिया बद्दल कुणीच स्वागतोत्सुक नव्हते उलट "असं शक्य नाही" हाच मूड सगळ्याचा होता. मात्र सलग दोन दिवस सुंदर त्यांच्याशी बोलत होते ! नकाशा स्कीम बद्दल समजून सांगत होते. आणि शेवटी त्यांनी याच टीम कडून असं एक सॉफ्टवेयर बनवून घेतलं जे लोकांना योग्य तो रस्ता दाखवेल. 

आणि अथक श्रमातून या टीमने 2005 सालात गुगल मॅप बनवून अमेरिकेत सर्वप्रथम लॉन्च केले. पुढच्या वर्षी इंग्लंड मध्ये आणि 2008 मध्ये भारतात गुगल मॅप ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. 


आणि आज त्या गुगल मॅप ची उपयुक्तता संपूर्ण जगाला उमजली आहे. गुगल मॅप म्हणजे जणू सर्वासाठी घराबाहेर पडल्या क्षणापासूनच "वाटाड्या" चे काम करत आहे. विशेष म्हणजे त्याचे न ऐकता तुम्ही वेगळ्या रस्त्याने हट्टाने जायचे ठरवलं तरी तो गुगल मॅप (निवेदिका बाई) रागावत नाही तर तुम्हाला पुन्हा "रिरूट" करून देऊन योग्य मार्गावर आणते. एका पाहणीनुसार जगातील प्रत्येक सातव्या माणसामागे एक माणूस आजकाल गुगल मॅप वापरतो आहे. 

कळलं ? राग बायकोचा पण फायदा जगाचा !! कसा झाला ते ?


 कधी कोणती घटना जगाला एक वेगळेच वळण देईल हे कधी सांगता येत नाही. बायकोने रागावणे हि घटना जगात काही पहिल्यांदा सुन्दर यांच्या घरी घडली असं नाही. त्याच्या कैक हजारो वर्ष आधीपासून हि घटना जगात घडत आलीय की ! पण सुंदरच्या घरी घडली आणि त्यांनी या घटनेतून पॉजिटीव्ह विचार केला अन त्यातून जगाला गुगल मॅप मिळाला. तसे तर झाडावरचे सफरचंद आधीपण खाली पडत होतेच की ! मात्र न्यूटनच्या डोक्यावर पडले अन त्यातून जगाला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते कळलं ! सांगायचं इतकंच की, महान लोकांचे हे सगळं पाहून आपल्याही आयुष्यात असं काही घडलं तर त्यातून पॉजिटीव्ह पाहून त्यावर काम करावे. न जाणो त्यातून वेगळं काहीतरी सापडेल जे पूर्ण जगाला जाऊ द्या पण किमान तुमच्या जवळच्या चार लोकांना वेगळा प्रकाश मिळाला तरी खूप झालं न ! 


शिवाय ते "रिरूट" बद्दल पण लक्षात ठेवा. नकळत आपण रस्ता चुकलो तर न रागावता पुन्हा तुम्हाला "रिरूट" करत ती गुगलवाली बाई जसे मूळ उद्देशाकडे नेते तसेच आपण कधी नकळत आपला रस्ता (म्हणजेच ध्येय) भटकलो तर चिडू नका. रागावू नका. शांतपणे पुन्हा "रिरूट" करून ध्येयापर्यंत कसे जाता येईल ते पहा! 


खूप फरक पडेल जगण्यात हो ! (आणि कधीकाळी चुकून बायको रागावलीच तर जास्त हर्ट करून घेऊ नका. कदाचित तुमच्या हातून छान काहीतरी घडावं म्हणून ती तसे बोलली असेल असं समजून पुढं सरका.... कामाला लागा) 

🙏🙏🙏🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi