Sunday, 25 August 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील' सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील'

सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार

३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

                                              - महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि.२४.   'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने   सुरू आहे. ज्या महिलांनी ३१  जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या  पात्र महिलांना  लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री  आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे.   त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना  लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाराज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावेआणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi