Sunday, 25 August 2024

लखपती दीदी' मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात दाखल

 'लखपती दीदी' मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात दाखल

 

जळगाव,दि. २५ (जिमाका) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'लखपती दीदी' मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदतपुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिक,  जिल्हाधिकारी आयुष प्रसादपोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दीदींशी  संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दीदी संमेलन स्थळी आगमन झाले. 

प्रधानमंत्र्यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले‌. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi