Thursday, 1 August 2024

कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी "विशेष मोहिम"

 कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी "विशेष मोहिम"

            मुंबई, दि.31 : राज्यातील स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी "विशेष मोहिम" अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

            या प्रकीयेमध्ये प्रचलीत नियमानुसार पडताळणी, तपासणी करून स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना उचित शिधापत्रिका वितरीत करून शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तात्काळ देण्यात यावेतअशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आलेल्या आहेत.

            राज्यातील सर्व विना शिधापत्रिका धारक स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना आवाहन करण्यात येते कीत्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधून विहित प्रक्रियेव्दारे अनुदेय शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी. अधिक माहितीसाठी 022- 22793840 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा napu28.mhpds@gov.in इमेलवर संपर्क साधावा.

००००

रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार; रत्नागिरीत सागरी विद्यापीठाच्या उभारणीसही तत्वत: मान्यता

 रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार;

रत्नागिरीत सागरी विद्यापीठाच्या उभारणीसही तत्वत: मान्यता

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 31 :- कोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे कोकणपुत्रलोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्मारकासाठी जमिनी उपलब्ध करण्यासह आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक भव्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे झाले पाहिजेत्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठाच्या उभारणीलाही यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली.

            रत्नागिरी जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलउद्योगमंत्री उदय सामंतमत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तागृह (परिवहन व बंदरे) विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुतेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रत्नागिरीतील संबंधित संस्थांचे पदाधिकारीप्रतिनिधी उपस्थित होते. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीकोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक कुवारबांव येथे व्हावे ही रत्नागिरीकरांची आणि राज्य शासनाची इच्छा आहे. त्यादृष्टीने स्मारकासाठी आवश्यक जागा संबंधित विभागाने तातडीने हस्तांतरीत करावीस्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध  करुन देण्यात येईल. स्मारकाचे काम दर्जेदार आणि लोकनेत्यास साजेसे असले पाहिजेअशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोकणला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन  रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठाची स्थापन करण्यास बैठकीत  तत्वत: मान्यता देण्यात आली. हे सागरी विद्यापीठ मेर्वी येथे समुद्रकिनारी उभारण्यात येणार आहे. विद्यापीठासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली. रत्नागिरी येथे शासकीय विधी महाविद्यालय उभारण्यासह जिल्ह्यातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांचा सविस्तर आढावाही बैठकीत घेण्यात

‘एमआयडीसी’ उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार

 एमआयडीसी’ उभारणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार

 

            मुंबईदि. 31:- राज्याच्या उत्पन्नवाढी बरोबरच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजअहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील लिंगदेवअकोलेनाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणाजांबुटके तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसी’ उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच राज्यात यापुढे नवीन एमआयडीसी’ उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे जिल्ह्यातील डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

            एमआयडीसीची आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंतअन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रामआमदार किरण लहामटेआमदार देवेंद्र भुयारआमदार दिलीप मोहिते-पाटीलआमदार अतुल बेनके (व्हिसीद्वारे)आमदार नितीन पवार (व्हिसीद्वारे)नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारीविभागीय आयुक्त दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. राज्यातील प्रत्येक विभागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा)अहिल्यानगर जिल्ह्यातील लिंगदेवअकोलेनाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा एमआयडीसी बरोबरच जांबुटके (ता. दिंडोरी) येथील आदिवासी औद्योगिक समूह विकास योजना तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एमआयडीसी’ उभारण्यासाठीचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करा. तसेच एमआयडीसीच्या उभारणीसाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे. किमान शंभर एकर जमीन उपलब्ध असेल तरच सर्वसोयींनीयुक्त  एमआयडीसी’ उभी राहू शकते. त्यामुळे यापुढे एमआयडीसी मंजूर करताना किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

            पुणे जिल्ह्यातील उंबरवाडी (ता. जुन्नर) येथे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. या ठिकाणी फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांच्या सोबत जागेची पाहणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर बारामती एमआयडीसी मधील प्रलंबित कामेचाकण एमआयडीसीतील शेतकऱ्यांच्या प्रश्ना विषयीही चर्चा करण्यात आली.

००००

मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य

 मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 31 : मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून मराठवाड्यातील सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नाही. मराठवाड्यात सिंचनासाठी जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्या प्रकल्पांसाठीच्या दृष्टीने आवश्यक मान्यता व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्यातअशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

            मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथी गृह येथे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेआमदार संजय शिरसाटजलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. दीपक कपूरउपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीजलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरेपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजय खंदारेजलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि गोदावरी जल समृद्धी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मराठवाड्यातील सिंचनाच्या अनुशेष भरून  काढण्यास राज्य  शासनाने प्राधान्य दिले  असल्याचे  सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमराठवाड्यातील मागील व आपल्या पिढीने दुष्काळ पहिला आहे. पुढच्या पिढीला दुष्काळाच्या वेदना सहन कराव्या लागू नयेत यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. त्यानुसार मराठवाड्यात सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जे पाणी मराठवाड्यासाठी आहे ते त्यांना दिले जाणार आहे. याबाबतचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यात सिंचन प्रकल्पांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी  ज्या भागासाठी जेवढे पाणी मंजूर आहेते पाणी त्या भागाला दिले जाईल. याबाबत समितीमार्फत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील सर्व भागांचा विचार करूनच शासन या विषयावर काम करते. शासन कोणत्याही भागावर भेदभाव करु शकत नाही. मराठवाड्यास पाणी देण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणी दिले जात असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी पाठपुरावा करावा

 अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या

पर्यावरण विषयक मंजुरीसाठी पाठपुरावा करावा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. ३१ :- अमरावती येथील नांदगाव पेठजवळ उभारण्यात येत असलेला पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क हा राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

            अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतआमदार रवी राणाकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सलसहसचिव प्राजक्ता लवंगारेउपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजयउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेवस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीअमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क हा जागतिक दर्जाचा व्हावाअशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसारच येथील सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी जागतिक दर्जाचे गुंतवणुकदार येण्यासाठी त्यांना त्या प्रकारचे सोयी सवलती देण्यात याव्यात. तसेच येथील उद्योगांना सौर ऊर्जेसाठी सवलती देण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करावी.

            या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असून स्थानिकांना रोजगार निर्मितीही होणार आहे. या प्रकल्पाची पर्यावरण विषयक मंजुरी घेऊन पायाभूत कामे लवकरात लवकर पूर्ण करावीतजेणेकरून प्रकल्प कार्यान्वित होईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            यावेळी श्री. शर्मा यांनी पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या सद्यस्थितीसंदर्भात सादरीकरण केले. पीएम मित्रा टेक्सटाईल हा अमरावतीत सुमारे १०२० हेक्टर जागेवर उभारण्यात येत आहे.  यासाठीची सर्व प्रक्रिया झाली असून पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  हा ग्राऊंड फिल्ड प्रकल्प असून यामध्ये वस्त्रोद्योग संबंधी प्रशिक्षणइन्क्युबेशन सेंटरपायाभूत सुविधाआवास प्रकल्प आदी सुविधा असणार आहेत. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अंमलबजावणी संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.

००००

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

 सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

            मुंबईदि. 31 : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.

            राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवारविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमंत्रिमंडळ सदस्यलोकप्रतिनीधी, मुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीअपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरविविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवराज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.

            प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय

            श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी दि. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

            श्री. राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूरतमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन 1998 मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.

            आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

            सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.

            सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्डकोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.

            दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्री. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

            उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.

            श्री. राधाकृष्णन यांनी अमेरिकाइंग्लंडफ्रान्सजर्मनीइटलीस्पेनपोर्तुगालनॉर्वेडेन्मार्कस्वीडनफिनलंडबेल्जियमहॉलंडतुर्कीचीनमलेशियासिंगापूरतैवानथायलंडइजिप्तसंयुक्त अरब अमिरातबांगलादेशइंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.

राज्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चे आयोजन

 राज्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत

पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चे आयोजन

 

            मुंबईदि.३१ ; राज्यातील पशुपालकांमध्ये पंचसुत्रीच्यासंदर्भात जागृती निर्माण करणे तसेच  पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात दि.१ ते दि.१५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत "पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४" आयोजित करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूलपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यभर राबविला जाणार आहे.

      पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विभागाकडून "उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदासपशुस्वास्थपशुखाद्यपशुचारा व व्यवस्थापन" या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  पंधरवड्यादरम्यान पंचसुत्रीची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी  गावपातळीवर शिबीरेकार्यशाळा,व्याख्याने,  तज्ञांचे मार्गदर्शनयशस्वी पशुपालकांचे अनुभव कथन यासांरख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

        राज्यातील पशुधनाची पूर्ण उत्पादनक्षमता वापरात आणणे तसेच उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबर पशुपालन व्यवसाय फायदेशीरपणे करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

            व्यावसायिक दृष्टीकोनातून व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी पशुजन्य पदार्थ (उदा. मांसलोकरअंडी इ.) तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादनखरेदीविक्री याची माहिती पशुपालकांना करुन देणे आवश्यक आहे.  पशुपालन हा व्यवसाय केवळ शेतीपूरक अथवा जोडधंदा न राहता तो पशुपालकाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होईल या दृष्टीकोनातून पशुपालन उद्योजकता निर्माण करण्यासाठी  या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

     या कालावधीत पंधरवड्याची माहिती सर्व पशुपालकांना व्हावी यासाठी व्यापक स्वरुपात  देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखानेशासकीय कार्यालयेग्रामपंचायतकृषि उत्पन्न बाजार समितीआठवडी बाजार  इत्यादी ठिकाणी पशुपालकांसाठी कार्यक्रमांचे माहितीबाबत प्रसिध्दी करण्यात येईल.

 पशुसंवर्धन पंधरवड्यादरम्यान दैनंदिन कार्यक्रमांचे संयोजन व संनियंत्रण आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्फत करण्यात येईल, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi