Thursday, 1 August 2024

कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी "विशेष मोहिम"

 कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी "विशेष मोहिम"

            मुंबई, दि.31 : राज्यातील स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी "विशेष मोहिम" अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

            या प्रकीयेमध्ये प्रचलीत नियमानुसार पडताळणी, तपासणी करून स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना उचित शिधापत्रिका वितरीत करून शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तात्काळ देण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आलेल्या आहेत.

            राज्यातील सर्व विना शिधापत्रिका धारक स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधून विहित प्रक्रियेव्दारे अनुदेय शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी. अधिक माहितीसाठी 022- 22793840 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा napu28.mhpds@gov.in इमेलवर संपर्क साधावा.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi