Saturday, 27 July 2024

बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना

 बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना

            मुंबईदि. 27 : शहाबाज गावसेक्टर 19, बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज  पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावीअशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्तांना दिली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली.

            इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचारआरोग्य सुविधाअन्नपाणीकपडेतात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महानगरपालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावेअशा सूचना मुख्यमंत्री         श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत. 

तेजोमय स्वरनाद" या कार्यक्रमाचे 28 जुलै रोजी आयोजन

 तेजोमय स्वरनाद" या कार्यक्रमाचे 28 जुलै रोजी आयोजन

            मुंबईदि.27: सांस्कृतिक कार्य विभागपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सप्रभादेवी आणि फोंडाघाट फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने "तेजोमय स्वरनाद" हा कार्यक्रम रविवार 28 जुलैसंध्याकाळी 6 वाजता करिश्मा हॉल5 वा मजलारवींद्र नाट्यमंदिर आवार येथे आयोजित करण्यात आला आहे.

            आषाढ महिना म्हटलाकी सगळीकडे पडणारा पाऊसहिरवी झालेली धरतीत्यामुळे प्रसन्न झालेले वातावरण असे चित्र असते. "आषाढस्य प्रथम दिवसे" असे म्हणत आपण त्याचे आनंदाने स्वागत करतो. विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरी आषाढी एकदशीला पांडुरंगाच्या पायाशी लीन होतात. याच महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या. या दीप अमावस्येचे सांस्कृतिक महत्त्व "तेजोमय स्वरनाद" कार्यक्रमातून उलगडले जाणार आहे.

            इतिहासकालीन दिवेत्यांचे वेगवेगळे उपयोग इ. रंजक माहिती आणि काही दुर्मीळ दिवे यावेळी बघायला मिळणार आहेत. दिव्यांचे संग्राहक आणि वक्ते मकरंद करंदीकर ही माहिती देणार असून निवेदिका दीपाली केळकर त्यांची मुलाखत घेतील. गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

            दिव्यांच्या अनुषंगाने येणारी विविध गाणी धनंजय म्हसकरप्राची जोशी आणि श्रुती पोटे सादर करणार आहेत. वाद्य संगत हनुमंत रावडेडॉ. हिमांशु गिंडेवैभव कदम आणि तन्मय मेस्त्री यांची असेल. नृत्यांकुर डान्स अकादमीचे विद्यार्थी नृत्याविष्कार सादर करतील. कार्यक्रमाचे संयोजन प्रीती निनाद मांडके यांचे आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.

000

बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस

 बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस

          मुंबई, ‍‍दि. 26 : देशाला आत्मनिर्भर बनविताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहेअसे सांगून सामान्य व सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  येथे केले.  या संदर्भात बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

          दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एजुकेशन ट्रस्ट' संस्थेचा १६ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २६) जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या 'नॉट फॉर प्रॉफिट' संस्थांसाठी असलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर 'सार्थक' संस्थेचे लिस्टिंग करण्यात आले.

          भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के लोक दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे. त्यामुळे देशातील दिव्यांगांची निश्चित संख्या समजेल व त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईलअसे राज्यपालांनी सांगितले.  

          तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा यामुळे आगामी काळात दिव्यांगांचे जीवन अधिक सुकर होईल व दिव्यांगता ही अडचण ठरणार नाही असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. जितेंदर अगरवाल या दंत चिकित्सक व्यक्तीने दृष्टी गमावल्यानंतर हिम्मत न हारता 'सक्षम' ही दिव्यांग क्षेत्रातील मोठी संस्था उभारली याबद्दल राज्यपालांनी श्री. अगरवाल यांचे अभिनंदन केले. 

          कार्यक्रमाला सेवानिवृत्त केंद्रीय सचिव लव वर्मा, सीडबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, सार्थकच्या सल्लागार मंडळाचे सदस्य क्रिशन कालरा व जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

Maharashtra Governor attends Foundation Day of Sarthak Educational Trust

            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 16th Foundation Day of the Sarthak Educational Trust, an organisation working for the Divyang Welfare at World Trade Centre in Mumbai on Fri (26 July). 

            The Sarthak Trust was listed as Not for Profit on the NSE's Social Stock Exchange on the occasion.

            Founder of Sarthak Dr Jitender Aggarwal, retired Secretary, Ministry of Social Justice Lav Verma, CEO of SIDBI Sandeep Varma, Member of the Advisory Board of Sarthak Krishan Kalra and President of WTC Mumbai Vijay Kalantri were present on the occasion.

0000

बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा

 बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          मुंबईदि. 26 : मुंबईच्या विकासात बेस्टचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी बेस्ट’ ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावाअशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाला केली. यासाठी शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

          बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना उपदान (ग्रॅच्युइटी)कोविड भत्ताकायमस्वरुपी तसेच हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र आदींच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह आमदार सर्वश्री ॲड. आशिष शेलारप्रवीण दरेकरश्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड, ‘बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी बेस्ट कामगारांच्या उपदानासाठीचा (ग्रॅच्युइटी) 332 कोटींचा तसेच कोविड भत्त्यापोटीचा 78 कोटींचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे कायमस्वरुपी कामगार आणि हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्रधाडसी कार्य करणाऱ्या कामगारांचा सत्कारपदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

          यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबईने 1873 मधील ट्राम सेवेपासून आजच्या बेस्ट बस पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे परिवर्तन पाहिले आहे. मुंबईकरांना त्यांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचण्यासाठी एकाहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याने आता मेट्रोचे जाळे देखील विणले जात आहे. तथापि, ‘बेस्ट सेवेचे महत्त्व अबाधित असून तिला अधिक बळकट केले जाईलअसे त्यांनी सांगितले. बेस्ट कामगारांच्या जुन्या झालेल्या निवासी संकुलांच्या पुनर्विकासाबाबत तसेच बेस्टच्या बळकटीकरणाला मदत होईल, अशा पद्धतीने बस डेपोच्या पुनर्विकासाबाबत देखील आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

          प्रारंभी श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार श्री. लाड यांनी प्रास्ताविकात बेस्ट च्या कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले. आमदार सर्वश्री श्री.  शेलार, श्री. दरेकर यांनी देखील बेस्टच्या कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. महाव्यवस्थापक श्री. डिग्गीकर यांनी आभार प्रदर्शन केले.

बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस

बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस

          मुंबई, ‍‍दि. 26 : देशाला आत्मनिर्भर बनविताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहेअसे सांगून सामान्य व सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  येथे केले.  या संदर्भात बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

          दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या 'सार्थक एजुकेशन ट्रस्ट' संस्थेचा १६ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २६) जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या 'नॉट फॉर प्रॉफिट' संस्थांसाठी असलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर 'सार्थक' संस्थेचे लिस्टिंग करण्यात आले.

          भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के लोक दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे. त्यामुळे देशातील दिव्यांगांची निश्चित संख्या समजेल व त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईलअसे राज्यपालांनी सांगितले.  

          तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा यामुळे आगामी काळात दिव्यांगांचे जीवन अधिक सुकर होईल व दिव्यांगता ही अडचण ठरणार नाही असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. जितेंदर अगरवाल या दंत चिकित्सक व्यक्तीने दृष्टी गमावल्यानंतर हिम्मत न हारता 'सक्षम' ही दिव्यांग क्षेत्रातील मोठी संस्था उभारली याबद्दल राज्यपालांनी श्री. अगरवाल यांचे अभिनंदन केले. 

          कार्यक्रमाला सेवानिवृत्त केंद्रीय सचिव लव वर्मा, सीडबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, सार्थकच्या सल्लागार मंडळाचे सदस्य क्रिशन कालरा व जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

Maharashtra Governor attends Foundation Day of Sarthak Educational Trust

            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 16th Foundation Day of the Sarthak Educational Trust, an organisation working for the Divyang Welfare at World Trade Centre in Mumbai on Fri (26 July). 

            The Sarthak Trust was listed as Not for Profit on the NSE's Social Stock Exchange on the occasion.

            Founder of Sarthak Dr Jitender Aggarwal, retired Secretary, Ministry of Social Justice Lav Verma, CEO of SIDBI Sandeep Varma, Member of the Advisory Board of Sarthak Krishan Kalra and President of WTC Mumbai Vijay Kalantri were present on the occasion.

0000

कारगिल विजय दिवस रजत जयंती राज्यपाल, फडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना

कारगिल विजय दिवस रजत जयंती

राज्यपालफडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना

            मुंबई‍‍दि. 26 : कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी राजभवन मुंबई  येथून मेघालयमिझोरम व त्रिपुरा या तीन राज्यांसाठी तीन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित राज्यांच्या सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना व प्रतिनिधींना रूग्णवाहिकेच्या प्रातिनिधिक किल्ल्या देण्यात आल्या.   

          बोरिवली येथील अथर्व फाऊंडेशनच्या वतीने उत्तर पूर्वेतील उपरोक्त तीन राज्यांमधील माजी सैनिक तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी या रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या आहेत.  

          अथर्व फाऊंडेशनने आतापर्यंत उत्तर पूर्वेतील सर्व राज्यांना रुग्णवाहिका  भेट देऊनहुतात्म्यांच्या मुलींना लॅपटॉप भेट देऊन तसेच बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शन आयोजित करून प्रेरणादायी कार्य केले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

          कारगिल विजय दिनानिमित्त लष्करातील सेवेच्या संधी याबाबत युवकांना मार्गदर्शन केले जावे तसेच सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहित केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.    

          कारगिल येथे सर्वात उंचीवर लढले गेलेले हे युद्ध होते व विपरीत स्थितीत आपल्या जवानांनी विजयश्री मिळविली, असे सांगून या युद्धात भारताने एक इंच देखील जमीन गमावली नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. कारगिल युद्ध हे देशाच्या इतिहासातील महत्वाचे प्रकरण असून तो इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

          कार्यक्रमाला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार सुनील राणेउपाध्यक्षा वर्षा राणेकर्नल एस चटर्जी व १५ आसाम रेजिमेंटचे जवान व अधिकारी उपस्थित होते. 

0000

Kargil Vijay Diwas

Maha Governor, DCM present ambulances to North Eastern States

          Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Deputy Chief Minister Devendra Fadnavis flagged off 3 ambulances to be presented to the States of Meghalaya, Mizoram and Tripura on the occasion of Kargil Vijay Diwas at Raj Bhavan, Mumbai on Fri (26 July).

          Symbolic keys of the ambulances were presented by the Governor to the representatives of the Sainik Welfare Boards of the three States. The Ambulances gifted by the 'Atharva Foundation' Borivali Mumbai will be used to provide healthcare services to the retired jawans and family members of the martyrs of the Armed forces.

          President of the Atharva Foundation and Borivali MLA Sunil Rane, Vice President Varsha Rane, army veteran Col S Chatterjee and officers and jawans of the 15 Assam Regiment were present.   

राज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा

 राज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा

          मुंबई‍‍दि. 26 : कारगिल विजय दिवसाच्या रौप्य जयंती दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली .

          कार्यक्रमाला महाराष्ट्रगुजरात व गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. पवन चड्ढापश्चिम  मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे. सिंहमे. जन बिक्रम दीपसिंहमाजी जीओसी ले. जन. एच. एस. केहालों तसेच सैन्य दलातील आजी व माजी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          राज्यपालांच्या हस्ते यावेळी देशासाठी लढताना युद्धभूमीवर हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबातील ११ वीर नारींचा सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्याने कारगिल युद्धात आपल्या अतुलनीय शौर्याचा परिचय देत देशाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले, असे राज्यपालांनी यावेळी संबोधित करताना सांगितले.

          कारगिल येथील विजयाची परंपरा पुढेही कायम ठेवण्यासाठी युवकांनी सैन्य दलात प्रवेश घ्यावा व देशसेवा करावी असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले. युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवान व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांची काळजी घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे, असे सांगून कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज निधीला योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.  या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी कारगिल विजय दिवस मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून रवाना केले. या रॅलीत आसाम रेजिमेंटचे जवान सहभागी होत असून ते  ४ ऑगस्ट रोजी कारगिल येथे जाऊन १५ ऑगस्ट रोजी पुणे येथे परतणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

0000

Maharashtra Governor pays tributes to Martyrs on Silver Jubilee of Kargil Vijay Diwas; honours Veer Naris

      Maharashtra Governor Ramesh Bais placed a wreath at the Colaba War Memorial and offered his homage to the martyrs on the occasion of the Silver Jubilee of the Kargil Vijay Diwas in Mumbai on Fri (26 July).

      At a programme organised by the General Officer Commanding, Maharashtra, Gujarat and Goa Area, the Governor felicitated 11 Veer Naris and addressed the officers of the armed forces.

      Complimenting the officers and jawans of the Armed Forces for the victory at the Kargil War, the Governor appealed to the youths to join the armed forces and maintain the winning streak.  The Governor later flagged off the Kargil Vijay Diwas Motorcycle Expedition involving the jawans of 15 Battalion of the Assam Regiment. The Rally will reach Kargil on 4th August and reach at Pune on 15th August.

            GOC in Chief Lt Gen Pawan Chadha, FOC in C Western Naval Command Vice Admiral Sanjay J Singh,  Maj Gen Bikram Deep Singh, former GOC Lt Gen H S Kehlon and other serving and retired officers of the armed forces were present.

0000

Featured post

Lakshvedhi