Saturday, 20 July 2024

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान

 शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            सातारादि. १९ : शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.  साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नयेअशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचेवीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत, हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्र शौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट संग्रहालयलंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयाची मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारपालकमंत्री शंभूराज देसाईकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेखासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेआमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार सर्वश्री मकरंद पाटीलजयकुमार गोरेराजेंद्र राऊतमुख्य पोस्ट मास्टर जनरल किशनकुमार शर्माआंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे कार्यालय प्रमुख निकोलास मर्चंटसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेवृषालीराजे भोसलेपुरातत्व विभागाचे संचालक सुजितकुमार उगलेजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधिक्षक समीर शेखअपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल आदी उपस्थित होते. यावेळी 350 व्या शिवराज्यांभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडकिल्ले सिंधुदुर्गछत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रासंत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकीटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

             जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात  आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा असून त्यांची शिकवण तत्वे अंगिकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्याकर्तुत्वाच्या खुणा जिथं कुठे असतील तिथून त्या शिवप्रतापाच्या भूमीत पुन्हा आणल्या जातील. लंडनहून सातारा येथे आणण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांच्या दर्शनातून त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. ही वाघनखे म्हणजे त्यांची वीरगाथा आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढे यश ही मोठे हे त्यांच्या जीवनातील विविध घटनांमधून दिसून येतेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

              मुख्यमंत्री म्हणाले कीशिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्व घटकांसाठी अनेक हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. विविध योजना शासन राबवीत असून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गड-कोट किल्ल्यांचे जतनसंवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.  खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे काम करेल. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नूषा महाराणी ताराबाई यांच्या संगममाहुली येथील समाधी स्थळाचा जीणोद्धार राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी मुघल सत्तेला पराभूत करुन रयतेचे राज्य स्थापन केले. स्वराज्यावर चालून आलेले संकट अफजलखानाचा वध करताना त्यांनी ज्या वाघनखाचा उपयोग केला ती वाघनखे अनेक वर्षे लंडनच्या म्युझीयममध्ये ठेवण्यात आली होती. ती वाघनखे साताऱ्यात संग्रहालयामध्ये शिवप्रेमींच्या दर्शनासाठी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळाली आहे. शिवरायांनी जातीभेद न करता रयतेचे राज्य प्रस्थापित केले. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील नागरिकही वाघनखे पाहण्यासाठी येतील व त्यातून प्रेरणा घेतील. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्यशासन काम करत असून राज्यात अनेक विकासात्मक प्रकल्पयोजना सुरु आहेत. शेवटच्या घटकाचा विचार करत प्रत्येकाच्या उत्थानासाठी शासन काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

              उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनवीन पिढीला इतिहास कळावा यासाठी शिवछत्रपतींची वाघनखे प्रेरणादायी आहेत. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगून यापुढेही विकास कामांच्या प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाहीअशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कीराजगडच्या पायथ्याशी मौजे पाल ता. वेल्हा येथील राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आराखड्याला 30 कोटींचा निधीवडजल ता. जुन्नर येथील शिवनेरी संग्राहलयाला 300 कोटीमौजे तुळापूर हवेली येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिराळा, सांगली येथे स्मारकप्रतागपडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर शिवराज्यभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार मोलोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे इंदापूर ऐतिहासिक गढीच्या संवर्धनासाठी 40 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.

            श्री. पवार म्हणालेशिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतनसंवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या वेल्हा तालुक्याच नाव आता राजगड करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रतापगडरायगडशिवनेरीयाबाबतच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. किल्ल्यांवर मद्यपान करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिक कडक कायदा करण्यात येणार आहे.

            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीचे जनक होते. छत्रपती शिवरायांच्या सर्व वस्तू अनमोल आहेत. त्यांची वाघनखे साताऱ्यात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचागौरवाचा दिवस आहे. महाराष्ट्राचा इतिहास गौरवाने सांगणाऱ्या ज्या वस्तू लंडन अथवा अन्य देशाच्या वस्तूसंग्रहालयात असतील, त्या वस्तू महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीशासनाने महिलांसाठीशेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिवराज्याभिषेक दिवस हा शासकीय कार्यक्रम साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. संसदभवनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालय, दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपये दिले. आयआयएम, नागपूर येथेही शिवाजी महाराजांच्या राज्याची मॅनेजमेंटचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये दिले आहेत. आग्रा येथील दरबारात शिवजयंती गेल्या दोन वर्षापासून साजरी होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखागड-किल्ल्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

            पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले कीछत्रपती ‍शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेली वाघनखे सातारा नगरीत येणे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट ज्या वाघनखांच्या माध्यमातून त्यांनी नष्ट केले ती वाघनखे प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये राहणार आहेत. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दिवसभरातून चार स्लॉट उपलब्ध आहेत. एकावेळी दोनशे लोक हे प्रदर्शन पाहू शकतील. प्रशासनाने यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याचा सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.

            यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करुन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा मान सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले.

            खासदार श्री. भोसले म्हणाले कीलोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजेही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलीत्यांनी सर्वधर्म समभाव शिकविला. त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद शिवचरित्रात आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            आमदार श्री. भोसले म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा या ठिकाणी आणणे हा जीवनातील भाग्याचा क्षण आहे. या माध्यमातून इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीसश्री. पवार यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजितकुमार उगले यांनी मानले.

000000


 

वृत्त क्र. ८९७


Friday, 19 July 2024

भारतातील एकमेव मंदिर चतुर्वेदेश्र्वर धाम. आपल्याला चार वेद माहीत असतात, पण आपण कधी त्यांचं मूर्तीस्वरूपात दर्शन घेतलेलं आहे का?

 भारतातील एकमेव मंदिर चतुर्वेदेश्र्वर धाम. आपल्याला चार वेद माहीत असतात, पण आपण कधी त्यांचं मूर्तीस्वरूपात दर्शन घेतलेलं आहे का? नसेल तर आज घेऊ या. या आहेत चार वेदांच्या चार मूर्ती, डावीकडून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. इथे १०० वर्षांपासून वेदकार्य चालू आहे, आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी इथे वैदिक शिक्षण घेतले आहे. जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील हे सावरगाव आहे. या आश्रमाची स्थापना ब्रह्मर्षी यज्ञेश्र्वर शास्त्री कस्तुरे यांनी केली आहे. 


श्री चतुर्वेदेश्वर धाम येथील चतुर्वेदेश्वराची मूर्ती ही प.पू. श्री यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे उपाख्या बाबा यांना स्वप्नदृष्टांत होऊन स्वतः भगवान चतुर्वेदेश्वरांनी "मी गोदावरी नदीत अमक्या ठिकाणी असून मला तिथून बाहेर काढ असे बाबंना सांगितले." त्यावेळेस गुरूजी नांदेडला होळी येथे संस्कृत पाठशाळा चालवत होते.


म्हातारपण दुर ठेवण्यासाठी............

 


विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही

  

विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही

 - उपमुख्यमंत्री अजित पवार

            कोल्हापूरदि. १८ : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार१४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित पीडितांना सांगितले. मुसलमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला आल्या होत्या. त्यांना सध्या विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेतन्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश पाटीलजिल्हाधिकारी अमोल येडगेपोलिस अधीक्षक महेंद्र पंडितउपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारीग्रामस्थ उपस्थित होते.

            घटनेआधी विशाळगडावर अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी केलेल्या मागणीवर सातत्याने प्रशासन विशेषत: जिल्हाधिकारीपोलीस अधीक्षक आणि इतर शासकीय अधिकारी चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचे काम करत होते. विशाळगडावरील जी अतिक्रमणे आहेतजी न्यायप्रविष्ट आहेततसेच मुंबई उच्च न्यायालयात त्याविषयी काही खटले सुरु आहेत. तसेच न्यायालयाचाही अवमान होणार नाही, अशा पध्दतीचा मार्ग या ठिकाणी काढला जाईल, असे त्यांना सांगितले होते. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल किंवा वरिष्ठ शासकीय वकील या सर्वांशी चर्चा केली जात होती. या संदर्भात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीमुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होते. सर्व शांततेने घ्यातुमची काय मागणी असेल याबद्दल सरकार कायदा आणि नियमांने सकारात्मक असेल. कायदा नियम हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर ते चालणार नाहीकायद्याच्यानियमांच्या चौकटीत बसून आपण मार्ग काढू, असे बोलणे त्यांच्याबरोबर झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी गावात सांगितले.

            मुसलमानवाडीत झालेल्या नुकसानाबाबत तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी नुकसानाबाबत तेथील सर्व गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या पाहून 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केलेला आहे, अशी माहितीही त्यांनी गावातील नागरिकांना दिली.

            घटनेचे संपूर्ण व्हीडिओ पोलिसांनी काढलेले आहेत. सगळ्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा केली जाईल आणि त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. राज्यामध्ये दूषित वातावरण निर्माण होईलअशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये

            विशाळगडाच्या घटनेबाबत प्रशासन आम्हाला वेळोवेळी माहिती देत होते. तरीही आपण स्वत: पाहणी करण्यासाठी आलो. पुढील काळात काही स्वयंसेवी संस्थाही मदत करणार आहेत. ही मदत तहसीलदारांमार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज याबाबत आढावा घेत आहेत. सरकारही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडीओआक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन वातावरण खराब होईल, असा प्रयत्न करु नकाअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जनतेला केले. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्यान घेतली आहे. चुकीच्या गोष्टींचे समर्थन सरकार करणार नाही. अशा प्रकारचे गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी शासन निधी देत असते. अशा शिवकालीन किल्ल्यांवर अतिक्रमण होवू नयेअशी मागणी शिवप्रेमी व इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांची आहे. समाजा-समाजामध्ये फूट पडेलकारण नसताना जातीय सलोखा बिघडेल आणि त्याच्यामधून राज्यामाध्ये दूषित वातावरण निर्माण होईलअशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करु नये, असे त्यांनी आवाहन केले.

000

योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही –

योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध महत्वाकांक्षी योजनांची आढावा बैठक मुंबई, दि. १८ : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. शासनाने जाहीर केलेल्या सात महत्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हास्तरीय विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्य सचिवांसह विविध विभागांचे सचिवस्तरीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, योजनांच्या अमंलबजावणीत गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी यासाठी दक्ष राहिले पाहिजे. योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट साध्य करताना लाभार्थ्यांची नोंदणी करताना काही घटक गैरप्रकार करत असतील, ते वेळीच रोखले पाहिजे. विशेषतः ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत कुणी महिला भगिनींकडून अर्जासाठी पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करा. अशांना केवळ निलंबित करून नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा. या योजनेत भगिनींना कुणीही नडता कामा नये याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. या नोंदणीचा सातत्याने आढावा घेतला जाणे आवश्यक आहे. महत्वाच्या अशा या सर्वच योजनांमध्ये केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्यात याव्यात. अधिकृत अशा केंद्रावरच अर्ज भरले जातील, असे प्रय़त्न केले जावेत. खासगीरित्या आणि अन्य कुठल्या पद्धतीने कुणी अर्ज भरत असतील, त्यांना वेळीच रोखण्यात यावे, अशा सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्या. ०००००

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार कराव्या - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी शासकीय विभागांना पुढाकार घेण्याचे निर्देश

 योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार कराव्या

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी शासकीय विभागांना पुढाकार घेण्याचे निर्देश

 

            मुंबईदि. १८ :  अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांचे उदिृष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा. या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येईल. त्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युध्दपातळीवर तयार करण्यात याव्यातअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासकीय तसेच विविध प्राधिकरणेस्थानिक स्वराज्य संस्थामहामंडळे आदी विभागांनी तातडीने अशा पात्र उमेदवारांची नोंदणी करूनत्यांना त्यांच्या पात्रतेनुसार या योजनेत सामावून घ्यावेजेणेकरून मोठ्या संख्येने उमेदवारांना या योजनेतील विद्यावेतन देणे शक्य होईलअसे विशेष निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे अध्यक्षतेखाली विविध महत्वाकांक्षी योजनांबाबत आढावा बैठक झाली. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाअल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तारमुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार मनोज सौनिकमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित क्षेत्रीय अधिकारी आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            सुरवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग- व्यवसायांनाआस्थापनांना नोंदणी करता येणार आहे.

            बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (महिला व बालविकास विभाग)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (कौशल्य विकास विभाग)मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (अन्न व नागरी पुरवठा विभाग)मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना ( उच्च व तंत्र शिक्षण विभाग)मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना (सामाजिक न्याय विभाग)मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना (ऊर्जा विभाग) आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना (सामाजिक न्याय विभाग) या योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीया प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनीही या योजनांच्या प्रगतीचात्यातील नोंदणींचा दर आठवड्याला आढावा घ्यावा. जिल्ह्यांनी उद्दिष्ठ निश्चित करावे. योजना राबवणाऱ्या संबधित विभागांनीही पुढाकाराने कार्यवाही करावी. लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

            ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने ५९ लाख तर ऑफलाईन पद्धतीने १५ लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. एकाच दिवसात विक्रमी साडेसात लाख अर्ज आल्याची माहिती, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी दिली.

            ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये. याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे. नोंदणी करतानाच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच आलेल्या अर्जांची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्डा-वार्डापर्यंत पोहचली आहे. महिला भगिनींचा प्रतिसादही मोठा आहे. त्यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्रांची संख्या वाढवण्यात यावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय थेट लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या.

            मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतही उद्योग विभागासहप्रदूषण नियंत्रण मंडळएमआयडीसी यासारख्या महामंडळांसहसेवा क्षेत्रातील बँका-संस्थासहकारी संस्था- कारखानेदूध संस्था अशा सर्वांकडून मागणी नोंद होईलअसे प्रयत्न व्हावेत. यातही प्रत्येक जिल्ह्याने प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे उद्दीष्ट निश्चित करूनयेत्या काळात प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळेल यासाठी प्रय़त्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

            मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेला गती देण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. पाटील यांनी दिली. मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना महत्वाची आहे. त्यामुळे या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. संबंधित विभागांनी समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

            मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेत देशातील ७३ आणि राज्यातील ६८ तीर्थस्थळांचा समावेश आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशातील महुआ हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळमहाडचे चवदार तळेभगवान बिरसा मुंडा यांचे झारखंडमधील रांची येथील स्थळनागपूरची दिक्षाभूमी यांचाही यात समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. या योजनेतून राज्यातील ज्येष्ठांना लवकरात लवकर तीर्थयात्रा करता यावीयासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. वयोश्री योजनेतही राज्यात १९ हजार १३ अर्ज पात्र ठरले आहेत. या ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी. तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावेअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनाची त्वरेने कार्यवाही व्हावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही महिलांसाठी महत्वाची आहे. या योजनेची अमंलबजावणी तातडीने व्हावीत्यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात यावाअसे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

            बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकारीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच यात्रेचे नियोजन करणाऱ्या सर्व यंत्रणांचे कौतुक केले. पंढरपूर येथील दर्शन मंडपासाठीच्या शंभर कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून पंढरपूरमधील हा दर्शन मंडप उभारण्यात येईल. हा मंडप उभारण्यासाठी मुंबई आयआयटीचे सहकार्य घेतले जाणार आहे. या दर्शन मंडपामुळे अठरा ते चोवीस-चोवीस तास रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळणाऱ आहेत. स्वच्छतागृहपिण्याचे पाणी अशा सुविधा मिळाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळेलअसा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

०००००


 


चातुर्मास 2024 संपूर्ण माहिती*

 *चातुर्मास 2024 संपूर्ण माहिती* 

    


*यंदा महाराष्ट्रीय पंचांगानुसार आज १७जुलै २०२४ पासून चातुर्मास सुरू होत आहे*

 . 


*आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात*


या काळात अनेक व्रतं-उपासना या करण्यात येतात. या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत, यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही आहेत.

चातुर्मास्याचा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वपूर्ण आहे. 

या दिवसांमध्ये  मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे. 


*चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत...*


**शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दही, तूप, गोमुत्र,दर्भजल) सेवन करावे.

**पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी 

*एक भुक्त (एकदाच जेवण), 

*अयाचित (न मागितलेले) जेवण  

*चातुर्मास्य उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे.

* देव, तुळसी,पूजनीय योग्यब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मास्यात लक्षप्रदक्षिणा व्रत. 

*शंकराला लक्ष बिल्वार्चन.

*विष्णूला लक्ष तुलसीअर्चन.

*गणेशाला लक्ष दूर्वार्चन.

*सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घ्य दान

*देवीला रोज कुंकुमार्चन. 

*श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन .

असे विविध अर्चन प्रकार करता येतात.

*रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार. 

*नित्यअभिषेक.

** तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितले आहे.

** चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये काही अडचणीच्या प्रसंगात कालसुसंगत शास्त्रानुसार विचार करुन कार्य करावे.

*पलंगावर झोपू नये, 

*मत्स्य, मांस तसे कधीच खाऊ नये पण किमान चातुर्मासात तरी खाऊ नये

*कांदा, मुळा, वांगे,लसूण हे पदार्थही खाऊ नयेत.

*चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात*

   *आषाढ महिन्याच्या उत्तरार्धा आधिचे चारदिवस म्हणजे आषाढशुध्द एकादशी पासून चातुर्मासास प्रारंभ होतो. या एकादशी पासून एकादशी व्रत सुरु करावे. कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चातुर्मास्य एकादशी व्रत करावे.

    **यानंतरच्या पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ओळखले जाते. चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असा याचा शब्दश:अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणांमुळे या चार महिन्यांत भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. *काहीजण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात. 

*काही जण जप-तप करतात, *काही जण या चार महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात.

**या चार महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे. त्या चुका सुधारुन यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल.यंदा पंच मास आहे.

*आषाढ शुक्ल एकादशी* 

हिला देवशयनी एकादशी सुध्दा म्हणतात या एकादशीला देव झोपतात ही श्रध्दा आहे.

विठूमाऊलीच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा तुकाराम आदि सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीत होते आणि सुरु होतो चातुर्मास्य प्रवचन कीर्तन भजनाचा जागर. 

*गुरुपौर्णिमा* . 

आपले सर्व धर्मकार्य सद्गुरुच्या सान्निध्यात, त्यांच्या चरणाशी लीन होऊन, त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करत करायची असते. 

म्हणून सद्गुरुंची पूजा अर्चना करतात. या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परमकर्तव्य आहे.


चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे *श्रावण*. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा. 

श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार सुध्दा उपासना आहे.

*रविवार* 

आदित्य राणूबाईचे व्रत  

सवितृसूर्यनारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते.

*सोमवार* 

भगवानशंकराच्या पूजनाचे महत्त्व आहे .

*मंगळवार* 

विवाहानंतर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारापासून पुढील पाचवर्षे श्रावणात प्रत्येक मंगळवारी शिवमंगलागौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेने केले पाहिजे.

*बुधवार*, *गुरुवार*

बुध-ब्रहस्पतीचे पूजन 

द्वार, धन-धान्यभंडार, या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून करावे.

*शुक्रवार*

षष्ठिदेवी-जराजीवंतिका पूजन गूळ-फुटाणे दूध याचा नैवेद्य अर्पण करुन केले जाते.

*शनिवार* 

अश्वत्थनारायण, भगवाननृसिंह, श्री हनुमान यांचे पूजन करावे . या दिवशी बटूभोजनाचे महत्त्व सांगितले आहे. 

*नागपंचमी* 

नवनागांचे पूजन पूर्वी नागाच्या वारुळा जवळ करीत .

मात्र असे न करता घरीच नागांचे चित्र काढून त्याचीच पूजा करावी .

*कुलाचार* 

*आपल्या कुलदेवतेची आरधना पूजा,नैवेद्यासाठी पुरणपोळी इ.त्यात्या कुलातील रितीरिवाजानुसार शुद्धअष्टमी , शुद्धचतुर्दशी, किंवा पौर्णिमा या दिवशी करतात.

*खानदेश विदर्भ या भागात नागपंचमी नंतरच्या रविवारी किंवा कुलाचाराप्रमाणे शुक्ल पक्षातील रविवारी *रोट* या नावाने "रण्णा-सण्णा" देवी यांची विशिष्ट पध्दतीने पूजा व नैवेद्य करतात. यात परंपरागत आलेल्या एका श्रीफळाची देवीचीमूर्ती म्हणून पूजा करतात.

*श्रावणी*

आपापल्या वेदशाखे प्रमाणे नागपंचमी किंवा पौर्णिमा या दिवशी वेदोच्चारण करतांना जे  दोष निर्माण होतात ते दोष विसर्जन करुन पुन्हा नव्याने वेदारंभ करावा याला उपाकर्म, श्रवणकर्म म्हणतात. या वेळी अरुंधती याज्ञवल्क्य सहित सप्तर्षींची पूजा करुन, जानवे बदलले जाते.

 *रक्षाबंधन-नारळीपौर्णिमा*

ही येते. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील.

 तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे? कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरु करुन देतात. तुलसीदास यांनी म्हटले आहे, *‘एहि कलिकाल न साधनदूजा | योग, यज्ञ, जप, तप, व्रत पूजा’*  तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप, तप, यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरूजी तुम्हाला मार्गदर्शन करतील.

*श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षात श्रीकृष्णजन्माष्टमी येते. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीरसपूर्ण साजरा करण्याची आपली परंपरा आहे.

*गोपाळकाला*

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी  गोपाळकाला अर्थात दहिहंडी संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या धामधूमीत संपन्न होतो. 

'कृ’ धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे.म्हणून या महिन्यात साधकाने आपली क्रियाशीलता वाढवत स्वत:ला सिद्ध करावे.श्रीमद्भगवतगीतेचे वाचन आणि श्रवण मनन याच महिन्यात केले जाते.

*भाद्रपदातील श्रेष्ठ कर्म -*

श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो भाद्रपद. 

भाद्रपद (‘भद्र’ म्हणजे श्रेष्ठ आणि ‘पद’ म्हणजे पुढील वाटचाल) याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे.

शुक्ल पक्षात 

*हरतालिका* 

हे व्रत, माता पार्वतीने आपल्या सख्यांसह करुन अत्यंत कठीण व्रत कठोरपणे आचरण केले. आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुमारिका सुवासिनी या व्रताचे आजही परिपालन करतात.

*श्री गणेशचतुर्थी*. पार्थिवगणेश पूजन माता पार्वतीने आपल्या मलापासून निर्माण केलेल्या श्रीगणेशाचे पूजन, पृथ्वीपासून अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचेपूजन .

  ********************

***पार्थिव अर्थात माती पासून निर्माण केलेल्या मूर्तीची पूजा **श्रावणात *पार्थिव शिवलिंगार्चन*

**भाद्रपदात पार्थिवगणेश पूजन

**अश्विनात प्रत्यक्ष भूमीत नवधान्य पेरून आदिमायेची पूजा . तसेच सप्तशतीच्या तेराव्या अध्यायात सुरथराजाने मातीपासूनच मूर्ती करुन पूजा केल्याचे वर्णन केले आहे.*कृत्वा मूर्तिं महीमयीम्*

 तेव्हा या तीनही देवता पृथ्वीचे,भूमीचे महत्त्व वाढवणाऱ्या आहेत. आणि या तीनच देवतांचे पार्थिवमूर्ती स्वरुपात पूजन केले जाते.

  ********************

पार्थिव गणेश पूजनातच नव्हे तर श्रीगणेश पूजनातच दूर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या, त्यांच्यातील औषधी गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात.

हा पार्थिव गणेशोत्सव आता जगभरात साजरा होत असतो.

*ऋषीपंचमी* 

या विरक्ती व भक्ती प्रदान करणाऱ्या या व्रतात सप्तर्षींसहअरुंधतीचे पूजन ज्येष्ठमाता करतात . 

*ज्येष्ठागौरी/महालक्ष्मी* 

*अनुराधा नक्षत्रावर आवाहन *ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि *मूळ नक्षत्रावर विसर्जन .असे तीन दिवसांचे हे व्रत आहे. मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा करतात. दक्षिण महाराष्ट्रात गौरी (पार्वती) स्वरुपात . मराठवाडा,विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, या भागात ज्येष्ठा(अलक्ष्मी) कनिष्ठा(लक्ष्मी) या स्वरुपात पूजन केले जाते.

*अनंत चतुर्दशी* 

भगवान श्रीकृष्णांची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. दानाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे.

याच महिन्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज *श्रीमत् भागवत सप्ताह* याला प्रौष्ठपदी म्हणतात अनन्यसाधारण महत्व असलेला काल आहे.

याची समाप्ती पौर्णिमेला होत असते.

*पितृपक्ष*

या महिन्याचा वद्य पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जाते. समस्त पूर्वजांना पिंडप्रदान तर होतेच पण ज्यांचा आपला काहीही संबंध नाही त्यांना सुध्दा धर्मपिंड याच काळात देता येतो.

आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळआहे. 

*अश्विन महिना निरोगी जीवनाचे सार -*

चातुर्मासातील तिसरा महिना                      *अश्विन*    

यात येते नवरात्र वर निर्देशित केल्याप्रमाणे त्रैलोक्य जननी माता भगवतीची नवधान्य पेरुन पूजा बांधली जाते. काहींच्या कुलाचारांनुसार पापड्या, कडकण्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा देवीच्या डोक्यावर बांधला जातो. रोज किंवा पंचमी,अष्टमी या दिवशी सप्तशतीपाठ, अष्टमी किंवा नवमीला पाठाचे हवन करुन नवमी किंवा दशमीला नवरात्रोत्थापन हे ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेने करतात.

*ललितापंचमी*

नवरात्रातील पंचमीला *उपांगललिताव्रत* अत्यंत भक्तीभावाने आणि कुलपरंपरेनुसार केले जाते.

संयम अणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे. या कालावधित मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो.

जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेक शक्ती, ज्ञान-शक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे. या दसऱ्याच्या दिवशी शमी व अश्मंतक(आपटा)यांची पूजा करुन सिमोल्लंघन करतात. नंतर आपट्याची पाने  एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात.यात आपल्या आसुरी विचारांवर विजय प्राप्त करत प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन करु शकू हा निर्धार आहे.

*कोजागरी पौर्णिमा*

या पौर्णिमेला चंद्राकडून अमृत स्त्रवले जाते म्हणून मध्यरात्री इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करुन आटिव दूधाचा नैवेद्य समर्पित करतात. व रात्री नाना प्रकारचे खेळ, नृत्य द्यूतक्रीडा, करुन जागरण केले जाते. 

या महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते. 

याची देवता अश्विनीकुमार आहे. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणेच चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा. 

*गुरुद्वादशी*

दत्तप्रभूंनी या दिवशी श्रीनृसिंहसरस्वती स्वरुपात मोठी लीला केली. आजही नृसिंहवाडी, गाणगापूर, किंवा प्रत्येक श्रीदत्त देवस्थानी हा उत्सव संपन्न होतो.

समुद्र मंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरीअमृत घेऊन अनेकानेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती

*धनत्रयोदशी*

देवांचे वैद्य ,आयुर्वेदाचे उद्गाते भगवानधन्वंतरींचा अवतार दिन. सर्वत्र उत्साहात संपन्न होतो. याच दिवशी सायंकाळी आपल्या धनसंपदेची पूजा करुन. अक्षयधनाची कामना करावी.

*नरक चतुर्दशी*

नरकासुराचा संहार करुन त्याने बंदी बनवलेल्या एकहजार राजकन्यांची मुक्तता करुन त्या राजकन्यां बरोबर स्वतः विवाह करुन समाजात सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था केली. तोच हा नरकचतुर्दशीचा दिवस अभ्यंगस्नान करुन दीपावलीचा पहिला दिवस मानला आहे.

*लक्ष्मीपूजन*

येणा-या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषिराजा याच महिन्यात करत असतो. . 

नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात करतात. याच दिवशी सायंकाळी चित्र-लेखनी-सहित-लक्ष्मी- कुबेराचे पूजन करतात. व्यापारी आपल्या वह्या(चित्र) (लेखनी)पेन,लक्ष्मी, (कुबेर)तिजोरी, याची पूजा करुन आनंद साजरा करतात. मध्यरात्री कचरा काढून बाहेर टाकतात याला अलक्ष्मी निःसारण असे शास्त्रात म्हटले आहे. इतर दिवशी मात्र मध्यरात्री कचरा काढणे अशुभ मानले आहे.

*क्रियाशील कार्तिक महिना*

चार्तुमासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक.

*बलीप्रतिपदा*

भक्त प्रल्हादाचा नातू बली याच्या कडे भगवंतांनी तीनपाऊले भूमी मागितली दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर तिसरे पाऊल बलीने स्वतःच्या डोक्यावर ठेवायला सांगितले. 

या दिवशी पतीला आणि मोठ्या वडीलधाऱ्यांना स्त्रिया आणि भाऊ सोडून सर्व मोठ्यांना कुमारिका औक्षण करतात .त्यांना ओवाळणी मात्र दिलीच पाहिजे हं. 

*भाऊबीज*

बहिणभावाच्या प्रेमाचा हा दिवस. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. प्रत्यक्ष यमराज बहिणीकडे जातात म्हणून त्या दिवशी मृत्यू सुद्धा होत नाही अशी श्रद्धा आहे. बहिणीने भावाला ओवाळून झाल्यावर भावाने हक्काने ओवाळणी दिलीच पाहिजे असा हा दीपावलीचाआनंद लुटला जातो. 

*कार्तिकी एकादशी*

चातुर्मास्याचा काळ संपलेला. ग्रीष्मा ऋतूचे ऊन वर्षा ऋतूतील पाऊस संपून शरदाचं चांदणं अनुभवताना वारकऱ्यांना आपल्या काळ्या आईच्या पोटी आलेल्या धान्यलक्ष्मीची ओढ लागते विठूमाऊली आणि काळीआई मनातली घालमेल हळूहळू दूर होते. एकादशीचा उपवास आणि महाद्वार काला करुन जड पावलाने वारकरी घरी परततो.घरी येतो पण पंढरीची आठवण जात नाही. मग अंगणातल्या तुळशीचा आणि  दामोदर स्वरुपातील भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न करुन नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते.

*वैकुंठ चतुर्दशी*

चातुर्मास्यनिद्राकाल संपवून नव्या निसर्गचक्राला चालना देतांना भगवान शंकराची आतुरतेने झालेली आठवण आणि शंभुमहादेव महाविष्णूंच्या भेटीच्या ओढीने वैकुंठाला निघाले दोघेही एकमेकांना भेटतात तो हा दिवस धार्मिक श्रद्धेने आजही शिवमंदिरात व विष्णूमंदिरात संपन्न होतो.  

*त्रिपुरी पौर्णिमा*

भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला सर्वत्र आनंदीआनंद झाला आजही सर्व शंकराच्या देवस्थानी मोठी रोषणाई करुन दीपमाळा उजळून त्यावर त्रिपुरासुराचे प्रतीक म्हणून एक मोठा काकडा जाळला जातो त्या प्रकाशाने आसमंत उजळून निघतो. 

कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या कालावधीत चातुर्मास्यात अंगिकारलेल्या व्रतांचे उद्यापन करावे असे शास्त्र आहे.

अशा प्रकारे गुरुकृपा, श्रेष्ठ आचरण, मनन, चिंतन, संयमी व्यवहार, उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो. यामुळे मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येईल.  इथे चातुर्मास खऱ्या अर्थाने संपतो.

🙏🙏🙏🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi