Friday, 19 July 2024

आज आपल्यासाठी ५ वेगवेगळ्या विषयावर आरोग्यदायीक माहिती* *आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।*

 *आज आपल्यासाठी ५ वेगवेगळ्या विषयावर आरोग्यदायीक माहिती*


*आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।* 


*भगरीचे आरोग्यासाठी फायदे...❗*


 भगर म्हणजेच *‘वरीचे तांदूळ’* हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.


सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.


पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.

आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.


खरंतर भगर हे काही धान्य नाही. भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया.


हिंदीमध्ये याला ‘सामा चावल’ म्हणतात.

शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भातासारखीच असते.


भगर हे पटापट वाढणारे पीक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘बी’ पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते.

भगर हे अख्या भारतभर उपासाच्या दिवशी केले जाते, पण ते केवळ उपासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत.


जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषकद्रवे आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग

*१. जास्त प्रमाणात प्रोटीन*


भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.

कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते.


*२. फायबर रिच फूड*

भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. 

आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते.

म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात.

भगर पचायला हलकी असते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो दूर होतो, गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.

आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते. त्यामुळे जेवण कमी जाते पण पोट भरते 

या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.


*३. लो ग्लायसेमिक इंडेक्स*


भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.

यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे.

*‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’* असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मधुमेह असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अर्थातच मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.


*४. ग्लूटेन फ्री*


भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन म्हणजे आपण खातो त्या धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ.

आपण ज्या धन्याच्या पिठाला मळतो त्यात ग्लूटेन असते, उदाहरणार्थ गव्हाचे पीठ. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते.

ग्लूटेनमध्ये काही पोषक द्रव्ये नसतात, काही लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी सुद्धा असते.

ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखणे, अपचन यासारखे त्रास होतात.

अशांसाठी भगर जे पूर्णपणे ग्लूटेन फ्री आहे हा एक उत्तम पर्याय आहे, जो पचायला हलका आहे हे आपण वर बघितलेच आहे.


*५. जास्त प्रमाणात आयर्न*


भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) सरल तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.

इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयर्न भगरीतून मिळते.

साधारण १०० ग्राम भगरीतून १८.५ एमजी आयर्न मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयर्नचा सर्वोत्तम स्रोत आहे.


*६. व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त*


भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात.

तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.


*७. सोडियम फ्री फूड*


भगरीत सोडियम नसते ज्यामुळे बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.


*८. भरपूर अँटिऑक्सिडंट्स*


साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.

अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्री रॅडिकल्स नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात.


मोठी माणसे भगर जरी उपसाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना, अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो.

कारण ती पचायला अतिशय हलकी असते.

भगरीसारखे इतके सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे.

======================

*पांढरी किंवा पिवळी कावीळ वरील उपाय :*


केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !

आरोय टीप्स

 पांढरी किंवा पिवळी कावीळ वर उपाय केळीतील अतिशय सोपे औषध घरगुती उपाय !


मेडिकल सायन्सने कितीही जरी प्रगती केलेली असली तरी कावीळ हा रोग आहे तो आयुर्वेदिक उपायाने जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर दवाखान्यामध्ये तो कधीही बरा होत नाही.


कावीळ साठी तुम्हाला माहीत असेल की ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषध तुम्हाला दिली जातात काही ठिकाणी नाका मध्ये ड्रॉप टाकले जातात काही ठिकाणी तुम्हाला दह्यामध्ये औषध दिल जात तर काही ठिकाणी केळीमध्ये औषध दिलं जातं.


तर हे केळी मधल औषध आहे ते  तुम्हाला सांगणार आहे केळी मधलं औषधे सगळ्यात सोप आहे आणि सर्वांना करता येईल अस आहे आणि सहज उपलब्ध होणार आहे म्हणून हा उपाय कोण घेणार आहोत


पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कावीळ होण्याचं जास्त प्रमाणामध्ये जाणवते. कारण कावीळ पाण्यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असते. रक्तामधील बिलिरुबिन पातळी वाढली तर आपली त्वचा रंग बदलून ती पिवळसर दिसायला लागते आणि आपण त्याला कावीळ झाली असे म्हणतो.


कावीळ ही ही दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ  आणि दुसरी पिवळी कावीळ. कोणतीही कावीळ असू देत या औषधाने ती सहज रित्या निघून जाते.


त्याची लक्षणे काय असतात तर खूप अशक्‍तपणा जाणवतो डोकेदुखी ताप भूक कमी होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे मळमळ होणे त्याचबरोबर तुमचे डोळे आणि तुमची जीभ पिवळसर रंगाची होणे ही काविळीची सामान्य लक्षण असतात.  पित्तरस रक्तामध्ये मिसळला तर आपल्या त्वचेला जास्त पिवळा रंग येत असतो आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते आणि तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप आहे ते गंभीर होत असत.


त्याला इंग्रजीमध्ये हिपॅटायटीस असं म्हणतात टायफाईड होऊन या आजारामुळे त्याला बाधा होऊन कावीळ होऊ शकते. तर कावीळ एक सामान्य आजार आहे सर्वांना होऊ शकतो त्याचा वेळेवर जर उपाय केला तर कावीळ कुठल्याही प्रकारची असली तरी ती सहजपणे बरी होते.


कावेळीसाठी केळीमध्ये दिले जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध औषध असते. हे औषध कसं करायचं आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं औषध देणारा कडे जातो आणि हे औषध काय आहे ते दोन-तीन दिवस आपण घेऊन येतो केळीमध्ये आणि आपण खात असतो तर हे इतकं सामान्य औषध आहे की तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढ्या सामान्य गोष्टींमधून कावीळ आहे सहजपणे बरी होते.


 या उपायासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. केळीच्या बऱ्याच जाती आहेत गावठी आणि जवारी. त्याच्यामध्ये  कुठलीही केळीची जात या उपायासाठी चालते तुम्हाला जर  गावठी केळी असेल तर अतिउत्तम. तरी त्यासाठी आपल्याला फक्त अर्ध केळ लागणार आहे. हे केळ पिकलेले असावा


 या उपायासाठी आपण अर्ध केळी घेऊया तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे औषध घेतलेल आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अर्ध्या केळीमध्ये औषध दिलं जातं. तर अर्धी केळी आपल्याला मधून कापून घ्यायचे आहे यामध्ये एक ग्रॅम चुना घालायचा आहे एक ग्राम म्हणजे एका गव्हाच्या धान्यात दाण्या एवढा घालायचा आहे.


केळ सोलून ते मधोमध कापून त्यामध्ये चुना लावल्यानंतर याची चव असते ती थोडीशी कडसर लागते. तेव्हा आपल्याला ते चांगल्या पद्धतीने असो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या माणसाला काविळ  झालेली आहे त्या माणसाला उपाशी सकाळी उपाशीपोटी खायला द्यायच आहे.


अशा पद्धतीने तुम्ही औषधे घेतलेल असेल. केळीमध्ये दिलं जाणारं कावीळचे औषध सलग जर तुम्ही पाच दिवस घ्यायचं आहे हे उपाय उपाशीपोटी करायचा आहे तर कितीही प्रमाणात तुम्हाला कावीळ झालेली असेल तर ती  सहजरीत्या उतरते.


कावीळ झाली असेल तर सलग पाच दिवसांमध्ये या पद्धतीने औषध तुम्ही घेऊन पहा. तुम्ही एखाद्या ठिकाणी केळी मध्ये दिलेले औषध  पाहिला असेल तर या पद्धतीने तुम्ही कावीळ वर उपाय करा. कावीळ सहजरीत्या उतरून जाते. हे सहज रित्या उपलब्ध होणार आणि सर्वांना करता येणारा साध सोप औषध आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल


 यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायची आहेत. तुम्हाला पूर्ण  विश्रांती घ्यायची आहे आणि विश्रांती घेत असताना तुम्हाला तिखट वगैरे पदार्थ तेलकट आहे तूपकट हे पदार्थ खायच टाळायचे आहे. दारू पूर्णपणे टाळायची. त्याचबरोबर मांसाहार करणे पूर्णपणे टाळायच आहे. जरी कावीळ पाच दिवसांमध्ये उतरली तरी21 दिवसांपर्यंत तुम्हाला हे पथ्य पाळायचे आहेत.


कोणत्याही प्रकारची काय वेळ झाली असेल तर अर्धा केळी मध्ये चुना घालून सलग पाच दिवस हा उपाय केला तर कावीळ सहजरित्या उतरून जाईल. तर हा उपाय अवश्य करून बघा आणि याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर द्या.


.. अतिशय मौल्यवान माहिती.. 👆

=========================

*महत्वाची माहिती.*


खालील पदार्थाना एकत्र 

खाऊ नका.

अ )  १  दूधाबरोबर आंबट पदार्थ. तळलेले पदार्थ व फळे हानिकारक

असतात. दूधाबरोबर दही, मीठ,चिंच,कलिंगड,

दोडका,आंबट पदार्थ खाऊ नका.

२  दह्या बरोबर खीर,पनीर, दूध, कलिंगड,केळे,मुळा,गरम

पदार्थ अथवा गरम जेवण

नुकसान करते.

३ मधाबरोबर मुळा,कलिंगड, द्राक्षे, पावसाचे पाणी, गरम पाणी हे पदार्थ हानीकारक असतात. तूप

व मध कधीही समप्रमाणात खाऊ नये.

४  खीरीबरोबर खिचडी,

आंबट पदार्थ, फणस, सातू, दारु वगैरे घेऊ नये.

५  कलिंगडाबरोबर लसुण

मुळा, मुळ्याची पाने,दूध, दही हानीकारक असतात.

६  टरबुजाबरोबर पुदिना, 

गार पाणी चेऊ नये.

७  थंड पाण्याबऱबर शेंगा,

तूप,तेल,कलिंगड,पेरु,

जांभूळ, काकडी किंवा

गरम जेवण करु नये.

८  चहाबरोबर काकडी,

खिरा खाऊ नये.

९  मुळ्याबरोबर गूळ 

नुकसान करते.

१०  तांदळाबरोबर व्हिनेगर हानी करते.


आ)  कंबर किंवा सांध्त्राच्या दुखण्यात केळी,पालक, टोमॅटो,

तांदूळ, दही,त्याचप्रमाणे

आंबट पदार्थ खाऊ नयेत.

ते रोग वाढवतात.


इ)  चैत्र महिन्यात गुळ,

वैशाख महिन्यात तेल,

सेवन करु नये.

ज्येष्ट महिन्यात उन्हात फिरणे,आषाढ महिन्यात

बेलाचे सेवन, श्रावण महिन्यात पालेभाजी 

सेवन,कार्तिक महिन्यात

दह्याचे सेवन,भाद्रपद आणि आश्विन महिन्यात

कारल्याचे सेवन.मार्गशीर्ष

महिन्यात जिर्याचे सेवन, पौष महिन्यात स्त्रीचा संग,फाल्गुन महिन्यात

चण्याचे सेवन हानिकारक

असते.


ई )  प्लॅस्टिकच्या भांड्यात द्रव पदार्थ ठवणे

त्यात ते उकळणे आणि

खाण्यापिण्याने विविध

रोग उत्पन्न होतात. यांचा 

उपयोग खाण्यापिण्याच्या

कामासाठी करु नये.


उ)  या व्यतिरिक्त कास्य,

तांबे किंवा पितळ्याच्या

भांड्यात ठेवलेल्या वस्तू

जसे तूप,तेल,आंबट वस्तू, 

दही,ताक,दूध,लोणी,रसदार डाळी,भाज्या इ. विषयुक्त होतात. या भांड्यात पदार्थ जास्त

वेळापर्यंत ठेवू नयेत.

=======================

*क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना.*


किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना

१) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या.

२) कोथिंबीर रस घ्या.

३) कोबीचा रस घ्या.

४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे.

५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे.

६) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर)

७) हलका व्यायाम करणे.

८) मासाहार टाळावा.

९) केमोमाईनच्या पानांचा काढा घेणे

१०) नेटल लीफ टी घेणे.

११) मुळ्याच्या पानांचा रस एक चमचा घ्या. (रोज)

१२) रोज उशीरासव घेणे तीन वेळा दोन चमचे समभाग पाण्यात.

१३) चंद्रप्रभा वटी व मुत्रदोष नाशक वटी घेणे.

१४) ब्राम्ही च्या पानांचा रस व काळीमिरी एकत्र घेणे.

१५) जेवणातील प्रोटीन मात्रा बंद करून प्रोटीन फ्री डायट देणे.

१६) उच्च रक्तदाब कंट्रोल मध्ये आणणे.

१७) नशा, चहा, काँफी बंद करणे.

१८) पुनर्नवासव घेणे.

( ९ व १० मध्ये नमूद केलेली केमोमाईन व नेटल लिफ ही झाडे नर्सरीतून मिळतील)


*किडनीचे आजार.* 

किडनी फेल्युअर विकारांवर अथवा किडनी अंशतः काम करते किंवा डायलेसिस सुरू असलेली मंडळी ही हे उपाय करु शकतात. ही संपुर्ण पणे आयुर्वेदिक पध्दती असून याचे साईड इफेक्ट्स नाहीत.


१) चार लिटर पाणी उकळून पाव म्हणजे एक लिटर झाल्यावर ते पाजणे थंड करून आर ओ चे पाजू नका. एक लिटर पाणी दिवसभरात

२) क्रियेटीनीन वाढलेल, ब्लड युरीया वाढलेला आहे, डायलेसिस चालू आहे, पोटँशियम ची मात्रा अधिक झालेली आहे, ज्यांची किडनी हे पदार्थ मुत्रमार्गातून रिमुव्ह न करत असल्याने अंगावर एक प्रकारची सूज येते अशा सर्वांना गीलोय, गोखरू, पुनर्नवा पंचांग यांना घरी आणून चांगले कुटून दहा ग्रँमच्या प्रमाणात एकत्रितपणे एक कप पाण्यात उकळून पाव कप झाल्यावर ते देणे. नर्सरीमध्ये ही झाडे सुध्दा मिळतात ती घरी लावून ही रस काढता येतो किंवा अनेक आयुर्वेदिक दुकानात हा रस मिळतो. ते न मिळाल्यास तिघांचे काढे बाजारात मिळतात. ते दोन दोन चमचे या प्रमाणात द्या पंधरा दिवसात रिपोर्ट मध्ये फरक दिसेल. दिवसात दोनदा देणे.

३) क्रियेटीनीन वाढलेल्याना मसालेदार पदार्थ, हेवी जेवण देऊ नका. जी गोष्ट वाढलेय ते कंटेन्ट असलेले पदार्थ देऊ नका. उदा. सोडियम, पोटँशीयम, युरिया वाढलेल्या मंडळींनी हे कंटेन्ट असलेले  पदार्थ देऊ नका. 

४) कपालभारती, अनुलोम, विलोम भसरीका दहा मिनिटे करायला सांगा.

५) हातावरील, पायावरील किडनीचे अँक्युप्रेशर  पाँइंट दाबत जा.

तीन पेक्षा कमी क्रियेटीनीन असलेले मेंबर्स, तीन ते पाचमधील पेशंट ज्यांची किडनी सत्तर टक्के काम करते.अशा पेशंट यांना याचा लवकर रिझल्ट येतो.पण ही औषधे घेताना ही तुमच्या डॉक्टर ना अथवा स्थानिक वैद्याचा सल्ला घ्या. पण अनेक लोकांची डायलेसीस याने बंद होऊ शकतील हा विश्वास आहे.

===================

*तुमच्या कोणत्याही आरोग्य विषयक समस्यांसाठी एकवेळ जरूर संपर्क साधा...👇🏻*

*अधिक माहिती आणि नॅचरल औषधासाठी संपर्क:-*

*पद्मावती हेल्थ केअर*

*9594881581*

*8208426494*

*8799853299*

*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*

*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*

*------------------------------*

         *दवा ना खाना*

*सही समय पर सही खाना, खाना.....*

*👉🏻मो*

*8208426494*

*9594881581*

*वरील नंबर सर्वांनी सेव करावा*

ग्रुप जॉईन करण्यासाठी या नंबर *नमस्कार* असे पाठवा.

*------------------------*

*आरोग्य दृष्ट्या कोणीही हा मेसेज शेअर करू शकता*

Thursday, 18 July 2024

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमातून 13 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य

 आरोग्याची वारीपंढरीच्या दारीउपक्रमातून

13 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य




सेवा

 

            मुंबईदि. 18 : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग 'आरोग्याची वारीपंढरीच्या दारीहा उपक्रम राबवीत आहे. वारीमध्ये 17 जुलै पर्यंत 13 लाख 96 हजार 072 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात आला.

             संत श्री ज्ञानेश्वर महाराजश्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला तर लगेच उपचार मिळावेतयासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारीपंढरीच्या दारीहा उपक्रम हाती घेतला होता. प्रत्येक पाच किलोमीटरवर एक आपला दवाखाना तयार करण्यात आला होता. वारी दरम्यान 6 हजार 368 आरोग्य अधिकारीकर्मचारी यांनी वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून 2,327 रुग्णांवर उपचार करण्यात आले. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी 5 खाटांचे तात्पुरते अति दक्षता विभाग (आयसीयू) सज्ज ठेवण्यात आले होते. येथे ऑक्सिजनमॉनिटरऔषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

            या आषाढी वारीमध्ये डॉक्टरनर्सआरोग्य सहाय्यकआशाआरोग्य सेवकशिपाईसफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर तापसर्दीखोकलाड्रेसिंगजुलाबचा त्रास झाल्यास सेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर गर्दी जास्त असल्याने प्रत्येक ठिकाणी मोठी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

            फिरत्या रुग्णवाहिकेबरोबरच 102 व 108 या रुग्णवाहिकाही पालखी मार्गावर सेवा देत होत्या. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आले होते. रुग्णवाहिकेबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोयही करण्यात आली होती.

 सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात आलेली सेवा

प्रत्येक 5 किमी अंतरावर आपला दवाखाना’-  258

वारी दरम्यान 102 व 108 रुग्णवाहिका 24 बाय 7 उपलब्ध – 707

दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – 5885

महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – 136

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना –136

पालखी मार्गावर आरोग्य दूत –212

पालखी सोबत माहितीशिक्षण व संदेशवहन चित्ररथ – 9

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 5 खाटांची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – 87

आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.

0000

निलेश तायडे/विसंअ

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार

 राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार

- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 

        मुंबईदि. १८ :- पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण - २०२४ तयार करण्यात आले आहे. पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक१८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे. यामध्ये दहा वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

               मंत्री श्री.महाजन म्हणाले कीग्रामीण व शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. राज्यात त्यासाठी उच्चतम दर्जाचे शाश्वत व जबाबदार पर्यटन विकसित करुन ग्रामीण भागातील पर्यटन व कृषी पर्यटनास वाव देण्याच्या दृष्टीने विविध पुरस्कारही देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लघुमध्यममोठेमेगाअल्ट्रा मेगा प्रकल्पांना अगटांमध्ये विभागण्यात आले असून त्यांना गुंतवणूक व रोजगार निर्मितीच्या आधारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पर्यटन घटकांना व्याज परतावाएसजीएसटी परतावाविद्युत शुल्कासह विविध करांमध्ये सवलतींचा धोरणात समावेश आहे. ग्रामीण भागातील पर्यटन उद्योगांसाठी होम स्टेॲग्रो टुरिझम या स्पर्धा विभागनिहाय राबविण्यात येणार आहेत. या धोरणामुळे राज्याचा देशातील राज्यांमध्ये अग्रेसर राज्य श्रेणीत समावेश होणार आहे.

            देशातील व राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणेपर्यायाने व्यापार- उत्पन्न आणि उद्योजकता यांना चालना देणेपर्यटन क्षेत्रामध्ये ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणेपर्यटन क्षेत्रात नवीन गुंतवणूक आणणे,राज्याच्या महसुलात वाढ करणेराज्यातील वैविध्यपूर्णबहुप्रांतीयबहुभाषिक संस्कृती लक्षात घेता स्थानिक लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम आणि उत्सवाचा पर्यटनाच्या  विकासासाठी उपयोग करुन घेणे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन नवकल्पनाउत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविणे यावर या धोरणात भर देण्यात येणार आहे.एक खिडकी प्रणालीच्या संस्थात्मकीकरणासह खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सक्षम वातावरण निर्माण करणे. केंद्र शासनाच्या मैत्री प्रणालीसह संलग्न केले जाणार आहे.

            पर्यटन घटकांना भांडवली गुंतवणूक प्रोत्साहनसीजीएसटी कराचा परतावा, वीजदरात सवलत,सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांना इतर वित्तीय प्रोत्साहन, व्याज व अनुदान प्रोत्साहनमहिला उद्योजकअनुसूचित जाती-जमातीभिन्न सक्षम घटक यांना अतिरिक्त प्रोत्साहन,देश-परदेशातील पर्यटन प्रदर्शन,ट्रॅव्हल शो- मार्टमध्ये सहभागासाठी पर्यटन भागधारकांना प्रोत्साहन ग्रामीण पर्यटन मेळावा,वार्षिक मेळावा आयोजनासाठी प्रोत्साहन (प्रति रु. १५ लक्ष पर्यंत),मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क सूटयुवा पर्यटनासाठी प्रोत्साहन,पर्यटन पुरस्कारकौशल्य विकास कार्यक्रमांना प्रोत्साहन,पर्यटन/आदरातिथ्य उद्योगातील संशोधनासाठी प्रोत्साहन (प्रति रु. १० लक्ष पर्यंत),माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन (प्रति रु. १० लक्ष पर्यंत),दुर्मिळ कला,संस्कृती आणि पाककला पुनरुज्जीवित करण्यास प्रोत्साहन ( प्रति रु. ५ लाख पर्यंत),नाविन्यपूर्ण उत्पादने/सेवांसाठी प्रोत्साहन (प्रति रु५० हजार पर्यंत),दिव्यांगाना रोजगार देण्यासाठी प्रोत्साहनपर्यावरण पर्यटन प्रमाणपत्रासाठी प्रोत्साहन (प्रति रु. १० लक्ष पर्यंत),कृषीकॅराव्हॅनसाहसी पर्यटनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे, याबाबतचा सविस्तर शासन निर्णय राज्यशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी म्हटले आहे.

000

दिव्यांगांच्या उपक्रम अनुदानासंबंधी शासनाचे धोरण जाहीर

 दिव्यांगांच्या उपक्रम अनुदानासंबंधी शासनाचे धोरण जाहीर

    मुंबई दि. 17 : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळासंलग्न वसतीगृहेकार्यशाळा (प्रशिक्षण केंद्र)आणि अनाथ मतिमंद यांची बालगृहे ही कायमस्वरूपी विनाअनुदान /विना अनुदान तत्त्वावर चालवली जातात. त्यांच्या अनुदानाबाबत प्रचलित असलेले शासन निर्णय कालबाह्य झालेले आहेत. तसेच दिव्यांगांच्या उपक्रमांना अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी पुरेशा नाहीत. ही बाब लक्षात घेता शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सर्व संस्थांना/ उपक्रमांना शासन अनुदानसंबधी धोरण जाहीर केले आहे. याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

     या धोरणामुळे विशेष कार्यशाळा अनुदान तत्त्वासंबधी अन्य बाबतचे इतर शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात आले आहेत. या धोरणानुसार 15 वर्षे पूर्ण झालेल्या 'श्रेणीतील विनाअनुदानित संस्थांना अनुदानित तत्त्वावर मंजुरी देण्यासाठी विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मूल्यांकन समिती गठीत करण्यात आली असून त्याचा विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आयुक्तदिव्यांग कल्याण विभाग, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली देखील छाननी समिती आहे. सदर  समितीला  संस्थांचे प्रस्ताव राज्य समितीकडे सादर करावे लागणार आहेत.

            राज्यातील दिव्यांगांच्या उपक्रमासंदर्भात विविध दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगाची संख्या विचारात घेऊन राज्यासाठी दिव्यांगांचा बृहत आराखडा सदरच्या धोरणाअंतर्गत तयार करण्यात येणार आहे. सदर धोरणामध्ये सर्व संस्थांच्या स्वयंमूल्यांकनासाठी विविध नमुनेदेखील शासनाने निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार त्यांना गुणांकन देण्यात येणार आहे व दिलेल्या गुणांकनांवरून संस्थांची श्रेणी अ,क निश्चित होणार आहे. सदर धोरणामुळे ज्या संस्थांना अनुदान मिळणार आहे. त्या संस्थांवर संपूर्णपणे नियंत्रण शासनाचे असणार आहे. सदर संस्थांच्या भरतीकर्मचारी मान्यताअनुदान व इतर उपक्रम याबाबतदेखील संपूर्ण नियंत्रण या धोरण अंतर्गत ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच बंद पडलेल्या दिव्यांग उपक्रमाच्या संस्था यांचे हस्तांतर व स्थलांतर करणे याबाबतचादेखील समावेश सदर धोरणात करण्यात आला आहे.                                                          0000

भारत..* *फुकट्यांचा देश...* आता बदला

 *भारत..* *फुकट्यांचा देश...*


     भारत सरकार तथा राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता भारत हा फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात आहे. येथील जनतेला सुविधाही हव्यात पण वैयक्तिक स्वार्थ त्याहून मोठा. नेमकी हीच मानसिकता राजकारण्यांनी ओळखून फुकट वाटण्याचा सपाटाच लावला आहे. 

   *सर्वात प्रथम फुकट वाटण्याची सुरुवात तामिळनाडू या राज्यातून झाली. पुढे पुढे निवडणूका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची स्पर्धा सुरू झाली. सर्व सामान्य करदात्यांच्या पैशातून कोणी लॅपटॉप वाटतात तर कोणी फुकट वीज आणि पाणी देतात. हे सर्व करीत असतांना राज्य सरकारांची आर्थिक स्थिती दोलायमान झालेली आहे. आरोग्यविषयक सोयी सवलती समजू शकतो. परंतु सध्या सर्रासपणे अन्नधान्यापासुन तर घरगुती चैनीच्या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

एसटी बस तर कर्नाटक आणि दिल्ली मध्ये तर स्त्रियांना संपूर्ण पणे  मोफत केली आहे. यामुळे गरज नसताना लोक फिरत आहेत. परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा सध्या जागा मिळत नाही.  निराधार योजना आणली पण चांगला भक्कम आधार असणारे लोक सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत. तसेच यासाठी काही महाभाग आपले वय वाढवून योजनांचा फायदा पदरात पाडून घेतात. शेतकऱ्यांना १ रुपयात शेत विमा, विविध सबसिडी, शेतकरी सन्मान निधी,विहीर, पंप, पाईप ,स्पिंकलर , म्हशी बकऱ्या.. विज बिल माफी etc.. मोफत योजनांचा पाऊस पडत आहे.

पीएम आवास योजनेअंतर्गत मोफत घरे... मोफत आरोग्य पाच लाखापर्यंतचे आरोग्य विमे.. मोफत धान्य मोफत गोदाम... आता महिलांना लाडकी बहिण योजना... थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय, नोकरदार, आणि टॅक्स पेयर सोडले तर एक घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही. वरून जनतेची ओरड आहे की पेट्रोल स्वस्त करा.. वस्तू स्वस्त करा... तिकडे शेतकऱ्यांना धान्याला अजून वाढीव भाव हवा... इकडे जनतेला स्वस्ताई हवी. 

ह्या योजना हव्यात पण खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच. या योजनांचे दुष्परिणामही आता दिसत आहेत. काम करायला कुणी तयार नाही, कामावर मजूर मिळत नाही. शेतीच्या कामे निंदणी खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या... आता कदाचित त्याही कमी होतील. ग्रामीण भागात तर ही स्थिती आहे की महिन्याला हजार रुपये जरी कमावले तरी सर्व खर्च निभावतो कारण धान्य  मोफत किंवा कमी किमतीत मिळते. सबसिडीवर सिलेंडर मिळतात... वृद्धांना निराधार चे पैसे मिळतात, घर तर आधीच फुकट आहेत. यामुळे जनता कमालीची निष्क्रिय झाली, व्यसनी झाली. ग्रामीण भागामध्ये आता दारू पुरतेच काम करताना काही लोक दिसतात. कामाला ये म्हटलं तर ५ तासांची मजुरी ५०० रुपये सांगतात. ह्या योजनांनी जनतेचे भले व्हायचे असते तर गेल्या पन्नास वर्षातच झाले असते. कित्येक वर्षांपासून दारिद्र्यरेषेखाली असणारे लोक आजही दारिद्र्यरेषेखालीच आहेत. आजही ते तेच आयुष्य जगतात कारण त्यातून बाहेर निघण्याची मानसिकता सरकारने कधी निर्माण होऊच दिली नाही. सर्व काही मोफत किंवा आरामात बसून मिळत असताना उगीच कामाची दगदग करणार कोण. आता त्यांच्या डोळ्यात स्वप्नही निर्माण होत नाहीत. आधीच व्यसनाधीन असलेला बाप आजूबाजूला वातावरणही व्यसनाचे परिणामी या वर्गातील मुले शाळेत तेवढे लक्ष देत नाहीत आणि तरुण वयात तेही व्यसनाच्या अधीन होत आहेत. याचा ही सर्व्हे सरकार ने एकदा करायलाच हवा. पण राजकीय लोकांना याची काही देणं घेणं नसावे. या तरुण वर्गाला स्वतःकडे आकर्षित करत ते त्यांच्याच रॅलीची महफिल वाढवत आहेत. पण या फुकट खाऊ बरबाद पिढ्यांचे भविष्य काय. इतके दिवस फुकट घेऊनही हे लोक जर तिथेच असतील तर यांच्यावर होणारा खर्च निष्फळ वाया जात नाही का. टॅक्स भरणारा वर्ग रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला चांगले आयुष्य देण्याचे स्वप्न रंगवत सतत कष्ट करत मिळालेला त्यांचा तो पैसा...आणि त्यातून भरला जाणारा टॅक्स हा देश चालवतो, मोफत बसून खाणारी जनता नव्हे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे, याचा अर्थ जगण्यासाठी, चांगल्या सुख सुविधांसाठी येथे बरीच स्पर्धा करावी लागणार आहे. असे असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर फुकट वाटप होत असेल तर ही धोक्याची घंटा नक्कीच असणार आहे. इथे देश महत्त्वाचा की वैयक्तिक राजकीय स्वार्थ हे आता जनतेनेच ओळखणे आवश्यक आहे. हे असेच सुरू राहिले तर जनताच एक दिवस फुकट योजनांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. टॅक्स पेयर्स यांनी टॅक्स का भरावा, कारण ते कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करत आहेत. त्यांना कुठल्याच मोफत ची अपेक्षा नाही. मग त्यांचा कष्टाचा पैसा जर असा फुकट वाटला जात असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा. कारण पैसा तसाही पाण्यातच जाणार आहे.

*आज बालवाडीपासून फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासून लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.* 


 *देशात सध्या जवळपास ६०% लोकसंख्या तरुणांची ही अवस्था आहे, हे प्रमाण संपुर्ण महाराष्ट्रात आहे.*

*ज्या वयात आपले भविष्य  घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते.*

*अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे.*    

*यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या अनेक  वर्षापासून  इ. १ ली ते ८ वी पर्यंत परीक्षा घेतली जात नाही.*

*९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे.*

*ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार पंतप्रधान कसा चुकीचा, मुख्यमंत्री कसा चुकीचा या पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असतो.*

*आता ही तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते.*

*फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन  यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.*

*आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः,बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण ध्येयवादी असावा तर तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.*

*सगळे फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून ही त्यांची अपेक्षा देखील राहणार.*

*कोणतीही गोष्ट फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.*

 *स्विझरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलठ्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला.*   

*आपल्याला स्विझरलंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.*

*आपल्याला जर खरच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगति पथावर न्यायचे असेल भारत मातेला परम वैभव प्राप्त करायचे असेल तर सगळे फुकट ही मानसिकता सोडा. अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय आज मनापासून करा. सरकारने जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायला हव्यात.*

*अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे, ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्या पेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधला ना. ते जीवन जगले ना.* 

*आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, इतर देशात कुठेही नाही.*

*मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो.* *याच जिवंत उदाहरण आज खेडे गावामध्ये शेतात काम करायला मजुर मिळत नाही  त्यामुळे शेती परवडत नाही याला जबाबदार आपले नेतेच ज्यानी ही अफुची गोळी आपल्या पीढीला दिली . सरकार तरी कोठुन आणि किती दिवस अस फुकट देणार कुठुन तरी खरेदी करणार त्याला पैसा कोण देणार आपणच आपल्या करातुन आयकरातुन देणार ( इनकम टॅक्स )*      

*आणि मग यातून आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे 'रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार  दुराचार , बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राची प्रगती होण्याऐवजी यातून नुकसान जास्त होते.*


*"आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा , पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्की विचार करायला हवा."* 


*फुकट नको उज्वल भविष्याची स्वप्ने भंग होत आहेत तरुण पिढी निष्क्रिय बनत आहेत सरकार व समाज व्यवस्थेने या कडे लक्ष घातले पाहिजे. सुज्ञ सुजाण नागरिकांनी फुकट मुफ्त या गोष्टींना कडाडून विरोध करायला हवा. राजकीय पक्षांच्या लाॅलीपाॅपला विरोध आवश्यक आहे*.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल

 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी

 १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल

            - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

       मुंबई, दि.१८ : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून,  आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचेराज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

        मंत्री श्री.लोढा म्हणाले कीआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे.राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन  करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्यक्षात १९५८ महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल केले आहेतही बाब सकारात्मक आहे. 

    मंत्री श्री.लोढा म्हणाले कीप्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील सर्व युवक-युवती पात्र आहेत. कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालयीन युवक युवतींना देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे युवक घडावेतयासाठी राज्य आणि केंद्र सरकार काम करत आहे.

Wednesday, 17 July 2024

हे भगवान विट्ठला...किसानों को आनंदी रखना ...मजदूरों और सामान्य लोगों के जीवन को समृद्ध करना "

 हे भगवान विट्ठला...किसानों को आनंदी रखना  ...मजदूरों और सामान्य लोगों के जीवन को समृद्ध करना "

मुख्यमंत्री ने भगवान विट्ठल मंदिर में की पूजा

 • आषाढ़ी एकादशी के अवसर पर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे के हाथों हुई महापूजा

• विट्ठल को श्रद्धांजलि अर्पित करने दर्शन मंडप और टोकन दर्शन प्रणाली लागू करने के लिए १०३ करोड़ रुपये

• पंढरपुर में बनेगा एक हज़ार बिस्तरों वाला अस्पताल

            पंढरपुर, १७ जुलाई: आषाढ़ी एकादशी के अवसर पर पंढरपुर का पूरा माहौल भक्तिमय हो गया, जहां हर कोई भगवान पांडुरंगा की भक्ति में खोया हुआ नजर आया। इस अवसर पर उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किसानों की भलाई के लिए भगवान विट्ठल से प्रार्थना की,  “हे भगवान, किसानों को खुश रखना...मजदूरों, किसानों और आम लोगों के जीवन को समृद्ध करना। हे प्रभू सभी के कष्टों को दूर करना ”, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने भगवान विट्ठल के चरणों में प्रार्थना की।

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने आज अपनी पत्नी के साथ आषाढ़ी एकादशी के अवसर पर श्री विट्ठल रुक्मिणी महापूजा की। उच्च और तकनीकी शिक्षा मंत्री और पालक मंत्री चंद्रकांत पाटील, राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, स्वास्थ्य मंत्री डा. तानाजी सावंत, शालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संसद सदस्य श्रीकांत शिंदे,  विधायक समाधान औताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावले, जिलाधीश कुमार आशीर्वाद, पुलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समिति के संयुक्त अध्यक्ष गहणिनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेलके और अन्य गणमान्य व्यक्ति भी उपस्थित थे।

मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि राज्य सरकार 'सामान्य लोगों की सरकार' है, इसलिए वह आम लोगों के जीवन में शांति, समृद्धि और खुशी लाने के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने कहा कि इस शुभ दिन पर हम पांडुरंगा से प्रार्थना करते हैं कि वे राज्य के किसानों के जीवन में खुशहाली लाएं और मजदूरों और किसानों के जीवन में समृद्धि और खुशहाली लाएं। उन्होंने कहा कि राज्य सरकार आम लोगों के जीवन को बेहतर बनाने के लिए प्रयास कर रही है। बेरोजगार युवाओं के लिए मुख्यमंत्री-माझी लाड़की बहिन योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री कार्य शिक्षण योजना जैसी विभिन्न योजनाओं को लागू करके लोगों के जीवन को उन्नत किया जाएगा।

इस वर्ष २५ से ३० प्रतिशत अधिक वारकरी

पंढरपुर में माहौल हर जगह भक्ति से भरा हुआ है क्योंकि आषाढी वारी के लिए आने वाले वारकरियों की संख्या में २५ से ३० प्रतिशत की वृद्धि हुई है। मुख्यमंत्री ने कहा कि वारकरी समुदाय हमेशा भागवत धर्म के ध्वज को ऊंचा रखता है और उनकी सरकार यह सुनिश्चित करते हुए उन्हें सभी सुविधाएं प्रदान करेगी कि उन्हें किसी भी प्रकार की असुविधा का सामना नहीं करना पड़ेगा।

उन्होंने यह भी कहा कि सरकार ने वारकरी महामंडल की स्थापना की है और वारी-जुलूस में दिंडियों (विभिन्न समूहों) के लिए अनुदान की घोषणा की है। उन्होंने आगे यह भी कहा कि आषाढी वारी के लिए जिला प्रशासन को दी जाने वाली राशि को तीन गुना तक बढ़ा दिया गया है. उन्होंने कहा कि पंढरपुर की तीर्थयात्रा विकास योजना सभी की सहमति से तैयार की जाएगी.

विट्ठल रुक्मिणी मंदिर के संवर्धन के लिए ७३ करोड़ ८० लाख

विट्ठल रुक्मिणी मंदिर के संवर्धन के लिए ७३ करोड़ ८० लाख रुपये की धनराशि को मान्यता दे दी गई है. इसके तहत सभी निर्माण कार्य उच्च गुणवत्ता के होंगे और मंदिर को उसका पुराना गौरव प्राप्त होगा। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने घोषणा की कि प्रशासन और मंदिर समिति तिरुपति बालाजी मंदिर की तर्ज पर विट्ठल रुक्मिणी मंदिर में दर्शन मंडप और टोकन दर्शन पद्धति को लागू करने के लिए तैयार है और प्रस्तावित योजना के लिए १०३ करोड़ रुपये की धनराशि को मंजूरी दे दी गई है। श्री शिंदे ने यह भी काहा कि एमटीडीसी के साथ मंदिर समिति का समझौता भविष्य में भी जारी रहेगा।

उन्होंने कहा कि सरकार यह सुनिश्चित करने के लिए हर संभव प्रयास कर रही है कि तीर्थयात्रियों को सभी प्रकार की सुविधाएं प्रदान की जाएं। उन्होंने यह भी कहा कि राज्य सरकार सकारात्मक दृष्टिकोण रखते हुए मंदिर समिति के सभी कर्मचारियों की समस्याओं का समाधान करेगी.

पंढरपुर में १००० बिस्तरों वाला नया अस्पताल

स्वास्थ्य विभाग ने आषाढ़ी वारी के अवसर पर चार स्थानों पर मेगा स्वास्थ्य अभियान का आयोजन किया है और इस महाआरोग्य अभियान से अब तक आठ लाख से अधिक भक्त लाभान्वित हुए हैं और १५ लाख से अधिक लोगों को इसके माध्यम से स्वास्थ्य लाभ मिलने की संभावना है।

मुख्यमंत्री ने बताया कि इस अवसर पर देश-विदेश से श्रद्धालु पंढरपुर आते हैं और उन्हें स्वास्थ्य सुविधाओं की कोई कमी न हो, यह सुनिश्चित करने के लिए पंढरपुर में १००० बिस्तरों वाला नया अस्पताल बनाया जा रहा है।

प्रमुख वारकरी सम्मानित

मुख्यमंत्री ने नाशिक जिला के सताना तालुका के अंबासन गांव के निवासी प्रमुख वारकरी बालू शकर अहिरे (५५ वर्ष), किसान श्रीमती आशाबाई बालू अहिरे (५० वर्ष) को सम्मानित किया। सम्मानित तीर्थयात्रियों को एक वर्ष के लिए एसटी निगम की बसों में मुफ्त यात्रा के लिए राज्य परिवहन निगम द्वारा प्रदान किया गया रियायती पास सौंपा गया। ये प्रमुख तीर्थ यात्रा पिछले १६ वर्षों से नियमित रूप से वारी में शामिल होते रहे हैं।

श्री विट्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

इस अवसर पर श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर समिति द्वारा स्थापित श्री विट्ठल निर्मल दिंडी पुरस्कार भी वितरित किया गया। संत तुकाराम महाराज वंशज देहुकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालकी सोहला, देहू ने १ लाख रुपये का प्रथम पुरस्कार जीता। ७५ हजार रुपये का दूसरा पुरस्कार पुणे के दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहला ने जीता, जबकि ५० हजार रुपये का तीसरा पुरस्कार श्री गुरु बाबासाहेब अजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहला, इंदापुर ने जीता। पुरस्कार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे के हाथों वितरित किये गये।


Featured post

Lakshvedhi