Friday, 5 July 2024

प्रलंबित जलसंधारण योजनांचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा

 प्रलंबित जलसंधारण योजनांचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा

- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

            मुंबई, दि. 5 : मृद व जलसंधारण विभाग व जलसंधारण महामंडळाने कार्यारंभ आदेश दिलेल्या आणि दोन वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या जलसंधारणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

            या संदर्भात आढावा बैठक मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी बैठकीस व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशीरेमुख्य अभियंता नागपूर विजय देवराजप्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. राठोड म्हणालेराज्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामाचा आढावा घेऊन कामे तत्काळ पूर्ण करावीत. प्रकल्प पूर्ण होण्यास नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर त्या प्रकल्पाच्या मूळ किंमतीमध्ये वाढ होते. मुदतवाढ देऊनही कामे पूर्ण झाली नाहीत त्याची कारणे शोधावीत. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काही कामे प्रलंबित राहत असल्यास शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा. तसेच काही ठेकेदारांनी काम करण्यास असमर्थतता दाखवल्यास तसे अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी दिले.

            विभागाचे मुख्य काम हे ० ते ६०० हेक्टर मधील लहान प्रकल्पांद्वारे सिंचनक्षेत्रामध्ये वाढ करणे हे असल्यामुळे त्यासाठी कटिबद्ध राहावे अशी सूचना त्यांनी केली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांबाबत आढावा घेऊन काम सुरु न होणेकामाची प्रगतीठेकेदार सक्षम नसल्याबाबत मुख्य अभियंता यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

0000

रस्ते अपघातांवर नियंत्रणाकरीता एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली

 रस्ते अपघातांवर नियंत्रणाकरीता

एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली

- मंत्री दादाजी भुसे

            मुंबईदि. 5 : राज्यात रस्ता अपघातांची संख्या कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून कृती आराखडा तयार करून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. अशी माहिती, मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

                सदस्य भीमराव तापकीर यांनी राज्यात होत असलेले वाहन अपघात’ विषयावर अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. 

            मंत्री श्री. भुसे म्हणाले कीपुणे शहरात लोकसंख्या वाढत असून वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. पुणे शहरातील अपघात कमी करण्यासाठी महानगरपालिकापरिवहन विभागवाहतूक पोलीसराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन एक महिन्याच्या आत पुण्यात करण्यात येईल.  पुणे शहरात प्राणांतिक अपघातामधील घटना 2022 मध्ये 696तर 2023 मध्ये 596 घडल्या. यामध्ये 14.40 टक्क्यांची घट झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील अपघातातील अशा घटनांमध्ये 1.4 टक्क्याने  कमी झाल्या आहे. पुणे परिवहन कार्यालयामार्फत शहरातील वाहतूक नियम मोडणाऱ्या 1943 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 13.16 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी ते मे 2024 दरम्यान विविध गुन्ह्यापोटी 49 हजार 447 वाहने दोषी आढळून आली आहेत.  या वाहनधारकांकडून 798.77 लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

            रस्ते अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन चालक चाचणीअपघातांची ऑनलाईन नोंदणीअधिकाऱ्यांना प्रशिक्षणरस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येत आहे.  चालकांसाठी नेत्रआरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील अपघातांची प्रमाण कमी होत असल्याची नोंद आहेअसेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

--

नीलेश तायडे/विसंअ/


सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीची आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी

 सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीची

आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी

– मंत्री उदय सामंत

मुंबईदि. 5 : भिवंडी (जि. ठाणे) येथील सनलाईट हॉस्पिटलमध्ये बालिकेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. सामंत म्हणाले कीया प्रकरणात एका बालिकेचा बळी गेला ही दुर्दैवी घटना आहे. याबाबत सदस्यांनी दिलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले असेलतर त्याबाबत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल. राज्यात अशाच प्रकारच्या मेडिकल निग्लिजन्सच्या घटना घडल्या असतीलतर आवश्यकता पडल्यास राज्यस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल.

दरम्यानया प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही संबंधितांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांद्वारे याची चौकशी करण्यात येईलअशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

कांदळवनाच्या संरक्षणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

 कांदळवनाच्या संरक्षणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी

प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ५ : कांदळवने ही फ्लेमिंगोंचे (रोहित पक्षी) अधिवास आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील फ्लेमिंगोंचे हे अधिवास संरक्षित करण्यासाठी तसेच आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीने दोन महिन्यांत याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले जातील, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य चेतन तुपे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे फ्लेमिंगोंचा अधिवास चांगला आहे. इराण, मध्य आशिया आदी ठिकाणांहून फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचा प्रवास करुन या भागात येतात. येथील कांदळवने ही त्यांची अधिवास क्षेत्रे आहेत. कांदळवन हे फ्लेमिंगोंचे सुरक्षा कवच असल्याने ते जपले पाहिजे. त्यामुळे या क्षेत्राचे नुकसान करणाऱ्यांना आर्थिक दंडासोबतच शिक्षेची तरतूद करता येईल का, याचा विचार केला जाईल, अशी माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हा अधिवास अधिक संरक्षित करण्यासाठी  राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणाऱ्या समितीत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, सिडको, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरविकास विभागाचे अधिकारी  यांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

कांदळवने जपण्यासाठी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया मॅपिंग करत आहेत. त्यामुळे महसूल विभागाकडे असणारी ही जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केंद्र शासनाकडे करणार असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, नेरुळ सीवूडस (नवी मुंबई) येथील डीपीएस तलावाजवळ सहा फ्लेमिंगो पक्ष्यांचा झालेल्या मृत्यूबाबत चौकशी करण्यात आली.  त्यांचे शवविच्छेदन केले असता चार पक्ष्यांचा मृत्यू हा श्वसनक्रिया थांबल्याने झाल्याचे कारण समोर आहे. इतर दोन पक्ष्यांचे मृतदेह भग्नावस्थेत असल्याने त्याचे कारण समजू शकले नाही. अर्थात,  तेथील स्थळ पाहणीनंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या तलावाशेजारील रस्त्यांवर असलेले एलईडी दिवे बदलून तिथे लो प्रेशर सोडियम दिवे अथवा पिवळ्या रंगांचे एलईडी दिवे बसविण्याची शिफारस केल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

यावेळी आशिष शेलार, संजय केळकर, जयंत पाटील यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले.

०००

राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार

 राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबईदि. 5 राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहितीअंदाज घेण्यात येतो. महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत. 10 हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभागकृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहेअशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली.

                यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाणभास्कर जाधव,  राजेश टोपे यांनी भाग घेतला.

             मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीपीक विमा कायद्यानुसार कंपनीला विमा मंजूर झाल्यापासून  15 दिवसांच्या आत परतावा शेतकऱ्यांना द्यावा लागतो. या मुदतीत नुकसानीचा परतावा दिला नाहीतर व्याजासह  कंपनीला ही रक्कम देण्याचे बंधन आहे. जळगांव जिल्ह्यात आंबिया बहार 2022-23 मध्ये पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी  66 हजार 988 अर्ज नुकसान भरपाईस पात्र ठरले आहे. सन 2022-23 मध्ये पीक विम्यापोटी 593 कोटीचे वितरण झाले आहे. अशाप्रकारे आंबिया बहारात 2022-23 मध्ये राज्यात शेतकऱ्यांकडून 821 कोटी रूपये विम्याचा हप्ता भरण्यात आला होता. सबंधित वर्षात नुकसान भरपाईपोटी एक हजार 23 कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळाले आहे.  जळगांव जिल्ह्यात या शेतकऱ्यांनी  821 कोटींपैकी 375 कोटींचा विमा हप्ता भरला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सदर वर्षात शेतकऱ्यांना 594 कोटी रूपयांचा परतावा मिळाला आहे. 

            जळगांव जिल्ह्यातील आंबिया बहर 2022 -23 मध्ये हजार 686 विमा न मिळालेल्या अर्जांची  जिल्हाधिकारीजळगांव यांनी महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्रनागपूर यांच्याकडून पुनर्तपासणी करण्यात आली आहे.  राज्यात एक रूपया पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागील 3200 कोटी व आताचे हजार कोटी असे 7200 कोटी रूपये देण्यात आले आहे. हे अंतिम नसून हजार कोटीपर्यंत मदत मिळणार आहे. पीक विमा कंपनीने परतावा दिला नसल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येईल. कोकणात ढगाळ वातावरणामुळे आंबा फळपीकाचे नुकसान होते. या नुकसानीपोटी विमा मिळण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईलअसेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांना अनियमितरित्या जमीन वाटपबाबत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी

 प्रकल्पग्रस्तांना अनियमितरित्या जमीन वाटपबाबत

उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

            मुंबईदि. 5 : शासनाने आधी पुनर्वसन मग धरण’ हा कायदा पारित केला आहे. याच कायद्यानुसार सध्या प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र कायदा येण्यापूर्वी राज्यात काही प्रकल्प झाले आहेत. या प्रकल्पांबाबत जमीन अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनीसातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांना अन्य ठिकाणी शासकीय जमिनी देण्यात आल्या आहेत. ज्यांची प्रकल्पात जमीन नाही अशा अनियमितरित्या पर्यायी शासकीय जमिनींचे वाटप केल्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

             याबाबत सदस्य समाधान अवताडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाणबाळासाहेब पाटीलयशोमती ठाकूरदिलीप मोहिते - पाटीलमहेश शिंदे यांनी उपप्रश्न विचारले.

             मंत्री श्री. पाटील म्हणाले कीप्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटपाबाबत अनियमितता झाली असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. या संदर्भात चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. प्रकल्पात भोगवटादार 1 ची जमीन गेली असल्यास प्रकल्पग्रस्तास भोगवटादार 1 ची जमीनच देण्याचा शासनाचा नियम आहे.

            शासनाने अधिग्रहीत केलेली जमीन प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येते. ही जमीन ज्या ठिकाणी आहेतिथेच देण्यात येते. कोयना प्रकल्पाबाबत अनियमितपणे जमीन वाटपाबाबत कार्यवाही करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या जमीनीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांची दुबार जमीन घेतली गेली असल्यास चौकशी करून त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पात्र प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात येईलअसेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

देवगिरी किल्ला परिसरातील भारतमातेच्या दर्शनाला बंदी नाही

 देवगिरी किल्ला परिसरातील भारतमातेच्या दर्शनाला बंदी नाही

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ला येथे असलेल्या भारतमाता मंदिरात दर्शनाला कोणतीही बंदी नाहीअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.

            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम 93 अन्वये याबाबतची सूचना मांडली होती.

            मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले कीयासंदर्भात मी 20 जून रोजी प्रधानमंत्री यांना पत्र लिहून अशी घटना होऊ नये, अशी विनंती केली. पुरातत्व विभागाने अशी कोणतीही बंदी नाही असे पत्राद्वारे कळविले आहे. तेथे पूजा अर्चा सुरू असून भारतमाता मंदिरश्री गणेश मंदिरश्री जनार्दन स्वामी मंदिर येथील पर्यटकांसाठी तसेच भाविकांच्या दर्शनासाठी कोणताही प्रतिबंध केलेला नाही. याठिकाणी एकादशीआषाढी एकादशीकामिका एकादशीजनार्दन स्वामी यांची पुण्यतिथी याप्रसंगी येणाऱ्या भाविकांसाठीवारकऱ्यांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विनाशुल्क प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

            प्रत्येक दुर्ग किल्ल्यांच्या परिसरात विविध देऊळे आहेततेथे स्वच्छता राखण्याबाबतदिवाबत्ती करण्याबाबत कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात यावीअशी सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने केली. त्यावर राज्याच्या अखत्यारीतील स्थळांमध्ये अशी व्यवस्था निश्चित करण्यात येईलअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

0000.

Featured post

Lakshvedhi