Friday, 5 July 2024

रस्ते अपघातांवर नियंत्रणाकरीता एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली

 रस्ते अपघातांवर नियंत्रणाकरीता

एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली

- मंत्री दादाजी भुसे

            मुंबईदि. 5 : राज्यात रस्ता अपघातांची संख्या कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून कृती आराखडा तयार करून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. अशी माहिती, मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

                सदस्य भीमराव तापकीर यांनी राज्यात होत असलेले वाहन अपघात’ विषयावर अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. 

            मंत्री श्री. भुसे म्हणाले कीपुणे शहरात लोकसंख्या वाढत असून वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. पुणे शहरातील अपघात कमी करण्यासाठी महानगरपालिकापरिवहन विभागवाहतूक पोलीसराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन एक महिन्याच्या आत पुण्यात करण्यात येईल.  पुणे शहरात प्राणांतिक अपघातामधील घटना 2022 मध्ये 696तर 2023 मध्ये 596 घडल्या. यामध्ये 14.40 टक्क्यांची घट झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील अपघातातील अशा घटनांमध्ये 1.4 टक्क्याने  कमी झाल्या आहे. पुणे परिवहन कार्यालयामार्फत शहरातील वाहतूक नियम मोडणाऱ्या 1943 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 13.16 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी ते मे 2024 दरम्यान विविध गुन्ह्यापोटी 49 हजार 447 वाहने दोषी आढळून आली आहेत.  या वाहनधारकांकडून 798.77 लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

            रस्ते अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन चालक चाचणीअपघातांची ऑनलाईन नोंदणीअधिकाऱ्यांना प्रशिक्षणरस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येत आहे.  चालकांसाठी नेत्रआरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील अपघातांची प्रमाण कमी होत असल्याची नोंद आहेअसेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

--

नीलेश तायडे/विसंअ/


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi