Friday, 28 June 2024

पावसाळा चालू झाला आहे. , आरोग्य सांभाळा

 #rainydays 

#healthylifestyle 

#Ayurveda 

☔☔⛅⛈️⛈️🌧️🌨️🌩️☔☂️🌈

पावसाळा चालू झाला आहे. 

त्यासोबत काहींना पोट दुखी किंवा जुलाब, सर्दी किंवा डोकेदुखी देखील होईल. 


हे टाळण्यासाठी काय काय करू शकतो आपण. 

👉 जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस गरम पाणी प्या. 

👉 गरम पाणी नाही पिता आले तर किमान दुपारी किंवा सायंकाळी तरी एक वेळा सुंठ उकळलेले किंवा तुळशीचे पान टाकून उकळलेले पाणी प्या.


☺️👉 पावसाळ्यात आपल्या पोटाची ताकद कमी होत असते त्यामुळे जे व्यक्ती पावसाळ्यात बाहेरच आणि जड खाणं टाळतात त्यांना पावसाळा सुखकर आणि आनंदी जातो. 

☺️☺️


👉 पावसाळ्यात भिजल्यास घरी येऊन साधा आणि गरम असा आहार आणि शक्य झाल्यास गरम पाणी प्या. 

👉 आपला शरीर आजारी होण्यापूर्वी लक्षणे दाखवत असतं आपल्याला जरा जरी वाटेल की उद्या ताप येऊ शकतो सर्दी होऊ शकते अशा वेळेस, 

🌈सुंठ आणि हळद टाकून गरम पाणी. 

🌈साधे जेवण. 

🌈पाण्याची वाफ आणि पुरेशी झोप फार फायदेशीर ठरते.


👉 वातावरणामुळे जेव्हा शरीर थकत असते तेव्हा अतिशय जास्त व्यायाम टाळावा. 


👉 या दिवसांमध्ये आपल्याला तेलकट तुपकट गरम खाण्याची इच्छा होते अशा वेळेस असं खाणं शक्यतो घरी खावं आणि जर असं खाणं एका वेळेस झालं तर दुसऱ्या वेळेसच्या जेवणाला मात्र हलका आहार घ्यावा. 


👉 ताजे मिळणारे फळ जे गोड असेल पण खूप जास्त पिकलेले नसेल असे खावे. 


👉 दही ,पालेभाज्या याचा वापर अत्याधिक मर्यादित ठेवावा. 


👉 जे लहान मुलं हमखास पावसाळ्यात आजारी पडतात त्यांना दूध हळद/सुंठ हळद युक्त दूध/सीतोपलादीचा चाटण द्यावी. 


👉 तरीही जे मुलं किंवा मोठे माणसं आजारी पडतात अशांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आयुर्वेदिक वैद्याकडून सात किंवा पंधरा दिवसांचा पोट दुरुस्त होणारा औषध घेऊन जावं ज्यामुळे पूर्ण पावसाळ्याचा आनंद घेता येतो परंतु शरीराचा अग्नी देखील व्यवस्थित राहतो. 


आणि काही कारणाने डॉक्टरांकडे येता येणे शक्य नसेल तर कमीत कमी बाहेरचे अन्न जागरण टाळणं हे मात्र आपल्या हातात आहे ते करावे. 


धन्यवाद. 

वैद्य मेघा अत्रे. 

08805162540.

*कृपया आपल्या घरातील स्त्रियांना सांगा गॅसजवळ फोन नेऊ नका, ठेऊ नका, वापरू नका 👆🏻मुंबई मधील प्रकार* 🙏🏻🙏🏻🙏🏻

 *कृपया आपल्या घरातील स्त्रियांना सांगा गॅसजवळ फोन नेऊ नका, ठेऊ नका, वापरू नका 👆🏻मुंबई मधील प्रकार*  🙏🏻🙏🏻🙏🏻


श्री कैलाश मानसरोवर से प्रत्यक्ष दर्शन भगवान शंकर के मां पार्वती के साथ यह कोई कंप्यूटर वीडियो नहीं है जरूर देखें

 श्री कैलाश मानसरोवर से प्रत्यक्ष दर्शन भगवान शंकर के मां पार्वती के साथ यह कोई कंप्यूटर  वीडियो नहीं है जरूर देखें


भक्तीप्रभात

 🪷……भक्तीप्रभात……

🌹


*स्वप्न…!

रात्रंदिवसा देवा तुमची

मूर्ती ध्यानात.

त्याचा लागे ना अंत…

*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*



दिव्यस्वरूपी सडा 

टाकत होते अंगणात.

_‘अल्लख’_ म्हणुनि भिक्षा मागत

आले दारात…

दत्त गुरूंचे पाऊल उठले 

माझ्या अंगणात.

त्याचा लागे ना अंत…

*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*



भगवी झोळी होती 

त्यांच्या डाव्या बगलेत.

रुद्राक्षांच्या माळा होत्या 

त्यांच्या गळ्यात…

कुण्या वाटेने गेले

माझे गुरूदेव दत्त?

त्याचा लागे ना अंत…

*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*



श्वानांची फौज होती 

त्यांच्या संगत.

श्वानांना भाकर टाकत 

होते भगवंत…

बघा बघा ते अत्रीनंदन 

आले भजनात.

त्याचा लागे ना अंत…

*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*



भक्तांचा मेळा होता 

त्यांच्या संगत.

खडावांचा नाद घुमतो 

माझ्या कानात…

*‘गुरुदेव दत्त’* मंत्र ठेवा 

ठेवा ध्यानात.

त्याचा लागे ना अंत…

*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*


𖦺𖦺𖦺𖦺


*सुप्रभात!*


𖦺𖦺𖦺𖦺


स्वर : शुभांगी जोशी


संगीत : महेश हिरेमठ



_(भक्तीगीत : दर गुरुवारी)_


𖦺𖦺𖦺𖦺🌹𖦺𖦺𖦺𖦺

पावसाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी आ. निकोले आक्रमक # वाढवण बंदर रद्द, पेसा भरती, शेतमालाला हमी भाव संदर्भात मागण्या

 पावसाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी आ. निकोले आक्रमक

# वाढवण बंदर रद्द, पेसा भरती, शेतमालाला हमी भाव संदर्भात मागण्या

मुंबई / डहाणू. (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असता पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे विधानभवनात फलक झळकवत जिल्ह्यातील विविध मागण्यांवर जोरदार आंदोलन केले आहे.

यावेळी आमदार निकोले यांनी आमची एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द, आदिवासी पेसा भरती झालीच पाहिजे, नोकरी आमच्या हक्काची नाही कोण्याच्या बापाची ! शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांच्या मालाला हमीभाव द्या ! अश्या जोरदार घोषणाबाजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली. दरम्यान आ. निकोले म्हणाले की, गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतात अवधानी खारफुटीचे तिवर झाडे आली तर ती बुजवण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्यांनी केला तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. इथे तर चक्क समुद्रामध्ये 5000 एकर क्षेत्रात मातीचा भराव करून हे विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने आखला आहे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय धोक्याचे आहे. तर, आदिवासी भागातील उच्चशिक्षित मुला-मुलींना रोजगार मिळावा हा त्यांचा हक्क आहे कारण या क्षेत्रामध्ये पेसा कायदा लागू आहे. तसेच, जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेला शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होतोय. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हा मिळालाच पाहिजे, अशी मागणी आमच्या अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सातत्याने विविध ठिकाणी आंदोलन करून करण्यात येत असते त्याच अनुषंगाने आज ही मागणी आम्ही विधानभवनात करत आहोत, असे आमदार निकोले यांनी सांगितले.


सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

 सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत

 

            मुंबई, दि. 27 : महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरणवितरण हानी कमी करणेवितरण प्रणालीचे  सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टिम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत, असे महावितरणने कळविले आहे.


सुंदर विचार

 नकारात्मक विचार पाया कमकुवत करतात आणि तुमची क्षमता मर्यादित करतात.तुमचे विचार हे तुमचे आर्किटेक्ट आहेत.(Your Thoughts Are Your Architects)आपण कोण आहोत आणि आपण काय सक्षम आहोत याबद्दल आहेत.तुमच्या अंतरमनाला काय आग लावते? तुम्हाला खरोखर जिवंत वाटते कशामुळे? तुमचा उद्देश शोधणे.परेशान हो तो पढ़ो ! हैरान हो तो समझो !स्वतःबद्दल नकारात्मक बोलू नका.(Don't speak negative about yourself) 

   समस्या इतक्या मोठ्या होतात जेव्हा आपण काळजी करू लागतो आणि तक्रार करू लागतो तेव्हा आपण त्याबद्दल विचार करून खूप थकून जातो. अनेकदा अपयश येते. नियतीला सुबुध्दी साठी प्रार्थना करा,

काय करावे लागेल याची यादी तयार करा.  

मग बघा कामे सोपी होतात.आपल्याला वास्तवापेक्षा कल्पनेचा त्रास जास्त होतो.

    कल्पनेत आपण समस्येच्या स्वरूपाचा अतिरेक करून असे चित्र बनवतो की ती गुंतागुंतीची आणि कठीण आहे पण प्रत्यक्षात जेव्हा आपण तिचा सामना करतो तेव्हा आपल्याला कळते समजते समस्या किती छोटी आहे,

Featured post

Lakshvedhi