#rainydays
#healthylifestyle
#Ayurveda
☔☔⛅⛈️⛈️🌧️🌨️🌩️☔☂️🌈
पावसाळा चालू झाला आहे.
त्यासोबत काहींना पोट दुखी किंवा जुलाब, सर्दी किंवा डोकेदुखी देखील होईल.
हे टाळण्यासाठी काय काय करू शकतो आपण.
👉 जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस गरम पाणी प्या.
👉 गरम पाणी नाही पिता आले तर किमान दुपारी किंवा सायंकाळी तरी एक वेळा सुंठ उकळलेले किंवा तुळशीचे पान टाकून उकळलेले पाणी प्या.
☺️👉 पावसाळ्यात आपल्या पोटाची ताकद कमी होत असते त्यामुळे जे व्यक्ती पावसाळ्यात बाहेरच आणि जड खाणं टाळतात त्यांना पावसाळा सुखकर आणि आनंदी जातो.
☺️☺️
👉 पावसाळ्यात भिजल्यास घरी येऊन साधा आणि गरम असा आहार आणि शक्य झाल्यास गरम पाणी प्या.
👉 आपला शरीर आजारी होण्यापूर्वी लक्षणे दाखवत असतं आपल्याला जरा जरी वाटेल की उद्या ताप येऊ शकतो सर्दी होऊ शकते अशा वेळेस,
🌈सुंठ आणि हळद टाकून गरम पाणी.
🌈साधे जेवण.
🌈पाण्याची वाफ आणि पुरेशी झोप फार फायदेशीर ठरते.
👉 वातावरणामुळे जेव्हा शरीर थकत असते तेव्हा अतिशय जास्त व्यायाम टाळावा.
👉 या दिवसांमध्ये आपल्याला तेलकट तुपकट गरम खाण्याची इच्छा होते अशा वेळेस असं खाणं शक्यतो घरी खावं आणि जर असं खाणं एका वेळेस झालं तर दुसऱ्या वेळेसच्या जेवणाला मात्र हलका आहार घ्यावा.
👉 ताजे मिळणारे फळ जे गोड असेल पण खूप जास्त पिकलेले नसेल असे खावे.
👉 दही ,पालेभाज्या याचा वापर अत्याधिक मर्यादित ठेवावा.
👉 जे लहान मुलं हमखास पावसाळ्यात आजारी पडतात त्यांना दूध हळद/सुंठ हळद युक्त दूध/सीतोपलादीचा चाटण द्यावी.
👉 तरीही जे मुलं किंवा मोठे माणसं आजारी पडतात अशांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आयुर्वेदिक वैद्याकडून सात किंवा पंधरा दिवसांचा पोट दुरुस्त होणारा औषध घेऊन जावं ज्यामुळे पूर्ण पावसाळ्याचा आनंद घेता येतो परंतु शरीराचा अग्नी देखील व्यवस्थित राहतो.
आणि काही कारणाने डॉक्टरांकडे येता येणे शक्य नसेल तर कमीत कमी बाहेरचे अन्न जागरण टाळणं हे मात्र आपल्या हातात आहे ते करावे.
धन्यवाद.
वैद्य मेघा अत्रे.
08805162540.
No comments:
Post a Comment