🪷……भक्तीप्रभात……
🌹
*स्वप्न…!
रात्रंदिवसा देवा तुमची
मूर्ती ध्यानात.
त्याचा लागे ना अंत…
*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*
दिव्यस्वरूपी सडा
टाकत होते अंगणात.
_‘अल्लख’_ म्हणुनि भिक्षा मागत
आले दारात…
दत्त गुरूंचे पाऊल उठले
माझ्या अंगणात.
त्याचा लागे ना अंत…
*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*
भगवी झोळी होती
त्यांच्या डाव्या बगलेत.
रुद्राक्षांच्या माळा होत्या
त्यांच्या गळ्यात…
कुण्या वाटेने गेले
माझे गुरूदेव दत्त?
त्याचा लागे ना अंत…
*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*
श्वानांची फौज होती
त्यांच्या संगत.
श्वानांना भाकर टाकत
होते भगवंत…
बघा बघा ते अत्रीनंदन
आले भजनात.
त्याचा लागे ना अंत…
*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*
भक्तांचा मेळा होता
त्यांच्या संगत.
खडावांचा नाद घुमतो
माझ्या कानात…
*‘गुरुदेव दत्त’* मंत्र ठेवा
ठेवा ध्यानात.
त्याचा लागे ना अंत…
*स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त!*
𖦺𖦺𖦺𖦺
*सुप्रभात!*
𖦺𖦺𖦺𖦺
स्वर : शुभांगी जोशी
संगीत : महेश हिरेमठ
_(भक्तीगीत : दर गुरुवारी)_
𖦺𖦺𖦺𖦺🌹𖦺𖦺𖦺𖦺
No comments:
Post a Comment