Wednesday, 26 June 2024

माझी माय

 *आपण अशी शेवटची पिढी आहोत, ज्यांच्याकडे अशी साधी भोळी "आई" आहे .....* 

*🔸 तिला स्वतःची जन्म तारीख  माहित नाही व  वाढदिवस कधीच साजरा करत नाही.*

*🔸 जिचं ना सोशल मीडिया वर कोणतं अकाउंट आहे.*

*🔸 ना तिला फोटो-सेल्फी काढण्याची आवड आहे.*

*🔸 तिला साधं हे सुद्धा नाही माहीत की स्मार्टफोनचं लॉक कसं उघडतात ?*

*🔸 जिने खूप कमी सुख-सुविधांमध्ये आपलं जीवन काढलं. ना कुठली तक्रार करता...*

*हो आपण शेवटची पिढी आहोत, ज्यांचाकडे अशी "आई" आहे.*


सावधान, स्विमिंग पुल पासुन

 आज  चिखली मध्ये एका डॉक्टरांची मुलगी जी केवळ 16-17 वर्षाची होती अॅक्युट पॅनक्रिया टायटीस मुळे गेली. तीन-चार दिवसांपूर्वी तिला अचानक संध्याकाळी पोट दुखायला लागलं नंतर उलट्या सुरू झाल्या ...लगेच ऍडमिट केलं.. फिजिशियन कडे दोन दिवस त्यांनी ट्रीटमेंट करून बघितले. ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली .त्यामध्ये तिला अॅक्युट पॅनक्रियाटायटीस निघाला.ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीये हे बघून थर्ड डे ला तिला लगेच संभाजीनगरला शिफ्ट केलं. तिथे ती मल्टी ऑर्गन फेलीवर मध्ये गेली .पलमनरी ईडीमा.. प्लुरल ईफ्युजन अशा बऱ्याच शारीरिक अडचणी सुरू झाल्या आणि एडमिट केल्यानंतर थर्ड डे ला सकाळी तिचा आज मृत्यू झाला. एवढ्या कमी वयामध्ये अॅक्युट पॅनक्रॅटिस कसा काय झाला असं डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी जे सस्पेक्टेड कारण सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं ...मेडिसिनच्या बुकमध्ये स्विमिंग पूल डिसीज चे वर्णन आलेले आहे. या चॅप्टरमध्ये कॉमन स्विमिंग पूल वापरल्यामुळे काय काय इन्फेक्शन होऊ शकतात त्याचं वर्णन केलेलं आहे .हा पेशंट सुद्धा पाच सहा दिवसांपूर्वी पुणे किंवा शिर्डीच्या वाटर पार्क मध्ये गेला होता आणि .....तिथेच या मुलीला कुठलं तरी इन्फेक्शन झालं ..जे त्या पाण्यामध्ये तिच्या नाकात तोंडात गेलेलं होतं आणि पुढच्या चार-पाच दिवसांमध्येच एवढे भयंकर प्रॉब्लेम सुरू झाले आणि आज तिची डेथ झाली. त्यामुळे यानंतर स्विमिंग पूल मध्ये उतरण्याआधी थोडा विचार करूनच उतरा.🙏🙏विनंती


आपल्या कोकणात अशा तऱ्हेने आपण काही तरी उपयुक्त आणि वेळेची बचत होईल असे नक्कीच करू शकतो नाही का..?

 आपल्या कोकणात अशा तऱ्हेने आपण काही तरी उपयुक्त आणि वेळेची बचत होईल असे नक्कीच करू शकतो नाही का..? 

अशा दृष्टीने प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत..

आपली कुशाग्र बुध्दी नुसत्या गप्पा न मारता अशा ठिकाणी खरे तर वापरायला हवी की नाही..कोकणचा कॅलिफोर्निया करायचे नंतर आधी ह्या सोप्या गोष्टी अमलात आणूयात..


*अपने आसपास के मंदिरों के पुजारियों की जानकारी में डाल दें कि इस सुविधा का लाभ उठाने के लिए लेबर आफिस में अपना रजिस्ट्रेशन करा लें।* 🙏🏼🪷

 *अपने आसपास के मंदिरों के पुजारियों की जानकारी में डाल दें कि इस सुविधा का लाभ उठाने के लिए लेबर आफिस में अपना रजिस्ट्रेशन करा लें।*

🙏🏼🪷


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश खते, बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यांवर कठोर कारवाई करावी

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

खतेबियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेतेकंपन्यांवर कठोर कारवाई करावी

                                                                                                                                                 मुंबईदि. २५ : राज्यातील शेतकरीनागरिक यांना नैसर्गिक आपत्तीशेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावीअसेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खतेबियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.                                                          

            सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरिपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटीलसहकार मंत्री दिलीप वळसे -पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेपणन मंत्री अब्दुल सत्तारग्रामविकास मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,  मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेकृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधाकृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.                

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीशेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाहीअसे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावाअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, असे तालुकेजिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ‘ला निना’मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

            खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले.

            यंदा खरिपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टरसोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टरभात पिकाखाली १५.३०लाख हेक्टरमका पिकाखाली ९.८० लाख हेक्टरकडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राज्यात २४.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून १.५० लाख टन युरिया व २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा  करण्यात आल्याची माहिती, प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली.

0000


 


राजर्षी शाहू महाराजांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल कायम सुरु राहील

 राजर्षी शाहू महाराजांनी दाखविलेल्या मार्गानेच

महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल कायम सुरु राहील

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 25 :- सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनकरयतेचे राजेलोकराजेराजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालाविचारांनास्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊनत्यांनी दाखविलेल्या मार्गाने सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवरची महाराष्ट्राची वाटचाल कायम राहीलअसा विश्वास व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या संदेशात म्हणतात कीराजर्षी शाहू महाराजांच्या प्रगतपुरोगामीसुधारणावादी विचारांवर देशाची दमदार वाटचाल सुरु आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ या विचारांवरच पुरोगामी महाराष्ट्र देशात आपले वेगळेपण टिकवून आहेतोच महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पनात्यांच्या विचारांचाकार्याचा कृतिशील वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी सक्षमपणे केले. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रत्येक राज्यकर्त्यासाठीसरकारसाठी मार्गदर्शक आहे.

            राजर्षी छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकोत्तर राजे होते. लोकांनी त्यांच्या कामासाठी सरकारच्या दारात येण्याची गरज नाहीसरकारचं लोकांच्या दारात जाईलहा विचार शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अंमलात आणला. त्याच विचारांवर राज्य शासन काम करत आहे. त्यामुळे शासन आपल्या दारीसारख्या लोककल्याणकारी अभियानाची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरु आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने यापुढेही महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सुरु राहीलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचेविचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

Tuesday, 25 June 2024

कृषी विभागामार्फत नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 कृषी विभागामार्फत नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 

            मुंबईदि. २५ :  राज्यातील शेतकरीवितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

            राज्यातील खरीप हंगामात बियाणेखते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

            संबंधितांनी व्हॉट्सॲपटोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणीनिविष्ठांची गुणवत्ताकिंमतसाठेबाजी व लिंकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवतानानावपत्तासंपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.

            ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर आपल्या संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतीलअसे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi