Wednesday, 26 June 2024

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश खते, बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यांवर कठोर कारवाई करावी

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

खतेबियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेतेकंपन्यांवर कठोर कारवाई करावी

                                                                                                                                                 मुंबईदि. २५ : राज्यातील शेतकरीनागरिक यांना नैसर्गिक आपत्तीशेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावीअसेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खतेबियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.                                                          

            सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरिपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटीलसहकार मंत्री दिलीप वळसे -पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेपणन मंत्री अब्दुल सत्तारग्रामविकास मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,  मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेकृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधाकृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.                

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीशेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाहीअसे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावाअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, असे तालुकेजिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ‘ला निना’मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

            खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले.

            यंदा खरिपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टरसोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टरभात पिकाखाली १५.३०लाख हेक्टरमका पिकाखाली ९.८० लाख हेक्टरकडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राज्यात २४.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून १.५० लाख टन युरिया व २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा  करण्यात आल्याची माहिती, प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली.

0000


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi