Friday, 21 June 2024

मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर

 विधान परिषदेची मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024

मतदानाच्या दिवशी मतदारांना

विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर

 

            मुंबई, दि. 20 :- लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-ब नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्यानेत्यांना मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर केलेली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्त‍िक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधानपरिषदेच्या कोकण विभाग व मुंबई पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

            या निवडणुकीसाठीचे मतदान २६ जून२०२४ (बुधवार) रोजी सकाळी ७.०० ते सायं ६,०० पर्यंत व मतमोजणी ०१ जुलै२०२४ (सोमवार) रोजी होणार आहे.

-----000-------


Thursday, 20 June 2024

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची मुलाखत

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त

प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 20 : ‘योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु)वरळीयेथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापकडॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

            'आंतरराष्ट्रीय योगदिवस आणि जागतिक संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी 'योगअभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. तर माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी संगीत फायदेशीर आहे. कोविडनंतर योगचे महत्त्व वाढले असून केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगची मदत घेत आहेत. योग साधना आणि संगीत यांचे मानवी जीवनातील महत्व आणि योगाचे विविध प्रकारसंगीत थेरपी आशा महत्वपूर्ण विषयावर 'दिलखुलासकार्यक्रमातून डॉ. उजेडे यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवारदि. 21, शनिवार दि. 22 आणि सोमवार दि. 24 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. प्राध्यापक डॉ. सचिन उपलंचीवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत

 शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत

कृषी विभागाचे आवाहन

 

            मुंबई, दि. 20 : चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. 

            महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. 

            डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे.  एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे.

            एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26एनपीके-20:20:0:13एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.

0000

वाढवण बंदर उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी

 वाढवण बंदर उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे

मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

 

            मुंबई, दि. २० : राज्यातील वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.

            जगातील १० मोठ्या बंदरापैकी देशातील वाढवण हे एकमेव मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. सुमारे १२ लाख रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त मंत्री श्री. बनसोडे यांनी व्यक्त केली.

            वाढवण परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांनामत्स्यव्यवसाय करणारे व या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांचे पुनर्वसन तसेच योग्य तो मोबदला देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबवून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. वाढवण बंदरामुळे राज्याचा तसेच स्थानिक नागरिकांच्या आर्थिक विकासाचे नवीन दालन खुले होणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            वाढवण बंदर हे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जे.एन.पी.टी.) व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागिदारीतून होणार आहे. या बंदर प्रकल्पाची किंमत ७६ हजार २०० कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे ७४ व २६ टक्के आहे. वाढवण बंदराची उभारणी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

🌹सर्व भाविक भक्तांना नम्र सूचना श्री चा महाप्रसाद टाईम, दि, 20-06-2024पासून,, 10,ते, 5-00,वा पर्यंत झालेला आहे तरी नोद घावी 🌹

 🌹सर्व भाविक भक्तांना नम्र सूचना श्री चा महाप्रसाद टाईम, दि, 20-06-2024पासून,, 10,ते, 5-00,वा पर्यंत झालेला आहे तरी नोद घावी 🌹


हिंदू धर्मात बेल, वड, पिंपळ, तुळस,,आंबा,कमळ, शमी,

 || श्रीराम ||


वटपौर्णमा परवावर आली आहे.  आज माझे व माझ्या मैत्रिणीचे सहज काही बोलणे झाले. मी या विषयावर दोन-तीन वाक्य बोलून गेले. तर तिने मला तू वटपौर्णिमा व हरतालिका यावर काही लिही असे सुचवले. आणि माझे विचार चक्र सुरू झाले. 

हिंदू धर्मात बेल, वड, पिंपळ, तुळस,,आंबा,कमळ, शमी, पारिजातक अशा काही झाडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. काही झाडांची फळे काही झाडांची पाने तर काही जणांची फुले वेग वेगळ्या देवांना अर्पण करतात. या सर्वांचे विविध औषधी उपयोग आहेत .आज आपण वटपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 

जगात सर्वात दाट सावली असते वडाची. संपूर्ण मोठ्या झालेल्या वृक्षाच्या  पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अत्यंत गुणकारी आहे, त्याचे गुण वर्णन करणारे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. 

"कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌ | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्||"

अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते.  अशी घर होती तोपर्यंत कूलर, एसी लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणून आहे .

 ज्येष्ठ महिन्याच्या जीवघेण्या घुसमट करणाऱ्या उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. उष्णतेने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!

वडात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केल्या औषधीचा उपयोग करतात. वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपांत  औषध तयार होते. 

पक्ष्यांचेही वास्तव्य वडाच्या झाडावर असते.

पौर्णिमेच्या उपासाचा सात जन्माची काही एक संबंध नाही .आपण सर्वजण भागवत कथा ऐकतो त्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. एकाच जन्मात पती असलेला गेल्या जन्मी पुत्र पुढच्या चरणी पिता असेही घडू शकते. जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या पेशी मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.

 संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या. १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह. असे सात वेळा १०० वर्षाच्या आयुष्यात घडू शकते म्हणून सात जन्म. 

आपण सध्या काय करतो? मोठी वडाची झाडे तर फारशी उरली नाहीतच मग वडाच्या फांद्या तोडून आणतो किंवा वडाचा पूजेचा कागद आणतो. दोन्ही कृती सावित्रीला शोभणाऱ्या नाहीत. कारण प्रत्येकाने फांदी आणायची म्हटले तर झाडाला राहणारच काय आणि कागद जरी म्हटला तरी वृक्षतोड होणारच आहे. या सगळ्याचा विचार करावा. उपासाचा याच्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. सावित्रीने पतीचे प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पराकष्ठेचे प्रयत्न केले.तेही खंबीर राहून हातपाय न गाळता.आपणही आपल्या पतींना त्यांच्या व्यवसायात  त्याच्या समाज उपयोगी कार्यात भक्कम साथ द्यावी. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करावे. नाहीतर आपला उपास म्हणून त्यांना बाहेर जेवायला सांगणे यासारखा विरोधाभास नाही. एखादे कार्य करत असताना त्यात तल्लीन झाल्यावर उपास घडणे ही वेगळी गोष्ट आहे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. वटवृक्ष हा अनेक पारंब्या असल्यामुळे वंश वृक्ष देखील मानल्या जातो त्याचा विचार करावा. आजकाल सर्व भगिनी वर्ग सुशिक्षित आहे. प्रत्येक व्रतवैकल्या मागील कारण जाणून घेऊन आपले आचरण तसे असावे. केवळ नटून थटून वडाला दोरे, चिंध्या बांधून काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवावे.

शतायुष्याच्या प्रार्थनेबरोबरच निसर्गाची कृतज्ञता मानण्याचा हा दिवस आहे. सावित्रीला हे वटमहात्म्य माहीत होते. म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण विनाकारणच केवळ उपचार म्हणून "वटवृक्ष " तोडले तर आपल्या सत्यवानाचे काय याचा विचार करण्याचा दिवस आहे. "वटपौर्णिमा""

यावर्षीपासून आपण वडाच्या फांद्या न तोडता वडाचे शास्त्रीय महत्त्व जाणून वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करूया. उपास करणे किंवा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

तसेच हरतालिका च्या उपासाचे देखील आहे त्याचा विचार नंतर करू . 


सद्गुरू चरणी अर्पण🙏🙏🙏

|| जय जय रघुवीर समर्थ||


सौ. वीणा भाले 

अकोला.

धान्य धान्य स्वातत्रत्या वीर

Featured post

Lakshvedhi