Thursday, 20 June 2024

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची मुलाखत

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त

प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 20 : ‘योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु)वरळीयेथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापकडॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

            'आंतरराष्ट्रीय योगदिवस आणि जागतिक संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी 'योगअभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. तर माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी संगीत फायदेशीर आहे. कोविडनंतर योगचे महत्त्व वाढले असून केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगची मदत घेत आहेत. योग साधना आणि संगीत यांचे मानवी जीवनातील महत्व आणि योगाचे विविध प्रकारसंगीत थेरपी आशा महत्वपूर्ण विषयावर 'दिलखुलासकार्यक्रमातून डॉ. उजेडे यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवारदि. 21, शनिवार दि. 22 आणि सोमवार दि. 24 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. प्राध्यापक डॉ. सचिन उपलंचीवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi