सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 20 June 2024
सांगू कशी तुला मी ?*
👉🏻 *प्रत्येक आईवडील; मुलगा/मुलगी; सासू; सून किंबहुना अगदी प्रत्येकाने हा लेख वाचायलाच हवी* 👇🏻
*सांगू कशी तुला मी ?*
*डॉ. शमा देशपांडे.*
रविवारची सकाळ उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खर म्हणजे धाक कसला,धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.
अगदी बालपणापासून,नंतर सासरी आल्यावर देखील घरात आई-बाबांचे छत्र होतेच. सकाळी लवकर उठणे ,रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता.सकाळी सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून शिस्तीत जगण्याचा,एक संस्कार मनावर पक्का झाला होता. त्यावेळी त्या शिस्तीचा खरतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे,व्यवस्थित वस्तू आवरणे,वस्तू जागेला ठेवणे,लवकर उठणे ,व्यायाम करणे, शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. .........आता असे वाटतं आमच्या आई -बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं. हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.
हळूहळू आई-मुले ,वडील-मुले ,सासू-सून,सासरे -सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता अस अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला. पूर्वी आई-वडील म्हणायचे,सासरी गेल्यावर वळण नसेल तर जड जाईल. आत्ताच शिका सगळे.
आता आई वडील म्हणतात,"जाऊदे,लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर ,तेंव्हा राहूदे थोडे मोकळे."
पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे ,"तुम्ही नीट तर पुढची पिढी नीट." आणि आताचे सासू- सासरे म्हणतात," कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना. आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला. आता आपण म्हणजे आमची पिढी नकळतपणे आपल्याच मुलांना,मुलींना व्यवस्थितपणा नाही,टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते अस नाही. आई देखील मुलीच्या या बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल न? आता असं वाटत ,घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध ,आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना ,मुलींना,सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगताना ,मुलांना काय वाटेल,सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.
*आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली ,मुले,सूना यांना वळण लावत नाही,संस्कार करत नाही असे नाही. पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार,शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी ,'आपल्याला झेपतेय न काम ,मग सारखे मुलांना बोलून ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे आणि मोकळे व्हायचे.सुनेला,मुलांना,मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे. गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचे. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने ,असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.*
*मला असं वाटत ,म्हंटल तर प्रॉब्लेम , म्हंटल तर 'सध्या सगळीकडे असेच चालते' म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग! 'बोलू का नको?,सांगू का नको? ' मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा-मुलगी) दोघेही जर व्यसने,स्वैराचार,याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे. सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. . नवी पिढी-नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष,नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.*
घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे. चारित्र्य,व्यसने ,पार्ट्या कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल *सांगू कशी तुला मी?'*
या परकेपणातून ,संकोचातुन,भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.
मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल,विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक चुकीची गोष्ट थंडपणे पहाणे हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे. ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता ,त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची *मुलगी* समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे,न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून *परकेपणाच* आहे असं समजायला हरकत नाही.
संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो,दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे, *पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा'*
*खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे, समंजस आहे,कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते. केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई,वडील,सासू,सासरे ,आजी-आजोबा या सगळ्यांनीच ' सांगु कशी तुला मी ? ' या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी गरज आहे.*
*डॉ.शमा देशपांडे.
अग्रेषित
कि जरा बरं वाटतं
*कि जरा बरं वाटतं.....*
जाताना बरोबर काही नेणार नाही!
हे जरी सत्य असल तरी...
खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं!!
वाटेत कुणी दिन दुबळा असाह्य दिसला की... चार नाणी खिशात असली की ती त्याच्या हातावर टेकवताना जरा बर वाटत!
हॉटेलिंग ची हौस फिटली असली तरी....
मित्र भेटला तर त्याच्या बरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्या इतपत चार पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं!
कपडालत्ता दागदागिने नकोसे वाटू लागले तरी... मुलाबाळा साठी, नातवंडासाठी मनाजोगा खर्च करण्या इतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं!
बरोबर काही न्यायचं नसल तरी .....
शेवट पर्यंत हातात चार पैसे खुळखुळत असले की,जरा बरं वाटतं!!
साठी पार केलीत?अजिबात वाटत नाही!अस कुणी म्हटल की जरा बरं वाटतं!
मित्रांसोबत रात्रभर पार्टी केली तरी...
घरी कुणीतरी आपली वाट पाहतंय हे जाणवलं की,जरा बरं वाटतं!
जाताना बरोबर काहीच जाणार नाही हे माहीत असल तरी...
आहे तोपर्यंत जे जे शक्य ते उपभोगुन घेतलं की,जरा बरं वाटतं!
पुढे दवा डॉक्टर काय वाढून ठेवलंय माहीत नाही तरी...
दोन चार एफडी एखादी पॉलिसी असली की, जरा बरं वाटत!
साठी नंतर ही आपण मुला बाळांना भार नाही. माझ मला पुरेस आहे.अस म्हणण्या इतपत पुंजी गाठीशी असली की,जरा बरं वाटतं!
मी मेल्यावर मला काय करायचंय अस म्हटल तरी...
जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेऊन गेलं की,जाताना जरा बर वाटत!
गरजे पुरता संचय कर हे तत्वज्ञान ऐकायला बर वाटल तरी...
भविष्यात कशा कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही!
म्हणून.....
सगळं काही इथच रहाणार,
जाताना काही आपल्या बरोबर नेता येणार नाही.हे जरी खर असल तरी...
अंगात ऊब आहे तो पर्यंत खिशाला ही ऊब असली की,
जरा बरं वाटतं!जरा बरं वाटतं!
*कोणी लिहिलं माहीत नाही पण वाचून जरा बर वाटलं…*
👍🏻🙏🏻👍🏻
नृसिंहवाडीला अनेकदा भाषाशैलीने आपण गोंधळात
नृसिंहवाडीला अनेकदा भाषाशैलीने आपण गोंधळात पडतो . भाषा मराठीच पण इथले शब्दप्रयोग हे फारच वेगळे वाटतात . एकदा नृसिंहवाडीला मुक्काम असताना सहज चौकशी केली अमुकतमुक पुजारी दिसत नाहीत ते ? . तात्काळ समोरून उत्तर आले कि आताच देवाकडे गेले आहेत . मला अत्यंत वाईट वाटले पण तितक्यात ते पुजारी समोर हजर . नंतर मला समजले कि हि मंडळी देवाकडे हा शब्दप्रयोग देवळात या अर्थी करतात . त्यांना सहज म्हटले आज खूपच उशीर झाला नाही ?? तर ते म्हणाले , होय कि !! उद्योग सोडून कसं चालेल ?? मला उद्योग या शब्दाचा अर्थ उमगला नाही पण अज्ञान लपवत म्हटलं ,अगदी खरं !! . नंतर कळले की उद्योग म्हणजेच पौरोहित्य .
एकदा मनात आलं कि आपण लघुरुद्र करावा आणि हा मानस मी आमच्या उपाध्येना सांगितला ,तेव्हा त्यांनी प्रतिप्रश्न केला ,कसा करूया ? ओला कि कोरडा ?? रुद्र या विषयी वाचन झाले होते ,थोडीफार माहिती देखील होती पण हा संदर्भ मात्र नवीन होता . ओला किंवा कोरडा म्हणजे नेमके काय असे विचारताच ते म्हणाले ,अहो आचार्य, ब्राह्मण भोजनासहित म्हणजे ओला आणि केवळ आपण दूध ,केळी आदी अल्पोपहार दिल्यास त्याला कोरडा म्हणतो .
दत्त महाराजांच्या उत्सव मूर्तीला इथे स्वारी असे म्हणतात .स्वारी हा पुजारी वर्गाचा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय .प्रत्यक्ष दत्त महाराजांचे सान्निध्य म्हणजे नेमके काय ते इथे अनुभवावे . स्वारीच्या चेहेऱ्यावरील भाव अर्थात दत्त महाराजांची नित्य बदलणारी मुद्रा हा एक अनुभव आहे , एक अनुभूती आहे .
नृसिंहवाडीला मूळपुरूषापासून पुजारीवर्गाच्या चार शाखा पुढे विस्तार पावत आहेत त्या शाखांना फाडे असे म्हटले जाते . दत्त महाराजांची पूजा या शाखा विभागून करीत असतात . प्रतिवर्षी एका शाखेची पाळी येते यांनाच हक्कदार पुजारी असे म्हटले जाते . या वर्षाच्या कालखंडाला वर्षेली असे संबोधले जाते . माघ प्रतिपदेला दत्त महाराजांच्या पूजनात शाखा बदल होतो . या पुजारी वर्गाचे गोत्र एकच असल्याने अशौच आल्यास ते सर्वाना एकदम लागू होते मग या वेळी येथे असलेल्या इतर गोत्रांच्या पुजारी वर्गाकडून पूजा होते . हे सर्व मूळ पुजारी वर्गापैकी नसले तरी दत्त महाराजांच्या पूजेचा मान त्यांना देखील अशा प्रसंगी मिळतो . या पुजारी वर्गात कोडणीकर ,जमदग्नी ,वाडीकर ,बोरगावकर आदी मंडळी येतात . यांना इथे परिष्ट असे म्हटले जाते .
शब्द प्रयोग कसेही असले तरी या नृसिंहवाडीतील सर्व पुजारीवर्ग हा अत्यंत कोमल अथवा मऊ हृदयाचा आहे . अल्पावधीत मिसळून जाणारा आणि अल्पसंतुष्ट अशा पुजारी वर्गाची निवड दत्त महाराजांनी का केली ? याचे उत्तर त्यांच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय मिळणार नाही . आवर्जून नृसिंहवाडीला भेट द्या आणि या क्षेत्रस्थांचे आदरातिथ्य अनुभवा . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य💫🙏🏻
🚩
इस मजदूरी का हिसाब भगवान रखते हैं।
*🌳🦚आज की कहानी🦚🌳*
*💐💐इस मजदूरी का हिसाब भगवान रखते हैं।💐💐*
अस्पताल में एक कोरोना पेशेंट का केस आया।मरीज बेहद सीरियस था।
अस्पताल के मालिक डॉक्टर ने तत्काल खुद जाकर आईसीयू में केस की जांच की। दो-तीन घंटे के ओपरेशन के बाद डॉक्टर बाहर आया और अपने स्टाफ को कहा कि इस व्यक्ति को किसी प्रकार की कमी या तकलीफ ना हो। और उससे इलाज व दवा के पैसे न लेने के लिए भी कहा ।
मरीज तकरीबन 15 दिन तक मरीज अस्पताल में रहा।
जब बिल्कुल ठीक हो गया और उसको डिस्चार्ज करने का दिन आया तो उस मरीज का तकरीबन ढाई लाख रुपये का बिल अस्पताल के मालिक और डॉक्टर की टेबल पर आया।
डॉक्टर ने अपने अकाउंट मैनेजर को बुला करके कहा ...
"इस व्यक्ति से एक पैसा भी नहीं लेना है। ऐसा करो तुम उस मरीज को लेकर मेरे चेंबर में आओ।"मरीज व्हीलचेयर पर चेंबर में लाया गया।डॉक्टर ने मरीज से पूछा - "भाई ! मुझे पहचानते हो?"मरीज ने कहा "लगता तो है कि मैंने आपको कहीं देखा है।"
डॉक्टर ने कहा ..."याद करो, अंदाजन दो साल पहले सूर्यास्त के समय शहर से दूर उस जंगल में तुमने एक गाड़ी ठीक की थी। उस रोज मैं परिवार सहित पिकनिक मनाकर लौट रहा था कि अचानक कार में से धुआं निकलने लगा और गाड़ी बंद हो गई। कार एक तरफ खड़ी कर हम लोगों ने चालू करने की कोशिश की, परंतु कार चालू नहीं हुई। अंधेरा थोड़ा-थोड़ा घिरने लगा था। चारों और जंगल और सुनसान था। परिवार के हर सदस्य के चेहरे पर चिंता और भय की लकीरें दिखने लगी थी और सब भगवान से प्रार्थना कर रहे थे कि कोई मदद मिल जाए।
"थोड़ी ही देर में चमत्कार हुआ। बाइक के ऊपर तुम आते दिखाई पड़े ।हम सब ने दया की नजर से हाथ ऊंचा करके तुमको रुकने का इशारा किया। तुमने बाईक खड़ी कर के हमारी परेशानी का कारण पूछा। तुमने कार का बोनट खोलकर चेक किया और कुछ ही क्षणों में कार चालू कर दी।"हम सबके चेहरे पर खुशी की लहर दौड़ गई। हमको ऐसा लगा कि जैसे भगवान ने आपको हमारे पास भेजा है क्योंकि उस सुनसान जंगल में रात गुजारने के ख्याल मात्र से ही हमारे रोगंटे खड़े हो रहे थे।
तुमने मुझे बताया था कि तुम एक गैराज चलाते हो ।"मैंने तुम्हारा आभार जताते हुए कहा था कि रुपए पास होते हुए भी ऐसी मुश्किल समय में मदद नहीं मिलती। तुमने ऐसे कठिन समय में हमारी मदद की, इस मदद की कोई कीमत नहीं है, यह अमूल्य है।परंतु फिर भी मैं पूछना चाहता हूँ कि आपको कितने पैसे दूं ?"
उस समय तुमने मेरे आगे हाथ जोड़कर जो शब्द कहे थे, वह शब्द मेरे जीवन की प्रेरणा बन गये हैं।"तुमने कहा था कि "मेरा नियम और सिद्धांत है कि मैं मुश्किल में पड़े व्यक्ति की मदद के बदले कभी कुछ नहीं लेता। मेरी इस मजदूरी का हिसाब भगवान् रखते हैं।
"उसी दिन मैंने सोचा कि जब एक सामान्य आय का व्यक्ति इस प्रकार के उच्च विचार रख सकता है, और उनका संकल्प पूर्वक पालन कर सकता है, तो मैं क्यों नहीं कर सकता। और मैंने भी अपने जीवन में यही संकल्प ले लिया है। दो साल हो गए है,मुझे कभी कोई कमी नहीं पड़ी, अपेक्षा पहले से भी अधिक मिल रहा है।"
"यह अस्पताल मेरा है।तुम यहां मेरे मेहमान हो और तुम्हारे ही बताए हुए नियम के अनुसार मैं तुमसे कुछ भी नहीं ले सकता।"
"ये तो भगवान् की कृपा है कि उसने मुझे ऐसी प्रेरणा देने वाले व्यक्ति की सेवा करने का मौका मुझे दिया।"ऊपर वाले ने तुम्हारी मजदूरी का हिसाब रखा और वो हिसाब आज उसने चुका दिया। मेरी मजदूरी का हिसाब भी ऊपर वाला रखेगा और कभी जब मुझे जरूरत होगी, वो जरूर चुका देगा।"डॉक्टर ने मरीज से कहा ....
"तुम आराम से घर जाओ, और कभी भी कोई तकलीफ हो तो बिना संकोच के मेरे पास आ सकते हो।"मरीज ने जाते हुए चेंबर में रखी भगवान् श्री कृष्ण की तस्वीर के सामने हाथ जोड़कर कहा कि....
"हे प्रभु ! आपने आज मेरे कर्म का पूरा हिसाब ब्याज समेत चुका दिया।"
*सीख- सदैव याद रखें कि आपके द्वारा किये गए कर्म आपके पास लौट कर आते है। और वो भी ब्याज समेत ।वर्तमान में कठिन समय चल रहा है। जितना हो सकता है लोगों की मदद करें। आपका हिसाब ब्याज समेत वापस आ गया।*
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
