सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 20 June 2024
मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी
‘मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 19 : राज्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, स्तनपान व शिशुपोषण याबाबत शास्त्रोक्त ज्ञानाद्वारे आनंदी मातृत्वाची संकल्पना समाजामध्ये रूजवण्याच्या उद्देशाने विविध शासकीय व अशासकीय घटकांच्या समन्वयातून सातारा जिल्ह्यामध्ये ‘मिशन धाराऊ माता- दुग्धामृतम्’ ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून सामाजिक लोकचळवळ म्हणून राज्यभर राबविण्यासाठी नियोजन करावे,असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांनी सातारा जिल्ह्यातील मिशन धाराऊ अभियानाचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, युनिसेफ, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन, बीपीएनआय (महाराष्ट्र) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, स्थानिक अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ म्हणून जनजागृती केली पाहिजे, असे सांगून मंत्री आदिती तटकरे यांनी 'मिशन धाराऊ' तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मदर सपोर्ट ग्रुपची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, प्राथमिक शिक्षिका, ग्रामसेविका, महिला लोकप्रतिनिधी व इतर तज्ज्ञ स्थानिक महिला यांचा समावेश मदर सपोर्ट ग्रुपमध्ये करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी
नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा
मुंबई, दि. 19 : नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले.
नागपुरातील 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तत्काळ सुरु करावे, असेही निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी 60 कोटी रुपये तत्काळ देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करावी, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे नागपूरमधील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडा, खसरा येथे तीनशे खाटाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाच्या विकास कामाची, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती या संस्थेची खसरा, सिताबर्डी येथे रिसर्च सेंटर, तसेच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा भरतवाडा, पुनापूर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. नासुप्रच्या 716 कोटींच्या मलजल प्रकल्पाच्या निविदा सुद्धा तत्काळ जारी करा, असे त्यांनी सांगितले.
इंदोरा येथील जागेवर सिंधू आर्ट गॅलरीचे बांधकामही तातडीने सुरु करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले. याशिवाय, अजनीतील ओबीसी भवन, संत सावतामाळी भवन, शिवसृष्टी, बख्त बुलंदशाह स्मारक सौंदर्यीकरण, टेकडी गणपती तीर्थक्षेत्र विकास, या प्रस्तावित प्रकल्पांचाही आढावा त्यांनी घेतला. विसर्जन कुंड, नंदग्राम प्रकल्प, पोहरा नदी शुद्धीकरण, नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, देवडिया रुग्णालय, प्रभाकरराव दटके रुग्णालय, रामझुला, अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागाची दुरुस्ती अशा सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला. नागपूर शहरातील क्रीडांगणे, खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.
बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव के. गोविंदराज, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा महिला व बालविकास मंत्र्यांकडून आढावा
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा
महिला व बालविकास मंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. 19 : महिला बचत गटांना रोजगार निर्मिती व उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीला माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्राम विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्याने एकाच छताखाली आणण्याबाबत विविध विभागांशी समन्वय करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
००००
Wednesday, 19 June 2024
नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी
नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा
मुंबई, दि. 19 : नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले.
नागपुरातील 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तत्काळ सुरु करावे, असेही निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी 60 कोटी रुपये तत्काळ देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करावी, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृह येथे नागपूरमधील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडा, खसरा येथे तीनशे खाटाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाच्या विकास कामाची, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती या संस्थेची खसरा, सिताबर्डी येथे रिसर्च सेंटर, तसेच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा भरतवाडा, पुनापूर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. नासुप्रच्या 716 कोटींच्या मलजल प्रकल्पाच्या निविदा सुद्धा तत्काळ जारी करा, असे त्यांनी सांगितले.
इंदोरा येथील जागेवर सिंधू आर्ट गॅलरीचे बांधकामही तातडीने सुरु करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले. याशिवाय, अजनीतील ओबीसी भवन, संत सावतामाळी भवन, शिवसृष्टी, बख्त बुलंदशाह स्मारक सौंदर्यीकरण, टेकडी गणपती तीर्थक्षेत्र विकास, या प्रस्तावित प्रकल्पांचाही आढावा त्यांनी घेतला. विसर्जन कुंड, नंदग्राम प्रकल्प, पोहरा नदी शुद्धीकरण, नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, देवडिया रुग्णालय, प्रभाकरराव दटके रुग्णालय, रामझुला, अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागाची दुरुस्ती अशा सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला. नागपूर शहरातील क्रीडांगणे, खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.
बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000
शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या समाधानानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया
शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या समाधानानंतरच
भूसंपादनाची प्रक्रिया
- मंत्री दादाजी भुसे
मुबंई, दि. १९ : राज्यातील पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या दरम्यान ८०२ कि.मी. लांबीचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तसेच प्रत्येकांच्या अडी-अडचणी समजावुन घेतल्याशिवाय संबंधित भूसंपादन प्रक्रिया केली जाणार नाही. आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसमवेत बैठकांचे आयोजन करण्यात येईल. बागायत/जिरायत क्षेत्र, अल्पभूधारक शेतकरी, सदर महामार्गादरम्यान इतर रस्त्याची परिस्थिती काय आहे, या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करुन व संबंधित शेतकऱ्यांचे समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार नाही,असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थाने (संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाईस्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच औंढा नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे कारंजा (लाड), माहूर, अक्कलकोट, गाणगापुर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे) जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल, वेळेची तसेच इंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे.
सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी प्रारंभिक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली असून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेमार्फत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्तुत भूसंपादन प्रक्रियेबाबत खासदार अशोक चव्हाण व इतर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्राप्त झाले आहे. सर्व बाबींचा सखोल अभ्यास करुन व संबंधित शेतकऱ्यांचे समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी सांगितले.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...