Wednesday, 19 June 2024

नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी

 नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा

            मुंबईदि. 19 : नागपूरमधील मेडिकलमेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहेतर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले.

            नागपुरातील 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असूनवाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तत्काळ सुरु करावेअसेही निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी 60 कोटी रुपये तत्काळ देण्यात यावेअसेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करावीयात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाहीअसेही त्यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथिगृह येथे नागपूरमधील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडाखसरा येथे तीनशे खाटाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावेअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाच्या विकास कामाचीमहात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थामहाज्योती या संस्थेची खसरासिताबर्डी येथे रिसर्च सेंटरतसेच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा भरतवाडापुनापूर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. नासुप्रच्या 716 कोटींच्या मलजल प्रकल्पाच्या निविदा सुद्धा तत्काळ जारी कराअसे त्यांनी सांगितले.

            इंदोरा येथील जागेवर सिंधू आर्ट गॅलरीचे बांधकामही तातडीने सुरु करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले.  याशिवायअजनीतील ओबीसी भवनसंत सावतामाळी भवनशिवसृष्टीबख्त बुलंदशाह स्मारक सौंदर्यीकरणटेकडी गणपती तीर्थक्षेत्र विकासया प्रस्तावित प्रकल्पांचाही आढावा त्यांनी घेतला. विसर्जन कुंडनंदग्राम प्रकल्पपोहरा नदी शुद्धीकरणनागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पदेवडिया रुग्णालयप्रभाकरराव दटके रुग्णालयरामझुलाअतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागाची दुरुस्ती अशा सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला. नागपूर शहरातील क्रीडांगणेखेळाची मैदाने विकसित करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.

            बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशीवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरनगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ताप्रधान सचिव गोविंदराजमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेनागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकरमहापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतसेच इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi