सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 19 June 2024
सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड
सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड
मुंबई, दि. 18 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे.
राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहरभाई पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात योग शिबिराचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
मंत्रालयात योग शिबिराचे आयोजन
मुंबई दि. १८ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवार २१ जून २०२४ रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी ८.३० वाजता योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. योगामुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे अनेक आजार देखील बरे होतात. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहिती व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा, या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा
प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा
- कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. १८ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या आढाव्यासाठी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये अंदाजित सहा हजार कोटी किंमतीचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने जून २०२३ मध्ये तत्वतः मान्यता दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यात 6,959 गावांचा समावेश असेल. यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शासनाने निश्चित केलेले शेती उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, शेतीमध्ये कर्बग्रहण वाढविणे हे उद्देश साध्य करावेच. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य प्रक्रिया करून साठवणूक करण्याची यंत्रणा उभी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संशोधन व्हावे. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या व विद्यापीठांनी विकसित केलेला छोट्या यंत्रांचा वापर होण्यासाठी सुद्धा या प्रकल्पातून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.
या बैठकीस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी उपसचिव संतोष कराड यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
0000
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी
द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि. १८ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी मतदान होणार आहे.
विधान परिषद सदस्य डॉ.मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बालाजीराव पाटील, डॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ.प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे २७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.
या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार, 3 जुलै, 2024 रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 5 जुलै, 2024 अशी आहे. शुक्रवार, 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी 5 वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 16 जुलै, 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000
Tuesday, 18 June 2024
कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
कौशल्य विकास विभागातील योजनांची
अंमलबजावणी प्रभावीपणे करा
- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १८ : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्रालय दालन येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आढावा घेतला.
कौशल्य रोजगार विभागाअंतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संस्थांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री श्री. लोढा यांनी केल्या. त्याचबरोबर रोजगार आयुक्तालय अंतर्गत तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करावयाचे एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घ्यावयाच्या मेळाव्याचे नियोजन., महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठी करावयाची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन., स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनी, विद्या विहार येथील कोर्सेस, बॅचेस, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत अकॅडमी तर पाच महसुली विभागात कार्यान्वित करणे,२ जुलै रोजी कौशल्य दिंडीचे आयोजन करणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ,सुकाणू समिती स्थापनेबाबतची सद्यःस्थिती याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आढावा घेतला.
या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी शर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवार यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
*****
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...