Wednesday, 19 June 2024

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी 

द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

           

            मुंबईदि. १८ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार१२ जुलै २०२४ रोजी मतदान होणार आहे.

            विधान परिषद सदस्य डॉ.मनीषा श्यामसुंदर कायंदेविजय विठ्ठल गिरकरअब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणीनीलय मधुकर नाईकॲड. अनिल दत्तात्रय परबरमेश नारायण पाटीलरामराव बालाजीराव पाटीलडॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झाडॉ.प्रज्ञा राजीव सातवमहादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे २७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.

            या निवडणुकीसाठी मंगळवार25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार2 जुलै2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार3 जुलै2024 रोजी केली जाईलतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार5 जुलै2024 अशी आहे. शुक्रवार12 जुलै2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी 5 वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 16 जुलै2024 पर्यंत पूर्ण होईलअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi