Thursday, 30 May 2024

Gas cylinder अपघात प्रकरणी ग्याव्याची काळजी


 

Viksit Ports' necessary to achieve the goal of 'Viksit Bharat': Maha Governor

 Viksit Ports' necessary to achieve

the goal of 'Viksit Bharat': Maha Governor

 

               Mumbai, 30th May : Stating that the road to 'Viksit Bharat' passes through 'Viksit Ports', Maharashtra Governor Ramesh Bais stressed the importance of developing the ports of India.

                The Governor was speaking on the occasion of the 35th Foundation Day of the Jawaharlal Nehru Port Authority at a programme in Mumbai on Wed (29 May).

                Memoranda of Understanding between JNPA and PSA and between JPNA and CMACGM for the development of Greenfield Port at Wadhwan were signed in presence of the Governor.

                The Governor felicitated the representatives of Public Private Partnership (PPP) and officials of JNPA on the occasion.

               The Governor released the Coffee Table Book and the Special Edition on the 35th Anniversary of JNPA brought out by Bhandarkar Publications.

                A Special Cover and Corporate Customized My Stamp of JNPA was also released on the occasion.

                 Chairman of Mumbai Port Authority Rajiv Jalota, Additional Chief Secretary Sanjay Sethi, Chief Commissioner of Customs Rajesh Pandey, Chief Post Master General Maharashtra Kishan Kumar Sharma, Chairman of JNPA Unmesh Sharad Wagh, General Manager and Secretary Manisha Jadhav and Officers and staff of JNPA and invitees were present.

-

विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक”

 विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक

- राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि. 30 : भारत हजारो वर्षांपासून एक महान सागरी राष्ट्र आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला 'विकसित राष्ट्रबनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. विकसित भारताचा राजमार्ग विकसित बंदरांमधून जातो. त्यामुळे देशाला विकसित घडविण्यात देशातील बंदरांची भूमिका अत्यंत महत्वाची आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

             जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. २९ मे) मुंबई येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            गेल्या ३५ वर्षांमध्ये जवाहरलाल नेहरू देशातील अग्रगण्य कंटेनर बंदर म्हणून उदयाला आले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधाप्रगत तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक उपक्रम यामुळे ते जागतिक व्यापारासाठी प्रमुख बंदर म्हणून स्थापित झाले आहे. जवाहरलाल नेहरू बंदरामुळे कार्यक्षम मालवाहतूक सुनिश्चित झाली व त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            सीमाशुल्कातून मिळणाऱ्या एकूण महसुलाच्या सुमारे २५ टक्के रक्कम ही जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून मिळते तर देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कंटेनर हाताळणी या बंदरातून होते. यावरून देशाच्या औद्योगिक विकासात या बंदराचे योगदान महत्वाचे असल्याचे सिद्ध होते, असे राज्यपालांनी सांगितले.

            जवाहरलाल नेहरू बंदरामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. राज्यातील २८ विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करण्याचे आवाहन करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            राज्यातील विद्यापीठांमध्ये सागरी व्यापार आणि बंदर संबंधित अभ्यासक्रम आणि कार्यक्रमांची रचना करण्यासाठी प्राधिकरणाने सहकार्य करावे, असेही आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.  

            राज्यपालांच्या उपस्थितीत वाढवण येथील ग्रीनफिल्ड बंदराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व पीएसए यांच्याततसेच जेपीएनए आणि सीएमएसीजीएम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते सार्वजनिक खाजगी भागीदारीतील (पीपीपी) निवडक प्रतिनिधींचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राधिकरणाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

            राज्यपालांच्या हस्ते जेएनपीएचे विशेष आवरण व कॉर्पोरेट कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले.

            जेएनपीएच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित केलेल्या विशेष आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

            कार्यक्रमाला मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटाअतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीपोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र किशन कुमार शर्मासीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजेश पांडेजवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्षउन्मेष शरद वाघसचिव मनीषा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

****

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पत्रकारांकरिता प्राधिकार पत्रे

 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

पत्रकारांकरिता प्राधिकार पत्रे

 

            मुंबईदि. 30 : महाराष्ट्र राज्यातून विधान परिषदेवर निवडून आलेल्या कोकण विभाग व मुंबई या दोन पदवीधर मतदारसंघातील तसेच मुंबई व नाशिक विभाग या दोन शिक्षक मतदारसंघातील सदस्यांची मुदत दिनांक 07 जुलै 2024 रोजी समाप्त होणार आहे. सदर रिक्त होणाऱ्या जागांकरीता भारत निवडणूक आयोगाने दिनांक 8 मे2024 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

            या निवडणूकीचे मतदान बुधवारदिनांक 26 जून2024 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत व मतमोजणी सोमवारदिनांक 1 जुलै2024 रोजी होणार आहे.

            या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रतिनिधींच्या नावांच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पोहचण्याचा अंतिम दिनांक 11 जून2024 आहे. या शिफारसी महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालयमुंबई यांनी 10 जून2024 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमुंबई यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावेआपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालयमुंबई यांच्याकडे 10 जून2024 पर्यंत पाठवावीत. जेणेकरून महासंचालनालयाच्या कार्यालयाकडून सदरची मागणी या कार्यालयाकडे 11 जून2024 पर्यंत प्राप्त होऊ शकेल. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 10 जून2024 नंतर महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयास प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाहीअसे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

अत्यधिक महत्वपूर्ण सूचना : नागरिक सुरक्षा महानिदेशालय नागरिकों और निवासियों को निम्नलिखित के प्रति सचेत करता है:*

 अत्यधिक महत्वपूर्ण सूचना : 

नागरिक सुरक्षा महानिदेशालय नागरिकों और निवासियों को निम्नलिखित के प्रति सचेत करता है:*


🛑 आने वाले दिनों में 47 से 55 डिग्री सेल्सियस के बीच बढ़ते तापमान और क्यूम्यलस बादलों की उपस्थिति के कारण अधिकांश क्षेत्रों में दमघोंटू माहौल होने के कारण, यहां कुछ चेतावनियां और सावधानियां दी गई हैं...


🔴 कारों में से इन्हें हटा दिया जाना चाहिए:

1. गैस सामग्री.

2. लाइटर.

3. कार्बोनेटेड पेय पदार्थ।

4. सामान्यतः इत्र और उपकरण बैटरियाँ।

5. कार की खिड़कियाँ थोड़ी खुली (वेंटिलेशन) होनी चाहिए।

6. कार के फ्यूल टैंक को पूरा न भरें.

7. शाम के समय कार में ईंधन भरें।

8. सुबह के समय कार से यात्रा करने से बचें.

9. कार के टायरों को ज़्यादा न भरें, ख़ासकर यात्रा के दौरान।


🔴 बिच्छुओं और सांपों से सावधान रहें क्योंकि वे अपने बिलों से बाहर निकलेंगे और ठंडी जगहों की तलाश में पार्क और घरों में प्रवेश कर सकते हैं।


🔴 खूब पानी और तरल पदार्थ पियें।


🔴सुनिश्चित करें कि गैस सिलेंडर को धूप में न रखें।


🔴 सुनिश्चित करें कि बिजली मीटरों पर अधिक भार न डालें और एयर कंडीशनर का उपयोग केवल घर के व्यस्त क्षेत्रों में करें, विशेषकर अत्यधिक गर्मी के समय में।


🔴 सूरज की रोशनी के सीधे संपर्क में आने से बचें, खासकर सुबह 10 बजे से दोपहर 3 बजे के बीच।


🔵 अंत में: कृपया इस जानकारी को साझा करें क्योंकि अन्य लोग नहीं जानते होंगे और हो सकता है कि वे इसे पहली बार पढ़ रहे हों...


*सादर, 

नागरिक सुरक्षा महानिदेशालय* भारत सरकार 🙏

*श्री सोमनाथ महादेव मंदिर,* *प्रथम ज्योतिर्लिंग - गुजरात (सौराष्ट्र)* दिनांकः 30 मई 2024, वैशाख कृष्ण सप्तमी - गुरुवार *प्रातः श्रृंगार*


 *श्री सोमनाथ महादेव मंदिर,*

*प्रथम ज्योतिर्लिंग - गुजरात (सौराष्ट्र)*

दिनांकः 30 मई 2024, वैशाख कृष्ण सप्तमी - गुरुवार

*प्रातः श्रृंगार*

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 

मुंबई, दि. २९ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे-

1.आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.

2. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधनप्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.

3.विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यमदृकश्राव्यसोशल मीडियाप्रकाशनेव्हिडीओ एडिटिंगतंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)

4. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल

5. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.

6. आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

          इच्छुकांनी संशोधन अधिकारीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय१७ वा मजलानवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोरमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरू चौकमहाराष्ट्र शासनमंत्रालयमुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहितीनमुन्यातील माहितीपदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावीपाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.         

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेल.

        या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

----------------------------------

 


 

अर्जाचा नमुना

अ.क्र.

तपशिल

माहिती

1.      

नाव

 

 

2.     

पत्ता

 

 

3.     

मोबाईल क्रमांक

 

4.    

ई-मेल आयडी

 

5.     

आधार क्रमांक

 

6.     

सध्या शिकत असल्यास पदवी व महाविद्यालयाचे नाव

 

 

विद्यार्थ्याची स्वाक्षरी -

विद्यार्थ्याचे 

Featured post

Lakshvedhi