Thursday, 30 May 2024

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 

मुंबई, दि. २९ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे-

1.आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.

2. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधनप्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.

3.विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यमदृकश्राव्यसोशल मीडियाप्रकाशनेव्हिडीओ एडिटिंगतंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)

4. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल

5. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.

6. आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

          इच्छुकांनी संशोधन अधिकारीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय१७ वा मजलानवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोरमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरू चौकमहाराष्ट्र शासनमंत्रालयमुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहितीनमुन्यातील माहितीपदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावीपाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.         

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेल.

        या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

----------------------------------

 


 

अर्जाचा नमुना

अ.क्र.

तपशिल

माहिती

1.      

नाव

 

 

2.     

पत्ता

 

 

3.     

मोबाईल क्रमांक

 

4.    

ई-मेल आयडी

 

5.     

आधार क्रमांक

 

6.     

सध्या शिकत असल्यास पदवी व महाविद्यालयाचे नाव

 

 

विद्यार्थ्याची स्वाक्षरी -

विद्यार्थ्याचे 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi