Friday, 17 May 2024

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष  


- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर


 


            मुंबई, दि. १७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही समस्या अथवा तक्रार असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षातील ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.


            २८ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १५५ - मुलुंड, १५६ - विक्रोळी, १५७ – भांडूप पश्चिम, १६९ - घाटकोपर पश्चिम, १७० – घाटकोपर पूर्व, १७१ – मानखुर्द, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांगांसह मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले.


०००

पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध

 पावसाळी हंगामात जलयानांना 

समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध

            मुंबईदि. 17 : पावसाळी हंगामात सुरक्षिततता आणि पर्यावरणाच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घातली जाते. त्यामुळे आंतरदेशीय जलयाने कायदा 1917 (इनलँड व्हेसल कायदा 1917) च्या अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांनी 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात जलयाने घेऊन समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ.प्रवीण एस.खरा यांनी केले आहे.


मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील 1269 कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील

अत्यावश्यक सेवेतील 1269 कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

            मुंबई उपनगरदि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे रोजी टपाली मतदान सुरू झाले होते. आज शेवटच्या दिवशी ४९९ मतदारांनी मतदान केले असून एकूण १२६९ मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

            विक्रोळी पूर्व येथील कार्यालयात मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.  तीन दिवस सुरू असलेली ही मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले आहे.


मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 173 ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात

173 ज्येष्ठदिव्यांग मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

             मुंबई उपनगरदि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघात एकूण 173 मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

            १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन आस्थेने त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे १५६ - विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गीता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ१५६ विक्रोळी,  १७० – घाटकोपर पूर्व१५७ – भांडूप पश्चिम१७१ – मानखुर्द शिवाजीनगरतसेच १५५- मुलूंड या विधानसभा मतदारसंघात समन्वय अधिकारी यांनी पथकासह मतदारांच्या घरी जाऊन गुप्तपणे गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडली. उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटेसमन्वय अधिकारी श्री. वानखेडेतहसीलदार वृषाली पाटीलएस. ए. खानविलकरतहसिलदार ज्योती वाघतहसीलदार सतीश कदम या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह गृहमतदानाची जबाबदारी पार पाडली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे यांनी केले मतदान

            आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईलअसेच वाटत होते. मात्रनिवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाहीमतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई कुपटे या १०० वर्षीय आजीबाई यांनी यावेळी व्यक्त केला. तरूणांनीही मतदान नक्की करावेअसेही त्यांनी आवर्जून सांगितले.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची मुलाखत

  

‘दिलखुलास’ कार्यक्रमात

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची मुलाखत

 

            मुंबईदि. १६ : नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची निवडणूकीसाठी नाशिक जिल्हा सज्ज या विषयावर दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे.

            ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’  कार्यक्रमात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक शैलेश माळोदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            नाशिक जिल्ह्यात असलेले मतदारसंघनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर असलेल्या सोयीसुविधामतदार जनजागृतीकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन याविषयी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी माहिती दिली आहे.

००००

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत

 

            मुंबईदि. १६ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात शुक्रवार १७ मे रोजी सकाळी ११ वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमाद्वारे पाहण्यास उपलब्ध होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            या मुलाखतीत मुंबई उपनगर प्रशासनामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारीपारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनामतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांना आवाहन याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

 लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य

चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

 

               मुंबईदि. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३मधील लिपिक टंकलेखकगट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

            दिव्यांगमाजी सैनिकअनाथप्रकल्पग्रस्तभूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

            पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनपत्रात 'लिपिक टंकलेखकसंवर्गाचा विकल्प दिलेल्या व पूर्व परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचाच शासनस्तरावर तपासणी करण्याच्या अधीन राहून या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालात समावेश करण्यात आला आहे.

            टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

Featured post

Lakshvedhi