Thursday, 16 May 2024

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

 वृत्त क्र. 351

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था
मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

            मुंबईदि15 : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी ते सायंकाळी या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७

१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी - ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे - ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे - ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव-  मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७

१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, 9702953815/ उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५  / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६

१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८  / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० / 
 प्रशांत गर्गे - ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६

१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४
                                                                    ००००

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

 मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात

 ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

            मुंबईदि. १५ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकदिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहेअशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. 

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणालेटपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते. ३०-मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेत टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत घरून मतदान केले आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि.१४ मे) पासून गृह मतदानास प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय २ टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.

         ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात ७७३ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली असून ३०-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक व २९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहेअशी माहिती श्री. यादव यांनी दिली. 

मुंबई शहरात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत

१९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

            मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवार१४ मे पासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

            ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील १३७३ कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले.

            तर ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ६०१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला. १६ मे२०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

            टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित कर्मचारी यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते.     

*आज पद्मश्री माणिक वर्मा* *जन्मदिन*

 ⚜🌹⚜🔆🌅🔆⚜🌹⚜

      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻

               *माणिक दिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

       *आज पद्मश्री माणिक वर्मा* 

                    *जन्मदिन*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

🌹⚜️🌸🌺🎶🌺🌸⚜️🌹

        *मुलीचे वय वर्ष १३. पण संगीताचा जाहीर कार्यक्रम घेतला तो सुद्धा चोखंदळ पुणेकरांसमोर. तेवढा स्वक्षमतेचा आत्मविश्वास होता. या पहिल्याच कार्यक्रमात दाद मिळवली. गदिमा.. सुधीर फडके इ. मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. या बालिका म्हणजे माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा. किराणा घराण्याच्या गायिका. हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या. ज्यांना पु. ल. देशपांडेंनी संगीतातील 'माणिक' म्हणून गौरवले. आज त्यांचा जन्मदिवस. (१९२६-१९९६). जन्म पुण्याचा.*       

        *संगीताचे बाळकडू हे त्यांना आईकडून प्राप्त झाले. पूढे त्यांनी अनेक गुरुंकडे शिक्षण घेतले. किराणा घराण्याचे गाणे शिकल्या. त्यांच्यावर हिराबाईं बडोदेकर यांचा मोठा प्रभाव होता. माणिकताईंनी स्वतः गाण्यासाठी कष्ट घेत स्वतःचे स्थान निर्माण केले. तर्कशास्त्र विषयात पदवी पण घेतली.*

        *रंजकता आणि रसिक हृदयाचा ठाव घेणारा विलक्षण गोडवा हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य. त्यांना मोठमोठे संगीत दिग्दर्शक लाभले. अगदी गदिमा.. सूधीर फडकेंच्या गीत रामायणातही त्यांची सात गाणी आहेत. शास्त्रीय.. उपशास्त्रीय.. भक्तीगीत.. नाट्यगीत ते अगदी चित्रपट गीत असा त्यांचा सर्वत्र संचार होता.* 

        *त्यांचे नाव निघताच तत्काळ आठवण होते ती "कबिराचे विणतो शेले.." गाण्याची. "निघाले आज तिकडच्या घरी..", "अंगणी गुलमोहर फुलला..", "हसले मनी चांदणे..", "आज अयोध्या सजली.." अशा अनेक लोकप्रिय गाण्यांची. त्यांनी गायलेल्या एकमेव लावणीतील त्यांची "जाळीमधली पिकली करवंद.." पण तेवढीच अवीट गोडीची. एकुण काय सगळ्याच प्रकारात त्यांची हुकूमत होती.*

        *कोणतीही कला शिकावी तर ती मन लावून शिकावी, कष्टाने आत्मसात करावी हे माणिकताईंचे मत. त्यांच्या गायकीला असलेला सात्विकतेचा स्पर्श व्यक्तीमत्वाला आणि सुरालाही होता. त्याकाळात मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात जर मुलीने माणिकताईंचे गाणे गायले तर ती सुशील समजली जायची एवढा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव समाजावर होता.* 

        *गाण्याच्या मैफिलीत रमूनही तेवढीच धडपड त्या संसारातही करायच्या. सणावाराला पंचवीस तीस पाहुण्यांचा स्वयंपाक तेवढयाच उत्साहानं करायच्या. मोठमोठी गायक मंडळी हक्काने त्यांच्या घरी जेवायला यायची. त्यांचे उत्साहाने स्वागत करायच्या.  आपल्या मुलींवर संस्कार करताना गाणे लादले नाही. त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू दिले. त्याला आशीर्वाद दिले.*

        *त्यांचा वारसा चालवत कन्या राणी वर्मा.. भारती आचरेकर.. वंदना गुप्ते.. अरुणा जयप्रकाश यांनीही आपआपली क्षेत्र गाजवलीत. पद्मश्री माणिकताईच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारालाही त्यांच्याच श्रेष्ठतेचा मान आहे.* 

        *माणिकताई वर्मा यांच्या विविधांगी गायकीची साक्ष देणारे हे वेगळ्याच ढंगाचे लोकप्रिय गीत. जेष्ठ श्रेष्ठ गायिका पद्मश्री माणिकताईंना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*

🌹⚜️🌸🌾🎶🌾🌸⚜️🌹

  *कुई कुई कुई कुई चाक बोलतंय*

  *मोट चालली मळ्यामंदी*

  *झुळ झुळ झुळ झुळ पाणी पळतंय*

  *नागावाणी पाटामंदी*

  *भिर भिर भिर भिर फिरतंय वारं*

  *सळ सळ करतंय शिवार सारं*

  *चम चम चम चम मोती चमकती*

  *घाटावरनं कणसामंदी*

  *भर भर येती रानपाखरं*

  *लुटतील दौलत चिमणा चोर*

  *गर गर गोफण फिरवीत राहीन*

  *माळावर मी थाटामंदी*

  *आहा हाहा हाहा हाहा कुकुकूकू*

  *आपण दोघं घुमवत राहू*

  *करू काढणी धाट मोडणी*

  *मोती साठवू खळ्यामंदी*

  *लई सुखाची तुझीच राई*

  *घरी लक्ष्मी येईल बाई*

  *धनत्तराची बाळं आपण*

  *खेळू नांदू सुखामंदी*

🌹⚜️🌸🌾🌺🌾🌸⚜️🌹

  *गीत : ग. दि. माडगूळकर*  ✍

  *संगीत : सुधीर फडके*

  *स्वर : माणिक वर्मा*

  *चित्रपट : पुढचं पाऊल (१९५०)*

  🎼🎶🎼🎶🎼   🎧

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *१६.०५.२०२४*

🌻🌸🥀🔆♦️🔆🥀🌸🌻

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याचे आवाहन

 अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना

 टपाली मतदान करण्याचे आवाहन

Ø  मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील 770 अधिकारी,कर्मचाऱ्यांनी केले मतदान

            मुंबई  दि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे पासून टपाली मतदान सुरू झाले आहे. दोन दिवसात ७७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर यांनी दिली .

            गुरुवार १६ मे  रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावेअसे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दातकर यांनी केले आहे.

            विक्रोळी पूर्व येथील पिरोजशहा नगरसांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  मतदान करावे. त्यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहेअसल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले .

                                                                        ०००००

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

 दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

            मुंबईदि15 : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी ते सायंकाळी या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७

१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी - ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे - ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे - ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव-  मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७

१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, 9702953815/ उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५  / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६

१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८  / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० / 
 प्रशांत गर्गे - ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६

१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४
                                                                    ००००

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याचे आवाहन

 अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना

 टपाली मतदान करण्याचे आवाहन

Ø  मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील 770 अधिकारी,कर्मचाऱ्यांनी केले मतदान

            मुंबई  दि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे पासून टपाली मतदान सुरू झाले आहे. दोन दिवसात ७७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर यांनी दिली .

            गुरुवार १६ मे  रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावेअसे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दातकर यांनी केले आहे.

            विक्रोळी पूर्व येथील पिरोजशहा नगरसांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  मतदान करावे. त्यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहेअसल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले .

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये 1333 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

 दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये

1333 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातूनही दिले मतदान प्रक्रियेचे धडे

            मुंबईदि. 15: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशीसहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडले. या दोन दिवसीय प्रशिक्षणात 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

            येत्या 20 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदार संघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील दहिसर विधानसभा मतदारसंघात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. हे प्रशिक्षण दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

            प्रशिक्षण सत्राचा उद्देश मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करून निवडणुकांचे निर्विघ्न आणि विनाविलंब संचालन सुनिश्चित करणे हे होते. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियामतदार पडताळणीमतदार व्यवस्थापनईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मशीनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि संकट व्यवस्थापन इत्यादी विषय अंतर्भूत होते. दिनांक 14 आणि 15 मे या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

            अधिकाऱ्यांना प्रशिक्षणामार्फत प्रदान केलेल्या ज्ञानाचे कितपत आकलन झाले हे ऑनलाईन परीक्षेद्वारे पडताळण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उपस्थितांनी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना निवडणूक व्यवस्थापनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली.

Featured post

Lakshvedhi