Friday, 17 May 2024

मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघातील २० मे रोजी

 मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ३०-मुंबई दक्षिण मध्य’, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघातील २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान पारदर्शकनि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती

एकूण मतदार :- २४ लाख ९० हजार २३८   

एकूण पुरुष मतदार :- १३ लाख ४३ हजार ९६९    

एकूण स्त्री मतदार :- ११ लाख ४६ हजार ०४५   

एकूण तृतीयपंथी मतदार :- २२४  

ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +)

एकूण:- ५५ हजार ८१७

एकूण पुरूष :- २६ हजार ८१५ 

एकूण स्त्री :- २९ हजार ००१

१८ ते १९ या वयोगटातील नवमतदार

एकूण मतदारः- २६ हजार ४५०  

एकूण पुरुषः १४ हजार ७१७   

एकूण स्त्री:- ११ हजार ७३३

दिव्यांग मतदार

एकूण मतदार :- ५५४९ 

एकूण पुरुष:- ३३२२  

एकूण स्त्रीः- २२२७  

मतदान केंद्रांची माहिती

एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५२०

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११

नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८

--

मतदानाच्या दिवशी मुंबईतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

 मतदानाच्या दिवशी मुंबईतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक

मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

            मुंबईदि. १६  : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजावावाअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

            भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५+ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून मुंबई शहर जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानाच्या दिवशीचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारीदिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांकरिता एक दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे दहा दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. बेस्ट बस सेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता १० लो फ्लोर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी देण्यात आलेले आहेत.

            प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी रूट मॅप करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत. या बस थांब्यावरून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक मतदारांना या बस सेवेचा लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांकरिता ५ व्हीलचेअरयुक्त लो फ्लोर बसेस व त्यासोबत एक सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

             दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मदत करण्याकरिता एकूण १३ दिव्यांग मित्र नियुक्त केलेले आहेत. ज्या ठिकाणी म्हणजे अरुंद रस्त्यामध्ये बसेस जाणार नाहीअशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय एक टॅक्सी म्हणजेच एकूण दहा टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.

दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर बसेस सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे.

️ १७८-धारावी/नामदेव साबळे/९७०२८३२००९

️ १७९-सायन कोळीवाडा/विजय साळुंखे/८३६९५३२१३८

️ १८०-वडाळा/तृप्ती धोंडे/९८९२१५४३०७

️ १८१-माहीम/रोशन पिंपळे/८९८३०४१२३६

️ १८२- वरळी/ज्ञानेश्वर पाटील/९४२२२००१७६

️ १८३-शिवडी/रवींद्र वाडीले/९४२११६९७७६

️ १८४-भायखळा/सुषमा गुप्ता/९८६९६२८९००

️ १८५-मलबार हिल/स्वाती जिरंगे/९८६९०२४२५४

️ १८६-मुंबादेवी/मनोज नेमाने/९८६९६०२८८५

️ १८७-कुलाबा/दत्तात्रय कांबळे/९१३७५१३८३२

****

Thursday, 16 May 2024

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत

 

            मुंबईदि. १६ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात शुक्रवार १७ मे रोजी सकाळी ११ वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमाद्वारे पाहण्यास उपलब्ध होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            या मुलाखतीत मुंबई उपनगर प्रशासनामार्फत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारीपारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनामतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांना आवाहन याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

------ 000 ------

दिलखुलास’ कार्यक्रमात नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची मुलाखत

 

            मुंबईदि. १६ : नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची निवडणूकीसाठी नाशिक जिल्हा सज्ज या विषयावर दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे.

            ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’  कार्यक्रमात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक शैलेश माळोदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            नाशिक जिल्ह्यात असलेले मतदारसंघनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर असलेल्या सोयीसुविधामतदार जनजागृतीकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन याविषयी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी माहिती दिली आहे.

००००

*३ मे - निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी.*

 *३ मे - निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी.*


मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे.

 'हे परमेश्वरा, आता तुझ्याकरिताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,' असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे.


 'नामस्मरण होत नाही, कारण वयामुळे मन थकले,' हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल, कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे; परंतु मन थकले, हे मात्र सयुक्तिक नाही.

 मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची. परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना, त्यापूर्वी केव्हाही, मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही.

 पूर्वी सहा-सहा तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल, हे मान्य आहे; पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. 


मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा, सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाअडका, प्रपंचातल्या गोष्टी, यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन.


पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा, माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे, त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.


धर्माचरण, भगवद्‌भक्ति, नामस्मरण, आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. 


चित्तशुद्धीचे लक्षण हे की, आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना होणे. ही भावना वाढण्यासाठी, 'सर्व जग सुखी असावे' अशी प्रार्थना करण्याचा परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत्‌कृपेने साधेल. 


अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि तो केव्हा डोके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.


*१२४. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी.*

मनुष्य पैसा मिळविण्यासाठी

 मनुष्य पैसा मिळविण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळविण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही.

*🙏 शुभ सकाळ🙏*

मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा

 *"मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन."*


जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, "सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?"


 फेमी म्हणाले:

 "मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."


पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता.  पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.


मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला.  पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे माझ्या लक्षात आले.


त्यानंतर मोठा व्यवसाय मिळविण्याचा तिसरा टप्पा आला.  तेव्हा मी नायजेरिया आणि आफ्रिकेत 95% डिझेल पुरवठा करत होतो.  मी आफ्रिका आणि आशियातील सर्वात मोठा जहाज मालक होतो.  पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.


चौथा टप्पा तेंव्हा आला जेंव्हा माझ्या एका मित्राने मला 200 अपंग मुलांसाठी व्हीलचेअर घेऊन देण्याची विनंती केली.


मित्राच्या विनंतीवरून मी लगेच व्हीलचेअर विकत घेतल्या.


पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन स्वतः व्हीलचेअर मुलांच्या हाती द्यावी.  म्हणून मी मित्रा सोबत गेलो.


तिथे मी स्वतःच्या हाताने त्या अपंग मुलांना व्हील चेअर दिल्या.  त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची विचित्र चमक मला दिसली. त्या मुलांना मी व्हीलचेअरवर बसून फिरताना आणि मजा करताना पाहिले.

जणू ते पिकनिक वर आले आहेत आणि जॅकपॉट जिंकत आहेत.


मला यात खरा आनंद वाटला.  मी  तेथून निघत असताना एका मुलाने माझे पाय धरले.  मी हळूवारपणे माझे पाय सोडवायचा प्रयत्न केला पण त्या मुलाने माझ्या चेहऱ्याकडे पाहत माझे पाय घट्ट पकडले.


मी खाली वाकून त्या मुलाला विचारले "तुला आणखी काही हवे आहे का?"


या मुलाने मला दिलेल्या उत्तराने मला आनंद तर दिलाच पण जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला.  तो मुलगा म्हणाला:

 "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन."


*तुमचा चेहरा पुन्हा पाहण्याची इच्छा करणारे कोणी आहेत का?*

Featured post

Lakshvedhi