Thursday, 16 May 2024

15 मे जागतिक कुटुंब दिन

 *15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून आपण संपूर्ण जगात साजरा करतो.* आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही. 15 मे जागतिक कुटुंब दिनी भारतातील सर्व कुटुंबीय आनंदाने आणि सुख समृद्धीने नांदावे तसेच एकत्र कुटुंबपद्ध सर्वत्र रूजावी व एकत्रर कुटुंबपद्धतीत वाढ व्हावी, एवढीच या 'जागतिक कुटुंब दिनी' अपेक्षा!

 *आज जागतिक कुटुंब दिन. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला.* शांतता, विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा म्हणून 'जागतिक कुटुंब' दिन साजरा करण्यात येतो.

लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक करणाऱ्या महिलेने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे सलग १० वर्षे या दिनाचा जगभर प्रसार केला. त्यांच्या चळवळीने जागतिक कुटुंब दिनाच्या सोहळ्यात विविध उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली.

या चळवळीचे उद्दिष्ट 'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा' अशा असून, हे सारे कार्य जागतिक पातळीवरील सरकारे, विविध कार्यालये, संस्था यांच्यामार्फत व्हायला हवे, असा त्यांचा कटाक्ष असतो.

वैश्‍विक कुटुंबाला जोडणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक, सामाजिक घटकांचा कुटुंबावर पडणारा प्रभाव आणि कुटुंबाविषयी इतर मुद्‌द्‌यांना विशेष प्राधान्य देण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे.

जगातल्या प्रत्येक व्यक्तीने हा दिवस साजरा करावा, अहिंसा, शांती आणि सहभाग यासंबंधी व्यक्तिगत प्रतिज्ञा करून आपला समाज, आपले जग सुरक्षित असल्याची ग्वाही एकमेकांना द्यावी, असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागचा आहे.

महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते

 *महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल.*


*कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राजे कौरव किंवा पांडवांच्या बाजूने उभे राहिले, परंतु एक राज्य असे होते जे या युद्धक्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहिले, ते म्हणजे दक्षिणेतील उडुपीचे राज्य.*


*जेव्हा उडूप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले.*


*उडुपीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता, त्यांनी श्रीकृष्णाला विचारले - हे माधव! दोन्ही बाजूंनी जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो, पण दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का?*


*त्यावर श्रीकृष्ण म्हणाले- महाराज! तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे, तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच यासंदर्भात काहीतरी योजना आहे, कृपया ती योजना मला सांगावी.*


*यावर उडुपीचे राजे म्हणाले की - हे वासुदेव! भावा भावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही.*


*परंतु हे ही सत्य आहे की हे युद्ध आता टाळता ही येणार नाही, म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.*


*यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले - महाराज!  तुमची कल्पना खूप चांगली आहे, या युद्धात 50 लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूने ही आम्ही निश्चिंत राहू.*


*मला हे सुध्दा माहीत आहे की या विशाल महासागराएवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्या शिवाय कुणालाही शक्य नाही.*


*भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाहीत, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या, अशा प्रकारे उडुपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली.*


*पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्धांसाठी भोजनाची व्यवस्था केली, त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कण ही वाया गेला नाही.*


*जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की, प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडुपीचा राजा कडून एक अन्नाचा कण ही वाया जात नाहीये तर. त्यांना हे कसे समजते की आज एवढ्याच सैन्याचे भोजन बनवायचे आहे?*


*खर तर तेथील उपस्थित असणाऱ्या सैन्याला एक प्रश्न पडत होता की उडप्पीचा राजांना हे कसे काय समजते की आज किती सैन्य मरणार आहे व ते रोज त्याच आधारे भोजन बनवतात.?*


*एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खर तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुध्दा एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच.*


*अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले.आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी युधिष्ठिराने न रहावुन उडुपीच्या राजाला विचारले की - हे महाराज! समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म, गुरू द्रोण आणि आमचा थोरला भाऊ कर्ण यांसारखे महापुरुष करत होते. परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांच्यापेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात, कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यासाठी केवळ जेवणाची व्यवस्थाच केली नाही तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कण ही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.*


*यावर उडुपीचे राजे हसले आणि म्हणाले - "सम्राट! या युद्धात तुम्ही मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोणाला देणार?"*


*यावर युधिष्ठिर म्हणाले - "याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल? जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते."*


*तेव्हा उडुपीचे राजे म्हणाले,  हे राजा!  ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा श्रीकृष्णाचाच महिमा आहे, हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.*


*मग उडूप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व व म्हणाले "महाराज! श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाणे (भुईमुगाच्या शेंगा) खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे, व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या व ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफल बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या आहेत त्या मोजत असे.*


*ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युध्दात १०००  गुणा सैन्य मारले जायचे , समजा त्यांनी ५० शेंगा खाल्या तर दुसऱ्या दिवशी युध्दात ५०००० सैनिक मारले जायचे व मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कण ही वाया जात नसे.*


*प्रभू श्री कृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्यासमोर नतमस्तक झाले, ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे, ही कथा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते, कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडुप्पीच्या सम्राटाद्वारा केली गेली आहे.*


*प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.*


*भारतात ही असे एक शहर नाही जिथे एकही उडुपीचे रेस्टॉरंट नाही , भारता सोबतच  परदेशातही अनेक उडुपी रेस्टॉरंट आहेत.*


*आणि या उडुपी रेस्टॉरंट्सची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात.*


 *🙏!! जय श्री कृष्णा !! 🙏* 


 *जय हिंद!* 🇮🇳 🚩

Wednesday, 15 May 2024

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे स्वागत

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे स्वागत

  

            मुंबईदि. १५ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले.  पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक  पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

            पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे परिवहन मंत्री रोहन सिनाननक्रीडा व समुदाय विकास मंत्री शामफा कुडजो लेविसभारतातील उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल आदींचा समावेश आहे.

००००

त्रिनीनाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन

 त्रिनीनाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन

         

          मुंबईदि. १५ : त्रिनीनाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ.किथ रॉली यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज दुपारी आगमन झाले.

            यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जी. व्ही. श्रीनिवासअतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले. राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000


दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

 दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती


            मुंबईदि15 : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी ते सायंकाळी या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७

१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी - ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे - ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे - ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव-  मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७

१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, 9702953815/ उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५  / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६

१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८  / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० / 
 प्रशांत गर्गे - ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६

१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४
                                                                    ००००


 


अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आवाहन

 अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदान

करण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आवाहन

 

            मुंबईदि. १५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघाच्या विक्रोळी येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १४ मे पासून टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावेअसे आवाहन मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.

            १४ मे रोजी विक्रोळी येथील पिरोजशहा नगरसांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील १६०६ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत साधारण ७०० मतदारांनी मतदान केले आहे. गुरुवार दिनांक १६ मे रोजी संध्याकाळी ५ ही प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान करावे.

            अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहेअसेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 

            मुंबईदि. 15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व  तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतीलअशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे 26- मुंबई उत्तर27- मुंबई उत्तर पश्चिम28- मुंबई उत्तर पूर्व29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सात हजार 384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष34 लाख 44 हजार 819 महिलातर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

            यामध्ये 26- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवलीदहिसरमागाठाणेकांदिवली (पूर्व)चारकोपमालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 1702 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 68 हजार 983 पुरुष8 लाख 42 हजार 546 महिलातर 443 तृतीयपंथी असे एकूण 18 लाख 11 हजार 942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्वदिंडोशीगोरेगाववर्सोवाअंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात  1753 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 38 हजार 365 पुरूष मतदार तसेच 7 लाख 96 हजार 663 महिला मतदार तर 60 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 35 हजार 088 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंडविक्रोळीभांडुप पश्चिमघाटकोपर पश्चिमघाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1682 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 8 लाख 77 हजार 855 पुरूष मतदार तसेच 7 लाख 58 हजार 799 महिला मतदार तर 236 तृतीयपंथी असे एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्लेचांदीवलीकुर्ला एससीकलीनावांद्रे पूर्ववांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1698 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 41 हजार 288 पूरूष मतदार तसेच 8 लाख 2 हजार 775 महिला मतदार तर 65 तृतीयपंथी असे एकूण 17 लाख 44 हजार 128 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            30 मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणुशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात 549 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 2 लाख 76 हजार 258 पुरूष मतदार तसेच 2 लाख 44 हजार 036 महिला मतदार तर 41 तृतीयपंथी असे एकूण 5 लाख 20 हजार 335 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

०००

Featured post

Lakshvedhi