भक्तिगीतावर एवढा सुंदर डांस 👌👍✌️. *"माउली माऊली जय हरि माऊली 👏"*
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 27 April 2024
तुलसी माला की महिमा📿*
*📿तुलसी माला की महिमा📿*
*🔹गले में तुलसी की माला धारण करने से जीवनीशक्ति बढ़ती है, बहुत से रोगों से मुक्ति मिलती है । शरीर निर्मल, रोगमुक्त व सात्त्विक बनता है ।*
*🔹तुलसी माला से भगवन्नाम जप करने एवं इसे गले में पहनने से आवश्यक एक्यूप्रेशर बिंदुओं पर दबाव पड़ता है, जिससे मानसिक तनाव में लाभ होता है, संक्रामक रोगों से रक्षा होती है तथा शरीर-स्वास्थ्य में सुधार होकर दीर्घायु में मदद मिलती है ।*
*🔹तुलसी को धारण करने से शरीर में विद्युतशक्ति का प्रवाह बढ़ता है तथा जीव-कोशों का विद्युतशक्ति धारण करने का सामर्थ्य बढ़ता है ।*
*🔹गले में तुलसी माला पहनने से विद्युत तरंगे निकलती हैं जो रक्त संचार में रुकावट नहीं आने देती । प्रबल विद्युतशक्ति के कारण धारक के चारों ओर आभामंडल विद्यमान रहता है ।*
*🔹गले में तुलसी माला धारण करने से आवाज सुरीली होती है । हृदय पर झूलने वाली तुलसी माला हृदय व फेफड़े को रोगों से बचाती है । इसे धारण करने वाले के स्वभाव में सात्त्विकता का संचार होता है ।*
*🔹तुलसी की माला धारक के व्यक्तित्व को आकर्षक बनाती है । कलाई में तुलसी का गजरा पहनने से नाड़ी संबंधी समस्याओं से रक्षा होती है, हाथ सुन्न नहीं होता, भुजाओं का बल बढ़ता है ।*
*🔹तुलसी की जड़ें अथवा जड़ों के मनके कमर में बाँधने से स्त्रियों को विशेषतः गर्भवती स्त्रियों को लाभ होता है । प्रसव वेदना कम होती है और प्रसूति भी सरलता से हो जाती है । कमर में तुलसी की करधनी पहनने से पक्षाघात (लकवा) नहीं होता एवं कमर, जिगर, तिल्ली, आमाशय और यौनांग के विकार नहीं होते हैं ।*
*🔹यदि तुलसी की लकड़ी से बनी हुई मालाओं से अलंकृत होकर मनुष्य देवताओं और पितरों के पूजनादि कार्य करे तो वे कोटि गुना फल देने वाले होते हैं । जो मनुष्य तुलसी लकड़ी से बनी माला भगवान विष्णु को अर्पित करके पुनः प्रसादरूप से उसे भक्तिपूर्वक धारण करता है, उसके पातक नष्ट हो जाते हैं ।*
*📜शास्त्रों में वर्णित तुलसी महिमा📜*
*🔹अनेक व्रतकथाओं, धर्मकथाओं, पुराणों में तुलसी महिमा के अनेक आख्यान हैं । भगवान विष्णु या श्रीकृष्ण की कोई भी पूजा विधि तुलसी दल के बिना परिपूर्ण नहीं मानी जाती ।*
*🔹जो दर्शन करने पर सारे पाप-समुदाय का नाश कर देती है, स्पर्श करने पर शरीर को पवित्र बनाती है, प्रणाम करने पर रोगों का निवारण करती है, जल से सींचने पर यमराज को भी भय पहुँचाती है, आरोपित करने पर भगवान श्रीकृष्ण के समीप ले जाती है और भगवान के चरणों में चढ़ाने पर मोक्षरूपी फल प्रदान करती है, उस तुलसी देवी को नमस्कार है । (पद्म पुराणः उ.खं. 56.22)*
*🔹तुलसी के निकट जो भी मंत्र-स्तोत्र आदि का जप-पाठ किया जाता है, वह सब अनंत गुना फल देने वाला होता है ।*
*🔹प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस, भूत दैत्य आदि सब तुलसी के पौधे से दूर भागते हैं ।*
*🔹ब्रह्महत्या आदि पाप तथा पाप और खोटे विचार से उत्पन्न होने वाले रोग तुलसी के सामीप्य एवं सेवन से नष्ट हो जाते हैं ।*
*🔹श्राद्ध और यज्ञ आदि कार्यों में तुलसी का एक पत्ता भी महान पुण्य देने वाला है ।*
*🔹तुलसी के नाम-उच्चारण से मनुष्य के पाप नष्ट हो जाते हैं तथा अक्षय पुण्य की प्राप्ति होती है ।*
*🔹तुलसी ग्रहण करके मनुष्य पातकों से मुक्त हो जाता है ।*
*📜वास्तु शास्त्र तुलसी 📜*
*🔷वास्तु शास्त्र में भी तुलसी को घर में सकारात्मकता लाने वाला पवित्र पौधा माना गया है तुलसी के पौधे को घर में पूर्व दिशा में रखें। इस दिशा में तुलसी का पौधा रखने पर घर में आध्यात्मिक विकास भी तेज होता है. घर के सदस्यों के बीच मनमुटाव कम होता है और प्रेम भाव बढ़ता है।*
*🔷अगर किसी वजह से पूर्व दिशा में नहीं रख सकते हैं तो उत्तर पूर्व दिशा, उत्तर दिशा या फिर उत्तर पश्चिम दिशा में रख सकते हैं।*
*🔷इसे भूलकर भी पश्चिम दिशा में नहीं रखना चाहिए अन्यथा घर में आर्थिक उन्नति के रास्ते बंद हो जाते हैं*
*🌞🚩🚩 *" ll जय श्री राम ll "* 🚩🚩
मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आजपासून सुरुवात
मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध
नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आजपासून सुरुवात
मुंबई, दि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे, असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे.
३ मे २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल.
‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्रमांक, २०५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.
तसेच ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, पहिला मजला, कक्ष क्रमांक १३२, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.
४ मे २०२४ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. ६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख - २६ एप्रिल २०२४
* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ - ३ मे २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत
* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख - ०४ मे २०२४
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख व वेळ - ०६ मे २०२४ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत
* मतदानाची तारीख व वेळ - २० मे २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
* मतमोजणीची तारीख - ०४ जून २०२४
* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख - ६ जून २०२४
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 369 अर्ज वैध
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
चौथ्या टप्प्यातील निवडणूक
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 369 अर्ज वैध
मुंबई, दि. 26 : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16, जळगाव - 20, रावेर - 29, जालना - 35, औरंगाबाद - 44, मावळ - 35, पुणे - 42, शिरूर - 35, अहमदनगर - 36, शिर्डी - 22 आणि बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
00000
*वाचनात आलेले छानसे असे काही.
*वाचनात आलेले छानसे असे काही....*
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’(Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करत होता. चर्चची जमीन रोज झाडून काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता.
चर्चमध्ये काम करणाऱ्या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे, असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षित होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता, त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता.
डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले.
डनहिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.
एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रीटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरूवात केली. त्याला आख्ख्या बॉन्ड स्ट्रीटवर कोठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही.
शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. 'आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर ?' डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.
त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला.
त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत, तीन वर्षात सोळा झाली.
अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला.
पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरूवात केली व *‘डनहिल’* या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरूवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.
त्याच्या सिगारेट्ससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा, त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर करारनामा (agreement) करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतकऱ्यांचे नशीब तर फळफळलेच, पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते.
या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या. पण डनहिलने मात्र आपला हाताचा अंगठा उमटवला, कारण त्याला सही करायला येत नव्हती.
हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले,
‘सर... हे खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते ?’
डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहिता वाचता आले असते, तर अजूनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिलो असतो.’
*आज सुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहे.*
*अन् ही खरी गोष्ट आहे.*
खासदार म्हणजे कोण? आणि तो खासदार काय करतो?*
*🌹खासदार म्हणजे कोण? आणि तो खासदार काय करतो?*
*गावच्या लोकांना हे माहिती नसते की खासदारकीची कामे काय असतात? आणि यामुळे गावच्या लोकांची दिशाभूल करणे काही राजकीय मंडळींना सोपे जाते.*
*बऱ्याच वेळा जाणूनबुजून काही गावकऱ्यांना खासदार आपल्या गावात आल्यावर चुकीचे प्रश्न विचारायला सांगतात म्हणजे उदाहरण दयायचे झाले तर गावकऱ्यांना काही लोक सांगतात की अमुक खासदार निवडून दिल्या पासून माघील 5 वर्षे आमच्या गावात आलाच नाही का आला नाही ते विचार?*
*आमच्या गावासाठी तू काय केलेस??*
*भोळ्या गावकऱ्यांना हे प्रश्न बरोबर वाटतात आणि गावात आलेल्या खासदारला कोंडीस पकडण्याचे प्रयत्न केले जातात.*
*खासदार हा मुळात गावची कामे करण्यासाठी निवडून दिला जात नाही. हे आधी नीट समजून घ्या!*
*खासदार आणि त्याचा पक्ष जर सत्तेत असेल तर त्यांना तुम्ही खलील प्रश्न विचारू शकतात👇🏼*
*माघील 5 वर्षात देशाच्या सुरक्षेसाठी काय केले?*
*मागील 5 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत काय वाढ झाली का?*
*मागील 5 वर्षात विदेशी गुंतवणूक देशात वाढली का?*
*मागील 5 वर्षात देशासाठी चांगले कायदे-कानून बनवलेत का?*
*मागील 5 वर्षात नेशनल हायवे मोठ्याप्रमाणात बनवलेत का?*
*देशाची पाणी समस्या सोडण्यासाठी देश पातळीवर काय उपाययोजना केल्यात?*
*मागील 5 वर्षात जगात देशाचा मानसन्मान वाढवला का?*
*मागील 5 वर्षात देशात किती गोरगरिबांना घरे दिलीत?*
*मागील 5 वर्षात देशाची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या पक्षाने काय उपाययोजना केल्यात?*
*हे असले प्रश्न तुम्ही तुमच्या निवडून दिलेल्या खासदारला विचारायची असतात आणि जर का वरील प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर आपण गावकऱ्यांनी याच खासदारला आणि याच्या पक्षाला पुन्हा निवडून दिले पाहिजे कारण देश चालवायचा आहे गाव नाही*
*गावची कामे करण्यासाठी सरपंच, प.स.सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार हे लोक असतात खासदार देश पातळीवर काम करत असतो🙏🏼*
*चुकीचे प्रश्न विचारून आपण आपलाच नुकसान करून घेऊ नका👈🏼🙏🏼*
*देश टिकला पाहिजे तरच आपले गाव टिकेल देशाच्या सुरक्षेसाठी खासदार निवडून दयायचा असतो हे लक्षात ठेवा🙏🏼🇮🇳🙏🏻*
*राष्ट्रप्रथम, राष्ट्रसर्वापरी ही संकल्पना मजबुत करा*

*