Saturday, 27 April 2024

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आजपासून सुरुवात

 मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास आजपासून सुरुवात

            मुंबईदि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहेअसल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

         लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलकसहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे.

          ३ मे २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल.

          ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयखोली क्रमांक२०५दुसरा मजलाजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहरजुने जकात घरशहिद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

           तसेच ३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयमुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयजुने जकात घरपहिला मजलाकक्ष क्रमांक १३२शहिद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.       

           ४ मे २०२४ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. ६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख - २६ एप्रिल २०२४

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ - ३ मे २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख - ०४ मे २०२४

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख व वेळ - ०६ मे २०२४ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* मतदानाची तारीख व वेळ - २० मे २०२४सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत 

* मतमोजणीची तारीख - ०४ जून २०२४

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख - ६ जून २०२४

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi