Saturday, 27 April 2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदान

 

        मुंबईदि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात  सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा - ५६.६६ टक्के

अकोला - ५२.४९  टक्के

अमरावती - ५४.५० टक्के

बुलढाणा -  ५२.२४ टक्के

हिंगोली -  ५२.०३ टक्के

नांदेड -  ५२.४७ टक्के

परभणी -५३.७९ टक्के

यवतमाळ - वाशिम - ५४.०४ टक्के

28 - मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

 28 - मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

 

            मुंबईदि. २६ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई  उपनगर जिल्ह्यातील २८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आजपासून अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

            आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे अशी : 1 ) मिहीर चंद्रकांत कोटेचा  (भारतीय जनता पार्टीएकूण तीन अर्ज), (2) सुक्ष्मा मोतीलाल मौर्य (अपक्षएक अर्ज).

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात  मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत  155 - मुलुंड, 156 - विक्रोळी, 157 - भांडुप पश्चिम, 169 - घाटकोपर पश्चिम, 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी 3 मे 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.   मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईलतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ६ मे २०२४ आहे. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान सकाळी ७ .००  ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होणार आहे.  ४ जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळागोदरेज संकुलविक्रोळी येथे करण्यात येणार आहे.

             मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम आणि 29 –मुंबई उत्तर मध्य या तीनही मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या कार्यालयाने दिली. 

000

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात भव्य सायकल रॅलीचे आयोजन रॅलीत सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन

 महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात भव्य सायकल रॅलीचे आयोजन

रॅलीत सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन

            मुंबई उपनगरदि. 26 : 'उत्सव निवडणूकीचाअभिमान देशाचाया राष्ट्रीय महोत्सवात आपण सर्वांनी 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी उर्त्स्फुतपणे सहभागी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालयचेतना कॉलेज जवळ  सकाळी 6.30 वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सायकल ग्रृप तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सहभाग घ्यावाअसे आवाहन मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे. बीवायसीएसमुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. 

असा असेल रॅलीचा मार्ग

            मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व)मुंबई येथून सायकल रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर ही रॅली मार्ग क्रमांक पहिला बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृहमार्ग क्रमांक दुसरा अंधेरी क्रीडा संकुलमार्ग क्रमांक तीसरा एनसीपीएदक्षिण मुंबई आणि मार्ग क्रमांक चौथा मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर या चार ठिकाणी रॅली मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने https://torms.gle/nN9Rpi8jQY5xtspb7 गुगल फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वनाथ अय्यर (मोबाईल क्रमांक 9619444027), कमल गाडा (मोबाईल 9821025381) यांच्याशी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधावाअसेही  सहाय्यक आयुक्त श्री. खैरनार यांनी  कळविले आहे.

            या रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून केली जाईल. या रॅलीमध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादमबृहन्मुंबई महानगरपालिका उपयुक्त विश्वास मोटेप्रसाद खैरनारसहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई इत्यादी सहभागी होणार आहेत.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पाहणी

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पाहणी

 

            मुंबई, दि. २६ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रणासाठी स्थापित प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधूडॉ. मुकेश जैन यांनी भेट देऊन पाहणी केली.

            यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव  यांनी माध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री. यादव यांनी प्रसारमाध्यम कक्षाद्वारे समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सी-व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

            केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. सिंधु व डॉ. जैन यांनी प्रसारमाध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिकमुद्रीत व समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीपेड न्यूज तसेच सी-व्हिजील ॲपवर नियंत्रण कक्षास प्राप्त तक्रारीबाबत माहिती घेतली. उमेदवारांच्या वर्तमानपत्रातील तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि विशेषत: समाजमाध्यमांमधील जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष ठेवाअशा सूचना दोन्ही निरीक्षकांनी केल्या.

         *****

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून आढावा

 मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघांचा

 केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून आढावा

 

          मुंबईदि. २६  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू व ३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. मुकेश जैन यांनी आज लोकसभा मतदारसंघांच्या कामकाजाचा आढावा घेतला.  

         मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवनिवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरेउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसेमाध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत श्री. सिंधू यांनी निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत माहिती जाणून घेतली.            

         ’३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडसमन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजनसमन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानीतक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटे आदि उपस्थित होते. या बैठकीत डॉ. जैन यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना समूह भावनेने काम करण्याचे आवाहन केले. तसेच अधिकारी- कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कामकाजासाठी सज्ज केल्याबद्दल डॉ. जैन यांनी समाधान व्यक्त केले.          

--

29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी 

सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

 

            मुंबईदि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे.

            केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयपाचवा मजलाप्रशासकीय इमारतशासकीय वसाहतवांद्रे पूर्वमुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक +91 8591369100 असा आहे.

            आज निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. गुप्ता यांनी या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारीपोलीस उपायुक्तसहायक निवडणूक निर्णय अधिकारीवॉर्ड ऑफीसरराज्य उत्पादन शुल्क अधिकारी यासह मतदारसंघासाठी नियुक्त केलेली खर्च सनियंत्रण समितीआयकर विभागाचे नोडल अधिकारी आणि निवडणुकीसाठी नियुक्त विविध अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खर्च विषयक अनुषंगाने निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत यासाठी नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न कऱण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी त्यांना मतदारसंघात यंत्रणेने केलेल्या तयारीची माहिती दिली. 


एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

 एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

            मुंबई, दि. 26 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद यासाठी नियुक्त पथकाकडून देण्यात येत आहे. निवडणूक ओळखपत्र, मतदार केंद्र, मतदानासाठी आवश्यक ओळखपत्रे आदींविषयक माहिती या पोर्टलवर नागरिकांमार्फत विचारण्यात येते. आतापर्यंत अशा 8 हजाराहून अधिक कॉल्सना या पोर्टलच्या माध्यमातून उत्तर देण्यात येऊन या नागरिकांचे शंका समाधान करण्यात आले आहे.


            या पोर्टलवर दाखल झालेल्या सर्व तक्रारींपैकी सुमारे 75 टक्केहून अधिक तक्रारी या मतदार ओळखपत्राशी संबंधित असतात. नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित त्यांच्या अडचणी देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले हे पोर्टल आहे. तसेच या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर अथवा https://tmp.eci.gov.in/electors या लिंकवर तक्रारी स्वीकारल्या जात आहेत. 


या संदर्भातील तक्रारी करू शकता


            मतदार नोंदणी, मतदार ओळखपत्र, मतदारांचे स्थलांतर यासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात. आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोर्टल उपलब्ध आहे. हे पोर्टल निवडणूक-संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना तक्रारी नोंदवणे सुलभ झाले आहे. पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी केली जाईल याची खात्री नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिक त्यांचा मोबाईल क्रमांक वापरून पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतात. हे पोर्टल एखाद्या नागरिकाने त्याच्या प्रोफाइलमध्ये नोंदवलेल्या सर्व तक्रारींची नोंद ठेवते. तक्रार नोंदवल्यानंतर, संदर्भ आयडी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई- मेल आयडीवर पाठविला जातो. तक्रार दाखल केल्यानंतर ती योग्य मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी सोपवली जाते. अधिकाऱ्याने कालबद्ध कालावधीत तक्रारीला प्रतिसाद देणे आवश्यक असते.


या सोप्या पद्धतीने तक्रार करू शकतात


            एनजीएसपी या संकेतस्थळावर गेल्यानंतर "रजिस्टर कंप्लेंट" बटणावर क्लिक करावे. त्यांनतर तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार नोंदवायची आहे ते निवडावे. तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा, जसे की तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क माहिती. त्यानंतर तुमच्या तक्रारीचा तपशील द्यावा. कोणतेही समर्थन दस्तऐवज अपलोड करा (असल्यास). "सबमिट" बटणावर क्लिक करा. एकदा तुम्ही तुमची तक्रार सबमिट केल्यानंतर, तुम्हाला ई- मेल पुष्टीकरण मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन देखील ट्रॅक करू शकता. पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी https://eci-citizenservices.eci.nic.in/ या लिंकचा वापर क

रू शकता.


Featured post

Lakshvedhi