Wednesday, 24 April 2024

मतदार जागरूकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांना मार्गदर्शन

 मतदार जागरूकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांना मार्गदर्शन

            मुंबईदि. २४ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नुकतेच भायखळा विधानसभा मतदार संघात दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांसाठी आयोजित शिबिरात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील शाळांमधील सुमारे ७०० शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले. प्रशिक्षणार्थींनी मतदानाची टक्केवारी वाढावीयासाठी सूक्ष्म नियोजन कसे करावेमतदारांना मतदानासाठी प्रेरित कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.        

             भायखळा विधानसभा मतदार संघात आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण शिबिरात ३३ क्षेत्रीय अधिकारी२५५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी३५ बचत गट कर्मचारी१५७ अंगणवाडी सेविका६७ आरोग्य सेविका१०५ कार्यालयीन कर्मचारी असे एकूण सुमारे ६५२ कर्मचारी सहभागी झाले. या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदाता दूत जसे अंगणवाडी सेविका/मदतनीसआरोग्य सेविकाआशा स्वयंसेविकास्वच्छता कर्मचारी यांना आवश्यक नेतृत्व कौशल्यमुंबई शहर जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशिक्षित व प्रेरित करण्यात आले. प्रत्येक प्रशिक्षणार्थींने समूह भावना व लक्ष्यपूर्वक दृष्टिकोनातून २०० कुटुंबांतील मतदारांना कसे जोडावे आणि त्यांना मतदानासाठी कसे प्रेरित करावे, याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे किती महत्वाचे आहेत्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व मतदारांना पटवून देण्याविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भातील संकल्पपत्र भरून घेणेबाबतही माहिती देण्यात आली.

          या दोन्ही प्रशिक्षण शिबिरात मुंबई शहर जिल्हा स्वीप समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी मार्गदर्शन केले.

          यावेळी भायखळा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधवअतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  प्रतिभा वराळेनिवडणूक अधिकारी राजेश कंकाळउपनिवडणूक अधिकारी निसार खान आदी उपस्थित होते.

***

सेवानिवृत्त यांनी IT returns का भरावे

आतून खराब असणारे आंबे 🥭ओळखण्याची सोपी ट्रिक .👍🏻

 आतून खराब असणारे आंबे 🥭ओळखण्याची सोपी ट्रिक .👍🏻

उष्माघातापासून वाचण्यासाठी एक नविन रेसिपी, एकदम सोपी

 उष्माघातापासून वाचण्यासाठी एक नविन रेसिपी, एकदम सोपी

साहित्य —

1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ, 

1 वाटी मसूर डाळ

1 वाटी उडीद डाळ

1 वाटी तूर डाळ

4 वाट्या ज्वारी

1 वाटी शाबुदाणा

1 वाटी मोहरी

2 चमचे ओवा

1 चमचा खसखस 

हे 

सर्व

एकत्र करा 

आणि 

निवडत बसा.....

पण 

घराबाहेर पडू नका,

कारण

ऊन 🌞🔥 प्रचंड आहे.

धन्यवाद 😌😌 आपला घरगुती डॉक्टर...

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल - जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

 एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

            मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सात हजार 914 नागरिकांनी आपले म्हणणे मांडले होते. त्यापैकी सहा हजार 928 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आलेअशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टलद्वारे (NGSP) नोंदविता येतात. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त तक्रारींपैकी ९४२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहेतर ३६ तक्रारींच्या निराकरणाचे काम  सुरू आहे. आठ तक्रारी निराकरणाच्या प्राथमिक प्रक्रियेत आहेत.

            नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले हे पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/  या पोर्टलवर अथवा https://tmp.eci.gov.in/electors  या लिंकवर तक्रारी स्वीकारल्या जात आहेत. 

या संदर्भातील तक्रारी करू शकता

            मतदार नोंदणीमतदान केंद्राची ठिकाणेइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम)निवडणूक खर्चनिवडणूक गैरव्यवहारयासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात. आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोर्टल उपलब्ध आहे.  हे पोर्टल निवडणूक संबंधित आणि गैर-निवडणूक संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना तक्रारी नोंदवणे सुलभ झाले आहे. पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी केली जाईल याची खात्री नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.  नागरिक त्यांचा मोबाईल क्रमांक वापरून पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतात. हे पोर्टल एखाद्या नागरिकाने त्याच्या प्रोफाइलमध्ये नोंदवलेल्या सर्व तक्रारींची नोंद ठेवते.  तक्रार नोंदवल्यानंतरसंदर्भ आयडी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई- मेल आयडीवर पाठविला जातो. तक्रार दाखल केल्यानंतर ती निवडणूक अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवली जाते. अधिकाऱ्याने कालबद्ध  कालावधीत तक्रारीला प्रतिसाद देणे आवश्यक असते.

या सोप्या पद्धतीने तक्रार करू शकतात

            एनजीएसपी (NGSP) या संकेतस्थळावर गेल्यानंतर "रजिस्टर कंप्लेंट" बटणावर क्लिक करावे. त्यांनतर तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार नोंदवायची आहे ते निवडावे. तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करावेजसे की तुमचे नावपत्ता आणि संपर्क माहिती, त्यांनतर तुमच्या तक्रारीचा तपशील द्यावा.  कोणतेही समर्थन दस्तऐवज अपलोड करावे (असल्यास). "सबमिट" बटणावर क्लिक करावे. एकदा तुम्ही तुमची तक्रार सबमिट केल्यानंतरतुम्हाला ई- मेल पुष्टीकरण मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन देखील ट्रॅक करू शकता. पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी https://eci-citizenservices.eci.nic.in/ या लिंकचा वापर करू शकताअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

०००

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली

 महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी

मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली

            मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तरमुंबई उत्तर पश्चिममुंबई उत्तर पूर्वमुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

            भारत निवडणूक आयोगबाईक्स मुंबईमुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ही सायकल रॅली काढण्यात येईल. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व)मुंबई येथून सायकल रॅलीला सुरवात होईल. त्यानंतर ही रॅली वेगवेगळ्या मार्गाने दक्षिण मुंबईएनसीपीएअंधेरी क्रीडा संकुलबोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृहमुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर या चार ठिकाणी रॅलीचा समारोप होईल.

            लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा राष्ट्रीय महोत्सव आहे. या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही सायकल रॅली काढण्यात येईल. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गुगल फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वनाथ अय्यर यांच्या मोबाईल क्रमांक 9619444027 व कमल गाडा यांच्या मोबाईल 9821025381 क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधावाअसे आवाहन संयोजकांनी केले आहे.

0000

Tuesday, 23 April 2024

एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल

 एनजीएसपी पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

            मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सात हजार 914 नागरिकांनी आपले म्हणणे मांडले होते. त्यापैकी सहा हजार 928 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आलेअशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित आणि गैर-निवडणूक-संबंधित तक्रारी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टलद्वारे (NGSP) नोंदविता येतात. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त तक्रारींपैकी ९४२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहेतर ३६ तक्रारींच्या निराकरणाचे काम  सुरू आहे. आठ तक्रारी निराकरणाच्या प्राथमिक प्रक्रियेत आहेत.

            नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले हे पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/  या पोर्टलवर अथवा https://tmp.eci.gov.in/electors  या लिंकवर तक्रारी स्वीकारल्या जात आहेत. 

या संदर्भातील तक्रारी करू शकता

            मतदार नोंदणीमतदान केंद्राची ठिकाणेइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम)निवडणूक खर्चनिवडणूक गैरव्यवहारयासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात. आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये पोर्टल उपलब्ध आहे.  हे पोर्टल निवडणूक संबंधित आणि गैर-निवडणूक संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना तक्रारी नोंदवणे सुलभ झाले आहे. पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी केली जाईल याची खात्री नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.  नागरिक त्यांचा मोबाईल क्रमांक वापरून पोर्टलवर नोंदणी करू शकतात आणि त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतात. हे पोर्टल एखाद्या नागरिकाने त्याच्या प्रोफाइलमध्ये नोंदवलेल्या सर्व तक्रारींची नोंद ठेवते.  तक्रार नोंदवल्यानंतरसंदर्भ आयडी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ई- मेल आयडीवर पाठविला जातो. तक्रार दाखल केल्यानंतर ती निवडणूक अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवली जाते. अधिकाऱ्याने कालबद्ध  कालावधीत तक्रारीला प्रतिसाद देणे आवश्यक असते.

या सोप्या पद्धतीने तक्रार करू शकतात

            एनजीएसपी (NGSP) या संकेतस्थळावर गेल्यानंतर "रजिस्टर कंप्लेंट" बटणावर क्लिक करावे. त्यांनतर तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार नोंदवायची आहे ते निवडावे. तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करावेजसे की तुमचे नावपत्ता आणि संपर्क माहिती, त्यांनतर तुमच्या तक्रारीचा तपशील द्यावा.  कोणतेही समर्थन दस्तऐवज अपलोड करावे (असल्यास). "सबमिट" बटणावर क्लिक करावे. एकदा तुम्ही तुमची तक्रार सबमिट केल्यानंतरतुम्हाला ई- मेल पुष्टीकरण मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन देखील ट्रॅक करू शकता. पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी https://eci-citizenservices.eci.nic.in/ या लिंकचा वापर करू शकताअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

०००

Featured post

Lakshvedhi