Wednesday, 24 April 2024

मतदार जागरूकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांना मार्गदर्शन

 मतदार जागरूकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांना मार्गदर्शन

 

            मुंबईदि. २४ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नुकतेच भायखळा विधानसभा मतदार संघात दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांसाठी आयोजित शिबिरात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील शाळांमधील सुमारे ७०० शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले. प्रशिक्षणार्थींनी मतदानाची टक्केवारी वाढावीयासाठी सूक्ष्म नियोजन कसे करावेमतदारांना मतदानासाठी प्रेरित कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.        

             भायखळा विधानसभा मतदार संघात आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण शिबिरात ३३ क्षेत्रीय अधिकारी२५५ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी३५ बचत गट कर्मचारी१५७ अंगणवाडी सेविका६७ आरोग्य सेविका१०५ कार्यालयीन कर्मचारी असे एकूण सुमारे ६५२ कर्मचारी सहभागी झाले. या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदाता दूत जसे अंगणवाडी सेविका/मदतनीसआरोग्य सेविकाआशा स्वयंसेविकास्वच्छता कर्मचारी यांना आवश्यक नेतृत्व कौशल्यमुंबई शहर जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशिक्षित व प्रेरित करण्यात आले. प्रत्येक प्रशिक्षणार्थींने समूह भावना व लक्ष्यपूर्वक दृष्टिकोनातून २०० कुटुंबांतील मतदारांना कसे जोडावे आणि त्यांना मतदानासाठी कसे प्रेरित करावे, याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे किती महत्वाचे आहेत्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व मतदारांना पटवून देण्याविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भातील संकल्पपत्र भरून घेणेबाबतही माहिती देण्यात आली.

          या दोन्ही प्रशिक्षण शिबिरात मुंबई शहर जिल्हा स्वीप समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी मार्गदर्शन केले.

          यावेळी भायखळा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधवअतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  प्रतिभा वराळेनिवडणूक अधिकारी राजेश कंकाळउपनिवडणूक अधिकारी निसार खान आदी उपस्थित होते.

***

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi