Saturday, 30 March 2024

अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी

 अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी

-मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम्

 

         मुंबई, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिली.

            मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत  श्री एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकर, अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

            यावेळी श्री.चोक्कलिंगम् यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 1,16,518 अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 40% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना 12  डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत्यानुसार राज्यभरातून दि28 मार्च पर्यंत 85 वयावरील जेष्ठ नागरिक यामध्ये 17 हजार 850 मतदारांचे तसेच 40% दिव्यांगत्व असलेले     5 हजार 453 दिव्यांग मतदारांचे 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील 53 मतदारांचे 28 मार्च पर्यंत 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.

            भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत  190 अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.

               राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी  (PRE CERTIFICATION) साठी  दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून  कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती श्री.चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यभरातील 48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी 1 हजार 656 Flying Squad Team (FST) व 2096 Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer)म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी श्री.धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special Police Observer) म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी श्री.एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.  राज्यामध्ये या निवडणूकीसाठी 98 हजार 114 इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

         कायदा व सुव्यवस्था यंत्रणेमार्फत दि. 28 मार्च पर्यंत 27,745 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच  190 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली 557 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती

         राज्यामध्ये दि. 1 ते 28 मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध  अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

 

अ.क्र.

जप्तीची बाब

परिमाण

रक्कम (कोटी मध्ये)

1

रोख रक्कम

-

33.12

2

दारु

23,42,360 लिटर

19.34

3

ड्रग्ज

8,68,772 ग्राम

186.00

4

मौल्यवान धातू

81,802 ग्राम

40.23

5

फ्रिबीज

4,568 (संख्या)

0.42

6

इतर

6,33,692 (संख्या)

63.17

एकुण

-

342.29

            महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  या निवडणूकीसाठी  रामटेकमध्ये  एकुण 35 उमेदवार पात्र ठरले त्यापैकी 7 जणांनी माघार घेतल्याने अंतिम उमेदवारांची संख्या 28 आहे, नागपूर मध्ये अंतिम उमेदवार 26 आहेत, भंडारा-गोंदीया मध्ये 22 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमेदवारांची संख्या 18 आहे,  गडचिरोली-चिमूर मध्ये 12 उमेदवारांपैकी 2 जणांनी माघार घेतली असून अंतिम उमदेवारांची संख्या 10 तर चंद्रपूर मध्ये अंतिम उमेदवार 15 आहेत.

पहिल्या टप्प्यात 05 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा तपशिल

            निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास मतदार नोंदणीची प्रक्रीया थांबविण्यात येते व मतदार यादी अंतिम करण्यात येते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी दि. 27.03.2024 रोजी थांबविण्यात आली आहे व या निवडणूकीसाठी मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे अंतिम करण्यात आलेला आहे.

क्र.

मतदार संघाचे नाव

पुरुष मतदार

महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

एकुण

मतदान केंद्रे

1

9- रामटेक

10,44,891

10,04,142

52

20,49,085

2,405

2

10 - नागपुर

11,13,182

11,09,876

223

22,23,281

2,105

3

11- भंडारा-गोंदिया

9,09,570

9,17,604

14

18,27,188

2,133

4

12-गडचिरोली -चिमुर

8,14,763

8,02,434

10

16,17,207

1,891

5

13-चंद्रपुर

9,45,736

8,92,122

48

18,37,906

2,118

एकूण

48,28,142

47,26,178

347

95,54,667

10,652

         मतदारांचा तुलनात्मक तपशील  या  पाच लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

क्र.

मतदार संघाचे नाव

2014 मधील मतदार संख्या

2019 मधील मतदार संख्या

2024 मधील मतदार संख्या

1

9- रामटेक

16,77,266

19,22,764

20,49,085

2

10 - नागपुर

19,00,784

21,61,096

22,23,281

3

11- भंडारा-गोंदिया

16,55,852

18,11,556

18,27,188

4

12-गडचिरोली -चिमुर

14,68,437

15,81,366

16,17,207

5

13-चंद्रपुर

17,53,690

19,10,188

18,37,906

वयोगटानुसार मतदार संख्या

क्र.

मतदार संघाचे नाव

18-19

20-29

30-39

40-49

50-79

80 +

1

9- रामटेक

31,725

3,83,276

4,90,339

4,76,971

6,20,361

46,413

2

10 - नागपुर

29,910

3,37,961

5,06,372

5,07,640

7,70,700

70,698

3

11- भंडारा-गोंदिया

31,353

3,66,570

3,99,115

3,98,749

5,93,132

38,269

4

12-गडचिरोली -चिमुर

24,026

3,28,735

3,56,921

3,48


नाथबाबा, मला भगवंताचं,* *"श्रीकृष्णाचं" दर्शन घडवा.*

 *कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.* 


नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघुन गेला. 

त्याच्या मनात एक अधीरता, 

उत्कटता दाटून आली होती. 

घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले. 

हात जोडून तो नाथांना म्हणाला की,

*नाथबाबा, मला भगवंताचं,* 

*"श्रीकृष्णाचं" दर्शन घडवा.*


एकनाथ महाराज यांना काहीच समजेना. 

हा कोण कुठला ब्राह्मण? 

आपली व त्याची ओळख पण नाही, 

त्याला मी कोठे रहातो? 

हे पण माहित नाही. 

माझे घर शोधत शोधत तो आलाय. 

तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या. 

त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.


नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले. 

पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.


नाथबाबा, 

*मला भगवंताच,*

*श्रीकृष्णाच दर्शन घडवा.*


त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. 

नाथांनी त्याला मंचकावर बसवले. 

स्वताच्या हाताने त्याचे पाय धुतले. 

तोपर्यंत गिरीजादेवींनी गुळपाणी आणले. 

ते पाहून त्या ब्राह्मणाच मन भरून आलं.

तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की, 

नाथबाबा, 

मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला. 

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणी मला म्हणाले की, 

*मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे.* 

आता माझी येथुन जायची वेळ झाली आहे. 

तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तु एकनाथ महाराज यांच्या घरी ये.


नाथबाबा, 

मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते. 

ते कोठे आहेत?


हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली. 

नाथ देहभान विसरले. 

*प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता.* 

आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. 

इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगीतले. 

तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता.

नाथ खांबाला टेकुन हळुहळु खाली बसले. 

गिरिजादेवी भानावर आल्या. 

मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.

*ते श्रीखंड्याचे साधेपण,*

*त्याची प्रत्येक हालचाल,* 

*शांतपणे आपले काम करणे,* 

*काल जातानाचं त्याच मुग्ध हसणं.*


नाथांचे डोळे भरून वाहू लागले. 

त्यांनी ध्यान लावले. 

त्यांना समजले की, 

*खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनुन गेली १२ वर्ष रहात होता.*

इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. 

दोघांनीही एकमेकांकडे पाहीले. 

गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की.....

*चोर, माखनचोर, चितचोर...!*


बारा वर्ष आमच्या जवळ राहीलास पण कळुनही दिले नाहीस. 

इतक्या वर्षात तु आमच्यावर अपार माया केलीस.

नाथ खांबाला धरून ऊठले. 

त्यांनी रांजण पाहीला, 

त्याला स्पर्श केला. 

श्रीखंड्यान बारा वर्ष खांद्यावरून वाहीलेली कावड पाहीली, तीला स्पर्श केला. 

नाथांच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागले. 

श्रीखंड्या जिथ जेवायला बसायचा, 

जिथ विश्रांती घ्यायचा. 

नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जीथे जीथे झाला होता, 

तीथे तीथे हाताने स्पर्श करू लागले.

गिरीजादेवींनी तर डोळ्यातील अश्रुंनी, 

श्रीखंड्या जिथे बसत असे तीथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. 

कंठ दाटून आला. 

त्यांनी आकाशाकडे बघीतले. 

आणी त्या म्हणाल्या की,

*हे भगवंता,*

*सगळीकडे तुच आहेस,* 

*डोळ्यात तुच, देहात तुच,* 

*अंतर्बाह्य तुच आहेस.*

आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तुच रहात होतास. 

आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. 

आम्हाला क्षमा कर देवा 

*श्रीकृष्णा.......!*

पण तु जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खुण दे.....


*काय आश्चर्य.....!*


 त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला, 

जोरात वारा सुटला.

अन कोपरयातली श्रीखंड्याची घुंघुरकाठी त्या वारयाने पडली. 

घुंघरांचा आवाज झाला. 

त्या घुंघुरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. 

त्या शेल्यातुन केशर- कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.


तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. 

तो आ वासुन हे बघत होता. 

भगवान श्रीकृष्णान त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.


 *आपल्या सगळ्यांची अवस्था*

*पण तीच असते.*

*देव कुणाच्या तरी रूपात*

*आपल्या आसपास रहात असतो,*

*आपली सेवा करत असतो.*

*आपल्याला मदत करत असतो.*

*आणी आपल्याला हे माहीत नसते.*

*कळते तेव्हाच,*

*जेव्हा ती व्यक्ती निघुन जाते.*👍👍😢😢

जय जय राम कृष्ण हरी.

👏👏👏


- इदं न मम

🙏🙏🚩🚩🙏🙏

मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आपले मत व्यक्त करा. चुक कुठे झाली ?..🫢🤔

 मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आपले मत व्यक्त करा.


चुक कुठे झाली ?..🫢🤔

   

एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये नेहमी 100% मार्क मिळवले.

     अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय.आय.टी. चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी. टेक. ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिव्हर्सिटी ऑफ़ कॅलिफोर्निया मधून तो एम. बी. ए. झाला. 

    आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही नेहमी टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.

     त्याचे पाच बेडरूमचे घर होते. चेन्नईच्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....

      पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, आपल्या पुर्ण परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली. 

     काय चूक झाली होती? शेवटी असं काय घडलं? गडबड कुठे झाली?

      हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले.... आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.

     त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने ‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला.

      सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.

     अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.

   काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नीने मुलांसह आत्महत्या केली...

       तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळवणे यासाठीच तयार झालेली होती, परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते....

      आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या. 

      अभ्यासात खूप हुशार होता, नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला

ज्यांची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाचा वा मुलीचा नेहमी पहिलाच क्रमांक यावा, त्यांच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्यांने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात. 

     मग अशी मुलं काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात. 

    बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचाऱ्यांवर, तेथून निघाला तर एम. बी. ए. आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे  टार्गेटस्...

      हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीटशी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.

      हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडेवाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.

     एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती...

एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एक कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." There is a Horrible Jungle out There.

     अशा या खतरनाक भयाण जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.


       विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देणं ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितिला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.


शेवटी आपली मुलं आपलीच आहेत ना.

जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली विद्यापीठे.*

 *जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी  प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली विद्यापीठे.*


👉🏻इ.पू.२८४ : *उजैन विद्यापीठ* - राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त

👉🏻इ.पू.२८२ : *सांची विद्यापीठ* - राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त

👉🏻इ.पू.२८० : *तक्षशिला विश्वविद्यालय*

👉🏻इ.पू.२७९ : *गंधार विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२७० : *नालंदा विश्वविद्यापिठ* - सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त

👉🏻इ.पू.२६८ : *उदन्तपूर विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६६ : *सारनाथ विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६५ : *मथुरा विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६४ : *दंतपूर विद्यापीठ* - जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.

👉🏻इ.पू.२६३ : *मथुरा विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६० : *नागरा विद्यापीठ* - अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.

👉🏻इ.पू.२५८ : *पवनी विद्यापीठ* - भंडारा महाराष्ट्र

👉🏻इ.पू.२५७ : *गिरनार विद्यापीठ* - जुनागड गुजरात

👉🏻इ.पू.२५६ : *एरागुंडी विद्यापीठ* - कुर्णाल,आंध्रप्रदेश

👉🏻इ.पू.२५५ : *गुन्टु विद्यापीठ* - कोपबल म्हैसुर

👉🏻इ.पू.२४५ : *जगदलपूर विश्वविद्यालय* - बांगलादेश

👉🏻इ.पू.२४३ :- *कोसम्बी विद्यापीठ* - अलाहाबाद पासून ३० कि.मी.

👉🏻इ.पू.२४० : *विक्रमशिला विश्वविद्यापीठ* - भागलपूर बिहार

Featured post

Lakshvedhi