Friday, 29 March 2024

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात

एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

            मुंबईदि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

            पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची

- डॉ. किरण कुलकर्णी

'दिलखुलास', 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात लोकसभा निवडणूक - 2024 निमित्त विशेष मुलाखत

            मुंबई दि. 28 : निवडणुकीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रेइलेक्ट्रॉनिक वाहिन्या, समाज माध्यमे तसेच ती माध्यमे वापरणाऱ्या सर्वांनी जबाबदारीने ती हाताळावीत आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन करावेअसे आवाहन राज्य माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाचेनियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 'माध्यमांची भूमिका आणि नागरिकांची जबाबदारीयासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. याअनुषंगानेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पेड न्यूजच्या संदर्भात तक्रारीसाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती स्थापन केली आहे. तसेच प्रत्येक राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांना आपल्या जाहिरातीचे प्रमाणीकरण (प्री सर्टिफिकेशन) करण्यासाठी जिल्हा तसेच राज्य पातळीवर जाहिरात प्रमाणीकरण समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कशा प्रकारे कामकाज करण्यात येणार आहे तसेच माध्यमांनी आणि नागरिकांनी मुक्त व निर्भिड वातावरणात राज्यातील निवडणूक पार पडण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहेयाबाबत डॉ. कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत सोमवार दि. १मंगळवार दि. २ आणि बुधवार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहेतर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

भावपूर्ण श्रद्धांजली

00000

Thursday, 28 March 2024

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार

 मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये

येत्या 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार

            मुंबई, दि. 28 : मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे.

            महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व 1 एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या कामकाजासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरील दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

            या अनुषंगाने मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी चालू राहणार असल्याने या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी केले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi