Thursday, 21 March 2024

महाराष्ट्र शासनाचे 20 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 20 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

            मुंबईदि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या वीस वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

            अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 26 मार्च  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् 26 मार्च  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २७ मार्च २०२४  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

            कर्जरोख्याचा कालावधी २० वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २७ मार्च २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २७ मार्च २०४४  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी सप्टेंबर २७  आणि मार्च २७  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची (2022) तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे


राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची (2022) तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध


 


            मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 या परीक्षेतून गट-अ व गट-ब (राजपत्रित) पदाच्या एकूण 23 संवर्गांसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) दिनांक 27 मार्च, 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तद्नंतर शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.


0000

मुंबईत गरजू आजारी लोकांसाठी समाजसेवा भावनेने सेवा उपलब्ध 🙏🙏 *

 मुंबईत गरजू आजारी लोकांसाठी समाजसेवा भावनेने सेवा उपलब्ध 🙏🙏 

       *We provide TIFFIN to  patients & relatives without any charges.* Area - South Mumbai

Hospitals:- Jaslok, Saifee, Bombay, Nair, J.J, all near to Mumbai Central and VT....

Contact details:-

U can also WhatsApp us

*Kalpesh Lodha 9967236006*

*Manoj Patwari 9820645070*

*Amrat Jain 9029373751*

At least forward to people who might be able to help by forwarding to others.


*R.K. Charitable Trust* have started Home Medical Equipment like

* *Wheelchair*

* *Suction Machine*

* *Waterbed*

* *Airbed*

* *Walker* 

Free of cost for use (with Refundable Deposit)

Contact person:-

*Sanjay Shah 9322516628*

*Chintan Pandya :- 7666311942*

*Add:-17-D, Nisarga Apt. Near IDBI bank, Mahavir Nagar, Kandivali West Mumbai 67* 

Please post this message in the known groups so that it gets circulated.


*SAI VILAYATRAI CHARITABLE POLYCLINIC*

"Kambar Darbar" Shantilal Modi Road, Opp Bhurabbhai Hall, Kandivali(W), Mumbai.

*T: 02265811644*

*0222865 9615*

*www.kambardarbar.org*


*DAY TIME CHGES*


1. *General OPD* ₹1/- only with medicines

Daily _11-30 am & 4-30 pm_


2. *X-Ray*  ₹100/-

Daily _9 am to 5-00 pm_  


3. *ECG* ₹70.00 

Daily _*9.00 am to11.00 am*_


4. *Pathology*  Highly subsidised rates. CBC ₹20/- only.

Daily _8.30 am to 12.00 noon_ 


5. *Eye Checkup* ₹20/- 

Daily _3.30 pm_

Morn _9am: Wed, Fri, Sat._ 

Cataract Surgery: FREE with best Indian lens.

Lazer (Phaco) surgery: 

₹5,300/- US imported non-foldable lens

₹10,000/- UK imported foldable aspheric lens.(Outside rateRs 40,000/-)


6. *Gynecology/ IVF/ Hysteroscopy*   

_Tue/Thur/Fri. 1 pm._  


7. *Skin Spl.*  ₹20.00

Mon _3.30 pm_


8. *Orthopedic* ₹20.00

Tue _3.30 pm_


9. *Diabetic & Cardio*  ₹20.00 

Wed _4.30 pm_


10. *Child Spl.*  ₹20.00

Fri  _5.30 pm_    


11. *Ear / Nose / Throat*  ₹20.00 

Wed / Friday _3.30 pm_


12. *Dental* Nominal Charges R C charges: ₹750/-.

Daily _9.00 am to 1.00 pm_

Daily _2.00 pm to 5.00 pm_


13. *Dialysis* Free for BPL patients  

Daily ( Phone: 28067645 )


14. *Cervical cancer* (Uterus Cancer) Test Free


15. *Anti Cancer Injection* for Girls  aged 14 yrs to 24 yrs. 


16. *Hearing Aids* for Sr. Citizens @ 50% of the actual cost. Free for deserving children by Birth.


17. *Notebooks and other staionery items* to all students on discounted rates during summer vacation.


18. *Scholarship* for Higher Education for deserving candidates for *BE MBBS CA CS BPHARM MCA & selected  MBA students.*


*Visit*

www.kambardarbar.org & submit Form with all required enclosures. 


Kindly contact on email p_zijn zasainani@rediffmail.com 


*NO NEED OF ANY  RECOMMENDATIONS.*

जय योगेश्वर 🙏🙏

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

 ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

 

            मुंबईदि. २० : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या मराठी ४८५हिंदी २०४ व इंग्रजी २२१ अशा एकूण ९१० ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभागमंत्रालयमुंबई यांच्या https://htedu.maharashtra.gov.in/maim/ या संकेतस्थळावर १८ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान ३० टक्के सूट दराने वा त्यापेक्षा अधिक सूट दर देण्यास तयार असल्यास त्या सूट दराप्रमाणे ग्रंथांचा पुरवठा करणे आवश्यक राहील. याबाबत प्रकाशकवितरकांनी देयकात स्पष्टपणे नमूद करावे.

            या संदर्भात यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचनाहरकतीआक्षेप असल्यास ३० मार्च २०२४ पर्यंत ग्रंथालय संचालकग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्यनगरभवनमुंबई- ०१ यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्त बटवड्यानेटपालाने किंवा ई- मेलवर मुदतीत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या सूचनाहरकती आणि आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच यादीत ग्रंथाचे नावलेखकप्रकाशककिमतीत काही बदल असल्यास निदर्शनास आणून द्यावेअसे अशोक मा. गाडेकरप्र. ग्रंथालय संचालकग्रंथालय संचालनालय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Wednesday, 20 March 2024

श्री गजानन महाराज संस्थानची कार्य प्रणाली

 *कळकळीची विनंती*.....................

सगळ्यांनी एकदा नक्की वाचा 🙏🏻🥀

 ही पोस्ट एका ताईंनी लिहलेली आहे ज्यांनी *शेगाव संस्थान* मध्ये भंडाऱ्याचे काम कसं चालतं यावर 'आँखो देखा हाल' म्हणून माहिती दिली आहे जी शब्दश: खरी आहे. देणग्यांचा विनियोग भक्तांच्याच उपयोगासाठी आणणारे दुसरे कोणतेही देवस्थान आजघडीला महाराष्ट्रात नाही. देवस्थान संस्थान कसं चालवावे यासाठी *शेगाव संस्थान* आदर्श आहे. 👇

अन्न हेच ब्रह्म #शेगाव

-मोहिनी मोडक

शेगावच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाने Industry Institute Meet #IIM20 चं आयोजन केलं होतं. प्रशस्त, सर्व सुविधायुक्त इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि कुशल प्राध्यापकवर्ग यामुळे या संस्थेनं चांगलं नाव कमावलं आहे. या आधीही काही ना काही निमित्ताने माझं या महाविद्यालया त जाणं झालंय परंतु यावेळेस ’मीट’च्या आयोजनाचा भाग म्हणून निमंत्रितांना #शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानची 'अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा’ बघण्याची संधी मिळाली. तिथे जायला एरवी परवानगी नसते. 

महाविद्यालय असो की दवाखाना, मंदिर परिसर असो की भक्तनिवास, संस्थानच्या प्रत्येक प्रकल्पाप्रमाणेच ही पाकशाळा उत्कृष्ट असणार हे गृहीत धरलं होतं. संस्थानच्या सर्व प्रकल्पातले सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी आणि दर्शनार्थी मिळून दररोज तब्बल पन्नास हजार लोकांसाठी नाश्ता आणि दिवसाचे तसेच रात्रीचे भोजन (महाप्रसाद) या एकाच पाकशाळेतून पुरवलं जातं. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सकाळी आणि संध्याकाळी केवळ २ तासात हे काम पूर्ण होतं.

SAPप्रणालीचा वापर करणारं माझ्या माहितीत तरी हे एकमेव धार्मिक संस्थान आहे. गुणवत्तेची आयएसओ प्रमाणपत्र कुठे टांगलेली दिसत नाहीत पण झाडा-निसर्गाच्या सान्निध्यातल्या या विविध महाकाय प्रकल्पातल्या कोणत्याही रस्त्यावर एका पानाचाही कचरा किंवा अव्यवस्था दिसत नाही. काटेकोरपणाचं उदाहरण द्यायचं तर पाकशाळेच्या आवारात तयार अन्नाचे 'कंटेनर' घेऊन जाण्या साठी गाड्या उभ्या केल्या जातात. या गाड्यांचे 'ऑईल' वगैरे गळले तर परिसर खराब होऊ नये म्हणून प्रत्येक गाडीच्या इंजिनखाली ट्रे ठेवलेले होते. भव्य पाकशाळेत  , स्वच्छ गणवेशातले कर्मचारी आपापली कामे शिस्तबद्ध पद्धतीने करत होते. 'सेंट्रल पाईपलाईन' मधून 'गॅस'ची नळी प्रत्येक पाक-यंत्राला जोडलेली होती. 

आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या भोजनाची, पन्नास हजार माणसांच्या क्षुधाशांतीची तयारी सुरु होती. एकाच वेळी शिर्‍यासाठी रवा भाजला जात होता, जिलब्या पाकात पडत होत्या, मोठ्ठ्या  फ्रीजच्या आकाराची इडलीपात्रं वाफाळत होती, तूप लावलेल्या शेकडो पोळ्या यंत्राद्वारे झपाझप तयार होत होत्या, प्रचंड आकाराच्या कुकरमध्ये भात शिजत होता, कढी, डाळभाजी मोठाल्या यांत्रिक कढयांमधून ढवळली जात होती. हे सगळं 'व्हिडीओ म्युट' करावा तसं यंत्रांच्या,माणसांच्या आवाजाविना सुरू होतं. या सगळ्य़ाला एका वेळी लागणारे मसाले, शिधा मोजून पाकीटां मधून त्या त्या पदार्थाच्या नावाच्या कप्प्यात रचलेले होते. त्यामुळे तिखट, मीठ कमी जास्त होण्याचा प्रश्नच नाही. 

(KayZen)कायझनमधील ’प्लेस फॉर एव्हरीथिंग- एव्हरिथिंग इन प्लेस’ हे तत्त्व इथे अचूक वापरलं जातं. प्रसादाचे लाडू यंत्राद्वारे कागदात 'पॅक' केले जात होते. तयार अन्न ठेवण्य़ासाठी लागणारे स्टीलचे मोठाले कंटेनर पूर्णपणे निर्जंतुक केले जात होते. संपूर्ण प्लांट मध्ये कुठेही तेलाचा डाग, खरकटे नावालाही नव्हते. कुठेही सांडलवंड नव्हती. तिथे तयार होणारे भोजन सेवणारी व्यक्ती कुणी का असेना, सर्वांना सारखं, उत्तम दर्जाचं, आरोग्यपूर्ण अन्न मिळालं पाहिजे याकडे व्यवस्थेचा कटाक्ष आहे. 

यंत्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवान उत्पादन, काही पाकक्रियांसाठी ऑटोमेशनचा वापर, तयार अन्नाची डीजिटल फूड लॅबद्वारे तपासणी असे इंडस्ट्री २.०, इंडस्ट्री ३.० आणि काही प्रमाणात ४.० तिथे पाहायला मिळालं. माणूस आणि यंत्रांचा सतत संबंध येत असल्याने कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेची आणि साधनसामग्रीचा अपव्यय होणार नाही याची किती काळजी घेतली जाते हे ही बघता आलं.

भाज्या धुणे, बटाटे सोलणे यासारख्या कामांसाठी यंत्रांचा वापर होत असला तरी भाज्यांमध्ये अळ्या/कीड असू शकते हे लक्षात घेऊन त्या चिरण्यासाठी मात्र महिला कर्मचारी होत्या. भजनं गुणगुणत त्यांची कामं सुरु होती. स्वच्छ केलेल्या भाज्या हारीने लावून ठेवलेल्या होत्या. हा विभाग मुख्य पाकशाळेपासून वेगळा होता. "अन्नं ब्रह्मेति व्यजानात्" अर्थात अन्न हेच ब्रह्म आहे या भावनेतून पाकशाळेचं संपूर्ण काम सुरु आहे. 

तळघरांमध्ये सोन्याचांदीच्या राशी रचण्याऐवजी लोकांचा (देणगीचा) पैसा पूर्णपणे लोकांसाठी वापरला जावा हा संस्थानचा उद्देश आहे. त्यातूनच संस्थान वेगवेगळे समाजोपयोगी प्रकल्प पारदर्शक पद्धतीने चालवतं. ’योजक: तत्र दुर्लभ’ परंतु इथे मात्र तसं नाही. प्रकल्पातल्या प्रत्येक कामाच्या नियोजनाला वेळ लागला तरी चालेल पण एकदा का ते कृतीत आलं की ते परिपूर्ण असावं याबाबत व्यवस्थापन आग्रही असल्याचं सोबतच्या प्राध्यापकांनी आवर्जून सांगितलं. खरं तर याहून अत्याधुनिक आणि महाकाय स्तरावरच्या फूड प्रोसेसिंगच्या चित्रफीती आपण नेहमी पाहतो तरीही हे वेगळं आहे. कोणताही व्यावसायिक हेतू नसूनही अतिशय व्यावसायिक पद्धतीने, प्रसिद्धीपासून दूर, निस्वार्थ भावनेने, एका लहानशा गावात इतक्या मोठ्या स्केलवर केलं जाणारं हे काम व्यवस्थापन कौशल्याचा वस्तुपाठ ठरावं.

श्री गजानन महाराज संस्थानचा एकूणच 'कर्मयोगी' आणि मूल्याधिष्ठित कारभार पाहिला तर माणसातल्या देवत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आपण चकित होऊन कुठे रेंगाळलो की तिथले सेवक विनम्रतेने आपल्याला 'चला पुढे माऊली' म्हणतात. खरं तर हे आवाहन नसून जादुई मंत्र आहे. 

दर्शनासाठी वेगवेगळ्या किंमतीच्या रांगा, देवस्थानातली अस्वच्छता, व्यवस्थापनातली अनागोंदी किंवा एकूणच अध्यात्माचा बाजार पाहून व्यथित झालेलं मन असे नंदादीप आजही शांतपणे व निरलसतेने अव्याहत तेवत आहेत हे पाहून खरोखर निवतं.

श्री गजानन जय गजानन

©️मोहिनी मोडक

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे

३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २१ मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २१ मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ मार्च 2024 रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २२ मार्च, २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २२ मार्च २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २२ सप्टेंबर आणि २२ मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे मुदतीचे

३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या १० वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २१ मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २१ मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ मार्च 2024 रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १० वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २२ मार्च, २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २२ मार्च २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २२ सप्टेंबर आणि २२ मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

Featured post

Lakshvedhi