Wednesday, 20 March 2024

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस


महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे

३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या १५ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २१ मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २१ मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ मार्च 2024 रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १५ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी २२ मार्च, २०२४ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २२ मार्च २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २२ सप्टेंबर आणि २२ मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध

  संरक्षित स्मारक परिसरात

विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध

संचालक डॉ. तेजस गर्गे यांची माहिती

 

            मुंबईदि. 19 : गेटवे ऑफ इंडियामुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम१९६० अन्वये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहिरात  करण्याअगोदर त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम अथवा चित्रीकरण करण्याकरिता संचालनालयाची विहीत पद्धतीने लेखी परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहेअशी माहिती पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

            एका कंपनीने विनापरवानगी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेट वे ऑफ इंडियामुंबई या राज्य संरक्षित स्मारकावर त्यांच्या कंपनीच्या शीतपेयाची प्रतिकृती झळकत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठीच्या चित्रीकरणाकरिता अथवा कार्यक्रमाकरिता संचालनालयामार्फत त्यांना कोणतीही परवानगी निर्गमित केलेली नाही. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिरातीकरिता राज्य संरक्षित स्मारकांचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे तत्काळ ही जाहिरात हटवण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. गर्गे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

            कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम  समाजमाध्यमावरील जाहिरात संकेतस्थळावरून काढण्यात यावी. विनापरवानगी अनधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयांचा जाहिरातीसाठी अनधिकृतपणे वापर करण्यात येणार नाहीअसे प्रसिद्ध करण्यात यावे आणि तसे संचालनालयास लेखी कळविण्यात यावेअसे कंपनीला दिलेल्या पत्रात कळविण्यात आल्याचे त्यांनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

            या अनुषंगाने योग्य  दखल घेतली गेली नाही तर कारवाई करण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे -

 निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात

होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

 

            मुंबई, दि. 19 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाने निर्दैशित केले आहे. आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईलकुठल्याही प्रकारे पैश्याचा तसेच बळाचा दुरुपयोग निवडणूक प्रक्रियेत होणार नाहीयासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सर्तक राहण्याच्या सूचना  मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.

            मंत्रालयात ईएसएमएस ॲप ( ESMS App/Portal ) संदर्भात आयोजित बैठकीत श्री.चोक्कलिंगम यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी तथा सहसचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            श्री.चोक्कलिंगम म्हणाले कीलोकशाहीच्या तत्वांचे पालन करत  पारदर्शकनिर्भय वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक यंत्रणेची असून या व्यापक जाणीवेतून सर्वांनी सतर्कतेने आणि प्रभावीरित्या कार्यप्रणालीचे व्यवस्थापन ठेवावे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकाराचा तसेच आपल्या यंत्रणांकडे असलेल्या अधिकारांचा योग्य  वापर करुन प्रभावीपणे  निवडणूक प्रक्रियेत करण्यात येणारा पैसाबळाचा संभाव्य दुरूपयोग रोखावा. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दोषींवर कारवाई करावीया संदर्भात नियमितपणे निवडणूक आयोगालामुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अहवाल द्यावा. यासंदर्भातील सर्व  कार्यवाही तत्परतेने करावी. या सर्व प्रक्रियेत विविध यंत्रणा संबंधित असून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने अपप्रकार रोखण्यासाठी यशस्वी नियंत्रण ठेवावे. राज्यभरात सर्व ठिकाणी पूरेशा प्रमाणात तपासणी पथकतपासणी नाके उपलब्ध राहतील याची यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. राज्यातील सर्व विमानतळरेल्वे स्थानकेबंदरे, सागरी किनारे या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावेसंशयास्पद बाबी आढळताच कसून तपासणी करावी. वन विभागाने ही चेकपोस्ट ठेवावे. तटरक्षक दलपोलिसकस्टम या तिन्ही यंत्रणांनी समुद्र मार्गे कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर आवकजावकवाहतूकहोणार नाही याची काळजी घ्यावी,अशा सूचना श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिल्या.

ईएसएमएस ॲप

            निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावीयासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसादारुअंमली पदार्थ व भेटवस्तूमौल्यवान धातूइ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे. याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याबाबत या बैठकीत निर्देश देण्यात आले.

            बैठकीस राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, कस्टमआयकर, केंद्रीय सेवा शुल्क, टपाल विभाग, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, सागरी सुरक्षा विभाग, वन विभाग यांच्यासह संबंधित राज्य तसेच केंद्रीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी

कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी

- मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 

            मुंबईदि. 19 : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावीअसे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

            मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर बोलत होते. यावेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजनअपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडसमितीचे समन्वयक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवीमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मतदान करण्याची शपथ दिली.

            जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले कीलोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. याबरोबरच नव मतदारांच्या नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. मतदान केंद्रांवर वीजपाणीमंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावेअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

            मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी नियुक्त स्वीप समितीचा कृती आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नियमितपणे बैठक होईलअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी समितीचे समन्वयक श्री. महाजनडॉ. दळवी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विविध विभाग प्रमुखांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध सूचना केल्या.


Tuesday, 19 March 2024

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करता येणार नाही


 

Vej कोल्हापुरी,

 


हिमालय, भंडारदरा आणि आर्कियॉलॉजी !

 हिमालय, भंडारदरा आणि आर्कियॉलॉजी !


शीर्षक (हेडिंग) वाचून असं वाटेल की या तीन गोष्टींचा एकमेकांशी संबंध काय? पण तो आहे, "भवताल" च्या संदर्भात आहे. कदाचित तुमच्या संदर्भात सुद्धा असू शकेल.
या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुला-मुलींसाठी आणि मोठ्यांसाठी "भवताल" ने या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. निसर्गाच्या अविष्कारांचा अनुभव घ्यायचा असेल, आपला इतिहास - संस्कृती यांचे ज्ञान मिळवायचे असेल किंवा कणखर सह्याद्रीची मजा लुटायची असेल तर या संधी दवडू नका, इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा.

१. चलो हिमालय...
(१७ - २५ एप्रिल)

हिमालयात अनेक जण गेले असतील. पण हिमालय समजून घेतलाय का, तो सुद्धा संबंधित विषयांच्या तज्ञांसोबत?
भवताल ने ही संधी १२+ मुला-मुलींसाठी उपलब्ध करून दिली आहे.
हिमालयाची निर्मिती, तिथली बर्फाच्छादित शिखरे, विविधता, निसर्गाचे वेगवेगळे पैलू उलगडले जाणार आहेत. यासोबतच भरपूर धमाल.
अधिक माहितीसाठी लिंक:

२. एक्साईटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा:
(३ - ६ मे  ;  ६ - ९ मे)

- कळसुबाई शिखर
- जगप्रसिद्ध सांदण व्हॅली
- कोकण कडा
- प्राचीन अमृतेश्वर मंदिर 
- सह्याद्रीतलं जंगल... हे सारं अनुभवणं आणि समजून घेणं यासाठी चार दिवसांचा विशेष समर कॅम्प. 

• टेन्ट मध्ये मुक्काम, • मनसोक्त करवंद खाणं, • कॅम्प फायर, • बियांचा संग्रह, • सीडबॉल बनवणं अशी धमाल! (१२+ मुला-मुलींसाठी.)
अधिक माहितीसाठी लिंक:

३. Introduction to Archaeology:
online weekend course
(२७ एप्रिल - २६ मे)

आपला इतिहास आणि प्राचीन संस्कृती यांचा उलगडा कसा होतो, हे सांगणारे विज्ञान म्हणजे पुरातत्वशास्त्र अर्थात Archaeology. त्याची सर्वसामान्यांना ओळख करून देणारा हा ऑनलाइन कोर्स.
- तज्ज्ञ पुरातत्वशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन.
- शनिवारी - रविवारी ऑनलाइन लाईव्ह सेशन्स + फील्ड व्हिजिट.
- सेशन्सची रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिली जाणार.
- मराठी / इंग्रजी भाषा.

(१३+ कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.)
अधिक माहितीसाठी लिंक:

भवताल
9545350862

--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com




Featured post

Lakshvedhi