Tuesday, 19 March 2024

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत

 दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सह संचालक डॉ. विवेक पाखमोडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            जगभरात तोंडाचे आरोग्य सुधारावे यासाठी दरवर्षी 20 मार्च रोजी ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन’ पाळाला जातो. या दिनानिमित्त नागरिकांमध्ये सजगता यावी यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध असून दातांची कीडहिरड्याचे आजारमुखदुर्गंधीतंबाखुमुळे होणारे मुखाचे आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात समावेश होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याअनुषंगाने मौखिक आजाराचे प्रकार आणि या आजारांबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहेयाबाबत 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सह संचालक डॉ. पाखमोडे यांनी माहिती दिली आहे.

            ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. पाखमोडे यांची मुलाखत बुधवार दि. 20, गुरुवार दि. 21 आणि शुक्रवार दि.22 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येणार आहेतर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 20 मार्च 2024 रोजी दुपारी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक रितली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक

 ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक

- अलियाक्सांद्र मात्सुकोऊ

 

            मुंबई, दि. १९ : बेलारूस भारतासोबत व्यापारव्यवसायपर्यटन आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे. या दृष्टीने बेलारुसमधील ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्राशी 'भगिनी राज्यसहकार्य करार करण्यास प्रयत्नशील असल्याची माहिती मुंबईतील बेलारुसचे नवनियुक्त वाणिज्यदूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ यांनी आज येथे दिली.

            बेलारुसने मुंबई येथे प्रथमच आपला स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु केला असून पहिले वाणिज्यदूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ यांनी मंगळवारी (दि. १९) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते. 

            मात्सुकोऊ यांनी राज्यपालांना सांगितले की नुकतीच बेलारुसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी ब्रेस्ट प्रांत - महाराष्ट्र प्रादेशिक सहकार्याच्या चौकटीवर चर्चा झाली.

            यावेळी वाणिज्य दूतांनी राज्यपालांना सांगितले कीबेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे भारतासोबत घनिष्ट संबंध विकसित करण्याबाबत आग्रही असून त्यांचा भारत दौऱ्यावर येण्याचा मानस आहे. त्यादरम्यान ते महाराष्ट्रालाही भेट देतील.

            बेलारुस सोविएत युनियनचा भाग असताना आपल्या देशाचे भारतासोबत संबंध अतिशय घनिष्ट होते. हे संबंध आता पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी बेलारुस उत्सुक असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

            रशियाचा शेजारी असलेला बेलारुस हा देश भारतासाठी युरोपियन युनियन आणि रशियन फेडरेशन यांच्यातील पूल म्हणून काम करू शकतो, असे सांगून बेलारुस मुंबईला वाहतूक व्यवस्थापनात मदत करु शकतोअसे ते म्हणाले.

            महाराष्ट्राशी मानवतावादी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने बेलारूस सरकार पुण्याजवळील एका अनाथाश्रमातील 30 मुलांना सहलीसाठी बेलारुसला नेणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

            बेलारुसमध्ये भारतीय संस्कृतीविशेषत: भारतीय संगीतनृत्ययोग आणि चित्रपट खूप लोकप्रिय असल्याचे सांगून आपला देश लवकरच नवी दिल्ली तसेच मुंबई येथे सांस्कृतिक दिन सोहळ्याचे आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

            बेलारुसच्या महावाणिज्य दूतांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल श्री. बैस यांनी महाराष्ट्र आणि बेलारुसमधील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्यविद्यार्थी-आदान प्रदानप्राध्यापक आदान प्रदान तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावेअशी अपेक्षा व्यक्त केली.

            नवी दिल्ली आणि राजधानी मिन्स्क दरम्यान थेट विमानसेवा सुरू झाल्याने यानंतर उभयपक्षी पर्यटनाला चालना मिळेलअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

**

राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध संचालक डॉ. तेजस गर्गे यांची माहिती

 राज्य संरक्षित स्मारक परिसरात

विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध

संचालक डॉ. तेजस गर्गे यांची माहिती

 

            मुंबईदि. 19 : गेटवे ऑफ इंडियामुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम१९६० अन्वये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहिरात  करण्याअगोदर त्याचप्रमाणे कोणताही कार्यक्रम अथवा चित्रीकरण करण्याकरिता संचालनालयाची विहीत पद्धतीने लेखी परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहेअशी माहिती पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

            एका कंपनीने विनापरवानगी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेट वे ऑफ इंडियामुंबई या राज्य संरक्षित स्मारकावर त्यांच्या कंपनीच्या शीतपेयाची प्रतिकृती झळकत असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठीच्या चित्रीकरणाकरिता अथवा कार्यक्रमाकरिता संचालनालयामार्फत त्यांना कोणतीही परवानगी निर्गमित केलेली नाही. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिरातीकरिता राज्य संरक्षित स्मारकांचा वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे तत्काळ ही जाहिरात हटवण्याच्या सूचना दिल्याचे डॉ. गर्गे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

            कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम  समाजमाध्यमावरील जाहिरात संकेतस्थळावरून काढण्यात यावी. विनापरवानगी अनधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयांचा जाहिरातीसाठी अनधिकृतपणे वापर करण्यात येणार नाहीअसे प्रसिद्ध करण्यात यावे आणि तसे संचालनालयास लेखी कळविण्यात यावेअसे कंपनीला दिलेल्या पत्रात कळविण्यात आल्याचे त्यांनी या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

            या अनुषंगाने योग्य  दखल घेतली गेली नाही तर कारवाई करण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे -

 निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात

होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

 

            मुंबई, दि. 19 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाने निर्दैशित केले आहे. आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईलकुठल्याही प्रकारे पैश्याचा तसेच बळाचा दुरुपयोग निवडणूक प्रक्रियेत होणार नाहीयासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सर्तक राहण्याच्या सूचना  मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.

            मंत्रालयात ईएसएमएस ॲप ( ESMS App/Portal ) संदर्भात आयोजित बैठकीत श्री.चोक्कलिंगम यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी तथा सहसचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            श्री.चोक्कलिंगम म्हणाले कीलोकशाहीच्या तत्वांचे पालन करत  पारदर्शकनिर्भय वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक यंत्रणेची असून या व्यापक जाणीवेतून सर्वांनी सतर्कतेने आणि प्रभावीरित्या कार्यप्रणालीचे व्यवस्थापन ठेवावे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकाराचा तसेच आपल्या यंत्रणांकडे असलेल्या अधिकारांचा योग्य  वापर करुन प्रभावीपणे  निवडणूक प्रक्रियेत करण्यात येणारा पैसाबळाचा संभाव्य दुरूपयोग रोखावा. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दोषींवर कारवाई करावीया संदर्भात नियमितपणे निवडणूक आयोगालामुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अहवाल द्यावा. यासंदर्भातील सर्व  कार्यवाही तत्परतेने करावी. या सर्व प्रक्रियेत विविध यंत्रणा संबंधित असून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने अपप्रकार रोखण्यासाठी यशस्वी नियंत्रण ठेवावे. राज्यभरात सर्व ठिकाणी पूरेशा प्रमाणात तपासणी पथकतपासणी नाके उपलब्ध राहतील याची यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. राज्यातील सर्व विमानतळरेल्वे स्थानकेबंदरे, सागरी किनारे या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावेसंशयास्पद बाबी आढळताच कसून तपासणी करावी. वन विभागाने ही चेकपोस्ट ठेवावे. तटरक्षक दलपोलिसकस्टम या तिन्ही यंत्रणांनी समुद्र मार्गे कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर आवकजावकवाहतूकहोणार नाही याची काळजी घ्यावी,अशा सूचना श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिल्या.

ईएसएमएस ॲप

            निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावीयासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसादारुअंमली पदार्थ व भेटवस्तूमौल्यवान धातूइ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे. याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याबाबत या बैठकीत निर्देश देण्यात आले.

            बैठकीस राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, कस्टमआयकर, केंद्रीय सेवा शुल्क, टपाल विभाग, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, सागरी सुरक्षा विभाग, वन विभाग यांच्यासह संबंधित राज्य तसेच केंद्रीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

कृपया शक्य झाल्यास आपल्याकडून काही मदत होत असल्यास जरूर करा....*😔

 *कृपया शक्य झाल्यास आपल्याकडून काही मदत होत असल्यास जरूर करा....*😔


इतना शेयर करो मित्रों के अनन्त काल तक कोई किडनी की वज़ह से मृत्यु का मु

 *इतना शेयर करो मित्रों के अनन्त काल तक कोई किडनी की वज़ह से मृत्यु को टल सकती हैं


ख ना देखें।*

डोळ्या मधले आसू पुसूनी ओठवरले गाणे, आणि अचानक गळून पडावी बिखरून पाने

 मला आवडलेला लेख..


वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आल तुमच्या बघा येत का वाचुन.....


अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट, 

एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.


अशाच निमुळत्या पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला. 


गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड किंवा एखादी पान टपरी. 


सागर ही वडाच्या झाडाखाली थांबला होता. 


नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खुप प्रसन्न , हिरवगार वाटतं होतं. 


तरीही आभाळ थोड दाटलेलच होत . 


बसस्टाँप वर दुसर कोणीही नव्हतं. 


तेवढयात एक ५०-५५ वर्षाचे गृहस्थ हातात लाल पिशवी , खिशाला पेन , पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग पडलेले. चप्पल थोडी फाटलेली , तुटलेली... पण तशीच शिवलेली. शेतात काम करुन टाचा उललेल्या.चेहरा माञ चिंतेने ग्रासलेला. डोळ्यात कसलतरी दुःख दाटलेलं. पिशवी खाली टेकवुन ते गृहस्थ वडाखाली बसले.


तशी सागरने त्यांच्याकडे एक नजर टाकली. आणि त्यांच्या बाजुला थोडी जागा राखुन तो ही बसला. 


मोबाईल वर गेम खेळण्यात तो गुंतला. कमीत कमी दहा ते पंधरा मिनीटे असेच गेले असतील... पाखरांची किलबिल...निरव शांतता...थंडगार वारा. 


अचानक मुसुमुसु रडण्याचा आवाज आला. 


सागरने लगेच बाजुला वळुन पाहिले. 


बाजुचे गृहस्थ , हुंदके आवरण्यासाठी तोंडावर रुमाल दाबत होते. डोळ्यातुन माञ असंख्य धारा घळाघळा वाहत होत्या. 


सागर त्यांना बघुन अस्वस्थ झाला. मोबाईल खिशात ठेवुन तो त्यांच्याकडे सरकला. 


सागर - काका, काय झालं ?


तसे ते गृहस्थ भानावर आले. डोळे पुसुन काहीनाही काहीनाही असा चेहरा करु लागले. 


सागर - काका , कुणी काही बोलल का ? भांडण झालय का ?


तरीही काका नुसती मान हलवत होते. 


सागर -कुणाची आठवण येतेय का ?

यावर गृहस्थ अजुनच रडायला लागला. 


सागर - काही मनात असेल तर बोलु शकता. बोलल्याने दुःख हलक होतं.


 गृहस्थ भरल्या डोळ्याने सागर कडे बघु लागले. 


सागर कडे बघुन त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. पण तोंडातुन शब्दांचा पाऊस कोसळावा तसे ते घडाघडा बोलु लागले. 


कधीकधी ओघाच्या भरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्वकाही सांगुन जातो. 


गृहस्थ - अवघड असतं स्वतः चे स्वप्न दुसर्यासाठी  सोडुन आयुष्यभर जगणं. 

रोज थोड थोड काळीज झिजतं. 


वडिल अचानक वारले, 

मी मोठा... 

छोटी बहिण भाऊ..आई. 

खाणारी चार तोंड. 


आठवीतच शाळा सोडली. मिळेल ते काम करायला लागलो. 

पैसे कमवायला लागलो. 


म्हटल आपण नाही शिकलो तरी बहिण भावाला शिकवु. ते शिकले काय अन मी शिकलो काय ? एकच आहे. 


दोघांनाही शिक्षक बनवलं. 

लग्न लावुन दिलं.

 पण नंतर ते फिरकलेच नाहीत. 


अवघड असतय दुसऱ्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करुन पै पै जोडणं. 


मला गायक व्हायच होतं पण होता आल नाही. 


म्हटल मुलाला गायक बनवु. 

तो गायक झाला.. 

मुंबईतच शिकला तिकडेच राहीला. 


परवा त्याला अँवाँर्ड मिळाला. 


त्यात म्हणाला, 


याच सार श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं. 


त्याच्या बोलण्यात मी कुठच नव्हतो रे...


मला पण वाटायच इस्ञीचे कपडे घालावे पाँश रहावे. पर रोज इस्ञिला ४ रुपय महिण्याचे १२०. ते मुलाला खर्चायला होतील म्हणुन कधीच इस्ञीचे कपडे घातले नाहीत. 


मला बी वाटायच गाडी घ्यावी पर पोराला काँलेज ला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणुन त्याला गाडी घेवुन दिली. 


कसली चैन..मोज केली नाही. 


सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये , ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते तेव्हा. 


आता वाटतं काय कमवल मी आयुष्यात ? 

काहीच नाही..

फक्त मन मारत जगत आलो. 


आता वय झालयं.,. 

मरणाची भिती झोप लागु देत नाही.

आणि अर्धवट स्वप्न चैन पडु देत नाहीत. 

सारखे विचार येतात. 

मग बसतो समाधी लावुन. 

तर लोक म्हणतात वेड लागलयं. 


पण मी वेडा नाही रे... 

खरचं. एक कलाकार कलेसाठी हळवा असतो इतकच. 

बाकी काही नाही. 


माझा आवाज ऐकवु का तुला ? म्हणजे कळेल मी वेडा नाही, कारण  मेलेल्या स्वप्नांच दुःख च इतक जड असत की वेडं होवुनच ते पेलण्याची ताकत येते. 


बोलताना अश्रु वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. 

घुसमट बाहेर पडत होती. 


सागरला त्यांची तळमळ बघुन गहीवरुन येत होतं. 


सागर - हो ऐकवा ना.. 


हो ऐकताच ते खुप खुश झाले. 


वर्षानुवर्षे होरपळलेल्या , घुटत आलेल्या एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती न स्विकारावी तर नवलच. 


गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले. 

आजवर त्यांच गाण कुणीही ऐकल नव्हत. 


      " तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं


       तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं 


      जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे


      मुस्कुराये तो मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे


    मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है

      तुझसे..."


त्यांचा आवाज खरच अफलातुन होता. 


त्यातले चढ उतार मधुरता.. कणखरपणा अगदी परफेक्ट. 


जणुकाही हे गृहस्थ म्हणजे रानटी हिरा.. 


जो योग्य जोहरी न मिळाल्याने प्रसिद्धी पासुन कोसो दुर कड्या कपारीत दगडांमध्ये पडुन होता. 


एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणुन. 


आवाजाची किमया इतकी होती की झाडं ..पानं..फुलं..वेली आणि सागर सर्व तृप्त होत होते. 


इतकावेळ दाटलेल ढग सुद्धा बरसायला लागले. 


जणुकाही एका सच्च्या रसीकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते. 


गृहस्थाचे दुःख , त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकुन वड सुद्धा रडत होता.  


पारंब्यातून अश्रुंच्या सरी बरसत होत्या. 


आभाळ कोसळत होतं. 


सागर आवाजात हरवला होता. 


तेवढयात बसच्या आवाजाने तो भानावर आला. 


गृहस्थ - चल पोरा माझी बस आली.. येतो. लय बरं वाटलं बोलुन.


गृहस्थ बस मध्ये बसुन निघुन गेले. 


सागर बसकडे बराच वेळ बघत होता. 


जणुकाही ती बस एका अज्ञात अवलीयाला घेवुन जात आहे , 


स्वतःच्या नकळत. 


आणि जाता जाता तो  अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतुन आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता. 


सागरच्या मनात वादळ सुरु झालं. 


काही आठवणी आठवु लागल्या. 


त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. 


हातावरच पोटं. 


मुलगा - मुलगी असा भेद नव्हता, 


पण..


आई वडिलांनी सागर आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता.


 ' आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करु शकतो. 


तुम्ही दोघांनी आपआपसात ठरवा.. 


कुणी शिकायचं ते ?


त्यावर बहिण म्हणाली , सागरला शिकवुया.


तिचेही स्वप्न होते.  


ती सागर इतकीच हुशार होती 


पण 


तिने त्याग केला स्वप्नांचा... 


भावासाठी. 


सागरच्या मनात एकच वाक्य घोळत होत , 


" वाईट याच वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते," 


सागरने फोन काढला आणि बहिणीला फोन केला. 


बहिण - हा सागर बोल बाळा.. 


सागर शांत... तिचा आवाज ऐकत


बहिण - हँलो... बोल ना आवाज येतोय का ??


सागर - ताई.... Thank you..! I respect you. 


बहिण - कशासाठी ? 


सागरने फोन कट केला. 

पाऊस उतरला होता. 


मोबाईल च्या स्क्रिन वरील पावसाचे थेंब त्याने  पुसले . 


आणि 


जुना हिरोईनचा वाँलपेपर काढुन ताईचा फोटो सेट केला . 


फोटोकडे बघुन गोड स्माईल केली. 


फोटोवर मायेने ओठ टेकवले. 


आणि 


मोबाईल  परत खिशात टाकला. 


तेवढयात काँलेज ला जाणारी बस आली आणि तो गेला. 


*आपल्या आजुबाजुला*  

*घरात अशी असंख्य माणसं असतात*

*जी नेहमी इतरांसाठी जगतात.*


*सोप्प नसतं इतरांसाठी झुरणं*


*आणि जगणं*


*सोप्प नसत समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं*


*त्यासाठी खुप मोठ मन लागतं*


*गट्स लागतात*


*अशी आगळीवेगळी माणसं जपायला हवी.*


*तुमच्या पण आयुष्यात असाच कोणीतरी त्याग केलेला असतो*


*आता आयुष्याच्या या वळणावर तरी त्यांची आठवण तरी ठेवा*


एक वेळ *कृतज्ञ* नाही राहिलात 

तरी

चालेल


पण


निदान


*कृतघ्न* तरी होऊ नकात


धन्यवाद

🙏🏻🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi