Tuesday, 19 March 2024

गिरीजा शंकर यांचे 'रंग मंच' भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल

 गिरीजा शंकर यांचे 'रंग मंचभावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. १८ : देशभरातील रंगभूमीची समृद्ध परंपरा व विविध राज्यांमधील रंगभूमी कलाकारांचे योगदान यावर आधारित गिरीजा शंकर यांचे 'रंग मंचहे पुस्तक रंगभूमीवर येणाऱ्या भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेलअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 

            राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंचया पुस्तकाचे सोमवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            रंगभूमीवर काम करणे आव्हानात्मक आहे. रंगभूमी करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी देखील देशातील लाखो लोक रंगभूमीची सेवा करतात. रंगभूमी केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक जागृतीचे माध्यम असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            शाळांमध्ये मुलांना नाटकांमध्ये भाग घेण्यास पालक व शिक्षकांनी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढेलनेतृत्वगुण विकसित होतील व ते चांगले नागरिक होतील असे राज्यपालांनी सांगितले.

            नाट्यगृहांचे भाडे परवडणारे असावे जेणेकरून नाटकांची तिकिटे कमी ठेवता येईल असे सांगून प्रादेशिक तसेच बोलीभाषेतील रंगभूमीला देखील प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

            गिरीजा शंकर हे संवेदनशील लेखक आहेत.  त्यांच्या पुस्तकाची समीक्षा होऊ शकत नाही. देशातील रंगभूमी समजून घ्यायची असेल तर गिरीजा शंकर यांचे पुस्तक वाचावे तसेच त्यांचे अनुभव ऐकावे असे  राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक वामन केंद्रे  यांनी यावेळी सांगितले.

            रंगमंच हे पुस्तक देशभरातील रंगकर्मींचा लेखाजोखा असल्याचे  अभिनेते व दिग्दर्शक ओम कटारे  यांनी सांगितले.

            लाखो लोक देशाच्या कानाकोपऱ्यात रंगभूमी करीत आहेतही एक प्रकारची अनामिक क्रांती असल्याचे गिरीजा शंकर यांनी सांगितले.

            देशातील रंगभूमी व रंगभूमी कलाकारांबाबत 'नया इंडियाया वृत्तपत्रात गिरीजा शंकर यांनी लिहिलेल्या स्तंभांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. 

            प्रकाशन सोहळ्याला कला दिग्दर्शक जयंत देशमुखअखिलेन्द्र मिश्रादुर्गा जसराज आदी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor releases 'Rang Manch' by Girija Shankar

            Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Rang Manch' authored by senior journalist and theatre activist Girija Shankar at Raj Bhavan Mumbai.

            The book is a compilation of columns on theatre and theater personalities in India written by Girija Shankar and published by 'Naya India'.

            Former Director of National School of Drama Waman Kendra, art director Jayant Deshmukh, theater personalities Om Katare, Akhilendra Mishra and Durga Jasraj were present.

0000

लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

 लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

            मुंबई, दि. 18 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. १८) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा ५० वा वार्षिक एकत्रित अहवाल राज्यपालांना सादर केला. 

            महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम१९७१ च्या कलम १२ पोटकलम (६) नुसारसन २०२२ मधील कामकाजासंबंधी हा अहवाल सादर करण्यात आला.

            लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२२ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ५५३० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला ३४१५ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२२ मध्ये ८९४५ प्रकरणे कार्यवाहीकरीता उपलब्ध झाली. 

            नोंदणी केलेली ४३६२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२२ च्या वर्षअखेरीस ४५८३ प्रकरणे प्रलंबित राहिलीअसे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

            महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५% पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गा- हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.

००००

State Lokayukt presents report to Governor

            Mumbai, 18th March : State Lokayukta Justice V. M. Kanade (retd) and Upa Lokayukta Sanjay Bhatia submitted the 50th Annual Consolidated Report about the performance of Lokayukta and Upa-Lokayukta for the year, 2022 to State Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Mon (18 Mar).

            According to the information provided by the office of Lokayukta, 5530 fresh complaints were registered by the office in the year 2022. There were 3415 cases already pending from the previous year for investigation. Out of the total 8945 cases available for disposal during the year 2022, a total of 4362 registered cases were disposed of during the year leaving behind a balance of 4583 cases at the end of the year 2022.

            It was stated that the institution had succeeded in redressing the grievances of many complainants during the last decades. According to the statement given by the office of Lokayukta, grievances in more than 75% complaints were redressed to the satisfaction of the complainants.

0000

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज

 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

        मुंबईदि. १८ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज झाला आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश

            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळउपजिल्हाधिकारी शारदा पवार आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले कीलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर२७- मुंबई उत्तर- पश्चिम२८- मुंबई उत्तर पूर्व२९- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेच्या २६ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी अणुशक्तीनगर आणि चेंबूरचा समावेश लगतच्या मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात आहे.

२६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या चार मतदारसंघांसाठी २० मे २०२४ रोजी मतदान होईल. त्यासाठी २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ६ मे २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर २० मे २०२४ रोजी मतदान होऊन ४ जून २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.

७२ लाख २८ हजार मतदार

            मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ७२ लाख २८ हजार ४०३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ३८ लाख ९४ हजार १८०महिला मतदारांची संख्या ३३ लाख ३३ हजार ४२२ एवढी आहे. तृतीय पंथी मतदारांची संख्या ८०० एवढी आहेतर परदेशी मतदारांची संख्या १६४४ एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या १४ हजार ११३ आहे. सर्व्हिस मतदारांची संख्या एक हजार ६६ एवढी आहे. ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १ लाख १ हजार ६७३ एवढी आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या सात हजार ३५३ एवढी आहे. त्यात २७ सहाय्यक मतदान केंद्रे असतील.

मतदान प्रक्रियेसाठी मनुष्यबळाचे नियोजन

            मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि एव्हीएम युनिटचे नियोजन करण्यात आले. मतदान केंद्रांवर वीजपाणीसावलीसाठी मंडप आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवारांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी त्रिस्तरीय एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक विषयक विविध परवानगीसाठी विधानसभास्तरीय कार्यक्रमासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीएकापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांतील कार्यक्रमाच्या परवानगीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोन लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रमाच्या परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेवर देखरेखीसाठी फिरत्या पथकांसह एकूण २२४ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामाध्यमांमधील जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी असतील दहा निरीक्षक

            लोकसभेच्या या निवडणुकीसाठी एकूण दहा निरीक्षक असतील. त्यात सर्वसाधारणखर्च निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था संदर्भातील देखरेखीसाठी निरीक्षक असतील. मतदारांच्या जनजागृतीसाठी स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यासाठी या व्यक्तींना मतदारांना आवाहन करण्यासाठी पत्र देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

            लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उत्तरमुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात असेलतर मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विक्रोळी येथे असेलअशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिली.

०००००

उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे

 उमेदवार आणि राजकीय पक्षांनी

निवडणूक नियमावलीचे पालन करावे

- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

            मुंबई, दि. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्दैशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे,अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.

            मंत्रालय येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत 18 व्या लोकसभा निवडणुक कार्यक्रमाबाबत बैठक घेतली. बैठकीस सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णीउपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

            यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील मतदानाचे वेळापत्रकनिवडणुकीसाठी  यंत्रणांची तयारी याविषयीची माहिती दिली. त्याचसोबत उमेदवारांसाठीची नियमावलीनिवडणूक प्रक्रियानामांकन प्रक्रियाखर्च या विषयीचे नियम आणि प्रक्रिये बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.

            राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करत उमेदवारी प्रक्रिया अचूक पार पाडावीअसे आवाहनही एस. चोक्कलिंगम यांनी केले. बैठकीस विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

Monday, 18 March 2024

MODEL CODE OF CONDUCT FOR THE GUIDANCE OF POLITICAL PARTIES AND CANDIDATES

 ""MODEL CODE OF CONDUCT FOR THE GUIDANCE OF POLITICAL PARTIES AND CANDIDATES

I. General Conduct

No party or candidate shall include in any activity which may aggravate existing differences or create mutual hatred or cause tension between different castes and communities, religious or linguistic.

Criticism of other political parties, when made, shall be confined to their policies and programme, past record and work. Parties and Candidates shall refrain from criticism of all aspects of private life, not connected with the public activities of the leaders or workers of other parties. Criticism of other parties or their workers based on unverified allegations or distortion shall be avoided.

There shall be no appeal to caste or communal feelings for securing votes. Mosques, Churches, Temples or other places of worship shall not be used as forum for election propaganda.

All parties and candidates shall avoid scrupulously all activities which are “corrupt practices” and offences under the election law, such as bribing of voters, intimidation of voters, impersonation of voters, canvassing within 100 meters of polling stations, holding public meetings during the period of 48 hours ending with the hour fixed for the close of the poll, and the transport and conveyance of voters to and from polling station.

The right of every individual for peaceful and undisturbed home-life shall be respected, however much the political parties or candidates may resent his political opinions or activities. Organizing demonstrations or picketing before the houses of individuals by way of protesting against their opinions or activities shall not be resorted to under any circumstances.

No political party or candidate shall permit its or his followers to make use of any individual’s land, building, compound wall etc., without his permission for erecting flag-staffs, suspending banners, pasting notices, writing slogans etc.

Political parties and candidates shall ensure that their supporters do not create obstructions in or break up meetings and processions organized by other parties. Workers or sympathisers of one political party shall not create disturbances at public meetings organized by another political party by putting questions orally or in writing or by distributing leaflets of their own party. Processions shall not be taken out by one party along places at which meetings are held by another party. Posters issued by one party shall not be removed by workers of another party.

II. Meetings

The party or candidate shall inform the local police authorities of the venue and time any proposed meeting Well in time so as to enable the police to make necessary arrangements for controlling traffic and maintaining peace and order.

A Party or candidate shall ascertain in advance if there is any restrictive or prohibitory order in force in the place proposed for the meeting if such orders exist, they shall be followed strictly. If any exemption is required from such orders, it shall be applied for and obtained well in time.

If permission or license is to be obtained for the use of loudspeakers or any other facility in connection with any proposed meeting, the party or candidate shall apply to the authority concerned well in advance and obtain such permission or license.

Organizers of a meeting shall invariably seek the assistance of the police on duty for dealing with persons disturbing a meeting or otherwise attempting to create disorder. Organizers themselves shall not take action against such persons.

III. Procession

A Party or candidate organizing a procession shall decide before hand the time and place of the starting of the procession, the route to be followed and the time and place at which the procession will terminate. There shall ordinary be no deviation from the programme.

The organizers shall give advance intimation to the local police authorities of the programme so as to enable the letter to make necessary arrangement.

The organizers shall ascertain if any restrictive orders are in force in the localities through which the procession has to

*शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे

 *"ताक"*

*शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.*

*ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज 90 % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.*

*ताक पिण्याचे हे 10 प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .*

*1) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.*

*2) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.*

*3) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.*

*4) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.*

*5) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.*

*6) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.*

*7) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.*

*8) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.*

*9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.*

10)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. 

*ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.*

*तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.*

*चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..*

*हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी  यासाठी शेअर करायला विसरू नका.*

 **डॉ. शिल्पा टाले ND (MD)AM* 

 *वेद योग निसर्गोपचार आरोग्य मंदिर नागपूर*

Sunday, 17 March 2024

आप सभी ग्रुप मेम्बर्स कृपया ध्यान दें !!* , आदर्श आचारसंहिता

 *आप सभी ग्रुप मेम्बर्स कृपया ध्यान दें !!*

*आज 16 मार्च, 2024 शाम 3 बजे से 4 जून 2024 तक भारत में आदर्श आचार संहिता लागू हो चुकी है*

*मेरा आप सभी भाइयों से अनुरोध है, कि आप एक जिम्मेदार  समाज के नागरिक है | किसी भी ग्रुप व सोशल मीडिया पर किसी भी राजनीतिक पार्टी या धार्मिक अथवा विवाद को जन्म देती पोस्ट या चर्चा ना करें।*

   *इस प्रकार की किसी भी चर्चा पर अपने विचार ना दें। जहां भी करे सोच-समझकर पोस्ट शेयर करे। चुनाव आयोग व प्रशासन की सोशल मीडिया पर पूरी नज़र है।*

*सोशल मीडिया का दुरूपयोग या नासमझ का प्रयोग आपके गले की फांस बन सकता है।*

    *अतः आदर्श आचार संहिता के सभी नियमों का कड़ाई से पालन करें।*

                    *🙏धन्यवाद🙏*

Featured post

Lakshvedhi