Saturday, 16 March 2024

नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी प्रयत्नशील

  

नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी प्रयत्नशील

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रु.1 हजार 129 कोटींच्या

 विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न

 

            ठाणेदि.15 (जिमाका) :- शासन नेहमीच सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करीत आले आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी समृध्द होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.  यादृष्टीने आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 129 कोटीं रुपये मूल्य असलेल्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच सिडको महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते.

            याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाईक्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडेसर्वश्री आमदार रमेश पाटीलगणेश नाईकप्रशांत ठाकूरमहेश बालदीश्रीमती मंदा म्हात्रेमाजी खासदार संजीव नाईकसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकरसहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयलसहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदेसहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीनवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण होत आहे. हे प्रकल्प लोकोपयोगी व लोकांच्या गरजेचे आहेत. मुंबईनवी मुंबई आता महामुंबई होत चालली आहे. तिसरी मुंबई आकाराला येत आहे. ती सर्वात मोठी मुंबई होणार आहे. शहराशहरांमधील संपर्क वाढत आहे. अटल सेतूमुळे मुंबई-ठाणे-नवी मुंबई-रायगड या शहरांमधील अंतर कमी होवून ही शहरे जवळ आली आहेत. अटल सेतू करताना पर्यावरणाची पूर्णत:काळजी घेण्यात आली आहे. फ्लेमिंगोची संख्या दुप्पट झाली आहेयातून आपले सरकार पर्यावरण पूरक विकास अशा प्रकारचे काम करीत आहेहे सिध्द होते.  अटल सेतूमेट्रोसिडकोच्या माध्यमातून विविध विकास कामेनवी मुंबई मध्ये नवनवीन व नाविण्यपूर्ण प्रकल्प होत आहेत. हे सर्व प्रकल्प राज्याच्या विकासाच्या गेम चेंजर प्रकल्प आहेत.

      स्वच्छतेमध्ये अमृतमध्ये राज्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्याला विविध पुरस्कार प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्लॅन सिटी म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक होत आहे. नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी ग्रोथ इंजिन उभे राहत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबई ही अश्व शक्ती आहे. सुनियोजित विकास कामे होत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ सुध्दा लवकर होणार आहे. यावरुन विकासाचा मार्ग टेक ऑफ घेणार आहे. पायाभूत सुविधाधार्मिक स्थळेभूमीपुत्रांचा विकास असे अनेक उपक्रम सुरु झाले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखीत राज्य सरकार पर्यावरण पूरक काम करीत आहे. राज्याला केंद्र शासनाचे देखील भक्कम पाठबळ मिळत आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यासाठी  भरीव तरतूद केली आहे. केंद्र शासन राज्य सरकारच्या पाठीशी आहे. ठाणेरायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांचा विकास व्हायला हवा. या जिल्ह्यांमध्ये उत्तम जागादळणवळाचे मार्गसंपर्क यंत्रणा व कुशल मनुष्यबळ यांची उपलब्धता आहे. यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सिंगल विंडो क्लियरन्सकॅपिटल सबसिडीउद्योगांना सुरक्षिततेची हमीअशा विविध घटकांमध्ये राज्य पुढे येत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ची कामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत.

      मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोचे अभिनंदन केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करायचे आहे. विमानतळाचे काम लवकरात लवकर करावे. विमानतळ नवी मुंबईच्या विकासामध्ये भर घालणारे आहे. लोकांचे म्हणणे काय,  लोकांचे हित कशामध्ये आहेयासाठी आपण काम करीत आहोत. त्यादृष्टीनेच हे शासन लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेत आहे.

       याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध नागरी सुविधा प्रकल्पांची चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पूर्णाकृती पुतळासे.10 एऐरोली शिलान्यासघणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली ऐरोली खाडीपूल बांधणे भूमीपूजननमुंमपा क्षेत्र सीसीटीव्ही यंत्रणा व कमांड सेंटरनमुनपा मुख्यालय लोकार्पण,  से.38सीवूड नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत लोकार्पणअमृत योजना 2.0 अंतर्गत सुविधा कामांचे भूमीपूजनमलउदंचन केंद्रांची पुनर्बांधणी-20 से 25 बेलापूर. से. 1 ए शिरवणेमलउदंचन केंद्रांची पुनर्बांधणी-से. 9 सानपाडासे. 3 वाशीसे. 12 वाशीसे.28 वाशीमलउदंचन केंद्रातील पम्पिंग मशिनरी बदल से. 6 बेलापूरसे.4 नेरुळसे. 30 वाशीमलउदंचन केंद्रातील पम्पिंग मशिनरी बदल से. 1 ए कोपरखैरणेसे. 2ए कोपरखैरणेयादवनगरऐरोली येथे 2 द.ल.लि. क्षमतेचा पॅकेज ट्रिटमेंट प्लान्ट उभारणेसे.12 बेलापूर येथे 7.5 द.ल.लि. क्षमतेचा टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारणेबेलापूर विभागात 24 x 7 पाणीपुरवठा योजनाबेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई आणि कोपरखैरणे विभागात से. 19 धारण तलाव पुनरुज्जीवन व सुशोभिकरणभोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे 150 द.ल.लि. क्षमतेचे फिल्टर वेड बांधणेनमुंमपा क्षेत्रातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे,, से. 30 व शाळा इमारत लोकार्पणसे. 15 घणसोली येथील शाळा इमारत लोकार्पणसे. 14कोपरखैरणे नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पणसे.3. ऐरोली येथील अग्निशमन केंद्र इमारत लोकार्पणविष्णुदास भावे नाटयगृहवाशी येथील ग्रंथालय लोकार्पणसे. 22तुर्भे येथील नियोजित विभाग कार्यालय इमारत भूमीपूजन नमंमपा परिवहन उपक्रमतुर्भे आगार प्रशासकीय इमारत लोकार्पण या विकासकामांचे ऑनलाईन भूमीपूजन व लोकार्पण संपन्न होत आहेअसे सांगितले.

00000

जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा कायापालट करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन

 जिल्हा रुग्णालयवैद्यकीय महाविद्यालय या आरोग्य मंदिरांचा

 कायापालट करण्यास प्राधान्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव येथील ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे ऑनलाईन भूमिपूजन

            मुंबईदि. १५ :राज्य शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे.  राज्यातील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये यांचा कायापालट करण्यात येणार असून या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊन आरोग्य सेवेची ही मंदिरे अधिक सुसज्ज केली जातील.असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

            सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आले.   

             मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे),राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार मंदा म्हात्रे,आमदार मनीषा कायंदेआमदार राजेश पवार,आमदार बालाजी कल्याणकर,माजी आमदार रामदास कदमसार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)आरोग्य सचिव नवीन सोनाआयुक्त धीरजकुमार,आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर तर धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रम स्थळावरून मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रविणसिंह परदेशीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,आरोग्य विभागाच्या लातूर परीमंडळाच्या उपसंचालक डॉ.अर्चना भोसलेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात,कार्यकारी अभियंता नरसिंग भांडे,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्लाजिल्हा आरोग्य अधिकारी व अनील खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या सुसज्ज ५००  खाटांच्या रुग्णालयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.ते म्हणाले सर्व सामान्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.आरोग्य विभागाला यासाठी आवश्यक निधी व यंत्र सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.  राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच स्वतंत्र सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी म्हणाले .

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआमचे शासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन असून धाराशिव येथे उभारण्यात येत असलेले ५००  खाटांचे जिल्हा रुग्णालय हे त्याचेच एक उदाहरण आहे. शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखाहून पाच लाखापर्यंत उपचाराच्या खर्चास मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा विनासायास उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गेल्या दीड वर्षात सुमारे २०० कोटीपर्यंत मदत दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेसर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून जवळपास ३०० ठिकाणी हे दवाखाने सुरू झाले आहेत.आता कॅशलेस वैद्यकीय सेवा ही सुरू करत असल्याचे ते म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेसांगली सातारा जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी सारखा उपक्रम  राबविला जात आहे. अशा उपक्रमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत. धाराशिव येथे उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयाचा औसाउमरगा,बार्शी व परंडा या भागातील जनतेस लाभ होणार असून या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल.

            आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सावंत म्हणालेराज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग नेहमीच दक्ष आहे. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्यात होत असलेल्या या जिल्हा रुग्णालयामुळे या भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रवीण परदेशी यावेळी म्हणालेपालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपूजनाची भेट मिळाली आहे.३ वर्षात या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.असे त्यांनी सांगितले.

            आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले,राज्यात १० जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालये बांधण्यात येत आहे.३६२ कोटी रुपयांचा निधी डॉ. परदेशी यांनी एशियन विकास बँकेकडून या रुग्णालयाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिला असल्याचे मनोगतातून सांगितले.

००००

वस्त्रोद्योग योजनांचा लाभ आता ई-टेक्सटाईल पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात सामंजस्य करार

 वस्त्रोद्योग योजनांचा लाभ आता ई-टेक्सटाईल पोर्टलवर

वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात सामंजस्य करार

 

            मुंबई, दि. 15 : वस्त्रोद्योग विभागाच्या  एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अनुदान/ अर्थसहाय्य वितरीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही सदर प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय (इंडस्ट्रीयल क्रेडीट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) बँकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

             ‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहउपसचिव श्रीकृष्ण पवारआयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रिय प्रमुख विकास देशमुख, बँकेचे प्रदेश प्रमुख सुमंत जोशी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            राज्य शासनाच्यावतीने वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवारयांनी तर आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे विकास देशमुख यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

            वस्त्रोद्योग विभागाच्या उद्योजकांसाठी असलेल्या विविध अनुदानित योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आयसीआयसीआय बँक ई-टेक्सटाईल, ऑफीस ऑटोमेशन नावाची प्रणाली विकसित करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तेथील परिस्थितीनुसार लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती या ऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना मिळणार आहे. या पोर्टलमार्फत शासन आणि लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठीचे खाते सुरू करण्यात येणार आहे. बँकेमार्फत निधी शासनाच्या खात्यात आणि लाभार्थ्यांसाठी असलेल्या खात्यामधून विविध योजनांचे अनुदान पात्र लाभार्थांना वितरीत करण्यात येणार आहे.

०००

देशातील पहिला एलएनजी आधारित वाहन प्रकल्प

 देशातील पहिला एलएनजी आधारित वाहन प्रकल्प

------

एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबईदि. 15 : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस)  इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.

            कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरएस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरमहाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकरवैभव वाकोडेमे. किंग्ज गॅस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आझम कुरेशी आदी उपस्थित होते.

              मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी एलएनजी रूपांतरणामुळे एसटी बसमधील बदलडिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले. 

             एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले.

            महामंडळाकडे डिझेलवर चालणारे सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो.  डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.

            राज्य शासनाच्या उद्योग विभागाने राज्यास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार (MOU)  केलेला असून त्यामध्ये परिवहनसाठी सुध्दा एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे.  डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे.  महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे संस्कृती आणि परंपरांचे जतन

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे

 संस्कृती आणि परंपरांचे जतन

- श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती

            मुंबईदि. १५ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केले आणि आपल्या येथील संस्कृतीपरंपरा जपल्या गेल्या. त्याकाळच्या इतर शासकांची प्रतिमा आक्रमक अशी होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील जनतेसाठी स्वराज्य निर्मिती केलीअसे प्रतिपादन तंजावर संस्थानचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती यांनी केले.

            राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. १५ व शनिवार १६ मार्च२०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील दीक्षांत सभागृहात 'शिवसंवादया दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमंत बाबाजीराजे भोसले बोलत होते. महाराणी गायत्रीराजे साहेब भोसलेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीसांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी श्रीमंत बाबाजीराजे भोसले म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला विश्वास दिला. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली. मावळ्यांची साथ घेत स्वराज्य निर्मिती केली. विधायक पद्धतीने त्यांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळच्या इतर  शासकांचा राज्यव्यवहार हा जनतेवर जुलूम जबरदस्ती आणि इतरांवर आक्रमणाचा असा होता. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आजही उठून दिसते आणि तब्बल साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांचे नाव घेतले जातेअसे त्यांनी नमूद केले.

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील केवळ गड किल्ले नव्हे तर तो इतिहासही जपला गेला पाहिजेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० ब्या वर्षानिमित्त महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.. स्वराज्य निर्मितीछत्रपतींचा जीवन काल हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आरमारशेतीअष्टप्रधान मंडळ स्थापन करून राज्यकारभार अशा कितीतरी गोष्टी या आजही सर्वांसमोर आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे  विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महानाट्य आयोजित केले जात आहेत. आजच्या परिषदेच्या माध्यमातून आणि त्यात सादर होणाऱ्या शोधनिबंधातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचेलअसेही त्यांनी नमूद केले.

            सध्या महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतके जागतिक वारसा स्थळे आहेत. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना नामांकन मिळाले असून ते केंद्र सरकार मार्फत युनेस्को कडे पाठवण्यात आले आहेतअशी माहितीही त्यांनी दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चवरे यांनी केले. या परिषदेच्या दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये अनेक ख्यातनाम इतिहास अभ्यासकलेखकइतिहासकार व इतिहास संशोधकांची व्याख्याने होणार आहेत.

000

दीपक चव्हाण/विसंअ

विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’

 विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार आनंददायी शनिवार

 

            मुंबईदि. १५ : विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावीचांगल्या सवयीसहकार्यवृत्तीनेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

            तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणासहानुभूतीसाहसलवचिकतावैज्ञानिक चिंतनरचनात्मक कल्पनाशक्तीनैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणावउदासिनतानैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

उपक्रमाचा उद्देश

            विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणेविद्यार्थ्यांमध्ये सामाजिकभावनिक कौशल्ये विकसित करणेशालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणेसंभाषण कौशल्य विकसित करणेआत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

            आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये प्राणायाम, योग, ध्यान-धारणा, श्वसनाची तंत्रेआपत्ती व्यवस्थापनाची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षणदैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापनस्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजनारस्ते सुरक्षासमस्या निराकरणाची तंत्रेकृतीखेळ यावर आधारित उपक्रम माईंडफुलनेस (Mindfulness) वर आधारित कृती व उपक्रमनातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य आदी कृतींचा समावेश असेल. या कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना असणार आहे.

            आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपद्धतींद्वारे आनंददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने शालेय शिक्षण आयुक्त आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक यांच्यामार्फत एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

00000

Friday, 15 March 2024

आमची मुलगी' संकेतस्थळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन


 आमची मुलगीसंकेतस्थळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबई, दि. १५ :- सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी, गर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगी' (http://amchimulgimaha.in) संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या  कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईआमदार मंदा म्हात्रेआमदार मनीषा कायंदेआमदार राजेश पवारआमदार बालाजी कल्याणकरक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेआमदार मंदा म्हात्रेआमदार मनीषा कायंदेआमदार राजेश पवारमाजी आमदर रामदास कदममित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी व सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)आरोग्य सचिव नवीन सोनाआयुक्त धीरजकुमारआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  महिलांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगीया संकेत स्थळामुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच अवैध काम करणाऱ्या प्रवृत्तीला अळा बसेल.

            'आमची मुलगीया संकेतस्थळामुळे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवणेगर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३, (पीसीपीएनडीटी आणि एमटीपी) कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होणार आहे.

            संकेतस्थळावर तक्रार नोंदविणे आणि शंकाचे निरसन करण्यासाठी  सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रार गोपनीय ठेवण्याची व तक्रारदाराची इच्छा असेल तर त्याचे नाव नोंदविण्याची व्यवस्था संकेतस्थळावर करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्राप्त तक्रारीचा निपटारा करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. संकेतस्थळावर प्राप्त तक्रारीनुसार तपासणीमध्ये यश आल्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत तक्रारदारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

००००००

Featured post

Lakshvedhi