Friday, 15 March 2024

राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे · महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान लाभ हस्तांतरण · मुंबई येथे बचत गटाच्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र

 राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·       महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान लाभ हस्तांतरण

·       मुंबई येथे बचत गटाच्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र

            मुंबई दि. 15:--बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. राज्यात 'उमेदअभियानात 60 लाख तर 'माविम'च्या माध्यमातून 15 लाख महिला सदस्य असून दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

             नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय)च्या  इन्डोअर स्टेडियम मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकररोजगारस्वयंरोजगार व कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढाखासदार राहुल शेवाळेआमदार सदा सरवणकरआमदार यामिनी जाधवबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहलअतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेशासकीय अधिकारीलोकप्रतिनिधी आणि दहा हजार पेक्षा जास्त बचत गटांच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

            याप्रसंगी दुरनियंत्रण प्रणालीद्वारे बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करून(dbt)आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रातिनिधिकरित्या 20 महिला बचत गटाच्या सदस्या व एक ट्रान्सजेंडर बचत गट सदस्यांना लाभ हस्तांतरणाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेमहिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर काम करीत असून त्या कोठेही मागे नाहीत. अंतराळ क्षेत्रापासूननौसेना पाणबुडी पर्यंत निर्भयतेने वावरत आहेत. महिलांमध्ये सहनशीलता, कर्तृत्व आणि नेतृत्व हे गुण सामावले असून देशाचे सर्वोच्च पद श्रीमती द्रौपदी मुर्मू या भूषवित आहेत याचे हे उदाहरणच आहे.

            महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात महिलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी महिला विकास धोरणावर काम केले जात आहे.  मुलींसाठी 18 व्या वर्षी एक लक्ष रुपये खात्यात जमा होणारी  "लेक लाडकी योजना"राज्य परिवहन महामंडळाचे बस प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे. वर्किंग वुमन हॉस्टेल्स तयार केले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे लाभ थेट त्यांच्या खात्यात पोहोचविण्यासाठी डीबीटी सुरू केले. उज्वला योजना लागू केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर काम करताना राज्य महिला-भगिनींसाठी अधिकाधिक योजना राबवून न्याय देण्यासाठी काम केले जात आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आश्वस्त केले.

            महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व काही उपाययोजना केल्या जात आहेतअडचणी मध्ये त्यांना तातडीने मदत मिळावीयासाठी पोलीस व महानगरपालिका यांनी यंत्रणा उभी करावी. सीसीटीव्हीरॅपिड रिस्पॉन्स टीमॲप्स व माहिती तंत्रज्ञान याचा सक्षम वापर केला जावाअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सूचित केले आहे.

 

 

बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र

            ते म्हणालेस्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रोत्साहनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव योजनेची सुरुवात होत आहे. महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये बचत गटांसाठी 250 कोटी रुपये तरतूद केली आहे. बचत गटाच्या महिलाना कौशल्य विकासासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्रांना जागा देण्यात येईल.  

            यावेळी त्यांनी मुंबईत विकासासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिलीकोस्टल रोड टप्पा दोन248 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी मदतमुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रेस्क्रिप्शन पॉलिसीद्वारे सर्व औषधे विनामूल्यमुंबई शहर स्वच्छ सुंदर व धुळी पासून मुक्त करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले मुंबई महानगरपालिका व राज्याचा कौशल्य विकास विभाग यांच्या सहयोगाने मुंबईतील बचत गट महिलांच्या सक्षमतेसाठी महिला कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात येणार आहे.

            मंत्री श्री.केसरकर म्हणालेमहिलांच्या सक्षमतेसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील जोगेश्वरी येथे बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी मॉल सुरू केलेला आहे. तसेच आता राज्य शासनाकडून बचत गटांसाठी नवी मुंबई येथे देखील मोठा मॉल उभा केला जाईल.

            याप्रसंगी  मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांचे स्वागत बचत गटांनी तयार केलेल्या "तोरणगुढीसुवासिक अगरबत्ती व जूटची बॅग" या भेटवस्तू देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केले. खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना मच्छीमार परवान्यांबाबत व त्याच्या शुल्क माफी मागणीचे निवेदन सादर केले. सुरुवातीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बाबतच्या 'नारीशक्तीचित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रम परिसरात महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शने ठेवण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात दहा हजार तर ऑनलाईन 70 हजार पेक्षा अधिक महिला बचत गट सदस्य सहभागी होत्या.

०००००

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ, आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये

 राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ,

आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये

----------

वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि. 15 : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याचप्रमाणे  मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय्य वाढविण्याची घोषणा केली होती.   

             ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभावकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून "आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या ११ हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो. आता नऊ हजार रुपयांनी ही रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असून  निकष व कार्यपध्दतीनुसार प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.  ही  मासिक अर्थसहाय्याची रक्कम "शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी" मधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतूनच देण्यात येईल. ही रक्कम डीबीटीने संबंधित पत्रकारांच्या खात्यात जमा होईल. गेल्या वर्षी मार्चमध्येच हा निधी ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे.

            राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते. या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय मिळेल.

००००


 

वृत्त क्र. 937

दिलखुलास','जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत

 दिलखुलास','जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अधिष्ठाता


प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सर ज. जी. स्कुल ऑफ आर्ट या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


            राज्यातील तसेच कलेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत असलेले सर ज.जी स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय ही अग्रगण्य कलाशिक्षण संस्था आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. त्याअनुषंगाने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे महाविद्यालयाचे दरवर्षी भरणारे वार्षिक कला प्रदर्शनाचे स्वरूप, तसेच कलेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, याबाबतची माहिती प्रा. डॉ. साबळे यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातुन दिली आहे.


            'दिलखुलास' कार्यक्रमात प्रा. डॉ. साबळे यांची मुलाखत सोमवार दि. 18, आणि मंगळवार दि.19 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी सायं 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पंकज चव्हाण यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


एक्स - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००



जयश्री कोल्हे/विसंअ

जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द

 जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द

- आयुक्त सुनील चव्हाण

            मुंबई दि. 15 जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित पदासाठी 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.

            मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट "ब" (अराजपत्रित) संवर्गातील  670 पदे सरळसेवेने भरण्यासाठी 19/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा शासन मान्य टि. सी. एस. कंपनीमार्फतराज्‍यातील 28 जिल्ह्यातील एकूण 66 केंद्रांवर 20/02/2024 व 21/02/2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.

            21/02/2024 रोजी सत्र 01 (सकाळी 9.00 ते 11.00) दरम्यान ARN Associate, ड्रिमलँडनांदगाव पेठअमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस A, B, C, D अशा स्वरुपात उत्तरेसदृष्य माहिती असल्याचे आढळून आले होते. या अनुषंगानेगृह विभागाच्या अहवालानुसारनांदगाव पेठअमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार आजपावेतो एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये टिसीएस कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ARN Associate, ड्रिमलँडनांदगाव पेठअमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील समावेश आहे.  सबबपरीक्षा घेणाऱ्या टिसीएस कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच या परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. या प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दिनांक 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व या परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावीअशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर केलेली आहे.

            या परीक्षेत झालेला गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरीएकूण परीक्षा कार्यपध्दती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही संशय निर्माण करणारा ठरला आहे. या गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्यामे. टि.सी.एस (TCS) या कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ARN Associate या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शनी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो. यामुळे ही परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी याबाबत सांगोपांग विचार होऊनजलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित या पदासाठी 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. तरी सर्व संबंधीत परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी,असेही आयुक्त श्री. चव्हाण यांनी सांगितले

विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन दुरूस्तीसाठी २११ कोटी रुपयांचा निधी

 विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन दुरूस्तीसाठी

 २११ कोटी रुपयांचा निधी    

                                        -  मंत्री संजय राठोड

 

             मुंबई, दि. १५ : विदर्भासाठी महत्वाच्या असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी ९७६ प्रकल्पांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीसाठी २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

            माजी मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमिनदारांनी लोकसहभागातूनसिंचनासाठी तयार केलेले तलाव होते. या तलावात पावसाचे पाणी साठविण्यात येत असे. या तलावांतून पावसाळ्यानंतर अनेक हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंत्री श्री. राठोड यांनी नुकतीच बैठक घेतली होती. 

            विदर्भातील सुमारे ९,२८० माजी मालगुजारी तलावांपैकी सन २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील ३४२ तलावांच्या दुरूस्तीसाठी ४४.०७ कोटीभंडारा जिल्ह्यातील ७४ तलावांच्या दुरूस्तीसाठी २२.४१ कोटीचंद्रपूर जिल्ह्यातील ४६० तलावांच्या दुरूस्तीसाठी १२०.३३ कोटीव गडचिरोली जिल्ह्यातील १०० तलावांच्या दुरूस्तीसाठी २४.२४ कोटी असे एकूण २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.

            मंत्री श्री. राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाच्या प्रस्तावांबाबत आढावा घेऊन लवकर निधी मिळण्यास मान्यता मिळावी, यासाठी पाठपुरावा केला आहे. तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची कामे दर्जेदार होण्याकरिता संबंधित अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेच्या लोगो, वेबसाईटचे अनावरण

  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेच्या

लोगो, वेबसाईटचे अनावरण

 

            मुंबई, दि. १५ : सरहद पुणे भारतीय लष्कर  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम  संस्था पुणे यांच्या सहकार्याने सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेचे आयोजन ३० जून २०२४ रोजी झोजिला वाँर मेमोरियल ते कारगिल वाँर मेमोरियल या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यासंबंधी स्पर्धेचा लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले.

            यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

            भारतीय लष्कराच्या वतीने प्रथमच झोजिला युध्द विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्याथाँन- २०२४(मॅराथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत भारतासह जगातील विविध देशातील धावपटू भाग घेणार आहेत.

            गेली सहा वर्षे सरहदच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅराथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल येथे केले आहे.  त्यासाठी भारतीय लष्कराने सरहद संस्थेला या स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी ४४ किमी मॅराथॉन,२५ किमी  मॅराथॉन,१० आणि ७.५ किमी आणि अंतराच्या स्पर्धा तसेच शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ४ किमीची स्पर्धा घेतली जाईल आणि यास्पर्धेतील विजेत्यांना  रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

            यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार,स्पर्धेचे अर्हम संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य समन्वयक डॉ. शैलेश पगारीया, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, तांत्रिक संचालक वसंत गोखले सरहदचे सुयोग गुंदेचा, रामदास खोपडे, अजित निबांळकर, संतोष बालवडकर, स्वयंम पगारीया उपस्थित होते.

            यास्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख मुख्यालय) हे आहेत.

नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण सोयी - सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाचे काम

 नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण


सोयी - सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे


 जीवन सुसह्य करण्यासाठी शासनाचे काम


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 15 : मुंबईसह राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवून जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शासन अनेक पातळ्यांवर काम करीत आहे. नागरीकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन काम करत असल्याचे, प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा नायर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अति. आयुक्त सुधाकर शिंदे, अधीक्षक डॉ. नीलम अंद्राडे आदी उपस्थित होते.


            नायर रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ही 11 मजली अगदी प्रशस्त इमारत आहे. महापालिकेची सर्व रूग्णालये आधुनिक सुविधांनी सज्ज बनविण्यात येणार आहेत. केईएम रूग्णालयात बंद पडलेल्या सहा वॉर्डांची दुरूस्ती करून हे वॉर्ड रूग्णांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. यामुळे 360 खाटांची संख्या वाढली आहे. नायर रुग्णालयाच्या इमारत बांधकामामध्ये 20 कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, ‘झीरो प्रीस्क्रीप्शन’ पॉलीसीच्या माध्यमातून विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी 3 हजार केाटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. औषधांसाठी एवढी मोठी तरतूद करणारी मुंबई ही जगातील पहिली महापालिका आहे. एका वर्षामध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी 7 हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. दीडशे वर्षात 12 हजार खाटा होत्या, शासनाने दीड वर्षात 5 हजार खाटांची संख्या वाढविली आहे. महापालिकेचे खर्चानुसार उत्पन्नही वाढले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.


            मुंबई खड्डेमुक्त करण्यात येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शहरात ' अर्बन फॉरेस्ट' तयार करण्यात येणार असून सागरी किनारा मार्गाजवळ जवळपास 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ तयार करण्यात येणार आहे. हा पार्क मुंबईचा ‘ऑक्सिजन पार्क’ ठरणार आहे. मुंबईत दळणावळणाची पायाभूत सोयी – सुविधांच्या विकासाची कामे गतीने होत आहे. मेट्रो, रस्ते, अटल सेतू, सागरी किनारा प्रकल्प यामुळे मुंबई अधिक गतिमान होत आहे. पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाची 8 लाख कोटी रूपयांची कामे सुरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. परकीय गुंतवणूकीतही राज्य देशात अव्वल आहे. 


            मुंबई स्वच्छ करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुंबईचे खरे हिरो हे सफाई कर्मचारी आहे. त्यांच्या 48 निवासी वसाहती आहेत, यामध्ये नागरी सुविधांच्या विकासाची कामे करण्यात येत आहे. सध्या 2 वसाहतींमध्ये कामे सुरू झाली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महापालिका त्यांचा खर्च उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक अधिक्षक डॉ. नीलम अंद्राडे यांनी केले. कार्यक्रमाला अधिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.


००००




 

Featured post

Lakshvedhi