Tuesday, 12 March 2024

जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

 जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

            वस्तू व सेवा कर विभागात नवीन ५२२ पदांना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            तसेच वस्तू कर व सेवा कर विभागाच्या 12 हजार 259 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील मान्यता देण्यात आली.  नवीन पदांमध्ये 9 पदे अपर राज्य कर आयुक्त30 राज्य कर सह आयुक्त36 राज्य कर उपायुक्त143 सहायक राज्य कर आयुक्त275 राज्य कर अधिकारी27 राज्य कर निरिक्षक आणि 2 स्वीय सहायक लघुलेखक गट-अ अशा पदांचा समावेश आहे.  राज्याच्या कर संकलनाचा हिस्सा देशाच्या 15 टक्के आहे.  तसेच महसुलामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. राज्याच्या एकूण महसुलात जीएसटीचा हिस्सा 68 टक्के असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज भासत होती.

-----०-----

धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड

 धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड

            धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            नवी मुंबई मधील खारघर नोड येथील सेक्टर 5 मधील भूखंड क्र.46 बी हा 4000 चौ.मी. भूखंड धनगर समाजास देण्यात येईल. सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार भाडेपट्टा अधिमुल्य आकारून जाहिरातीने भूखंडाचे वाटप करण्यात येते. मात्र याबाबतीत अपवाद करण्यात येऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास भाडेपट्टयाने थेट वाटप करण्यात येईल. या विभागाने संबंधित समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेला हा भूखंड योग्य रक्कम आकारून पोट भाडेपट्टयाने हस्तांतरित करावयाचा आहे. 

            या संदर्भात अभिनव समाज फाऊंडेशन या धनगर समाजासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने नवी मुंबई येथे भूखंड मिळविण्याबाबत विनंती केली होती.


यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू

 यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू


            यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            27 एचपी (अश्वशक्ती) पेक्षा जास्त पण 201 एचीपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट 75 पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येईल. 27 पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपया अतिरिक्त वीज सलवत लागू करण्यात येईल. ही वीज सवलत 27 एचपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना तसेच 27 एचीपी पेक्षा जास्त परंतु 201 एचपी पेक्षा कमी जोडभार असलेले जे यंत्रमाग वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करतील व ज्यांना मान्यता मिळेल अशा उद्योगांना लागू राहील. ही सवलत राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2023-28 या कालावधीपर्यंत लागू असेल.

खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

 खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना

आश्वासित प्रगती योजना

            राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी लागणाऱ्या ५३ कोटी ८६ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

            अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९९४ पासून कालबद्ध पदोन्नती देण्यात येते.  राज्य शासनाने १ ऑक्टोबर २००६ पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. याच धर्तीवर या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील २ लाभांची ही योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात येईल.

-----०-

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत 72 हजार लाभार्थ्यांना 16.20 कोटी निधी

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत

72 हजार लाभार्थ्यांना 16.20 कोटी निधी


- आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे


मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत १० हजार लाभार्थ्यांना 


२६.८६ कोटी निधी जमा


 


            मुंबई दि. ११ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत ७२ हजार पाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६.२० कोटी एवढा निधी जमा करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या १० हजार २९० लाभार्थ्यांना २९०० प्रमाणे नऊ महिन्यासाठीचा रूपये २६.८६ कोटी एवढा निधी जमा करण्यात आला असल्याची माहिती, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.


            महिला व बालविकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगोपन योजना राबविण्यात येत आहे. अनाथ, निराधार, निराश्रीत, कैद्यांची बालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, भिक्षेकऱ्यांची बालके, कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना पर्यायी कुटूंब उपलब्ध करून देणे, त्यांचे संस्थेतील वातावरणाऐवजी कौंटुंबिक वातावरणामध्ये पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत करण्यात येतो. २०२३ - २४ या वित्तीय वर्षासाठी एकूण ७३ हजार ८९ बालकांची माहिती आयुक्तालय स्तरावर प्राप्त झाली आहे. त्यानुसार या बालकांना आयुक्तालय स्तरावरून रक्कम अदा करण्यात येणार असल्यामुळे प्रायोगिक तत्वावर एका महिन्याच्या लाभापोटीची रक्कम बँकेमध्ये जमा करण्यात आली होती. मात्र, खाते क्रमांक, के.वाय.सी. नसणे, अर्धवट खाते क्रमांक अशा विविध त्रुटींमुळे बालकांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा झाली नाही. संबंधित त्रुटींची पुर्तता करून त्यानुसार ७२ हजार पाच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये १६.२० कोटी एवढा निधी जमा करण्यात आला असल्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले.


            याचबरोबर केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत सन २०२२ – २३ या वित्तीय वर्षाच्या प्रायोजकत्व, प्रतिपालकत्व आणि आफ्टर केअर सेवा या योजनेसाठी मंजूर निधीमधून कोरोना च्या संसर्गामुळे दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या १० हजार २९० लाभार्थ्यांना २९०० प्रमाणे नऊ महिन्यासाठीचा रूपये २६.८६ कोटी एवढा निधी जमा करण्यात आला आहे, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.


०००

राज्यातील ३०० व्यक्ती, ९३ संस्थाचा गौरव होणार सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांचे उद्या मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण

 राज्यातील ३०० व्यक्ती, ९३ संस्थाचा गौरव होणार

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांचे

उद्या मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण

            मुंबईदि.११ : राज्यातील ३०० व्यक्ती व ९३ संस्थाचा राज्य शासनाच्या वतीने उद्या दि. १२ मार्च रोजी विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य  करणारे समाजसेवक, व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-202020-21,2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारकर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारशाहुफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे.

            राज्यातील एकूण 393 पुरस्कारार्थ्यांची निवड या चार वर्षाचे पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 300 व्यक्ती व 93 संस्थांचा समावेश आहे. मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टसजमशेद भाभा नाटयगृहएनसीपीए मार्गनरीमन पॉइंटमुंबई येथे उद्या दिनांक 12 मार्च2024 रोजी सकाळी 11.00 वाजता  वितरण सोहळा संपन्न होत आहे.राज्यात समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षणआरोग्यअन्याय निर्मुलन जनजागरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव शासनाचे वतीने करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

00000

मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ पुस्तकांच्या दालनांना मराठी साहित्य प्रेमींनी अवश्य भेट द्यावी

 मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ

पुस्तकांच्या दालनांना मराठी साहित्य प्रेमींनी अवश्य भेट द्यावी

- मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 11 : पुस्तकांचे गाव’ या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून मालपेवाडी येथे सुरू झालेल्या पुस्तकाच्या दालनाला मराठी भाषा प्रेमींनी अवश्य भेट द्यावीअसे आवाहन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. पुस्तकांच्या गावांना परदेशी पर्यटकही भेट देतील हे लक्षात घेऊन आणि त्यांच्यापर्यंत मराठी साहित्य पोहोचावे यासाठी महत्त्वाच्या मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादांची श्राव्य पुस्तके उपलब्ध करून द्यावीतअशी सूचना त्यांनी केली.

             ‘हे ऑन वे’ या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवरील संकल्पनेनुसार राज्यात साकारलेल्या पुस्तकांचे गाव’ योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. याअंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील मालपेवाडीपोंभुर्ले या पहिल्या गावातील पुस्तक-दालनाचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते रविवारी झाले. मालपेवाडी येथे प्रातिनिधीक स्वरूपात मालपे ॲग्रो टुरिझम यांच्या कार्यालयात पुस्तक दालन तयार करण्यात आले असून पुढील काळात गावातील अन्य ठिकाणीही पुस्तकांची दालने सुरू करण्यात येणार आहेत.

            वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे साहित्याचे जाणकार आणि तज्ज्ञ वाचक यांची पुस्तक निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे पुस्तकांची निवड करण्यात येऊन विविध साहित्य प्रकारांनुसार तसेच सर्वकाळ लोकप्रिय असणारी पुस्तके या दालनांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मराठी साहित्याचे वाचक व अभ्यासक या ग्रंथदालनाचा लाभ घेऊ शकतील. पुढील काळात वेरुळनवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचे गाव उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच ही गावेही वाचक-पर्यटकांसाठी सुरू होतीलअशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांनी दिली.

            मालपेवाडी येथील दालनाच्या उद्घाटन प्रसंगी माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकरसंस्थेच्या नियामक मंडळाच्या आणि या प्रकल्पाच्या पुस्तक निवड समितीच्या सदस्य रेखा दिघेदेवगडचे तहसीलदार जनार्दन साहिलेपोंभुर्ले येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आप्पा बेलवलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

0000

Featured post

Lakshvedhi