Thursday, 7 March 2024

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार -

  

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले

चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार

-  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

 

            मुंबईदि. :- महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

          महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवयूएन वुमन्सच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सुझन फर्ग्युसनटाटा समाजिक विज्ञान संस्थेच्या लक्ष्मी लिंगममाविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे आदी उपस्थित होते.

          महिलांचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन राज्यात आतापर्यंत 3 महिला धोरणं जाहीर करण्यात आल्याचे सांगून मंत्री अदिती तटकरे म्हणाल्याया तिन्ही धोरणांपेक्षा वेगळे आणि अंमलबजावणीवर भर देणारे असे हे चौथे महिला धोरण असणार आहे.  या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिकसामाजिक उन्नतीसोबतच यामध्ये अष्टसुत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्यपोषक आहारशिक्षणकौशल्यमहिला सुरक्षामहिलाबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणेलिंग समानतापुरक रोजगारहवामान बदलनैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्यसांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश या महिला धोरणामध्ये आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागाने हे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये अंमलबजावणीवर भर असणार आहे. त्यासाठी त्रिसुत्री ठरवण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल. तर जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या धोरणाच्या माध्यमातून महिला अधिक स्वावलंबी होतील. समाजामध्ये स्त्री-पुरूष समानता येण्यासाठी महिलांचे अवलंबित्व कमी होणे गरजेचे आहे. यासाठी या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे नियोजनही या धोरणामध्ये करण्यात आले आहे.

            मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्यासमाजामध्ये स्त्री - पुरुष समानतेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. ही समानता येण्यासाठी पुरुषांनीही साथ देणे गरजेचे आहे. महिला दिन हा वर्षातून एकदा नाही तर रोज साजरा केला जावा. येत्या काळात माविमच्या माध्यमातून महिलांना आणखी चांगले अर्थसहाय्य मिळेल. त्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण होतील व राज्यासह देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होतील. अनेक महिला नवनवीन उद्योग उभारत आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

          महिला व बाल विकास विभागाचे सविच श्री. यादव म्हणालेमहिलांना आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. लोणचीपापड यामधून बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास वाव आहे. या क्षेत्रामध्ये आता महिलांनी काम करावे.

 

          यावेळी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समुद्री शैवाल उत्पादनामध्ये चांगले काम करणाऱ्या रत्नागिरीच्या वर्षा गोरिवलेहायड्रोफोनिक शेती करणाऱ्या लता जाधवदूध व दुग्धजन्य पदार्थामधून आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या गोंदियाच्या ममता ब्राह्मणकरआदिवासी भागात काम करणाऱ्या यवतमाळच्या कल्पना लिंमजी मंगामसरपंच म्हणून ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या नंदुरबारच्या कैशल्या वडवी आणि छ. संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांच्या सन्मान करण्यात आला.

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

 कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोस्टल रोडवरळीदादर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाची पाहणी

 

            मुंबईदि. 7 :- धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीदादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीतअसे निर्देशही त्यांनी मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांना दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास केला. या भेटीत त्यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासमवेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहलअतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

            मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार होत असलेल्या या कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या कोस्टल रोडवर ३२० एकर जागेत भव्य असे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून२०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे हे पार्क उभारण्यात येणार असल्याचे तसेच लवकरच हा कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होईल असे  मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

            त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वरळी परिसरातील गणपतराव कदम मार्गनेहरू सायन्स पार्क येथील सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग याठिकाणी सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला. ही सर्व कामे वेळेवर आणि दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते काँक्रिटीकरणामुळे मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील. पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत पुरवण्यासाठी या काँक्रिटीकरण कामांमध्ये शोषखड्यांचा देखील समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरण पूरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.

0000

भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने

 भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने

केंद्रीय मंत्री अमित शाह

 

            मुंबईदि. : मागील काही वर्षांत भारताचा वेगाने विकास झाला आहे. या विकासात सरकारच्या महत्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. 

            केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी आज मुंबईत आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद - एनएक्सटी 10 ला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            श्री. शाह म्हणालेकेंद्र सरकारने 2047 या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंतचा विकासाचा आराखडा तयार केला आहे. मागील 10 वर्षांच्या काळात 50 हून अधिक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे भारताची दिशा आणि स्थिती बदलल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. नोटबंदीवस्तू आणि सेवा करनॉन परफॉर्मिंग असेटसची समस्या सोडवणेजन-धन-आधार-मोबाईलच्या रूपात डिजिटल व्यवहारांची व्याप्ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाढवणेभविष्यातील भारत आणि आपली मूल्ये या दोन्हीचा समावेश असलेले नवीन शैक्षणिक धोरण असे अनेक निर्णय घेतले. सर्जिकल आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या सुरक्षेला कोणीही बाधा पोहोचवू शकत नाहीअसा संदेश भारताने जगाला करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            मुंबई शेअर बाजाराचा 22 हजारांवरून वाढत 73 हजारांवर पोहोचलेला निर्देशांक हा आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचे मोठे द्योतक आहे असे केंद्रीय मंत्री श्री.शाह यांनी नमूद केले. प्रत्यक्ष करदात्यांची संख्या 8.18 कोटी झाली असून अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या वाढून 1 कोटी 40 लाख झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ष 2027 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणे, 2030 पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर्सची निर्यात, 2025 पर्यंत अंतराळ स्थानक उभारणे, 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे, 2040 मध्ये चंद्रावर मानव पाठवणे आणि 2047 पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून विश्वगुरू बनण्याचे देशासमोरील उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

००००

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महो

 पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि

अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने

८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्री शक्तीचा

 

            मुंबईदि. ६ : सांस्कृतिक कार्य विभागपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळदादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार8 मार्च ते रविवार10 मार्च2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज  संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत  विविध चर्चासत्रमुलाखतीनृत्यगाण्याचे कार्यक्रमनाटक सादर केले जातील.

            महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य दादला नको  गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश  प्रतिष्ठानचे कलाकार सादर करतील.

            9 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशननागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान  प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचलवित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईलया कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

            10 मार्च2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावेअभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा देवी - दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

            अमर हिंद मंडळदादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

महाराष्ट्रः गोंड समुदाय' ग्रंथाचे सांस्कृतिक कार्य मंत्री

 महाराष्ट्रः गोंड समुदायग्रंथाचे सांस्कृतिक कार्य मंत्री

सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे गुरुवारी प्रकाशन

आदिवासी गोंड जमातीचा सामाजिक पैलूवर प्रकाश टाकणारा ग्रंथ

            मुंबईदि. ६ :  राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटियर) विभागाने संपादित केलेल्या 'महाराष्ट्रः गोंड समुदायया विशेष प्रकाशनाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७ मार्च) चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे सकाळी ११ वाजता होत आहे.

            भारतातील आदिवासी जमातींपैकी संख्येने सर्वांत मोठ्या जमातींपैकी एक अशी ही गोंड जमात आहे. थेट ओरिसापासून मध्यप्रदेशछत्तीसगढमहाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश पर्यंत ती पसरली असून गोंड जमातींनी व्याप्त प्रदेशाला 'गोंडवानाहे नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रातविदर्भ विभागात प्रामुख्याने गोंड वस्ती असून विदर्भातल्या गडचिरोलीचंद्रपूरयवतमाळनागपूरभंडारागोंदियाआणि अल्प प्रमाणात नांदेडतसेच अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गोंडांची वस्ती पाहावयास मिळते तर गडचिरोलीचंद्रपूर आणि यवतमाळात त्यांची दाट वस्ती आहे.

            चंद्रपूर व अन्य अनेक जिल्ह्यात या एका शुर वंशजांचे वास्तव्यराज्य कारभाराच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पहावयास मिळतात तसेच यांचे वेगळेपण देखील अनुभवायास मिळते.'महाराष्ट्र : गोंड समुदायया ग्रंथात त्यांच्या सामाजिक संरचनेच्या विविध पैलुवर प्रकाश टाकून महत्व अधोरेखित करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. मानववंशशास्त्राचा काहीसा आधार घेऊन सामाजिक स्थितीधार्मिक जीवनपरंपराचालीरीती तसेच सांस्कृतिक पैलु


बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

 बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            ठाणेदि.6 (जिमाका) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहीलबेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबध्द आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंडवागळे इस्टेटचेक नाका येथे कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईउद्योग मंत्री उदय रविंद्र सामंतकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार प्रताप सरनाईकआमदार किसन कथोरेमाजी मंत्री अर्जुन खोतकरमाजी मंत्री सदाभाऊ खोतमाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ताकौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरीकोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकरठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर,  जिल्हाधिकारी अशोक शिनगारेरत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंहमीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकरभिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्यउल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेखकौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेआज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. आज या मेळाव्यात 30 हजार तरुणांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात सरकारच्यावतीने 6 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. नमो महारोजगार मेळाव्यामुळे तरुणांमध्ये उत्साही वातावरण आहे. देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनीचे आज उद्घाटन होत आहे. या केंद्रातून दरमहा 2 हजार मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासन सर्वांसाठी काम करत आहे. दावोस मधून 3 लाख 73 हजार कोटींचे करार झाले. महाराष्ट्र अनेक विभागात पुढे आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत 700 दवाखाने सुरू केले. सर्वसामान्य माणसाच्या गरजा काय असतात, त्यांचे दुःख काय असतेयाची मला माहिती आहे. म्हणूनच माझ्या इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे.

            ते पुढे म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे.  राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत.  ठाणे येथून लवकरच मेट्रो सुरू होणार आहे. राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे केले आहेत.  यासाठी 11 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गअटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे. उद्या देखील रोजगार मेळावा सुरु आहे.

            मंत्री श्री. लोढा यांनी आपल्या प्रास्ताविकात नमो महारोजगार मेळाव्याची माहिती दिली. राज्यातील हा सर्वात मोठा महारोजगार मेळावा असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला आहे. या मेळाव्यातून तरुणांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहे. यापुढेही कौशल्य विकास विभागाकडून अशा प्रकारे बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतता हे काम निरंतर सुरु ठेवण्यात येईल.

            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 हजार 800 महिलांना शिलाई मशिन आणि घरघंटीचे वाटपरहिवाशी दाखलेहिट ॲक्शन प्लॅनचे उद्घाटनउष्ण्ता उपाययोजना कृती आराखडामहाराष्ट्र स्कोर कार्डचे प्रकाशन असे विविध उपक्रम झाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाईन लोकार्पण

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण झाले. या प्रबोधिनीच्या माध्यमातून जपानजर्मनीइस्राईल आणि फ्रान्स या चार देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच जर्मनी सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला ज्या द्वारे 5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे पण इच्छुक उमेदवारांना जर्मन भाषा येणे अनिवार्य ठरणार आहे. अशा मागण्या लक्षात घेऊन बाहेर देशातील उपलब्ध रोजगार आणि त्यासाठी आवश्यक भाषाकौशल्य युवकांना मिळावे यासाठी या प्रबोधिनी मध्ये जपानीहिब्रूजर्मन आणि फ्रेंच या 4 भाषांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच परदेशात जाण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा इच्छुकांना मिळाव्या यासाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटरची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

              बदलत्या डिजिटल युगाच्या गरजांसाठीस्वयंरोजगारासाठी या प्रबोधिनीच्या माध्यमातून आर्टिफिशीअल इंटलिजन्स सारख्या नाविन्यपूर्ण विषयाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था तसेच स्टार्टप्स साठी इनक्यूबेशन सेंटर ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

0000


रोजगार देणे पुण्याचे काम

 रोजगार देणे पुण्याचे काम

                                                           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

भारतातील पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

ठाणेदि. :- कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला कीसंपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील कोपरी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामाजी आमदार रविंद्र फाटकमाजी महापौर नरेश म्हस्केकौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरीकुलगुरु अपूर्वा पालकरबी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाडनॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाकडून निर्णय झाला होता कीराज्यातील बेरोजगार युवकांना 75 हजार शासकीय नोकऱ्या देणारमात्र प्रत्यक्षात एक लाख 60 हजार शासकीय नोकऱ्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. शासनाने शासकीय नोकर भरती बंदी उठविली. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखविले असून या विभागाकडून आतापर्यंत लाख नोकऱ्या दिल्या गेल्या असून लाख स्वयंरोजगार  उभे करण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले कीगरज म्हणून नोकरी तर करायला हवी मात्र नोकऱ्या देणारे हातही घडविले पाहिजे. बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी पुढच्या दहा वर्षात दहा लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आजच लोकार्पण केलेले देशातील पहिले स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल डेव्हलपमेंट केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेतून समाजाच्या स्वस्थतेकडे जाण्याचा मार्ग दाखविला. हाच आदर्श समोर ठेवून या शासनाने देखील डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महानगरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलेच आहे. त्याच पद्धतीने डीप क्लिन ड्राईव्हचे अभियान सुरु आहे.

विविध सामाजिक संस्थांनीसामाजिक कार्यकर्त्यांनी बेरोजगारांची यादी बनवावी व ही यादी अशा संस्थांकडे द्यावी. या बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षणानंतर त्यांना तीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वयंरोजगार सुरू केले. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील दहा हजार आठशे महिलांना आपण शिलाई मशीन व घरघंटी दिल्या. ही व्यवसायाची सुरुवात आहेअशा छोट्या छोट्या व्यवसायातून तोच व्यवसाय व्यवस्थित केल्यानंतर भविष्यात ती व्यक्ती एक मोठी व्यावसायिक बनतेअसे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहेमी स्वत:ला सीएम पेक्षा कॉमन मॅन समजतो. कार्यकर्ता समजतो. म्हणूनच मला सर्वसामान्यांचे दुःख समजते. सामान्य माणसाचे हे दु:ख समजून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे सर्वत्र तयार होत आहे. समृद्धी महामार्गअटल सेतू यासारखे प्रकल्प हे गेम चेंजर प्रकल्प आहेत. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्याचा जास्तीत जास्त विकास करण्याचे आमचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्रगड किल्ले स्वच्छ ठेवणेही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत अनेक तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याचा या शासनाचा प्रयत्न सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारे हे सरकार आहे

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राज्यगीताने झाली. सूत्रसंचलन शिबानी जोशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महत्वपूर्ण करार झाला. कौशल्य विकास आणि रोजगार या विषयात उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाडनॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुलगुरु अपूर्वा पालकर यांनी स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्रे, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांना सुविधा स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून असून या क्षेत्रात 2024 सालात 3 लाख 50  हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023 च्या तुलनेत ही वाढ 15 ते 20 टक्के जास्त असेल.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारचे प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. अभ्यासक्रमाची रचना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरज लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. येथे मॅकेनाईज्ड हाऊसकिपींग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहेअशी माहिती दिली.

या अकॅडमीची वैशिष्ट्ये

·         सुविधा व्यस्थापनातील आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी लघु आणि दीर्घ कालावधीचे शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

·         सुविधा क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर.

·         उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सोयी आणि उपकरणांनी सज्ज.

·         भारत विकास ग्रुपचे सर्वांगीण व्यस्थापनासाठी सहकार्य.

00000


 

Featured post

Lakshvedhi