Friday, 8 March 2024

पशुधनाच्या काळजीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषीमंत्री धनंजय

 पशुधनाच्या काळजीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप

फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

 

            मुंबई, दि. 6 : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या 'फुले अमृतकाळया पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी आमदार बाळासाहेब आजबेआमदार संग्राम जगतापकृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमारकृषी आयुक्त प्रवीण गेडाममहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी. पाटील तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.

            यावेळी कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीवातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढअतिवृष्टीढगफुटीवाढते तापमानउष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. संकरित गाई व म्हशींमध्ये दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दुभत्या गाईचे दूध उत्पादन ५ ते २० टक्क्यांपर्यंत घटल्याचे आढळून आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्वाची भूमिका बजावेल.

            या अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणेयोग्य वायु विजन राखणेपिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणेफॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या जातील.

ॲपचा वापर असा करावा

            या अॅपचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून Phule  Amrutkal हे अॅप डाऊनलोड करावे. (लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thiत्यानंतर नोंदणी करून मोबाईल नंबर टाकावा. ओटीपी मिळाल्यानंतर पत्ता व लोकेशन टाकून अॅप चालू करावे. हव्या असलेल्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तपमान आद्रता निर्देशांक मिळतो. त्याद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळू शकतो. हे अॅप ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच तापमान व आर्द्रतेचे सेन्सर्स वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना व्यक्तिगत सल्ला व सूचना पुरवते.


इंडिया ग्लोबल फोरमच्या परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मांडले राज्याचा विकासाचे चित्र महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-2035’ तयार

 इंडिया ग्लोबल फोरमच्या परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मांडले राज्याचा विकासाचे चित्र

महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी रोडमॅप-2035’ तयार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 6 : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधाउद्योगस्नेही वातावरण व धोरणांमुळे गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली असून या परिषदेने महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यासाठी महाराष्ट्र 2035’ हा रोड मॅप तयार केला आहे. याद्वारे महाराष्ट्र हे देशात अग्रस्थानी राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

            इंडिया ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित नेक्स्ट टेन - वार्षिक गुंतवणूक परिषदेच्या (अन्युअल इन्व्हेस्टमेंट समिट) कार्यक्रमात द महा ग्लोबल स्टोरी @75 या सत्रात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या पायाभूत सुविधात्यामुळे येणारी गुंतवणूक व उद्योग यांची माहिती दिली. एडीटोरीजचे संस्थापक विक्रम चंद्रा यांनी श्री. फडणवीस यांची मुलाखत घेतली.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसन 2035 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत. सुरक्षिततामजबूत, सामाजिक पायाभूत सुविधागुंतवणूक आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यामुळे राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे नेण्यास मदत होत आहे. डॉईश्च बँकेने जाहीर केलेल्या गुंतवणूकविषयक अहवालात नमूद केल्यानुसारसन 2029 पर्यंत देशातील मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही राज्यात होणार आहे. विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असून त्याबरोबरच राज्यात शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

             सामाजिक पायाभूत सुविधांचा विचार करता राज्यात सर्वाधिक विद्यापीठे असून नॅक नामांकन असलेल्या सर्वाधिक संस्था राज्यात आहेत. आयआयटीआयआयएम आहेतसर्वाधिक खासगी वैद्यकिय व अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आरोग्य क्षेत्रातही व्यापक बदल होत असून पुढील काही वर्षात राज्यात 50 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्रसुमारे 1 लाख बेड तयार करण्याचे आमचे नियोजन आहे. शाश्वत विकास करत असताना हरित ऊर्जापुनर्वापर अर्थव्यवस्था या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रीत करत आहोतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्यांमधील स्पर्धेचे स्वागत करताना उपमुख्यमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. राज्य शासन राबवित असलेल्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा या राज्यावर विश्वास आहे. देशातील 20 टक्के स्टार्टअप व 25 टक्के युनिकॉर्न हे राज्यात असून महाराष्ट्र हे देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असून यापुढील काळातही तो पहिल्या क्रमांकावरच राहणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून ब्लॉकचेनकृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू होत आहे. मुंबई विद्यापीठात एआय सेंटर ऑफ एक्सलन्सी सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तसेच गुगलच्या सहाय्याने नागपूरमध्येही सेंटर ऑफ एक्सलन्सी सुरू करत आहोत. पुढील काळात संपूर्ण गव्हर्नन्स मॉडेल बदलणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल ट्रान्झाशन रोडमॅप तयार केला आहे. त्या दिशेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे अभिलेख (रेकॉर्ड) जतन करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. त्याचप्रमाणे मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचाही विविध प्रकल्पांमध्ये वापर वाढविला आहे. येत्या दोन-चार वर्षात मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठी मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागापर्यंत आरोग्य व शिक्षण सेवा पोचविणे सुलभ होत आहे.

            ऊर्जा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून शेती क्षेत्राला वीज पुरविण्यासाठी 16 गिगावॅट वीज ही पुढील काळात सौरऊर्जेद्वारे पुरविण्यात येणार आहे. पुढील दहा वर्षात राज्यातील 50 टक्के वीज ही अपारंपरिक व नवनवीनीकरण ऊर्जेतून निर्माण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 

            मुंबई लवकरच पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात प्रगत शहर होईल व मुंबई ही देशातील आधुनिक शहरापैकी एक असेल. मुंबई व परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर सन 2014 पासून 30 बिलियन डॉलर गुंतवणूक केली आहे. 2027 पर्यंत मुंबई परिसरात 375 किमीचे मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. मुंबईतील कोणत्याही भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी किमान 59 मिनिटांत पोहचता येईलअशी वाहतूक सुविधा निर्माण करण्यात येत आहे. मुंबई परिसरात सागरी किनारा मार्गअटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूमेट्रोचे जाळेविरार अलिबाग कॉरिडॉरवांद्रे वरळी व वरळी -विरार सी लिंक या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वाहतूक सुविधा गतीमान होणार आहे. ट्रान्स हार्बर लिंकनवी मुंबई मेट्रो व नवी मुंबई विमानतळ या प्रकल्पामुळे हा परिसर भविष्याची मुंबई असून ती तिसरी मुंबई म्हणून ओळखली जाईल. मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातील सर्वात मोठे बंदर आहे. आता वाढवण बंदराची निर्मिती होणार आहे. या बंदरामुळे देशाचीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महामुंबई परिसराचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांचे 89 प्रस्ताव मंजूर

 जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांचे 89 प्रस्ताव मंजूर

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. 6 : राज्यातील सात जिल्हा क्रीडा संकुल व 82 तालुका क्रीडा संकुल अशा 89 क्रीडा संकुलांच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मंजूर करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            मंत्रालयात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताक्रीडा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

            मंत्री श्री. बनसोड म्हणालेसुधारित शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या अनुदान मर्यादेतील प्रस्तावित वाढीव अनुदान मर्यादेतील सुधारित अंदाजपत्रक व आराखडे यांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

            आज नवीन क्रीडा संकुल निर्मिती करीता पाच तालुका क्रीडा संकुलाचे अंदाजपत्रक व आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच राज्यातील विविध क्रीडा संकुलांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

००००

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न

 पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली

काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न

            मुंबई दि. 6 : महाराष्ट्र राज्य काजू परिषद संचालक मंडळाची बैठक पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

            यावेळी काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदममहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरेकाजू प्रक्रिया उद्योजककाजू उत्पादक शेतकरी प्रतिनिधीकृषी विद्यापीठातील काजू प्रक्रिया तज्ज्ञ आणि इतर संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

            यावेळी काजू परिषद स्थापन करण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची नोंद घेण्यात आली. काजू परिषदेचे मुख्यालयविकिरण सुविधा केंद्रवाशी येथे व उपविभागीय कार्यालय रत्नागिरीसिंधुदुर्ग व कोल्हापूर येथे सुरू करण्यात केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. काजू परिषदेचे उपविधीलोगो व लेटरहेड आकृतीबंधसेवक सेवा नियम व इ. तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. काजू परिषदेचे नावे बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली. काजू परिषदेसाठी शासनाकडून आवश्यक निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.


कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात

 कापूससोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व

मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 6 : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम गतीने राबविण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा व सन २०२४-२५ आराखड्यास मान्यतेबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त प्रवीण गेडामवित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीरकृषी विभागाचे उपसचिव संतोष कराडकृषी आयुक्त कार्यालयाचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी श्री. मुंडे म्हणाले, एकात्मिक कापूस ,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रमात सोयाबीन या पिकाचा २६ जिल्ह्यांत समावेश आहे तर २१ जिल्ह्यात कापूस पिकांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राबविण्यास गती द्यावी.या कार्यक्रमांसाठी आणखी निधीची गरज भासल्यास तो निधी ही उपलब्ध करून देण्यात येईल.

            ही योजना समूह आधारित आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापर वाढविण्यासाठी त्यांचा प्रचार व प्रसार करावा. तसेच सन २०२४-२५ च्या पीक प्रात्यक्षिकांच्या पॅकेज मध्ये सुद्धा नॅनो युरिया व नॅनो डीएपी समावेश करण्यात येणार आहे. देशामध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरण्यात महाराष्ट्र राज्य एक नंबर बनण्यासाठी विभागाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

कृषी सेवक पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

 कृषी सेवक पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

            मुंबईदि. ६ : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व) यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया आय.बी.पी.एस या संस्थेमार्फत १६ व १९ जानेवारी रोजी राबविण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असून यथाशीघ्र निकाल लावण्यासाठी आय.बी.पी.एस या संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहेअशी माहिती कृषी आयुक्तालयाचे प्रशासकीय अधिकारी अखिल शेंडे यांनी दिली आहे.

0000

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध 13 मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

 शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध

13 मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

 

            मुंबईदि. 6 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार १८ फेब्रुवारी२०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहायपेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन दिनांक १३ मार्च २०२४ पर्यंत परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

            हे ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी किंवा आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ६ ते १३ मार्च २०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे. या ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपालसमक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटीआक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. तसेच विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नावआडनाववडिलांचे नावआईचे नावलिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक उपरोक्त कालावधीत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीअसेही परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi