Monday, 4 March 2024

ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

 हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे जिल्ह्यात "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत आतापर्यंत

एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

आजच्या उपक्रमात नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना दिला प्रत्यक्ष लाभ

 

ठाणे,दि.3 (जिमाका):-  "शासन आपल्या दारी" हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणेहे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचेकष्टकऱ्यांचेशेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी "शासन आपल्या दारी" च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून "शासन आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.

            "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदानकल्याण शिळफाटाकोळेकल्याण येथे करण्यात आले होतेत्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री निरंजन डावखरेकिसन कथॊरे,  संजय केळकरकुमार आयलानीविश्वनाथ भोईरशांताराम मोरेआमदार गीता जैनआमदार मनिषा कायंदेमाजी आमदार रविंद्र फाटकएम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त संजय मुखर्जीसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोलेजिल्हाधिकारी अशोक शिनगारेसर्व महानगरपालिकांचे आयुक्तजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुतेअपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळेनिवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीहे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शेतकरीसर्वसामान्य माणूसगरजूवंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्गअटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला.

            स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे राज्य शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न आपण सोडवला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्य सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीने होत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यामुळे देशाचा सन्मान जगात वाढल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यात 6 व 7 मार्च रोजी "नमो महा रोजगार" मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावाअसे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. ते म्हणाले कीएमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. हे राज्य शासन जनतेसाठी काम करत असल्याने जनता "शासन आपल्या दारी" या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "शासन आपल्या दारी" हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पहिल्यांदाच सुरू केला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा.  या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून  वंचित  राहणार नाहीअसे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले कीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना  पोचविण्यासाठी काम सुरु आहे. "शासन आपल्या दारी "या योजनेच्या माध्यमातून शासनाचा  प्रत्येक अधिकारी प्रत्येक गरजू लाभार्थ्याच्या  घरापर्यत  जावून योजना पोहोचवित आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून  जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. "शासन आपल्या दारी" योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो. जनसामान्यांच्या हिताचा असा हा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबधीत अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

      खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की,  जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सर्वात प्रथम "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम झाला. यामध्ये 20 हजार  लोकांना याचा लाभ दिला. तळागाळातील लोकांपर्यंत योजना  पोहोचण्यासाठी "शासन आपल्या दारी" हा  कार्यक्रम घेण्यात आला आहे.

            ते म्हणाले की, मेट्रो- 12 च्या निविदाचे काम पूर्ण झाले असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरत आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत आहे. येणाऱ्या काळात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणणार आहोत. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण यामध्ये विकसित होत आहे. एम.एम.आर.डी.ए. नवीन डीपीआर तयार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसरविले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम येथे होत आहे. अंबरनाथ मध्ये दीडशे कोटी अनुदान मिळालेत्याचे आज भूमीपूजन झाले.

             कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली तसेच सभामंडपात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोबाईल टॉर्च दाखवून आणि त्याला उपस्थित नागरिकांनीही आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचे लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई मेट्रो – 12 (कल्याण ते तळोजा) प्रकल्प कामाचा ई शुभारंभ आणि कल्याण पश्चिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ई उद्धाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

ooooo

 

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर -

  







डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

           

            ठाणे दि. 3 : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाणखासदार श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत विकास कामे सुरु आहेत.  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियानवृक्षारोपण  तसेच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम  राबविले जात आहेत.

            ते म्हणाले की,   अंबरनाथ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कळवा येथील रुग्णालयामधील  कार्डिओलॉजीन्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

            महात्मा फुले जन आरोग्य अभियाना अंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती. या मर्यादेत वाढ करून आता पाच लाखापर्यंत उपचार घेता येणार आहेत. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजारडोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहशास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृहनवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU ), सुनील नगर येथील अभ्यासिका आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

000


Sunday, 3 March 2024

आयोध्या नगरीतील रामाचे मंदिर. घंटेचं चित्र दिसले की

 *आयोध्या नगरीतील रामाचे मंदिर. घंटेचं चित्र दिसले की घंटेला टच करा घंटा वाजेल. व्हिडिओ पूर्ण होत आला की तुम्हांला प्रसादाची थाळी, आरतीचे ताट निरंजन अशी चार ताटे दिसतील. प्रत्येक ताटाला स्पर्श केला की ते ताट रामाजवळ जाईल आणि शेवटी आरतीच्या थाळीला स्पर्श केला की रामा पुढे आरती ओवाळली जाईल. खूपच सुंदर व्हिडिओ*                                    🙏 *बोला प्रभू श्रीराम चंद्र की जय* 🙏🚩🚩


सलाहा नाहीं साथ चाहिए



जय हो

 जब एक बिटिया ने मोदीजी के सामने हर करम अपना करेंगे गाया फिर देश के प्रधानसेवक ने क्या किया देखिए 🇮🇳🇮🇳


जागतिक श्रवण दिवसानिमित्त 250 मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप 'पाच वर्षाखालील मुलांना विकलांगता प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार'



 जागतिक श्रवण दिवसानिमित्त 250 मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप

 

'पाच वर्षाखालील मुलांना विकलांगता प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार'

                                                                     : राज्यपाल रमेश बैस

 

 मुंबई, दि.3 - देशात जवळपास 6.3 कोटी लोकांना बहिरेपणा व कमी ऐकू येण्याची समस्या आहे. यातील 0 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या लक्षणीय आहे. पाच वर्षाखालील मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना श्रवणयंत्र तसेच इतर सुविधांचे लाभ मिळत नाहीत.  या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूअसे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  सर्वांना दृष्टी व श्रवणाची क्षमता प्राप्त झाल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य होणार नाहीअसे त्यांनी सांगितले. 

 

जागतिक श्रवण दिवसानिमित्त राज्यपाल बैस  यांच्या हस्ते रविवारी (दि. 3)  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे गरीब आणि गरजू कुटुंबातील 250 लहान मुलामुलींना मोफत  श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.  पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने तसेच सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, बहिरेपणामुळे मुलांचे अवलंबित्व वाढते.  या विकलांगतेमुळे देशाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील दिव्यांगांची माहिती देण्याची सूचना केली असून राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने दिव्यांगांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला 'विकलांग मुक्तबनविण्याच्या कार्यात अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

 

बहिरेपण असलेल्या मुलांच्या समस्यांचे लवकर निदान व उपचार होणे गरजेचे आहे असे सांगून शाळांमधून मुलांच्या श्रवणशक्तीची चाचणी झाली पाहिजे तसेच श्रवण दोष असलेल्या मुलांना गरजेनुसार कॉक्लीअर इम्प्लांट करुन दिले पाहिजे. या कार्यात कॉर्पोरेट्सने देखील सहकार्य केले पाहिजेअसे राज्यपालांनी सांगितले. 

 

सांकेतिक भाषेतील शिक्षक निर्माण करावे: अनुराधा पौडवाल

 

लहान मुलांना 'दिव्यांग प्रमाणपत्रमिळत नाही. त्यामुळे त्यांना श्रवणयंत्र आदी साहित्य मिळत नाही असे सांगून लहान मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्याबाबत राज्यपालांनी मदत करावी असे आवाहन अनुराधा पौडवाल यांनी यावेळी केले. महाविद्यालयांमध्ये 'सांकेतिक भाषाशिकवली जावी तसेच सांकेतिक भाषा शिकविणारे प्रशिक्षित शिक्षक देखील निर्माण केले जावेअसे त्यांनी सांगितले. 

  

सूर्योदय फाउंडेशन या संस्थेने आतापर्यंत 2000 मुलांना श्रवणयंत्र भेट दिले असून वर्षाअखेर आणखी 1500 मुलांना श्रवणयंत्र दिले जाणार असल्याचे कोषाध्यक्ष कविता पौडवाल यांनी सांगितले. 

 

महाट्रान्सको या संस्थेने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून 250 लहान मुलांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात केले. कार्यक्रमाला महाट्रान्सकोचे संचालक विश्वास पाठक, टाइम्स समूहाचे विनायक प्रभू व WS ऑडिओलॉजी कंपनीचे मुख्याधिकारी अविनाश पवार उपस्थित होते.     

 

 

 

Maha Governor distributes Hearing Aid to children on World Hearing Day

 

Maharashtra Governor Ramesh Bais distributed hearing aid with ear mould to children with hearing impairments coming from poor and needy families on the occasion of the World Hearing Day in Mumbai on Sun (3 Mar).

 

The Distribution of Hearing Aid with Ear Mould was organised at the instance of playback singer Anuradha Paudwal by the Suryodaya Foundation. The hearing aids were given to 250 children as part of the corporate social initiative of MAHATRANSCO.

 

Speaking on the occasion the Governor said he will use his good offices to help children to get 'Divyang Certificates' early so that they will receive free hearing aids from donor organisations. The Governor applauded the efforts of Anuradha Paudwal for arranging for hearing aid to the children.

 

Treasurer of the Foundation Kavita Paudwal, MAHATRANSCO Director Vishwas Pathak, Times Group's Vinayak Prabhu and WS Audiology Company CEO Avinash Pawar were present.

                              000

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान शासकीय गटात जिल्हा परिषद शाळा साखरा तर खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान

शासकीय गटात जिल्हा परिषद शाळा साखरा तर

खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम

                                             शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

 

            मुंबईदि. 3 :-  राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड)तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा घालेवाडी (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली.) यांनी मिळविला तर  खाजगी शाळा गटात शारदाबाई पवार विद्यानिकेतनशारदानगर (ता. बारामती जि. पुणे)  द्वितीय आणि भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शालेय शिक्षण मंत्री  दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाया उपक्रमांत  1 लाख  3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये कोटी लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता. 

अभियानात बक्षिसांची रक्कम 66 कोटीवर

            राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस 51 लाखद्वितीय क्रमांक 21 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस 11 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  या  अभियानात राज्यस्तरावर-1, बृहन्मुंबई मनपा-1, अ व ब वर्ग मनपा-1, विभागस्तरीय-8, जिल्हास्तरीय-36, तालुकास्तरीय-358 अशी प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका व ’ व ’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाखदुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक लाख रूपयांचे असेल. विभागीय स्तरावर पहिले 21 लाखदुसरे 11 लाखतिसरे लाख रूपयांचेजिल्हास्तरावर पहिले 11 लाखदुसरे लाखतिसरे लाख रुपये तर तालुकास्तरावर पहिले लाखदुसरे लाखतिसरे लाख रुपयेअशी 66 कोटी 10 लाखाची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम नियमितपणे राबविणार

            विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येईलअसेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. ते म्हणालेशिक्षकपालकविद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेऊन 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाहा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला. या उपक्रमातून शाळांच्या बाह्य घटकांसोबत व आंतर घटकांवर देखील प्रभावी काम करण्यात आले. या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यातून या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते शाळा व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रेरणा मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून प्रोत्साहित केले हेही या उपक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये 18 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग : गिनीज बुक ने घेतली दखल

            वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये सहभाग घेतला असून शिक्षण विषयक हस्तलिखित स्पर्धेत 13 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेत स्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुक मार्फत घेण्यात आली असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियान पेपर लेस पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आल्याचे सांगून श्री. केसरकर यांनी सांगितले,  वीज बचतआर्थिक साक्षरताडिजिटल उपक्ररणाचा वापरलोकशाही संसदीय मूल्यांचा वापरवैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आले.  

000000

Featured post

Lakshvedhi