Thursday, 29 February 2024

शाळांमधील परसबागांसंबंधी मार्गदर्शनासाठी विठ्ठल कामत आणि विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या

 शाळांमधील परसबागांसंबंधी मार्गदर्शनासाठी

विठ्ठल कामत आणि विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या

            मुंबईदि. 28 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मितीपरसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येत आहेत. मुंबई (कोकण विभाग)पुणेनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी विठ्ठल कामत यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती आणि नागपूर विभागासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या कार्य करतील.

            कोकण आणि पुणे विभागीय समितीमध्ये शिशिर जोशी हे सदस्य असतील. कोकण विभागीय समितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य सचिव असतील. पुणे विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद पुणेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य तर पुणे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

            अमरावती विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद अमरावतीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि नागपूर विभागासाठी जिल्हा परिषद नागपूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य सचिव राहतील. नाशिक विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य सचिव असतील. विभागीय समितीमध्ये तीन सदस्य निवडीचे अधिकार संबंधित विभागीय समितीच्या अध्यक्षांना असणार आहेत.

            ही समिती नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करणेनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणेस्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करणेउत्पादित भाजीपाला व त्याचे पोषणमूल्य याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपाययोजनाभाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये समावेश करणेशिल्लक राहणाऱ्या आहाराबाबत उपाययोजना आदींबाबत मार्गदर्शन करणार आहे.

            विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावीकृषी विषयाचे पायाभूत ज्ञान मिळावेविद्यार्थ्यांनी पिकविलेल्या ताज्या भाजीपाल्याचाफळांचा समावेश त्यांच्या पोषण आहारात व्हावा आदी हेतूने राज्यात सर्व शाळा स्तरावर परसबागा निर्माण केल्या जात आहेत. या परसबागा निर्मितीकरिता मार्गदर्शनासाठी विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

Wednesday, 28 February 2024

वेल्सच्या शिष्टमंडळाची विधानभवनाला भेट

 वेल्सच्या शिष्टमंडळाची विधानभवनाला भेट

 

            मुंबई, दि.  28 : विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी इंग्लंडमधील वेल्सच्या शिष्टमंडळाने आज विधानभवनाला भेट दिली.             यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. या शिष्टमंडळात वेल्सचे फ्युचर जनरेशन्स कमिशनर डेरेक वॉकर, वेल्स ट्रिनिटी सेंट डेवीड विद्यापीठातील उपकुलगुरु कार्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ डॉ. शोन ह्युजेस आणि विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड ह्युमॅनिटीज शाखेचे अधिष्ठाता डॉ. जेरेमी स्मिथ यांचा समावेश होता. त्यांनी विधानसभा व विधानपरिषद गॅलरीमध्ये उपस्थित राहून कामकाज पाहिले.

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा

 सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक

उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा

- मंत्री अनिल पाटील

            मुंबई दि. 28 :- रायगड जिल्ह्यातील मौजे सांगवी या दरडप्रवणग्रस्त गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने करण्यात येणारी कामे व अन्य उपाय योजनांबाबत सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावाअशा सूचना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.

            मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात कर्जत तालुक्यातील (जि.रायगड) मौजे सांगवी या दरडप्रवणग्रस्त गावाच्या स्थलांतराबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरेमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीरायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळेविभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त विवेक गायकवाड,  उप सचिव सत्यनारायण बजाजप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले कीसांगवी गावात भारतीय भूवैज्ञानिक विभागाने (जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया- GSI) यांनी सूचविलेली कामे करण्यास प्राधान्य देण्यात यावे.  पावसाळ्यापूर्वी कामे करणे महत्वाची असल्याने संरक्षक भिंतीसह अन्य कामांचा सुधारित प्रस्ताव पाठवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक त्रुटी राहणार नाहीतयाची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. तसेच हा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारीरायगड यांच्यामार्फत तातडीने सादर करावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

००००

राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार

 राज्यातील तरूणांना कौशल्याधारित 

प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

•          अहमदनगर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिर

•          ३०० पेक्षा नामांकित अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग

 

            अहमदनगर दि. 28 फेब्रुवारी (जिमाका) :- बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास श्री. शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

            कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाखासदार डॉ.सुजय विखे पाटीलअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिलेनाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरमहानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळेकौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणेजिल्हा कौशल्यरोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

            राज्यात नागपूरलातूरनंतर अहमदनगर येथे नमो विभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेशासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रशिक्षण

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले कीराज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे.  राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५०  तालुक्यातील ५११ गावात  या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. उद्योग  व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला गुणवत्तेनुसारकौशल्याप्रमाणे  रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधिनी सुरू करणार

– कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री.लोढा म्हणाले कीपंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधिनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करुन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

जिल्ह्यात  २३ हजार रोजगार निर्माण होणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कीऔद्योगिकरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आली. ५ हजार १४ कोटींच्या सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन  कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारा मिळण्यासाठी प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवणही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार आहेअसे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून  मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा गुंतवणूक परिषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध उद्योजक उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही  युवक-युवतींना ॲप्रेंटीसशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी केले. कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे यांनी आभार मानले.

विभागीय रोजगार मेळाव्यास तरूणांचा उदंड प्रतिसाद

            भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात अहमदनगरनाशिकधुळेनंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगारस्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या. या रोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी पाच जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला.  महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत.

*******


 

धान खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 धान खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

            मुबईदि. 28 : खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

            किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबई जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा पंधरवड्यात अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करणार

 मुंबई जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा

पंधरवड्यात अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करणार

 

            मुंबई दि. 28 : मुंबई जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 5 मार्च 2024 पर्यंत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता व्हावी याकरिता मुंबई जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.

            अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावायाकरिता महिला बालविकास विभागामार्फत अब व कप्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडीलांचा मृत्यु दाखलाअर्जदाराचा जन्म दाखलानगरसेवक यांचा बालकांचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखलारहिवासी दाखलाआधारकार्डजात प्रमाणपत्रशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रबोनाफाईडफोटो कॉपी आदी कागदपत्रे अनाथ बालकांना पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वित आहे, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

 असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 

            मुंबई, दि. 28 : टेलरिंग व्यवसायातील अल्प उत्पन्न, कमी शिक्षीत अशा कारागीरांना संघटीत करणे गरजेचे आहे. टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी वाढविण्यासाठी शासनामार्फत शिबिराचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

            असंघटित टेलरिंग कामगारांच्या समस्यांबाबत नरिमन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकरप्रधान सचिव  विनिता वेद सिंगलआयुक्त डॉ. एच. पी. तुंबोरे आदिसह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री खाडे म्हणाले कीअसंघटित कामगारांना संघटित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असूनजास्तीत – जास्त  कामगारांनी येथे नोंदणी करावी. टेलरिंग व्यावसायिकांना संघटित करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली असूनत्यांना प्रशिक्षणव्यवसायासाठी साहित्यआर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. इतर कामगारांप्रमाणे टेलरिंग कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी श्री. खाडे यांनी केले.

 

Featured post

Lakshvedhi