Wednesday, 28 February 2024

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

 निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी

मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

 

            मुंबई, दि. 28 : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई - ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

            कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज

 अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबईदि. 27 : शाळामहाविद्यालयांमधील शिक्षणामध्ये कला शिक्षणाचा समावेश करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी शासनाने कला शिक्षणाची सोय करावीअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. जहांगिर आर्ट गॅलरी येथे बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित 132 व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी कलाकार पद्मश्री मनोज जोशीबॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह सोसायटीचे सदस्यकलाकार उपस्थित होते.

            मोबाईलच्या अतीवापरामुळे आज विद्यार्थीशिक्षकपालक तणावामध्ये असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणालेविद्यार्थ्यांमध्ये हिंसा पहायला मिळत आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे कला शिक्षण आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता जागी होते. विद्यार्थ्यांमध्ये वेगळा विचार करण्याचीप्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचीनवीन विषय शिकण्याची क्षमता जागृत होते. कलेमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासात सकारात्मक प्रभाव पडतो. व्यक्तीला तणावमुक्त होण्यासाठी कला मदत करते. कला शिक्षण हा शालेय शिक्षणातील महत्वाचा घटक आहे. कला म्हणजे चित्रकलाशिल्पकलासंगीतनृत्य आणि रंगभूमी या सर्वांचा त्यात समावेश होतो. आजच्या काळात कला शिक्षणाला कमी महत्व दिले जात आहे.

            राज्यपाल श्री. बैस म्हणालेदेशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगळी कला आहे. त्याची जोपासना करण्यात यावी. प्रत्येकाच्या घरात किमान एक कलाकृती असावी यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या संस्थांनीही प्रयत्न करावेत. सर्वसामान्य लोकांमध्ये कलाकृतींचे महत्व सांगणे ही आजची गरज आहे. तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचेही आयोजन करावे. आज डॉ. उत्तम पाचारणे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. याचा मला आनंद आहे. यासह अनेक कलाकारांचाही आज सन्मान केला जात आहे. पुरस्कार प्राप्त कलाकारांचे मी अभिनंदन करतो.

            संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेमध्ये संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर पद्मश्री मनोज जोशी कलेचे महत्व सांगताना म्हणालेकितीही कृत्रीम बुद्धीमता आली तरीही व्यक्तीमधील स्पंदन आणि कल्पनाशक्ती यावर ती मात करू शकत नाही.

            यावेळी डॉ. उत्तम पाचारणे यांना जाहीर करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला. उत्कृष्ट चित्रकारशिल्पकार यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत

 राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'दिलखुलास' आणि

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत

            मुंबई: दि27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्तमराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            मराठी भाषेतील विज्ञानाची व्याप्ती, संकल्पना आणि विविध तंत्रज्ञानाचे योगदान तसेच विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद विविध उपक्रम राबविते. मराठीतून वैज्ञानिक संशोधन आणि विज्ञानातील प्रगतीचा प्रसार करणे ही या परिषदेची मुख्य उद्दिष्टे आहेत. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणेविज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणेजीवनात विज्ञानाचे महत्त्व वाढवणेवैज्ञानिक संशोधन यासाठी मराठी विज्ञान परिषद राबवित असलेले उपक्रम तसेच महाराष्ट्रातील वैज्ञानिकांचे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योगदान याविषयी 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात श्री. देशपांडे यांनी माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात श्री. देशपांडे यांची मुलाखत बुधवार दि. 28गुरूवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी तसेच शुक्रवार दि. 1 आणि शनिवार दि. 2 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक अभिजित मुळ्ये यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000


 

मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी रोजी आरंभ लाभार्थ्यांना पहिला हप्त्याच्या 375 कोटी निधीचे होणार वितरण

 मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्र्यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी रोजी आरंभ

लाभार्थ्यांना पहिला हप्त्याच्या 375 कोटी निधीचे होणार वितरण

 

            मुंबई‍‍दि. 27 : मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा आरंभ प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

              आर्थिक वर्ष 2023-24 ते  2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2023-24 मध्ये मंजूर 3 लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून 17,00,728 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 7,03,497 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महा आवास अभियान 2023-24 अंतर्गत 7 लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.

0000

शैलजा पाटील/स.सं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

             मुंबईदि. 27 : राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्गरस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या 39 कि.मी लांबीचा रेल्वे मार्ग  व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रूपये खर्च आलेल्या न्यु आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या 32.84 कि.मी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी रोजी  यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

             रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 कि.मी दुपदरी रस्ता काम378 कोटी रूपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदीया) महामार्गावरील 42 कि.मी लांबीच्या क्राँक्रीटीकरण रस्ता कामतसेच 483 कोटी रूपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील 18 कि.मी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

 

 

कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल कोकण विभागस्तरीय "नमो महारोजगार मेळावा" 6 व 7 मार्च रोजी ठाणे येथे होणार

 कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल

कोकण विभागस्तरीय "नमो महारोजगार मेळावा"

6 व 7 मार्च रोजी ठाणे येथे होणार

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी,

तर बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करावी

            मुंबई, दि. 27 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय  कोकण   'नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. त्यानंतर  ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव या होणाऱ्या मेळाव्याच्या तारखा मध्ये बदल झाला आहे. हा मेळावा दि. 6 व 7 मार्च रोजी मॉडेला मिल कपाऊंडवागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे - ४००६०४ येथे होणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवतीतसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागांतर्गत ठाणेपालघररत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  'नमो महारोजगार मेळाव्याचेआयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

        या मेळाव्यात दहावीबारावी,आय.टी.आय.पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी  उपस्थित राहू शकतात.एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

       कोकण विभागांतर्गत ठाणेपालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्गमुंबई उपनगरमुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

-000000-

संध्या गरवारे/विसंअ/


 

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी

 

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी

- मंत्री संजय बनसोडे

           

             मुंबईदि. 27 : कोकणचा सर्वांगिण विकास होण्यासाठी कोकणातील बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायाभूत सोयी – सुविधांची विकास कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीअसे निर्देश बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

            कोकणातील विविध बंदर विकासाबाबत आढावा बैठक मंत्री श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरेबंदरे विभागाचे प्रधान सचिव संजय सेठीसहसचिव सिद्धार्थ खरातमुख्य अभियंता श्री. गोसावी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

            वाल्मिकी नगर जेट्टीचे नूतनीकरण करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. बनसोडे म्हणालेयेथील रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. जंजिरा येथे दोन रस्ते करून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात. आणखी एक रस्ता झाल्यास या भागाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल. पर्यावरणाला कुठलीही हानी पोहचणार नाहीयाची काळजी घ्यावी. यासाठी पर्यावरण विभागाची मान्यता घेवून कामे करावीत.

            बंदरांमधील विकास कामांचे नकाशे तातडीने संबंधित यंत्रणेकडून मंजूर करून ऑनलाईन अपलोड करावीत. बागमांडला जेट्टीजवळ पार्किंग व इतर सुविधा देण्यात याव्यात. शेखाडी जेट्टीचे मजबूतीकरणाचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. आरावी व कोंडबील या जुन्या जेट्टी असून त्यांचे नूतनीकरण करण्यात यावेअसेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बंदर विकासाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi