Tuesday, 27 February 2024

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये सर्वाधिक 17 क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली दखल

 श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये

सर्वाधिक 17 क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली दखल

- मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

          मुंबईदि.27 : श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये एकाचवेळी सर्वाधिक 17 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने दखल घेतली असून याबाबतचे प्रमाणपत्रही त्यांनी वितरित केले आहे याबद्दल अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

            कौशल्य,रोजगारउद्योजकता नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पेनेतून सुरु झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाची नुकतीच सांगता झाली. 26 जानेवारी 2024 पासून मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी पारंपरिक देशी खेळांची स्पर्धा आयोजित केली गेली होती. मल्लखांबमल्लयुद्ध,लेझीमलंगडीरस्सीखेचकबड्डीपंजा लढवणेरस्सीखेच आणि ढोल ताशा या क्रीडा आणि कला प्रकारांचे अंतिम सामने मालवणी येथील 'क्रीडा भारती मैदानयेथे झाले आणि  पुरस्कार वितरणासह स्पर्धेचा नुकताच समारोप झाला.

            कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, मुंबईत प्रथम पारंपरिक क्रीडा स्पर्धा महाकुंभ यशस्वीरित्या पूर्ण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ'  आयोजित केले  होते.या स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेतली असून याबाबत त्यांनी प्रमाणपत्र ही वितरण केले आहे.

             देशी खेळांच्या माध्यमातून शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेली तरुण पिढी घडवण्यास हातभार लावूयादेशाचे भविष्य घडविण्याची ताकद असलेले तरुण घडवण्यासाठी मदत होईल, असे श्री.लोढा यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी क्रीडा भारती'चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकरबृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांसह सर्वांचे सहकार्य मिळाले.

अशी झाली श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा

            छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभात मुंबईकरांना आश्चर्यचकित करणारेअंगावर रोमांच उभे करणारे आणि प्रेरणा देणारे अनेक क्षण अनुभवायला मिळाले. स्पर्धेच्या प्रत्येक भागात तितकीच चुरस होती. शिवकालीन खेळांचा असा महोत्सव प्रथमच मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. आजवर या क्रीडा महाकुंभात मध्ये 17 खेळांच्या स्पर्धा झाल्या असून त्यामध्ये दोन ते अडीच लाख खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनगडकिल्ल्यांच्या सुबक आणि हुबेहूब प्रतिकृतीचे प्रदर्शनमर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेढोल ताशांच्या स्पर्धा अश्या अनेक लक्षवेधक गोष्टी नागरिकांच्या पसंतीस उतरल्या. पावनखिंड दौड या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण करण्याचा 81 वर्षाच्या गृहस्थांचा तरुणांना लाजवेल असा उत्साहशरीर सौष्ठेव स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांनी दाखवलेली जिद्दप्रत्येक टप्प्यावर पुरुषांच्या तोडीस तोड स्पर्धा करणाऱ्या महिला असे अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले.

0000

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण § 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार

 प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी.एम. किसान सन्मान निधी व

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे होणार वितरण

§  28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर

पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार

मुंबई, दि. 27 : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 23 मार्च2024 कालावधीतील 16 वा हप्ता  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि 28 फेब्रुवारी2024 रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ दि. 28 फेब्रुवारी, 2024 च्या समारंभात राज्यातील सुमारे 88.00 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी, 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरीरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेउपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री  अजित पवारवनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजनयवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोडकृषी मंत्री धनंजय मुंडेगृहनिर्माणइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेकेंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसानयोजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पतीपत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत दि. 24 फेब्रुवारी, 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये रू. 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

समारंभास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पदधतीने सहभागी व्हावे

 - कृषीमंत्री धनंजय मुंडे

हा समारंभ केंद्र शासनाचा कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही प्रधानमंत्री यांच्या हस्ते या समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.  

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम रू. 1943.46 कोटीचा लाभ  राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहेराज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहेत्यामुळे या लाभार्थींना पी.एम.किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे.

राज्यात सन 2023-24 पासून पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने पी. एम. किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील 85.60 लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम रू. 1712 कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. महाराष्ट्र शासन सन 2023-24 मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या योजनेमधून जवळपास रू. 3800 कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.   

०००००

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी

 मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी

- अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे निर्देश

 

            मुंबईदि. २७ :- मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावीअसे निर्देश अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.

            संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावीअसे अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.

            या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झालेतथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईलअसेही त्यांनी सांगितले.

घराचे स्वप्न पूर्ण करणार

  घराचे स्वप्न पूर्ण करणार

                                                            -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणेदि.24 (जिमाका) : प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावेअसे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहआयोजित कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) म्हाडा सदनिका सोडत 2023-24 संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते. कोंकण विभागातील 5 हजार 311 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आयोजित केले होती.

            यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावेविधानपरिषद आमदार निरंजन डावखरेआमदार संजय केळकरमाजी आमदार रवींद्र फाटकठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालकोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले कीअन्नवस्त्र व निवारा ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात राबविली जाते. अल्प उत्पन्न गटअत्यल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना या सदनिकांचे सोडतीद्वारे वाटप करण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्याला केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. राज्य शासनाकडून सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर घरे निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गिरणी कामगारांना देखील घरे देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. हे सर्वसामान्यांचे शासन असून सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने चालले आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.

            ते पुढे म्हणाले कीआपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून आता अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात आणि राज्यात सर्वांगीण विकास होताना दिसतोय. शासनाकडून देण्यात येणारी ही सर्व घरे वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत. जे वेळेत घर पूर्ण करतील त्यांना सन्मानित करण्यात येईल, तर जे काम वेळेत पुर्ण करणार नाहीत त्यांना निश्चितच दंड आकारण्यात येईल. 

            शेवटी म्हाडा सदनिका सोडत 2023-24 मध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत त्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी म्हाडाचे अधिकारी-कर्मचारीसोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

Everyone’s dream of owning a house will be fulfilled- Chief Minister Mr Eknath Shinde

 

            Thane, February 24:- Stating that every common men has a dream of owning a house, Chief Minister Mr Eknath Shinde said that this government is going to fulfill everybody’s dream of owning their own home.

He was speaking at the program for selecting the owners of MHADA houses for the year 2023-24 using a computerized system. The program was organized by the Konkan Housing and Area Development Board (KHADB)  at the Ram Ganesh Gadkari Rangayatan Natya Guru in Thane. This lottery of selecting the 5 thousand 311 houses for sale was today held here for the Konkan division.

Housing Minister Atul Save, member of legislative council Niranjan Dawkhare, legislator Sanjay Kelkar, former legislator Ravindra Fatak, District Magistrate of Thane District Ashok Shingare, vice -president and chief executive officer (CEO) of MHADA Sanjeev Jaiswal, chief executive officer of Konkan Housing and Area Development Board Maruti More and other dignitaries were present during the program.

Speaking further, Chief Minister Mr Eknath Shinde said that food, clothing and shelter are the fundamental needs of the time and also the society, adding that the union and the state government are taking all out efforts for providing these basic needs to the common people. He said that the Pradhan Mantri Awas Yojana is implemented for both- the people of urban as well as rural areas. He said that these houses are distributed by selecting the applicants through a lottery system from the very low income group, low income group (LIG), and medium income group (MIG).

 Mr Shinde said that the state is getting huge assistance from the union government. He also said that the state government is committed to construct houses for all on a large scale, adding that the distribution of houses to the Mill workers has already started. The Chief Minister said that the state government is constructing houses for many needy families. He said that this government is the government of common people and its functioning is going ahead with transparency. He also said that emphasis is given for providing infrastructural facilities to all.

The chief minister further said that the economy of our nation is progressing and marching ahead and today it stands at the third position in the world. He further said that the overall development can be witnessed in the state as well as the entire nation. Mr Eknath Shinde said that all the houses that are going to be given by the government, should be completed within the stipulated time, adding that those who will complete it within the time bound limit will be awarded whereas, those who will not, will be penalized.


विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर ‘जागर’

 विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर जागर

            मुंबईदि. 26 : रस्ता सुरक्षा अभियान यावर्षी 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या महिनाभराच्या कालावधीत राज्यभर राबविण्यात आले. या अभियानात शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणारे उमेदवाररिक्षा व टॅक्सी चालक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजनविद्यार्थ्यांना हेल्मेट वाटपवाहन चालकांना रस्ता सुरक्षा जनजागृती परिसंवाद आदी उपक्रम राबविण्यात आले.

            प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) कार्यालयाच्यावतीने शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शनदुचाकी चालविताना हेल्मेट वापरणेचारचाकी वाहन चालविताना सिटबेल्ट वापरणेगरज नसताना हॉर्न न वाजवणे यासाठी सुमारे 830 उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्की अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या 1241 उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानादरम्यान रस्ता सुरक्षेविषयी सुमारे 3 हजार इतक्या रिक्षा व टॅक्सी चालकांस मार्गदर्शन करण्यात आले.

            तसेच नवीन तरुण वर्गामध्ये वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृतीसाठी परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व मे. युनायटेड वेमुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या व्हाया सेफ मोबीलीटी प्रोग्रॅम यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा संवाद कार्यक्रम राबविण्यात आला.  हा कार्यक्रम मे. नॅशनल कन्नडा एज्युकेशन सोसायटी वडाळामे. पीस पब्लिक स्कूल ट्रॉम्बेगुरूनानक सेकंडरी स्कूल जीटीबी नगरऑक्झीलम काँन्व्हेट हायस्कूल वडाळाविवेक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज गोरेगांवएएफएसी इंग्लिश स्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालयसिताराम प्रकाश हायस्कूल वडाळासरस्वती विद्यालय चेंबूर या विविध शाळेत आयोजित करण्यात आला. यामध्ये सुमारे 1345 विद्यार्थी व 225 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे एकूण 1570 विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन थ्री डी मॉडेल चित्रीकरणाद्वारे  करण्यात आले.

            रिक्षा व टॅक्सी चालकांची 17 व 24 जानेवारी रोजी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्युट वडाळालोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रूग्णालय सायन व मुंबई टॅक्सीमेन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 वेळामे. लायन्य क्लब व डॉ. अग्रवाल आय हॉस्पीटल चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 556 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासलेल्या वाहन चालकांमध्ये 42 मोतिबिंदू, 38 रेटीना संबंधीत व्याधी, 58 जणांमध्ये निकट व दूर दृष्टीदोषदूर किंवा निकट दृष्टीदोष 109 वाहन चालकांमध्ये आढळून आला.  यावेळी 159 वाहन चालकांना विनामूल्य चष्मे वितरीत करण्यात आले. के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व वाणिज्यकला महाविद्यालय विद्याविहार येथे आयोजित कार्यक्रमात 560 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 100 विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आला.

            या कालावधीत 55 दोषी दुचाकी वाहन चालकांवर तपासणीअंती कारवाई केली. जनजागृती शिबिरात सुमारे 414 पेक्षा जास्त उमेदवारचालकांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 95 उमेदवारांनी अपली नावे अवयव दान करण्यासाठी नोंदविली आहे.  ताजमहाल हॉटेल येथील व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर्स लिमिटेड चेंबूर येथे 29 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येकी 100 पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते. भारत पेट्रोलियम कंपनी लिमीटेड माहूलट्रॉम्बे यांच्या संशोधन प्रशिक्षण केंद्र येथे धोकादायक मालाचे वहन करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत 340 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली असून  वायुवेग पथकामार्फत 11 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली.

        मोहिम काळात 75 वाहनांच्या तपासणीतून 22 वाहनांना रिफ्लेक्टर टेप बसविले तर 40 वाहनांवर कारवाई करण्यात आली. सिटबेल्ट न वापरण्याबाबत 40 वाहन चालकांची तपासणी करण्यात आलीयामध्ये वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच बसेसमध्ये वाहनातील अग्नीप्रतिरोधक सुरक्षेसंदर्भात योग्य ते मार्गदर्शनअपघात ग्रस्तांना मदत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सुमारे 7500 पेक्षा जास्त सुरक्षा सुरक्षेबाबत माहिती पत्रिकांचे वाटप करण्यात आलेअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा - मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी

विशेष मोहीम राबवा

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

            मुंबई दि. 26 - माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

            विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनिल चव्हाणप्रत्येक जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य अभियंताजिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) उपस्थित होते.

            मंत्री श्री. राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाबाबत आढावा घेऊन गोंदिया जिल्ह्यातील ४४४ तलावांच्या पुनरुज्जीवन व योजनांची दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटीभंडारासाठी ८५ तलावांच्या दुरूस्तीसाठी २७.०५ कोटीचंद्रपूर येथील ४६० तलावांच्या दुरूस्तीसाठी १२०. ३२ कोटीव गडचिरोली जिल्ह्यातील १०७ तलावांसाठी २९.०५ कोटींच्या कामांस मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. मान्यता देण्यात आलेल्या ११०६ तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची कामे गतीने आणि उत्तम गुणवत्तेने करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिल्या.

            यवतमाळ जिल्ह्यात 31 तलावांची दुरुस्ती करण्याचे नियोजित असूनतातडीने या संदर्भातील सुधारित प्रस्ताव पाठवावा. या कामानंतर यवतमाळमध्ये अंदाजे 600 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. नागपूरनांदेड व यवतमाळ जिल्ह्याचा सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा. या जिल्‍ह्यातील तलावांच्या कामासही गती देण्यात यावी. संबंधित सर्व कामे दर्जेदार होतील यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे. अनुभवी व्यक्तीमार्फत उत्तम दर्जाची व्हावीत यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

०००

5 हजार 605 अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकरकमी लाभ मिळणार

 5 हजार 605 अंगणवाडी सेविका आणि

अंगणवाडी मदतनीस यांना एकरकमी लाभ मिळणार

-  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 26 : अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या  निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये ७५ हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक १ एप्रिल२०२२ पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्तीराजीनामामृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

            हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक ३० एप्रिल २०१४ मध्ये नमूद  केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 

            अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi