Tuesday, 27 February 2024

विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर ‘जागर’

 विविध उपक्रमांमधून रस्ता सुरक्षेचा महिनाभर जागर

            मुंबईदि. 26 : रस्ता सुरक्षा अभियान यावर्षी 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या महिनाभराच्या कालावधीत राज्यभर राबविण्यात आले. या अभियानात शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणारे उमेदवाररिक्षा व टॅक्सी चालक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजनविद्यार्थ्यांना हेल्मेट वाटपवाहन चालकांना रस्ता सुरक्षा जनजागृती परिसंवाद आदी उपक्रम राबविण्यात आले.

            प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व) कार्यालयाच्यावतीने शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शनदुचाकी चालविताना हेल्मेट वापरणेचारचाकी वाहन चालविताना सिटबेल्ट वापरणेगरज नसताना हॉर्न न वाजवणे यासाठी सुमारे 830 उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्की अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या 1241 उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानादरम्यान रस्ता सुरक्षेविषयी सुमारे 3 हजार इतक्या रिक्षा व टॅक्सी चालकांस मार्गदर्शन करण्यात आले.

            तसेच नवीन तरुण वर्गामध्ये वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृतीसाठी परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व मे. युनायटेड वेमुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या व्हाया सेफ मोबीलीटी प्रोग्रॅम यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा संवाद कार्यक्रम राबविण्यात आला.  हा कार्यक्रम मे. नॅशनल कन्नडा एज्युकेशन सोसायटी वडाळामे. पीस पब्लिक स्कूल ट्रॉम्बेगुरूनानक सेकंडरी स्कूल जीटीबी नगरऑक्झीलम काँन्व्हेट हायस्कूल वडाळाविवेक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज गोरेगांवएएफएसी इंग्लिश स्कूल अँड कनिष्ठ महाविद्यालयसिताराम प्रकाश हायस्कूल वडाळासरस्वती विद्यालय चेंबूर या विविध शाळेत आयोजित करण्यात आला. यामध्ये सुमारे 1345 विद्यार्थी व 225 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे एकूण 1570 विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन थ्री डी मॉडेल चित्रीकरणाद्वारे  करण्यात आले.

            रिक्षा व टॅक्सी चालकांची 17 व 24 जानेवारी रोजी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्युट वडाळालोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रूग्णालय सायन व मुंबई टॅक्सीमेन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 वेळामे. लायन्य क्लब व डॉ. अग्रवाल आय हॉस्पीटल चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 556 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासलेल्या वाहन चालकांमध्ये 42 मोतिबिंदू, 38 रेटीना संबंधीत व्याधी, 58 जणांमध्ये निकट व दूर दृष्टीदोषदूर किंवा निकट दृष्टीदोष 109 वाहन चालकांमध्ये आढळून आला.  यावेळी 159 वाहन चालकांना विनामूल्य चष्मे वितरीत करण्यात आले. के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व वाणिज्यकला महाविद्यालय विद्याविहार येथे आयोजित कार्यक्रमात 560 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 100 विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आला.

            या कालावधीत 55 दोषी दुचाकी वाहन चालकांवर तपासणीअंती कारवाई केली. जनजागृती शिबिरात सुमारे 414 पेक्षा जास्त उमेदवारचालकांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 95 उमेदवारांनी अपली नावे अवयव दान करण्यासाठी नोंदविली आहे.  ताजमहाल हॉटेल येथील व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर्स लिमिटेड चेंबूर येथे 29 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येकी 100 पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते. भारत पेट्रोलियम कंपनी लिमीटेड माहूलट्रॉम्बे यांच्या संशोधन प्रशिक्षण केंद्र येथे धोकादायक मालाचे वहन करणाऱ्या व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत 340 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली असून  वायुवेग पथकामार्फत 11 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली.

        मोहिम काळात 75 वाहनांच्या तपासणीतून 22 वाहनांना रिफ्लेक्टर टेप बसविले तर 40 वाहनांवर कारवाई करण्यात आली. सिटबेल्ट न वापरण्याबाबत 40 वाहन चालकांची तपासणी करण्यात आलीयामध्ये वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच बसेसमध्ये वाहनातील अग्नीप्रतिरोधक सुरक्षेसंदर्भात योग्य ते मार्गदर्शनअपघात ग्रस्तांना मदत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सुमारे 7500 पेक्षा जास्त सुरक्षा सुरक्षेबाबत माहिती पत्रिकांचे वाटप करण्यात आलेअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi