Tuesday, 27 February 2024

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी

 मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी

- अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे निर्देश

 

            मुंबईदि. २७ :- मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावीअसे निर्देश अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.

            संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावीअसे अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले.

            या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झालेतथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईलअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi